आतां पुंसवन सांगतो.
अथपुंसवनं प्रयोगपारिजातेजातूकर्ण्यः द्वितीयेवातृतीयेवामासिपुंसवनंभवेत् व्यक्तेगर्भे भवेत्कार्यंसीमंतेनसहाथवा बृहस्पतिः तृतीयेमासिकर्तव्यंगृष्टेरन्यत्रशोभनं गृष्टेश्चतुर्थेमासेतुषष्ठेमास्यथवाष्टमे सकृत्प्रसूतागृष्टिः एतेनप्रतिगर्भमपिभवतीतिविज्ञायते बह्वृचकारिकापि कर्तास्याद्देवरस्तस्यायस्याः पत्युरसंभवः आवर्तत इदकर्मप्रतिगर्भमितिस्थितिः ब्राह्मे गर्भाधानादिसंस्कर्तापतिः श्रेष्ठतमः स्मृतः अभावेस्वकुलीनः स्याद्वांधवोवान्यगोत्रजः मदनरत्नेसत्यव्रतः मृतोदेशांतरगतोभर्तास्त्रीयद्यसंस्कृता देवरोवागुरुर्वापिवंश्योवापिसमाचरेत् हेमाद्रौयमः प्रथमेमासिद्वितीयेवायदापुंनक्षत्रेणचंद्रमायुक्तः स्यादितिवराहः हस्तोमूलंश्रवणः पुनर्वसुर्मृगशिरस्तथापुष्यः पुंसंज्ञकेषुकार्येष्वेतानिशुभानिधिष्ण्यानि अनूराधापिपुंनक्षत्रं अनूराधान् हविषावर्धयंत इतिश्रुतेः गर्गोपि पुन्नामाश्रवणस्तिष्योहस्तश्चैवपुनर्वसुः अभिजित् प्रोष्ठपाच्चैव अनूराधास्तथाश्वयुक् नृसिंहः रिक्तांपर्वचनवमींत्यक्त्वापुंसवनेशुभाः ज्योतिर्निबंधेवसिष्ठः मृत्युश्चसौरेस्तनहानिरिंदोर्मृतप्रजापुंसवनेबुधस्य काकीववंध्याभवतीहशुक्रेस्त्रीपुत्रलाभोरविभौमजीवैः अनवलोभनस्याप्ययमेवकालः दीपिकायांतुचतुर्थेऽनवलोभनमित्युक्तम् ।
प्रयोगपारिजातांत जातूकर्ण्य - “ गर्भधारणापासून दुसर्या किंवा तिसर्या मासांत पुंसवन संस्कार होतो. पुंसवन संस्कार गर्भ व्यक्त ( स्पष्ट ) झाल्यावर करावा. किंवा सीमंतोन्नयनासह करावा. ” बृहस्पति- “ गृष्टी ( एकवार प्रसूत स्त्री ) वर्ज्य करुन इतर स्त्रियेचें पुंसवन तिसर्या मासांत करावें, तें शुभ आहे. गृष्टीचें चवथ्या किंवा सहाव्या अथवा आठव्या मासांत करावें. ” या वचनावरुन पुसवन संस्कार प्रत्येक गर्भालाही होतो, असें समजतें. बह्वृचकारिका ही - “ जिच्या पतीचा असंभव असेल तिच्या त्या संस्काराचा कर्ता दीर होईल. त्या पुंसवनकर्माची प्रत्येक गर्भाला आवृत्ति होते, अशी शास्त्रमर्यादा आहे. ” ब्राह्मांत - “ गर्भाधानादिक संस्काराचा कर्ता पति मुख्य आहे. पतीच्या अभावीं आपल्या कुलांतील पुरुष, अथवा अन्यगोत्रज बांधव कर्ता होय. ” मदनरत्नांत सत्यव्रत - “ भर्ता मृत झाला किंवा देशांतरीं गेला असून जर स्त्रियेचा संस्कार झाला नसेल तर तिचा दीर किंवा गुरु अथवा वंशांतील पुरुष यांनें तिचा संस्कार करावा. ” हेमाद्रींत यम - “ पहिल्या मासांत किंवा दुसर्या मासांत ज्या वेळीं पुरुष नक्षत्रानें युक्त चंद्रमा असेल त्या वेळीं पुंसवन करावें. ” वराह - “ हस्त, मूल, श्रवण, पुनर्वसु, मृगशीर्ष, पुष्य हीं पुरुषनांवाच्या कर्माविषयीं शुभ आहेत. ” अनुराधा देखील पुंन क्षत्र आहे. कारण, “ अनूराध जे त्यांना हवीनें वाढविणारे ” अशी श्रुति आहे. या श्रुतींत ‘ अनूराधान् ’ असा पुल्लिंगनिर्देश आहे. गर्गही - “ श्रवण, पुष्य, हस्त, पुनर्वसु, अभिजित्, प्रोष्ठपदा ( अषाढा ), अनुराधा, आणि अश्विनी हीं पुंनक्षत्रें होत. ” नृसिंह - “ रिक्ता तिथि, पर्व ( अमा, पूर्णिमा ), नवमी ह्या तिथि टाकून बाकीच्या तिथि पुंसवनाविषयीं शुभ आहेत. ” ज्योतिर्निबंधांत वसिष्ठ - “ शनिवारीं पुंसवन झालें असतां मृत्यु येतो. इंदुवारीं स्तनहानि होते. बुधवारीं पुंसवन असतां प्रजा मरते. शुक्रवारीं काकवंध्या ( एकवार प्रसवणारी ) होते. रविवारीं, भौमवारीं, गुरुवारीं पुंसवन केलें असतां कन्या व पुत्र होतात. ” अनवलोभन संस्काराचा देखील हाच काल आहे. दीपिकेंत तर चवथ्या मासांत अनवलोभन होतें, असें सांगितलें आहे.