मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
स्वरुपवर्णन

श्रीदत्त भजन गाथा - स्वरुपवर्णन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २६/१२/१९२९
मधुर किती हांसे वृत्तीते मोहवी । जीवांते रंगवी निजठायी ॥१॥
मधुर आनन अमल कान्ती किती । स्पर्शसुखा मिती नाही नाही ॥२॥
किती कोमल हा किती हा सुखाचा  सुगंध अंगीचा बहुमोल ॥३॥
किती रंगवीतो भान विसरवीतो । किती आनन्दवीतो दत्तात्रेय ॥४॥
आनंदसागर मूस आनंदाची । मूर्ति मंगलाची वानूं कैसी ॥५॥
जीवाचा हा जीव प्राणाचा हा प्राण । कारण-कारण आत्माराम ॥६॥
मूर्त सुख वाटे जणूं एकवटले । शमन हे भले विकारांचे ॥७॥
मनन मनाचे वाचन वाचेचे । ह्रदय ह्रदयाचे प्रगटले ॥८॥
सच्चित् सुख भेट आम्हाते घडत । भजन रंगत त्याचे नांवे ॥९॥
अमल पाहाणे अमल हांसणे । अमल असे लेणे सदा त्याचे ॥१०॥
अमल हा प्रभु विमल तद्यश । ईशाचा हा ईश जगत्प्रभु ॥११॥
ईश्वर हा जाणा सकळ कारण । यांसी आवरण नाही नाही ॥१२॥
शुद्धबुद्ध आहे परम चैतन्य । याचे सम अन्य नाही कोण ॥१३॥
वदान्य हा प्रभु धीराचा हा धीर । वीराचा हा वीर दत्तनाथ ॥१४॥
विनायक झाला लीन स्वरुपांत । गुरु अवधूत तरी त्याला ॥१५॥
(प्रवचनांत केलेले अभंग )
==
स्वरुपवर्णन
येई येई माझ्या दत्ता । तुझी सर्व हे बा सत्ता ॥१॥
देव माझा हा शहाणा । किती दिसतो देखणा ॥२॥
माझ्य़ा फ़ार आवडीचा । माझा असे सलगीचा ॥३॥
माझ्या जीवींचा हा जीव । माझा आनंदाचा भाव ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP