कन्यादानेप्रपितामहपूर्वकमित्युक्तंस्मृत्यर्थसारे नांदीमुखेविवाहेचप्रपितामहपूर्वकं नामसंकीर्तयेद्विद्वानन्यत्रपितृपूर्वकम् नांदीमुखेइतिबह्वृचाद्यतिरिक्तविषयम् गृह्यपरिशिष्टे पित्राद्यानुलोम्याम्नानात् व्यासः भुक्त्वासमुद्वहेत्कन्यांसावित्रीग्रहणंतथा उपोषितः सुतांदद्यादर्चितायद्विजायतु भुक्त्वेतिमधुपर्केवैधभोजनपरं गृह्यपरिशिष्टे कन्यांवरयमाणानामेषधर्मोविधीयते प्रत्यड्मुखावरयंतिप्रतिगृह्णंतिप्राड्मुखाः मदनरत्नेऋष्यशृंगः वरगोत्रंसमुच्चार्यप्रपितामहपूर्वकं नामसंकीर्तयेद्विद्वान्कन्यायाश्चैवमेवहि तिष्ठेत्पूर्वमुखोदातावरः प्रत्यड्मुखोभवेत् मधुपर्कार्चितायैनांतस्मैदद्यात्सदक्षिणाम् उदपात्रंततोगृह्यमंत्रेणानेनदापयेत् गौरींकन्यामिमांविप्रयथाशक्तिविभूषिताम् गोत्रायशर्मणेतुभ्यंदत्तांविप्रसमाश्रयेति भूमिंगांचैवदासींचवासांसिचस्वशक्तितः महिषींवाजिनश्चैवदद्यात्स्वर्णमणीनपि ततः स्वगृह्यविधिनाहोमाद्यंकर्मकारयेत् यथाचारंविधेयानि मांगल्यकुतुकानिच एतत्कन्यादानंत्रिः कार्यमितिशौनकः ।
कन्यादानप्रयोगांत प्रपितामहपूर्वक उच्चार सांगतो स्मृत्यर्थसारांत - “ नांदीश्राद्धांत आणि विवाहांत कन्यादानप्रसंगीं पूर्वीं प्रपितामहाचे, नंतर पितामहाचे, तदनंतर पित्याचे नांवाचा उच्चार करावा. इतर ठिकाणीं पितृपूर्वक नांवाचा उच्चार करावा. ” नांदीश्राद्धांत प्रपितामहपूर्वक उच्चार सांगितला तो ऋक् शाखी वगैरे वगळून इतरांविषयीं समजावा. कारण, गृह्यपरिशिष्टांत पित्रादिक्रमानें उच्चार सांगितला आहे. व्यास - “ वरानें भोजन करुन कन्याप्रतिग्रह करावा. आणि बटूनें भोजन करुन गायत्रीचा उपदेश घ्यावा. कन्यादात्यानें उपोषित राहून पूजा केलेल्या वराला कन्या द्यावी. ” या वचनांत ‘ वरानें भोजन करुन ’ असें जें सांगितलें तें मधुपर्कांत विधिप्राप्तभोजनविषयक समजावें. गृह्यपरिशिष्टांत - “ कन्या वरणार्यांचा असा धर्म सांगितला आहे कीं, पश्चिमेकडे मुख करुन राहून वरते. आणि प्राड्मुख होऊन कन्याग्रहण करितात. ” मदनरत्नांत ऋष्यश्रृंग - “ वराचे गोत्राचा उच्चार करुन प्रपितामहपूर्वक नांवाचा उच्चार करावा. कन्येचाही याप्रमाणेंच गोत्राचा उच्चार करुन प्रपितामहपूर्वक नांवाचा उच्चार करावा. कन्यादाता पूर्वमुख असावा, आणि वर प्रत्यड्मुख असावा. मधुपर्कानें पूजित अशा त्या वराला दक्षिणासहित कन्या द्यावी. आणि उदकपात्र द्यावें. याप्रमाणें दान केल्यावर कन्यादात्यानें पुढचा मंत्र म्हणावा. तो मंत्र - ‘ गौरीं कन्यामिमां विप्र यथाशक्ति विभूषितां ॥ गोत्राय शर्मणे तुभ्यं दत्तां विप्र समाश्रय ॥ ’ नंतर आपल्या शक्तीप्रमाणें भूमि, गाई, दासी, वस्त्रें, महिषी, घोडे, आणि सुवर्णाचे मणी इत्यादिक द्यावे. तदनंतर आपल्या ग्रुह्योक्तविधीनें होमादि कर्म करवावें. जसा आचार असेल तशीं मांगल्य कौतुकेंही करावीं. ” हें कन्यादान त्रिवार करावें, असें शौनक सांगतो.
गृहप्रवेशनीयहोमेविशेषमाहाश्वलायनः अर्धरात्रेव्यतीतेतुपरेद्युः प्रातरेवहि गृहप्रवेशनीयः स्यादितियज्ञविदोविदुरिति औपासनहोमेविशेषमाह शौनकः यदिरात्रौविवाहाग्निरुत्पन्नः स्यात्तथासति उपक्रम्योत्तरस्याह्नः सायंपरिचरेदमुम् यदिरात्रौनवनाडीमध्येऽग्न्युत्पत्तिस्तदातदैवहोमारंभः तदुत्तरंचेत्परदिने सायमारंभइतिसुदर्शनभाष्येउक्तम् ।
गृहप्रवेशनीय होमाविषयीं विशेष सांगतो आश्वलायन - “ अर्धरात्रीच्या पुढें विवाहहोम झाला असतां गृहप्रवेशनीय होम प्रातः कालींच करावा, असें यज्ञवेत्ते सांगतात. ” औपासनहोमाविषयीं विशेष सांगतो शौनक - “ जर रात्रीं विवाहाग्नि उत्पन्न झाला असेल तर दुसर्या दिवशीं सायंकाळीं उपासनारंभाचा संकल्प करुन औपासन होम करावा. ” जर रात्रीं नऊ घटिकांचे आंत अग्नि उत्पन्न झाला असेल तर त्यावेळींच औपासनहोमाचा आरंभ करावा. नऊ घटिकांचे पुढें जर अग्नि उत्पन्न असेल तर दुसर्या दिवशीं सायंकाळीं औपासनहोमाचा आरंभ करावा, असें सुदर्शनभाष्यांत सांगितलें आहे.