मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
आज्ञा

श्रीदत्त भजन गाथा - आज्ञा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १८-१२-१९३०

आज्ञापिती देव आइती करावी । वाहने करावी सिद्ध आतां ॥१॥
येथोनियां आम्ही आतां निघणार । इतरत्र संचार करणार ॥२॥
उपासना धर्म विस्तृत कराया । भजनी लावाया जनलोकां ॥३॥
आम्हां येथोनियां आतां असे जाणे । प्रगट होईणे इतरत्र ॥४॥
धर्मसंस्थापना आमुचे बीरुद । भक्त-वर-प्रद आम्ही सदा ॥५॥
नित्य भक्तांपाशी आम्ही वसतसो । सदा रक्षितसो निजदासां ॥६॥
भक्तह्र्दयधामी आम्हां सदा वास । भक्ताचे काजास धांवतसो ॥७॥
तरी सज्जनानी करुं नये खंती । तयांसी सुगति नित्य प्राप्त ॥८॥
दुर्जना दुर्गति सुजना सद्गति । हेच एक रीति जगत्रयी ॥९॥
यास्तव सुजनी करु नये शोक । धरावा विवेक चित्तामाजी ॥१०॥
लोकोपकारासाठी आम्हां असे जाणे । क्वचित गुप्त होणे प्रगटोनी ॥११॥
विनायक म्हणे सिद्धता करणे । प्रस्थान ठेवणे सुमुहूर्ती ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP