आतां छुरिकाबंध सांगतो -
अथछुरिकाबंधः ज्योतिर्निबंधेनारदः छुरिकाबंधनंवक्ष्येनृपाणांप्राक्करग्रहात् विवाहोक्तेषुमासेषुशुक्लपक्षेप्यनस्तगे जीवेशुक्रेचभूपुत्रेचंद्रताराबलान्विते मौंजीबंधर्क्षतिथिषुकुजवर्जितवासरे संग्रहे शूद्राणांराजपुत्राणांमौंज्यभावेऽस्त्रबंधनं मौंजीबंधोक्ततिथ्यादौकार्यंभौमदिनंविना ।
ज्योतिर्निबंधांत नारद - " राजांना ( क्षत्रियांना ) विवाहाच्या पूर्वीं छुरिकाबंधन सांगतों - विवाहास उक्त मासांत शुक्लपक्षांत गुरु , शुक्र , भौम यांचें अस्त नसतां , चंद्रबळ व ताराबळ असतां , मौंजीबंधास सांगितलेल्या नक्षत्रांवर व तिथींस , भौमवर्जितवारीं छुरिकाबंधन करावें . " संग्रहांत - " शूद्र आणि राजपुत्र यांचें मौंजीबंधन नसल्यामुळें मौंजीबंधास सांगितलेल्या तिथिनक्षत्रादिकांवर , भौमवार वर्ज्य करुन इतर वारीं अस्त्रबंधन ( छुरिकाबंधन ) करावें . "