श्रीदत्त भजन गाथा - उपासनामहती
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २-१०-१९३०
उपासनेवीण समर्थ साधन । नसे जाण आन जगत्रयी ॥१॥
योग याग जरी किती सिद्ध झाले । थोडके ते भले परमार्थी ॥२॥
मन:शुद्धिवीण परमार्थी गति । नोहे कोणाप्रति निश्चित हे ॥३॥
मनोविकासन उपासना योगे । बद्ध अनुरागे होतां देवी ॥४॥
जेव्हा देवमय होवोनी रहात । मन हे पाहत देवालागी ॥५॥
आपणांसी जेव्हा करी देवमय । होवोनी प्रेममय सानुबंधे ॥६॥
तेव्हांच शुद्धि होत मन विकासत । ज्ञान निर्धारत मग तेथे ॥७॥
निश्चयाची प्राप्ति मनाच्या शोधने । प्रकाशत ज्ञाने मन मग ॥८॥
विनायक म्हणे म्हणोनि सगुणा । मज नारायणा सर्वकाळ ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2020
TOP