मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
देवकोत्थापन

तृतीयपरिच्छेद - देवकोत्थापन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां देवकोत्थापन सांगतो -

अथदेवकोत्थापनं यदाहनारदः समेचदिवसेकुर्याद्देवकोत्थापनंबुधः षष्ठंचविषमंनेष्टंमुक्त्वापंचमसप्तमौ निर्णयदीपेगार्ग्यः नांदीश्राद्धेकृतेपश्चाद्यावन्मातृविसर्जनम् ‍ दर्शश्राद्धंक्षयश्राद्धंस्नानंशीतोदकेनच अपसव्यंस्वधाकारंनित्यश्राद्धंतथैवच ब्रह्मयज्ञंचाध्ययनंनदीसीमातिलंघनम् ‍ उपवासंव्रतंचैवश्राद्धभोजनमेवच नैवकुर्युः सपिंडाश्चमंडपोद्वासनावधि बृहस्पतिः तीर्थेविवाहेयात्रायांसंग्रामेदेशविप्लवे नगरग्रामदाहेचस्पृष्टास्पृष्टिर्नदुष्यति योगियाज्ञवल्क्यः नस्नायादुत्सवेतीतेमंगलंविनिवर्त्यच अनुव्रज्यसुह्रद्धंधूनर्चयित्वेष्टदेवताम् ‍ ज्योतिषे स्नानंसचैलंतिलमिश्रकर्मप्रेतानुयानंकलशप्रदानम् ‍ अपूर्वतीर्थामरदर्शनंचविवर्जयेन्मंगलतोब्दमेकम् ‍ मासषट्कंविवाहादौव्रतप्रारंभणेपिच जीर्णभांडादिनत्याज्यंगृहसंमार्जनंतथा ऊर्ध्वंविवाहात्पुत्रस्यतथाचव्रतबंधनात् ‍ आत्मनोमुंडनंनैववर्षंवर्षार्धमेवच अभ्यंगेसूतकेचैवविवाहेपुत्रजन्मनि मांगल्येषुचसर्वेषुनधार्यंगोपिचंदनं ज्योतिर्निबंधे उद्वाहात्प्रथमेशुचौयदिवसेद्भर्तुर्गृहेकन्यकाहन्यात्तज्जननींक्षयेनि जतनुंज्येष्ठेपतिज्येष्ठकम् ‍ पौषेचश्वशुरंपतिंचमलिनेचैत्रेस्वपित्रालयेतिष्ठंतीपितरंनिहंतिनभयंतेषामभावेभवेत् ‍ निबंधे विवाहात्प्रथमेपौषेआषाढेचाधिमासके नसाभर्तुर्गृहेतिष्ठेच्चैत्रेपितृगृहेतथा हेमाद्रौस्मृत्यंतरे विवाहव्रतचूडासुवर्षमर्धंतदर्धकम् ‍ पिंडदानंमृदास्नानंनकुर्यात्तिलतर्पणम् ‍ तथा अर्धंपूर्ववत् ‍ संपिडानैवकुर्वीरन्नद्भिः स्नानमृतुत्रये तीर्थेसंवत्सरेप्रेतेपितृयज्ञेमहालये कृतोद्वाहोपिकुर्वीतपिंडनिर्वपणंसदा ।

नारद - " सहावा दिवस वर्ज्य करुन बाकीच्या समदिवशीं देवकोत्थापन करावें . विषम दिवसांत पांचव्या आणि सातव्या दिवशीं देवकोत्थापन करावें . बाकीचे विषम दिवस वर्ज्य आहेत . " निर्णयदीपांत गार्ग्य - " नांदीश्राद्ध केलें असतां जोंपर्यंत मातृकाविसर्जन ( देवकोत्थापन ) होई तोंपर्यंत दर्शश्राद्ध , सांवत्सरिकश्राद्ध , शीतोदकानें स्नान , अपसव्य , स्वधाशब्दोच्चार , नित्यश्राद्ध , ब्रह्मयज्ञ , अध्ययन , नदीचें व सीमेचें उल्लंघन , उपवास , व्रत आणि श्राद्धभोजन हीं कृत्यें त्रिपुरुषसपिंडांनीं करुं नयेत . " बृहस्पति - " तीर्थाचे ठायीं , विवाहांत , यात्रेमध्यें , युद्धामध्यें , देशाचा विनाश होत असेल त्या समयीं , आणि नगर किंवा गांव जळत असेल त्या वेळीं इतर जातीच्या स्पर्शास्पर्शाचा दोष नाहीं . " योगियाज्ञवल्क्य - " देवादिकांचा उत्सव केल्यावर , मंगलकार्य समाप्त केल्यावर , सुह्रत् ‍ व प्रिय यांना पोंचवून आल्यावर आणि इष्टदेवतेची पूजा केल्यावर सचैल स्नान करुं नये . " ज्योतिषांत - " सचैलस्नान , तिलयुक्त कर्म ( तर्पणादि ), प्रेताबरोबर जाणें , उदकुंभदान , पूर्वीं न पाहिलेल्या तीर्थांचें व देवाचें दर्शन हीं कृत्यें मंगलकार्य केल्यापासून एकवर्षपर्यंत वर्ज्य करावीं . विवाहादि मंगलकार्य केलें असतां आणि व्रताचा प्रारंभ केला असतां सहा महिनेपर्यंत जीर्णभांडीं वगैरे असतील तीं टाकूं नयेत . तसेंच घराचें संमार्जन करुं नये . पुत्राचा विवाह केल्यापासून एक वर्षपर्यंत आपलें मुंडन करुं नये . आणि पुत्राचा व्रतबंध केल्यापासून सहा महिनेपर्यंत आपलें मुंडन करुं नये . अभ्यंग केला असतां , सूतकांत , विवाहांत , पुत्रजन्म झाला असतां , आणि सर्व मंगलकार्यांत गोपीचंदन लावूं नये . " ज्योतिर्निबंधांत - " विवाह झाल्यापासून पहिल्या आषाढांत जर पतीच्या घरीं कन्या वास करील तर ती सासूचा नाश करील . क्षयमासांत जर पतिगृहीं राहील तर ती आपला नाश करील . ज्येष्ठ मासांत जर पतीच्या घरीं राहील तर ती पतीच्या ज्येष्ठ भ्रात्याचा नाश करील . पौषांत जर पतिगृहीं राहील तर ती श्वशुराचा नाश करील . अधिक मासांत जर पतिगृहीं राहील तर ती पतीचा नाश करील . चैत्रांत जर बापाच्या घरीं राहील तर ती बापाचा नाश करील . सासू इत्यादिकांचा अभाव असेल तर हा दोष नाहीं . " निबंधांत - " विवाह झाल्यापासून पहिल्या पौषांत , आषाढांत , आणि अधिक मासांत पतीच्या घरीं कन्येनें राहूं नये . आणि चैत्रांत बापाच्या घरीं राहूं नये . " हेमाद्रींत स्मृत्यंतरांत - " विवाह , व्रतबंध , चौल हीं कार्यै झालीं असतां अनुक्रमानें एक वर्ष , सहा महिने , तीन महिनेपर्यंत पिंडदान , मृत्तिकास्नान आणि तिलतर्पण करुं नये . " तसेंच विवाहादिक मंगल झालें असतां त्रिपुरुषसपिंडांनीं सहा महिनेपर्यंत शीतोदक स्नान करुं नये . " अपवाद - " विवाह केलेला असला तरी तीर्थाचे ठायीं , मातापितरांच्या सांवत्सरिकांत , प्रेतश्राद्धांत , पित्याच्या और्ध्वंदेहिक कर्मांत , आणि महालयांत सर्वदा पिंडप्रदान करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP