मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
कृषिकर्म

तृतीयपरिच्छेद - कृषिकर्म

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां कृषिकर्म ( शेती ) सांगतो -
अथकृषिः राजमार्तंडः ऋक्षेषूत्तरपौष्णवैष्णवमघामूलानुराधाश्विनीप्राजापत्यकरद्विदैवतगुरुप्रालेयपादेषुच निर्दोषैर्वृषभैर्हलैश्चसुमनोमालाभिरभ्यर्चितैर्दत्वाक्षेत्रपतेर्बलिंहलधरः क्षेत्रंततः कर्षयेत‍ प्राजेशश्रवणोत्तरादितिमघामार्तंडतिष्याश्विनीपौष्णानुष्णमरीचयः शतभिषक्‍ स्वातीविशाखातथा जीवार्केंदुसितेंदुनंदनदिनेलग्नेचसौम्योदयेसस्यानांवपनेतथैवलवनेशस्तास्तथारोपणे चंडेश्वरः हस्तचित्रादितिस्वातीरेवत्यांश्रवणत्रये स्थिरलग्नेगुरोर्वारेबीजंधार्यंज्ञशुक्रयोः ॐधनदायसर्वलोकहितायदेहिमेधान्यंस्वाहा लेखयित्वाइमंमंत्रंधान्यागारेनिधापयेत् सस्यवृद्धिंपरांकुर्यात्पूजितंप्रतिपूजयेत् दक्षिणदिड्मुखगमनंगमनमभिनवासुनारीषु व्ययमपिसस्यधनानांनबुधाबुधवासरेकुर्युः शनिवारेचनोकार्योधनधान्यव्ययोबुधैः ॥

राजमार्तंड - “ तीन उत्तरा, रेवती, श्रवण, मघा, मूळ, अनुराधा, अश्विनी, रोहिणी, हस्त, विशाखा, पुष्य, मृगशीर्ष, या नक्षत्रांवर; क्षेत्रपतीला बलि देऊन नंतर दोषरहित वृषभ घेऊन त्यांना पुष्पांच्या मालांनीं अर्चित ( अलंकृत ) करुन नांगर बांधून शेतकर्‍यानें शेत नांगरावें. रोहिणी, श्रवण, तीन उत्तरा, पुनर्वसु, मघा, हस्त, पुष्य, अश्विनी, रेवती, मृगशीर्ष, शततारका, स्वाती, विशाखा, ह्या नक्षत्रांवर; गुरु, रवि, चंद्र, शुक्र, बुध या वारीं; शुभलग्नावर; शेतें पेरावीं, शेतें लावावीं आणि शेतें कापावीं. ” चंडेश्वर - “ हस्त, चित्रा, पुनर्वसु, स्वाती, रेवती, श्रवण, धनिष्ठा, शततारका, या नक्षत्रांवर; गुरु, बुध, शुक्र, यांच्या वारीं; स्थिरलग्नावर धान्य सांठवावें. ‘ ॐ धनदाय सर्वलोकहिताय देहि मे धान्यं स्वाहा ’ हा मंत्र लिहून धान्याच्या कोठारांत ठेवावा, म्हणजे धान्याची अत्यंत वृद्धि करील; कारण, धान्यदेवतेची आपण पूजा केली असतां ती देवता आपली पूजा करील. दक्षिण दिशेस गमन, नव्या स्त्रियेप्रत गमन, धान्याचा व धनाचा व्यय हे विद्वानांनीं बुधवारीं करुं नयेत. तसाच धनाचा व धान्याचा व्यय शनिवारीं करुं नये. ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP