द्वितीयादिविवाहाविषयीं काल सांगतो -
द्वितीयादिविवाहेकालउक्तः संग्रहे प्रमदामृतिवासरादितः पुनरुद्वाहविधिर्वरस्यच विषमेपरिवत्सरेशुभोयुगलेचापिमृतिप्रदोभवेत् तृतीयविवाहेनिषेधोमात्स्ये उद्वहेद्रतिसिद्ध्यर्थंतृतीयांनकदाचन मोहादज्ञानतोवापियदिगच्छेत्तुमानुषीम् नश्यत्येवनसंदेहोगर्गस्यवचनंयथेति संग्रहे तृतीयांयदिचोद्वाहेत्तर्हिसाविधवाभवेत् चतुर्थादिविवाहार्थंतृतीयेऽर्कंसमुद्वहेत् ॥
संग्रहांत - " भार्या मृत झालेल्या वराचा पुनः विवाह करावयाचा तो भार्यामृतदिवसापासून विषम वर्षीं करावा , तो शुभ आहे . समवर्षीं केला असतां मृत्युदायक होईल . " तिसर्या स्त्रियेशीं विवाहाचा निषेध सांगतो - मात्स्यांत - " सुरतसिद्धीसाठीं तिसरी स्त्री कधींही विवाहूं नये . मोहित होऊन किंवा अज्ञानानें जर तिसरी मनुष्यजातीची स्त्री विवाहील तर तो विनाश पावेल , यांत संदेह नाहीं , असें गर्गमुनीचें वचन आहे . " संग्रहांत - " पुरुष तिसर्या स्त्रियेशीं जर विवाह करील तर ती स्त्री विधवा होईल . चवथा वगैरे विवाह करण्यासाठीं तिसरा अर्कासह ( रुईसह ) विवाह करावा . "
तद्विधिस्तु रविशन्योर्हस्तेवावरः संकल्प्यस्वतिवाचनंनांदीश्राद्धंकृत्वाचार्यंवृत्वा आकृष्णेनेतिछायायुतंसूर्यमर्केसंपूज्यगुडौदनंदत्वा वस्त्रेणतंतुभिरावेष्ट्य त्रिलोकवासिन् सप्ताश्वछाययासहितोरवे तृतीयोद्वाहजं दोषंनिवारयसुखंकुर्वितिसंप्रार्थ्यजलेनत्रिः सिंचेत् ममप्रीतिकरायेयंमयास्पृष्टापुरातनी अर्कजाब्रह्मणासृष्टाअस्माकंप्रतिरक्षतु नमस्तेमंगलेदेविनमः सवितुरात्मजे त्राहिमांकृपयादेविपत्नीत्वंमइहागता अर्कत्वंब्रह्मणासृष्टः सर्वप्राणिहितायच वृक्षाणामादिभूतस्त्वंदेवानांप्रीतिवर्धनः तृतीयोद्वाहजंपापंमृत्युंचाशुविनाशयेति ततआचार्यः काश्यपगोत्रामादित्यस्यप्रपौत्रींसवितुः पौत्रीमर्कस्यपुत्रीमर्ककन्याममुकगोत्रायवरायदास्येइति वाग्दानंकृत्वावरस्यमधुपर्कंकृत्वांऽतः पटंधृत्वास्वस्तिनइतिसूक्तंजप्त्वापूर्ववत्कन्यांदत्वा अर्ककन्यामिमामित्यूहेनकन्यादानमंत्रमुक्त्वादक्षिणांदद्यात् ततोगायत्र्यावेष्टितसूत्रेणबृहत्सामेतिमंत्रेणकंकणंबध्वाऽर्कस्यचतुर्दिक्षुकुंभेषुविष्णुंसंपूज्याग्निंप्रतिष्ठाप्याघारांतेसंगोभिरितिबृहस्पतये यस्मैत्वाकामकामायेत्यृचाऽग्नयेव्यस्तसमस्तव्याह्रतिभिराज्यंहुत्वाचार्ययगोयुगंदत्वा मयाकृतमिदंकर्मस्थावरेषुजरायुणा अर्कापत्यानिनोदेहितत्सर्वंक्षंतुमर्हसीतिनममेतिदिक् इतिनिर्णयसिंधौविवाहः ॥
त्या अर्कविवाहाचा विधि असा - वरानें रविवारीं किंवा शनिवारीं अथवा हस्त नक्षत्रावर पुष्पफलांनीं युक्त अशा अर्क ( रुईचे ) वृक्षाजवळ जाऊन संकल्प करुन आचार्य वरुन स्वस्तिपुण्याहवाचन आणि नांदीश्राद्ध करुन अर्ककन्यादाता आचार्य वरावा . नंतर ‘ आकृष्णेन० ’ या मंत्रानें अर्कवृक्षावर छायासहित सूर्याची पूजा करुन गुडौदनाचा नैवेद्य समर्पण करुन त्या वृक्षाला श्वेतवस्त्रानें आणि सुतानें वेष्टन करुन ‘ त्रिलोकवासिन् सप्ताश्व छायया सहितो रवे ॥ तृतीयोद्वाहजं दोषं निवारय सुखं कुरु ’ ह्या मंत्रानें त्याची प्रार्थना करुन उदकानें त्रिवार सिंचन करावें . ‘ मम प्रीतिकरा येयं मया स्पृष्टा पुरातनी ॥ अर्कजा ब्रह्मणा सृष्टा अस्माकं प्रतिरक्षतु । नमस्ते मंगले देवि नमः सवितुरात्मजे ॥ त्राहि मां कृपया देवि पत्नी त्वं म इहागता ॥ अर्क त्वं ब्रह्मणा सृष्टः सर्वप्राणिहिताय च ॥ वृक्षाणामादिभूतस्त्वं देवानां प्रीतिवर्धनः ॥ तृतीयोद्वाहजं पापं मृत्युं चाशु विनाशय ॥ ’ ह्या मंत्रानीं प्रदक्षिणा करावी . नंतर कन्यादात्या आचार्यानें ‘ काश्यपगोत्रां आदित्यस्य प्रपौत्रीं सवितुः पौत्रीं मम पुत्रीमर्ककन्याममुकगोत्रवराय दास्ये ’ असें वाग्दान करुन वराला मधुपर्क करुन अंतःपट धरुन ‘ स्वस्तिनो० ’ या सूक्ताचा जप करुन वर सांगितल्याप्रमाणें कन्यादान करुन ‘ अर्ककन्यामिमां विप्र यथाशक्ति विभूषितां ॥ गोत्राय शर्मणे तुभ्यं दत्तां विप्र समाश्रय ॥ ’ असा कन्यादानमंत्र म्हणून दक्षिणा द्यावी . नंतर गायत्रीमंत्रेकरुन वेष्टित सूत्रानें ‘ बृहत्साम० ’ ह्या मंत्रानें अर्क आणि वर यांना कंकण बांधून अर्कवृक्षाच्या चारही दिशांस चार कलशांवर विष्णूची पूजा करुन अग्नीची स्थापना करुन आघारान्त तंत्र करुन ‘ संगोभिरांगिरसो० ’ या मंत्रानें बृहस्पतीला , ‘ यस्मैत्वाकामकामाय० ’ या ऋचेनें अग्नीला , आणि व्यस्तसमस्तव्याह्रतींनीं अग्नि , वायु , सूर्य , प्रजापति यांना आज्यहोम करुन आचार्याला दोन गाई देऊन ‘ मया कृतमिदं कर्म स्थावरेषु जरायुणा ॥ अर्कापत्यानि नो देहि तत्सर्वं क्षंतुमर्हसि ॥ ’ ह्या मंत्रानें नमस्कार करावा . ही दिशा दाखविली आहे .
इति विवाहप्रकरणं संपूर्णम् .