मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
श्रीदत्त भजन गाथा -योगश्चित्तवृत्तिनिरोध

श्रीदत्त भजन गाथा -योगश्चित्तवृत्तिनिरोध

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ७/११/१९२९
आवरावी सदा ऊर्मि ह्रदयाची । घडी दक्षतेची ठेवावी ती ॥१॥
सैरावैरा मन जाऊं नच द्यावे । नित्य ते ठेवावे दृढत्वाने ॥२॥
अंत:करणाची वृत्ती न उठावी । दृढता असावी निश्चयाची ॥३॥
शपथ जेविं आम्ही घेवोनि वागतो । कधी न मोडीतो प्राण गेल्या ॥४॥
तैशी येथे घ्यावी शपथ निश्चयी । दृढता ह्रदयी असावी ती ॥५॥
स्पंदन ह्रदयाचे प्रत्यय बुद्धिचे । स्तब्धतेने साचे शोभवावे ॥६॥
घट्टमने असा नित्य या अभासी । भजतां देवासी चळूं नका ॥७॥
देह दु:ख कांही मुळि न मानावे । वेगळे रहावे देहातुनी ॥८॥
इंद्रिये मारावी मनही मारावे । दृढ ठाणे द्यावे अंतरांत ॥९॥
मारावे देहासी प्रेतरुप व्हावे । देवी मिसळावे ऐक्यरुपे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP