आतां होमाविषयीं आहुति पाहण्याचा प्रकार सांगतो -
अथहोमेआहुतिपातः ज्योतिषे तरणिविद्भृगुभास्करिचंद्रमाः कुजसुरेज्यविधुंतुदकेतवः रविभतोदिनभंगणयेत् क्रमात् प्रतिखगंत्रितयंत्रितयंन्यसेत् दिनकरार्कितमः कुजकेतवोहुतभुजेनशुभास्त्वितरेशुभाः हवनचक्रमिदंप्रविलोक्यतांहवनकर्मणिसर्वसमृद्धये अत्रशांतिरुक्ताविष्णुधर्मे क्रूरग्रहमुखेचैवसंजातेहवनेशुभे शांतिंविधायगांदद्याद्ब्राह्मणायकुटुंबिने आयसींप्रतिमांकृत्वानिक्षिपेत्तामधोमुखीं गोमूत्रमधुगंधाद्यैरर्चितांप्रतिमांततः स्वस्थांनिधायसंपूज्यतत्रहोमोविधीयते अत्रापवादः क्रियासारे नित्येनैमित्तिकेदुर्गाहोमादौनविचारयेत् ।
ज्योतिषांत - “ सूर्यनक्षत्रापासून दिवसनक्षत्रापर्यंत नक्षत्रें मोजून तीन तीन नक्षत्रें एकेक ग्रहावर बसवावीं; तीं अशीं: - पहिल्या तीन नक्षत्रांवर सूर्याचे मुखीं, दुसर्या तीन नक्षत्रांवर बुधाचे मुखीं, तिसर्या तीन नक्षत्रांवर शुक्राचे मुखीं, चवथ्या तीन नक्षत्रांवर शनीचे मुखीं, पांचव्या तीन नक्षत्रांवर चंद्राचे मुखीं, सहाव्या तीन नक्षत्रांवर मंगळाच्या मुखीं, सातव्या तीन नक्षत्रांवर बृहस्पतीच्या मुखीं, आठव्या तीन नक्षत्रांवर राहुमुखीं, नवव्या तीन नक्षत्रांवर केतुमुखीं, याप्रमाणें आहुति पडतात. रवि, शनि, राहु, मंगळ, केतु या ग्रहांच्या मुखीं आहुति पडते ती अशुभ; व इतर ग्रहांचे मुखीं पडते ती शुभ होय. हें आहुतिचक्र सर्व होमकर्माविषयीं पहावें, तेणेंकरुन सर्व समृद्धि होते. ” पापग्रहाच्या मुखीं आहुति पडली असतां शांति सांगतो विष्णुधर्मांत - “ पापग्रहाचे मुखीं होमाहुति पडली असतां शांति करुन कुतुंबी ब्राह्मणाला गोप्रदान करावें. लोहाची प्रतिमा करुन ती अधोमुखी स्थापन करुन गोमूत्र, मधु, गंध इत्यादिक उपचारांनीं पूजा करुन नंतर उताणी करुन यथाविधि पूजा करुन शांतिहोम करावी. ” ह्या आहुतिचक्राविषयीं अपवाद सांगतो क्रियासारांत - “ नित्यहोम, नैमित्तिकहोम, दुर्गाहोम, आदिशब्देंकरुन संस्कारहोम यांविषयीं आहुतिचक्र व अग्निचक्र यांचा विचार करुं नये. ”