आतां रजस्वलास्नान सांगतो.
अथरजस्वलास्नानं दैवज्ञवल्लभः ब्रह्मानुराधाश्विनसोमभेषुहस्तानिलाखंडलवासवेषु विश्वार्यमर्क्षोत्तरभाद्रभेषुवरांगनास्नानविधिः प्रदिष्टः ज्वरेतूशनाः ज्वराभिभूतायानारीरजसाचपरिप्लुता कथंतस्याभवेच्छौचंशुद्धिः स्यात्केनकर्मणा चतुर्थेहनिसंप्राप्तेस्पृशेदन्यातुतांस्त्रियं सासचैलावगाह्यापः स्नात्वास्नात्वापुनः स्पृशेत् दशद्वादशकृत्वोवाआचामेच्चपुनः पुनः अंतेचवाससांत्यागस्ततः शुद्धाभवेत्तुसेति इदंचातुरमात्रेज्ञेयं आतुरेस्नान उत्पन्नेदशकृत्वोह्यनातुर इतिपराशरोक्तेः रजसोज्ञानेतुपराशरमाधवीयेप्रजापतिः अविज्ञातेमलेसाचमलवद्वसनायदि कृतंगृहेषुदुष्टंस्याच्छुद्धिस्तस्यास्त्रिरात्रतः देवजानीयेकारिकायां उच्छिष्टातुद्विजातीनांरजः स्त्रीयदिपश्यति उपवासमधोच्छिष्टेऊर्ध्वोच्छिष्टेत्र्यहंक्षिपेदिति ।
दैवज्ञवल्लभ - “ रोहिणी, अनुराधा, अश्विनी, मृगशीर्ष, हस्त, स्वाती, ज्येष्ठा, धनिष्ठा, उत्तराषाढा, उत्तरा, उत्तराभाद्रपदा, या नक्षत्रांचे ठायीं श्रेष्ठ स्त्रियांना स्नान सांगितलें आहे. ” ज्वर असेल तर सांगतो उशना - “ जी स्त्री ज्वरानें व्याप्त असून रजस्वला झाली असेल तिचें शौच कसे होईल ? व कोणत्या कर्मानें तिची शुद्धि होईल ? चवथा दिवस प्राप्त झाल्यावर दुसर्या स्त्रियेनें तिला स्पर्श करुन उदकांत वस्त्रसहित बुडी मारुन पुनः स्पर्श करुन स्नान करावें. याप्रमाणें दहावेळां किंवा बारावेळां स्नान करावें आणि वारंवार ( प्रत्येक स्नानानंतर ) आचमन करावें. रजस्वला स्त्रियेनें प्रत्येक वेळीं वस्त्र पालटावें. अंती सारीं वस्त्रें टाकून द्यावीं. असें केल्यानें ती रजस्वला स्त्री शुद्ध होईल. ” हा स्नानप्रकार सर्व अतुरांच्या स्नानाविषयीं समजावा. कारण, “ आतुरांना नैमित्तिक स्नान प्राप्त असतां अनातुर ( निरोगी ) असेल त्यानें दहावेळां स्नान करावें ” असें पराशरवचन आहे. रजाचें अज्ञान असेल तर सांगतो पराशरमाधवीयांत प्रजापति - “ स्त्रियेला रजाचें ज्ञान झालें नसतां तिचें वस्त्र जर रजानें भरलें असेल तर तिनें घरांत केलेलें कर्म दूषित होईल. व तिची शुद्धि तीन दिवसांनीं होईल. ” देवजानीयांत कारिकेंत - “ ब्राह्मणादिकांची स्त्री उच्छिष्ट असून रजस्वला होईल तर सांगतो - अधरोच्छिष्ट असून झाली तर उपवास. आणि उर्ध्वोच्छिष्ट असून झाली तर तिनें तीन दिवस उपवासव्रत करावें. ”