मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
योगाचा दुरुपयोग

श्रीदत्त भजन गाथा - योगाचा दुरुपयोग

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


योगाचिया योगे बळ इंद्रियांचे । वाढवितां साचे काय होय ॥१॥
भोगाचि लालसा अधिक वाटत । शम न पावत चित्त कांही ॥२॥
भोग-सामर्थ्याला वाढवीतो योग । भोगाचाच योग घडे मग ॥३॥
अणिमादि सिद्धी सकळ प्राप्त होती । ऐश्वर्य प्राप्त होती संपूर्णत्वे ॥४॥
म्हणोनियां योग ज्ञानालागी आड । लावित कवाड जणूं कांही ॥५॥
जरी न भक्तीयोग उपासना कांही । भोग व्यर्थ पही होत असे ॥६॥
सिद्धीयोगे सिद्ध होतां होतो मत्त । सर्वदा अतृप्त अशांत तो ॥७॥
मग ज्ञान कैचे कैचा प्रेमरंग । सदा अंतरंग अविवेकी ॥८॥
सिद्धीचीया बळे मर्यादा उल्लंघी । पडतसे अधीं दारुणी तो ॥९॥
मग दैत्यत्वचि तयालागी येत । कैसा मुक्त होत योगे सांगा ॥१०॥
म्हणोनिया नित्य देवाचे भजन । करा गहिंवरुन प्रेमरंगे ॥११॥
विनायक म्हणे नित्य उपासना । याच एक साधना आश्रयावे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP