मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
सदा वस देवा ठायी

श्रीदत्त भजन गाथा - सदा वस देवा ठायी

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सदा वस देवाठायी । प्रेम ठेव त्याचे पायी ॥१॥
भजनाची धरी कांस । आवरी आपुली आस ॥२॥
स्वरुपांत मग्न होई । परततां उडी घेई ॥३॥
गंगाजलाचे हे स्नान । किंवा अमृताचे पान ॥४॥
किंवा जोत्स्नामय होणे । तैशा वृत्तीस ठेवणे ॥५॥
येथे संकल्प फ़ळती । सर्व काम पूर्ण होती ॥६॥
पूर्ण होतसे आशा ती । तैशी जाण प्रतीक्षा ती ॥७॥
परम होय समाधान । मन जातसे बुडोन ॥८॥
आनंदी आनंद । जगी येत पूर्णानंद ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP