मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
शिवनिर्माल्याचा निर्णय

तृतीयपरिच्छेद - शिवनिर्माल्याचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां शिवनिर्माल्याचा निर्णय सांगतो -

अथशिवनिर्माल्यनिर्णयः सिद्धांतशेखरे धराहिरण्यगोरत्नताम्ररौप्यांशुकादिकान् ‍ विहायशेषंनिर्माल्यंचंडेशायनिवेदयेत् ‍ अन्यदन्नादिपानीयंतांबूलंगंधपुष्पकम् ‍ दद्याच्चंडायनिर्माल्यंशिवभुक्तंतुसर्वशः आचार्यशिवचंडानामाज्ञाभंगेतुलक्षकम् ‍ धनस्यभक्षणेतेषांपादोनंलक्षमीरितम् ‍ निर्माल्येभक्षितेलक्षपादतः शुद्धिरीरिता दानंचभक्षणसमंतदर्धंतदुपेक्षणे अकामाद्भक्षणेयद्वानिर्माल्यस्यजपेत्सुधीः ब्रह्मपंचकसाहस्त्रंधर्मेण सहितंततः कामतोभक्षणेदीक्षाप्रायश्चित्तंनचान्यतः निर्माल्यलंघनेघोरंप्रजपेदयुतंततः स्पर्शश्चलंघनसमोविक्रयोभक्षणेनच स्मृत्यर्थसारेपि शैवसौरनिर्माल्यनैवेद्यभक्षणेचांद्रम् ‍ अभ्यासेद्विगुणं मत्याभ्यासेप्रतपनम् ‍ अन्यनिर्माल्येप्यनापद्येवमिति इदंचज्योतिर्लिंगाद्यतिरिक्तविषयम् ‍ तथाचपुरुषार्थप्रबोधेभविष्ये ज्योतिर्लिंगविनालिंगंयः पूजयतिसत्तमः तस्यनैवेद्यनिर्माल्यभक्षणात्तप्तकृच्छ्रकम् ‍ शालग्रामोद्भवेलिंगेबाणलिंगेस्वयं भुवि रसलिंगेतथार्षेचसुरसिद्धप्रतिष्ठिते ह्रदयेचंद्रकांतेचस्वर्णरौप्यादिनिर्मिते शिवदीक्षावताभक्तेनेदंभक्ष्यमितीर्यते तथा बाणलिंगेस्वयंभूतेचंद्रकांतेह्रदिस्थिते चांद्रायणसमंज्ञेयंशंभोर्नैवेद्यभक्षणं लिंगेस्वयंभुवेबाणेरत्नजेरसनिर्मिते सिद्धप्रतिष्ठितेचैवनचंडाधिकृतिर्भवेत् ‍ यत्रचंडाधिकारोस्तितद्भोक्तव्यंनमानवैः चंदाधिकारोनोयत्रभोक्तव्यंतत्रभक्तितः त्रैविक्रम्याम् ‍ बाणलिंगेचलौहेचसिद्धलिंगेस्वयंभुवि प्रतिमासुचसर्वासुनचंडोधिकृतोभवेत् ‍ अत्र ब्रह्महापिशुचिर्भूत्वानिर्माल्यंयस्तुधारयेत् ‍ तस्यपापंमहच्छीघ्रंनाशयिष्येमहाव्रते इतिस्कांदादशुचिनानग्राह्यंशिवनिर्माल्यं किंतुस्नात्वेतिस्मार्ताः अनुपनीतेननग्राह्यमितिश्रीदत्तः शिवदीक्षाहीनैर्नग्राह्यमितिशैवाः तिथितत्त्वेहेमाद्रौपरिशिष्टे अग्राह्यंशिवनैवेद्यंपत्रंपुष्पंफलंजलं शालग्रामशिलासंगात्सर्वंयातिपवित्रताम् ‍ पंचायतनपूजायांतंत्रेणचनिवेदितमित्यर्थः शिवपुराणे येवीरभद्रशपिताः शिवभक्तिपराड्मुखाः शंभोरन्यत्रदेवेषुयेभक्तायेनदीक्षिताः तेषामनर्हमीशस्यतत्प्रसादचतुष्टयम् ‍ काशीखंडे जलस्यधारणंमूर्ध्निविश्वेशस्नानजन्मनः एषजालंधरोबंधः समस्तसुरवल्लभः तथा स्नापयित्वाविधानेनयो लिंगस्नपनोदकं त्रिः पिबेत्रिविधंपापंतस्येहाशुविनश्यति लिंगस्नपनवार्भिर्यः कुर्यान्मूर्न्ध्यभिषेचनं गंगास्नानफलंतस्यजायतेऽत्रविपाप्मनः इदंपूर्ववाक्यवशाद्विश्वेश्वरविषयमितिकेचित् ‍ काशीस्थपुराणप्रसिद्धसर्वलिंगविषयम् ‍ काशीखंडेरत्नेश्वराख्याने तथैवदर्शनादित्यन्ये ॥

सिद्धांतशेखरांत - " भूमि , हिरण्य , गाई , रत्नें , ताम्र , रौप्य , वस्त्रें इत्यादि वेगळून इतर शिवनिर्माल्य चंडेशाला निवेदन करावा . इतर शिवनिर्माल्य कोणता तें सांगतो - अन्नादि भोज्य व भक्ष्य पदार्थ , पाणी , तांबूल , गंध , पुष्पें इत्यादि शिवानें उपभुक्त म्हणून निर्माल्य झालेले सर्व पदार्थ चंडाला द्यावे . आचार्य , शिव आणि चंड ह्यांच्या आज्ञेचा भंग केला असतां लक्ष गायत्रीजप करावा . त्या आचार्यादिकांचें द्रव्य खाल्लें असतां पाऊण लक्ष गायत्रीजप करावा . निर्माल्य भक्षण केला असतां पंचवीस हजार जप करावा , म्हणजे शुद्धि होते . दान करणें हें भक्षणासमान आहे . आणि कोणी भक्षण किंवा दान करीत असतां त्याची उपेक्षा केली असतां त्याच्या निम्में प्रायश्चित्त करावें अथवा इच्छा नसून साहजिक निर्माल्य भक्षण केला असतां सांगितलेल्या विधीनें पांच हजार गायत्रीचा जप करावा . आणि मुद्दाम होऊन भक्षण केलें असतां दीक्षा घ्यावी . त्यावांचून दुसरें प्रायश्चित्त नाहीं . निर्माल्याचें उल्लंघन केलें असतां अघोरमंत्राचा दहा हजार जप करावा . निर्माल्यास स्पर्श करणें तो उल्लंघनासारखा आहे . आणि विक्रय करणें तो भक्षणासारखा आहे . " स्मृत्यर्थसारांतही - शिवाचा व सूर्याचा निर्माल्य आणि नैवेद्य भक्षण केला असतां चांद्रायण प्रायश्चित्त करावें . वारंवार भक्षण केला असतां द्विगुणित करावें . मुद्दाम होऊन वारंवार भक्षण केला असतां प्रतपन ( सांतपन ) कृच्छ्र करावें . इतर देवांच्या निर्माल्याविषयीं देखील आपत्काल नसतां असेंच समजावें . हा शिवनिर्माल्याचा निषेध ज्योतिर्लिंगादिव्यतिरिक्त लिंगविषयक आहे . तेंच सांगतो पुरुषार्थप्रबोधांत भविष्यांत - " जो भक्त ज्योतिर्लिंगावांचून इतर लिंगाची पूजा करितो , त्यानें त्या लिंगाच्या नैवेद्याचें व निर्माल्याचें भक्षण केलें तर तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त करावें . शालग्रामाचें लिंग , बाणलिंग , स्वयंभूलिंग , पारदाचें लिंग , ऋषिलिंग , देवांनीं व सिद्धांनीं प्रतिष्ठित लिंग , मानसपूजेंत ह्रदयांतील लिंग , चंद्रकांताचें लिंग , सुवर्ण - रौप्य इत्यादिकांचें लिंग , यांचा नैवेद्य व निर्माल्य शिवदीक्षा घेतलेल्या भक्तानें भक्षण करावा , असें सांगितलें आहे . तसेंच - बाणलिंग , स्वयंभूलिंग , चंद्रकांतलिंग , ह्रदयस्थलिंग , यांच्या नैवेद्याचें भक्षण चांद्रायणासमान पवित्र करणारें आहे . स्वयंभूलिंग , बाणलिंग , रत्नाचें लिंग , पारदलिंग , आणि सिद्धानें स्थापितलिंग यांच्या निर्माल्यग्रहणाविषयीं चंडाला अधिकार नाहीं . ज्या ठिकाणीं चंडाचा अधिकार असेल त्या लिंगाच नैवेद्य वगैरे मनुष्यांनीं भक्षण करुं नये . ज्या ठिकाणीं चंडाचा अधिकार नसेल त्या ठिकाणचा नैवेद्य वगैरे भक्तिपूर्वक भक्षण करावा . " त्रिविक्रमपद्धतींत - " बाणलिंग , धातुलिंग , सिद्धलिंग , स्वयंभूलिंग , आणि सार्‍या प्रतिमा , इतक्या ठिकाणीं चंडाला अधिकार असत नाहीं . " ह्या विषयावर ग्रंथकार असें सांगतो कीं , " महादेव म्हणतात हे पार्वति ! ब्रह्मघातकी असला तरी शुद्ध होऊन जो माझा निर्माल्य धारण करील , त्याच्या मोठ्या पापाचा मी लवकर नाश करीन , " ह्या स्कंदपुराणांतील वचनावरुन अशुचि अवस्थेंत शिवनिर्माल्य ग्रहण करुं नये . तर स्नान करुन ग्रहण करावा , असें स्मार्त सांगतात . उपनयन झालें नसेल त्यानें शिवनिर्माल्य ग्रहण करुं नये , असें श्रीदत्त सांगतो . शिवदीक्षा घेतली नसेल त्यांनीं शिवनिर्माल्य ग्रहण करुं नये , असें शैव सांगतात . तिथितत्त्वांत आणि हेमाद्रींत परिशिष्टांत - " शिवाचा नैवेद्य , पत्र , पुष्प , फल आणि उदक हीं ग्रहण करण्याला योग्य नाहींत . पंचायतनपूजेमध्यें व एकतंत्रानें अर्पण केलेलीं असतील तर शालग्रामाच्या संगतीनें तीं सारीं ग्रहण करण्याला योग्य होतात . " शिवपुराणांत - " जे मनुष्य वीरभद्रानें शापित असल्यामुळें शिवभक्तीविषयीं पराड्मुख असतील , जे मनुष्य शंकरावांचून इतर देवांचे भक्त असतील , ज्यांनीं शिवदीक्षा घेतली नसेल , त्यांना शिवाचे चार प्रसाद ( नैवेद्य , निर्माल्य , तीर्थ , गंध ) ग्रहण करण्यास योग्य होत नाहींत . " काशीखंडांत - " विश्वेश्वराला स्नान घालून तें उदक मस्तकावर धारण करणें हा जालंधरबंध सर्व देवांना आवडणारा आहे . " तसेंच " जो मनुष्य लिंगाला यथाविधि स्नान घालून तें स्नानोदक त्रिवार प्राशन करील त्याचें त्रिविध ( कायिक , वाचिक , मानसिक ) पाप तत्काल नष्ट होतें . जो मनुष्य लिंगाला स्नान घालून तें उद्क आपल्या मस्तकावर सिंचन करील , तो पापरहित होऊन त्याला गंगास्नानाचें फळ प्राप्त होतें . " ह्या दोन वचनांनीं स्नानोदकाचें प्राशन व सिंचन सांगितलें तें पूर्वींच्या वचनावरुन विश्वेश्वराविषयीं समजावें , असें केचित् ‍ सांगतात . काशींतील पुराणप्रसिद्ध जीं लिंगे , त्या सर्वांविषयीं समजावें , कारण , काशीखंडांत रत्नेश्वराच्या आख्यानांत तसेंच दृष्टीस पडतें , असें इतर सांगतात .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP