आतां क्षुद्रकाल सांगतो -
अथक्षूद्रकालाः तत्रजलाशयस्य वराहः हस्तेचांबुपपौष्णकेशवमघामित्रोत्तरारोहिणीदेवेज्येषुचशुक्रसौम्यशशभृद्वागीशवारांशके रिक्तांछिद्रतिथिंविहायवृषभेनक्रेकुलीरेघटेमीनेकूपतडागकर्ममुनयः शंसंतिशुद्धष्टमे हस्तोमृगानुराधापुष्यधनिष्ठोत्तराणिरोहिण्यः शतभिषगित्यारंभेकूपानांशस्यतेभगणः हेमाद्रौ भविष्ये तस्मिन्सलिलसंपूर्णेकार्तिकेतुविशेषतः मुनयः केचिदिच्छंतिव्यतीतेचोत्तरायणे नकालनियमस्तत्रसलिलंतत्रकारणम् दीपिकापि मार्तंडेंदूडुशुद्धौमुरजिदशयनेमाघषट्कस्यशुक्लेमूलाषाढोत्तराश्विश्रवणमुरुकरेपौष्णशक्राप्यचांद्रे मैत्रेब्राह्मेचपूर्णामदन १३ रवि १२ तिथौसद्वितीयातृतीयकार्यातोयप्रतिष्ठाज्ञगुरु सितदिनेकालशुद्धेसुलग्ने वराहः आग्नेयेयदिकोणेग्रामस्यपुरस्यवाभवतिकूपः नित्यंसकरोतिभयंदाहंचसमानसंप्रायः नैऋत्येबालभयंवनिताक्षयंचवायव्ये दिक् त्रयमेतत्त्यक्त्वाशेषास्तुशुभावहाः कूपाः वास्तुशास्त्रे भूतिंपुष्टिंपुत्रहानिंपुरंध्रीनाशंमृत्युंसंपदंशत्रुबाधाम् किंचित्सौख्यंशंभुकोणादिकुर्यात्कूपोमध्येगेहमर्थक्षयंच ॥
त्यांत प्रथम जलाशयाचा काल सांगतो वराह - “ हस्त, शततारका, रेवती, श्रवण, मघा, अनुराधा, तीन उत्तरा, रोहिणी, पुष्य, ह्या नक्षत्रांवर; शुक्र, बुध, चंद्र, गुरु यांच्या वारीं व यांच्या अंशीं, रिक्तातिथि आणि छिद्रातिथि वर्ज्य करुन बाकीच्या तिथींवर; वृषभ, मकर, कर्क, कुंभ, मीन या लग्नांवर; अष्टमस्थान शुद्ध असतां कूप, तलाव यांचें कर्म प्रशस्त आहे, असें मुनि सांगतात. ” “ हस्त, मृग, अनुराधा, पुष्य, धनिष्ठा, तीन उत्तरा, रोहिणी, आणि शततारका हीं नक्षत्रें कूपांच्या आरंभास प्रशस्त आहेत. ” हेमाद्रींत भविष्यांत “ तो जलाशय उदकांनें संपूर्ण भरलेला असतां विशेषेंकरुन कार्तिक मासांत त्या जलाशयाची प्रतिष्ठा करावी. कितीएक मुनि उत्तरायण गेलें असतां प्रतिष्ठा इच्छितात. प्रतिष्ठेविषयीं कालनियम नाहीं. प्रतिष्ठेला कारण उदक आहे. अर्थात् उदक असेल त्या वेळीं प्रतिष्ठा करावी. ” दीपिकाही - “ विष्णुशयन ( चातुर्मास्य ) वर्ज्य करुन माघापासून सहा मासांच्या शुक्लपक्षांत सूर्य, चंद्र, नक्षत्रें यांची शुद्धि असतां; मूळ, पूर्वाषाढा, तीन उत्तरा, अश्विनी, श्रवण, पुष्य, हस्त, रेवती, ज्येष्ठा, शततारका, मृग, अनुराधा, रोहिणी या नक्षत्रांवर; पंचमी, दशमी, पूर्णिमा, त्रयोदशी, द्वादशी, द्वितीया, तृतीया, या तिथींवर; बुध, बृहस्पति, यांच्या वारीं; शुद्ध कालीं; शुभ लग्नावर; उदकप्रतिष्ठा करावी. ” वराह - “ गांवाच्या किंवा नगराच्या आग्नेय दिशेस जर कूप असेल तर तो नेहमीं भय आणि प्रायः मनाला त्रास उत्पन्न करील. नैऋत्य कोणास असेल तर बालकांस भीति होईल. वायव्य कोणास असेल तर स्त्रियांना भीति होईल. म्हणून आग्नेय, नैऋति आणि वायव्य ह्या तीन दिशा सोडून बाकीच्या दिशांस असलेले कूप शुभ आहेत. ” वास्तुशास्त्रांत - “ ईशानी दिशेस भूति, पूर्वेस पुष्टि, आग्नेयीस पुत्रनाश, दक्षिणेस स्त्रीनाश, नैऋतीस मृत्यु, पश्चिमेस संपत्ति, वायव्येस शत्रूपासून बाधा, आणि उत्तरेस अल्पसौख्य याप्रमाणें प्रत्येक दिशांस असलेल्या कूपांचीं फलें समजावीं. आणि घरामध्यें असेल तर द्रव्यनाश होईल. ”