मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
बृहस्पतिशांति

तृतीयपरिच्छेद - बृहस्पतिशांति

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां बृहस्पतिशांति सांगतो -

अथबृहस्पतिशांतिः शौनकः कन्यकोद्वाहकालेतुआनुकूल्यंनविद्यते ब्राह्मणस्योपनयनेगुरोर्विधिरुदाह्रतः सुवर्णेनगुरुंकृत्वापीतवस्त्रेणवेष्टयेत् ‍ ईशान्यांधवलंकुंभंधान्योपरिनिधायच दमनंमधुपुष्पंचपालाशंचैवसर्षपान् ‍ मांसीगुडूच्यपामार्गीविडंगीशंखिनीवचा सहदेवीहरिक्रांतासर्वौषधिशतावरी बलाचसहदेवीचनिशाद्वितयमेवच कृत्वाज्यभागपर्यंतंस्वशाखोक्तविधानतः ग्रहोक्तमंडलेभ्यर्च्यपीतपुष्पाक्षतादिभिः देवपूजोत्तरेकालेततः कुंभानुमंत्रणम् ‍ अश्वत्थसमिधश्चाज्यंपायसंसर्पिषायुतं यवव्रीहितिलाः साज्यामंत्रेणैवबृहस्पतेः अष्टोत्तरशतंसर्वंहोमशेषंसमापयेत् ‍ पुत्रदारसमेतस्यअभिषेकंसमाचरेत् ‍ कुंभाभिमंत्रणोक्तैश्चसमुद्रज्येष्ठमंत्रतः प्रतिमांकुंभवस्त्रंचआचार्यायनिवेदयेत् ‍ ब्राह्मणान्भोजयेत्पश्चाच्छुभदः स्यान्नसंशयः इतिबृहस्पतिशांतिः ।

शौनक - " कन्येच्या विवाहकालीं आणि ब्राह्मणाच्या उपनयनकालीं गुरुचें आनुकूल्य ( बळ ) नसेल तर विधि सांगितला आहे , तो असा - सुवर्णाची गुरुप्रतिमा करुन पीतवस्त्रानें वेष्टित करावी . स्थंडिलाचे ईशानी दिशेस धान्यराशीवर श्वेतकलश स्थापून त्यांत पंचगव्य आणि कुशोदक घालून दवणा , मोहाचें पुष्प , पलाशपुष्प , सर्षप , जटामांसी , गुळवेल , आघाडा , वावडिंग , शंखिनी , वेखंड , सहदेवी , विष्णुक्रांता , सर्वौषधि , शतावरी , चिकणा , सहदेवी , हळद , आंबेहळद , ह्या सर्व औषधि घालून त्याजवर पूर्णपात्र ठेऊन त्याजवर ग्रहमखांत सांगितल्याप्रमाणें पीताक्षतांनीं निर्मित दीर्घ चतुरस्त्र पीठावर सांगितलेली गुरुप्रतिमा स्थापून स्थंडिलावर अग्निस्थापनादिक कृत्य आपल्या शाखेंत सांगितल्याप्रमाणें आज्यभागापर्यंत करुन नंतर त्या प्रतिमेवर पीत वस्त्रें दोन , पीत यज्ञोपवीत , पीतचंदन , पीताक्षता , पीतपुष्पें , घृतदीप , दध्योदननैवेद्य , सुवर्णदक्षिणा इत्यादि षोडशोपचारांनीं गुरुपूजा करावी . नंतर ग्रहमखांत सांगितलेल्या रीतीनें कुंभानुमंत्रन करावें . नंतर बृहस्पतीच्या मंत्रानें अश्वत्थसमिधा , आज्य , घृतयुक्त पायस , घृतयुक्त मिश्रित यवव्रीहितिल , ह्या चार द्रव्यांचा

वेगवेगळा अष्टोत्तरशत होम करावा . नंतर प्रायश्चित्तादि होमशेष समाप्त करुन पीतगंधाक्षतपुष्पयुक्त ताम्रपात्रस्थ उदकानें अर्घ्य द्यावें . नंतर त्या कुंभांतील उदक घेऊन कुंभाभिमंत्रणाला सांगितलेल्या मंत्रांनीं , आणि समुद्रज्येष्ठा० ह्या मंत्रांनीं पुत्रस्त्रीसहित यजमानाला अभिषेक करावा . नंतर ती प्रतिमा , कलश , वस्त्रें हीं आचार्याला द्यावीं . नंतर ब्राह्मणांस भोजन घालावें . असें केलें असतां गुरु शुभदायक होईल , यांत संशय नाहीं . " याप्रमाणें बृहस्पतिशांति समजावी .

शौनकः गुर्वादित्येव्यतीपातेवक्रातीचारगेगुरौ नष्टेशशिनिशुक्रेवाबालेवृद्धेथवागुरौ पौषेचैत्रेऽथवर्षासुशरद्यधिकमासके केतूद्गमेनिरंशेर्केसिंहस्थेमरमंत्रिणि विवाहव्रतयात्रादिपुरहर्म्यगृहादिकं क्षौरंविद्योपविद्यांचयत्नतः परिवर्जयेत् ‍ मदनपारिजातेज्योतिः सागरे बालेशुक्रेवृद्धेशुक्रेवृद्धेजीवेनष्टेजीवे बालेजीवेजीवेसिंहेसिंहादित्येजीवादित्ये तथामलिम्लुचेमासिसुराचार्येतिचारगे वापीकूपविवाहादिक्रियाः प्रागुदितास्त्यजेत् ‍ सिंहस्थंमकरस्थंचगुरुंयत्नेनवर्जयेत् ‍ लल्लः अतिचारगतोजीवस्तंराशिंनैवचेत्पुनः लुप्तः संवत्सरो ज्ञेयः सर्वकर्मबहिष्कृतः सिंहस्थगुरोरपवादमाहपराशरः गोदाभागीरथीमध्येनोद्वाहः सिंहगेगुरौ मघास्थेसर्वदेशेषुतथामीनगतेरवौ वसिष्ठोपि विवाहोदक्षिणेकूलेगौतम्यानेतरत्रतु भागीरथ्युत्तरेकूलेगौतम्यादक्षिणेतथा विवाहोव्रतबंधश्चसिंहस्थेज्येनदुष्यति ।

शौनक - " व्यतीपात , गुर्वादित्य ( ह्म० गुरुचे राशीस ( धन - मीनास ) सूर्य , आणि सूर्याचेराशीस ( सिंहास ) गुरु तो गुर्वादित्य ), गुरुचा वक्र , अतिचार ( शीघ्रगतीनें एका वर्षांत एक राशी उल्लंघन करुन दुसर्‍या राशीस जाणें ), नष्टचंद्र , शुक्राचें व गुरुचें अस्त , बालत्व आणि वृद्धत्व , पौषमास , चैत्रमास , वर्षाकाल , शरदृतु , अधिकमास , धूमकेतूचा उदय , निरंशीं रवि , सिंहस्थगुरु , यांतून कोणतेंही असतां विवाह , मौंजीबंधन , यात्रा , नगर , बंगला , गृह , चौल , विद्या , उपविद्या हीं कृत्यें यत्नानें वर्ज्य करावीं . " मदनपारिजातांत ज्योतिः सागरांत - " शुक्राचें बालत्व आणि वृद्धत्व , गुरुचें अस्त , बाल्य आणि वार्धक्य , सिंहस्थगुरु , सिंहस्थरवि , गुर्वादित्य , मलमास , गुरुचा अतिचार , यांतून कांहींएक असतां पूर्वीं सांगितलेल्या वापी , कूप , विवाह इत्यादि क्रिया करुं नयेत . ह्या क्रियांविषयीं सिंहाचा गुरु आणि मकराचा गुरु यत्नानें टाकावा . " लल्ल - " शीघ्रगतीनें एक राशि भोगून पुढच्या राशीस गेलेला गुरु जर पुनः मागच्या राशीस न येईल तर तो संवत्सर लुप्त जाणावा . तो संवत्सर सर्व कर्मांना बहिष्कृत आहे . " सिंहस्थ गुरुचा अपवाद सांगतो पराशर - " सिंहस्थ गुरु असतां गोदा आणि भागीरथी यांच्या मध्यप्रदेशीं विवाह होत नाहीं . मघा नक्षत्रास गुरु असतां सर्व देशांत विवाह होत नाहीं . आणि मीनास रवि असतां विवाह होत नाहीं . " वसिष्ठही - " सिंहस्थ गुरु असतां गोदेच्या दक्षिणतीरास विवाह होतो . इतर ठिकाणीं होत नाहीं . सिंहस्थ गुरु असतां भागीरथीच्या उत्तरेस आणि गोदेच्या दक्षिणेस विवाह आणि मौंजीबंधन दूषित होत नाहीं . "

कन्यादातृक्रममाहयाज्ञवल्क्यः पितापितामहोभ्रातासकुल्योजननीतथा कन्याप्रदः पूर्वनाशेप्रकृतिस्थः परः परः अप्रयच्छन् ‍ समाप्नोतिभ्रूणहत्यामृतावृतौ गम्यंत्वभावेदातृणांकन्याकुर्यात्स्वयंवरं भ्रातृणांसंस्कृतानामेवाधिकारमाहसएवयाज्ञवल्क्यः असंस्कृतास्तुसंस्कार्याभ्रातृभिः पूर्वसंस्कृतैः भगिन्यश्चनिजादंशाद्दत्वांशंतुतुरीयकम् ‍ अत्रचकारेणपूर्वसंस्कृतैरित्यस्यानुवृत्तेर्विवाहपर्याप्तद्रव्यदानेस्वांशचतुर्थभागदानेवासंस्कृतग्रहणं व्यर्थंस्यात् ‍ अतः कर्तृनियमोऽयं तेनानुपनीतभ्रातृमात्रादिसत्त्वेमात्रादेरेवाधिकारोनभ्रातुरित्युक्तंसंबंधतत्त्वादौ कन्यास्वयंवरेमातुर्दातृत्वेचताभ्यामेवनांदीश्राद्धंकार्यम् ‍ तत्रचस्वयंप्रधानसंकल्पमात्रंकृत्वान्यद्ब्राह्मणद्वाराकारयेदितिप्रयोगपारिजाते वरस्तुसंस्कृतभ्रात्राद्यभावेस्वयमेवनांदीश्राद्धंकुर्यात् ‍ नमाता पुत्रेषुविद्यमानेषुनान्यंवैकारयेत्स्वधामितिनिषेधात् ‍ उपनयनेनकर्माधिकारस्यजातत्वाच्चेतिपृथ्वीचंद्रोदयः माधवीयेपरार्केचनारदः पितादद्यात्स्वयंकन्यांभ्रातावानुमतेपितुः मातामहोमातुलश्चसकुल्योबांधवस्तथा मातात्वभावेसर्वेषांप्रकृतौयदिवर्तते तस्यामप्रकृतिस्थायांकन्यांदद्युः स्वजातयः सकुल्यः पितृपक्षीयोबांधवोमातृवंशजः मदनपारिजाते कात्यायनः स्वयमेवौरसींदद्यात्पित्रभावेस्वबांधवाः मातामहस्ततोन्यांहिमातावाधर्मजांसुताम् ‍ ततोन्यामौरसीभिन्नां धर्मजांनियोगात् ‍ क्षेत्रजांमातामहोमातामातुलोवादद्यात् ‍ तेनौरसीदाने पितृबंधुषुसत्सुमातामहादीनांनाधिकारः अनुमतिंविना अस्यापवादस्तत्रैव दीर्घप्रवासयुक्तेषुपौगंडेषुचबंधुषु मातातुसमयेदद्यादौरसीमपिकन्यकां मनुः यदातुनैवकश्चित्स्यात्कन्याराजानमाव्रजेत् ‍ ।

कन्यादानाचे अधिकारी क्रमानें सांगतो याज्ञवल्क्य - " कन्येचा पिता प्रथम अधिकारी , त्याच्या अभावीं तिचा पितामह , त्याच्या अभावीं तिचा भ्राता , त्याच्या अभावीं सकुल्य ( पितृकुलांतील पितृव्यादिक , त्याच्या अभावीं मातृकुलांतील मातामह , मातुल इत्यादिक ), त्याच्या अभावीं माता हे कन्येच्या दानाविषयीं अधिकारी होत . हे सांगितलेले अधिकारी स्वस्थचित्त असतील तर समजावे . कोणत्याही कारणानें अस्वस्थचित्त असतील तर पुढचा पुढचा अधिकारी होतो . यांतून कोणता अधिकारी असेल त्यानें कन्येचा विवाह केला नाहीं तर तिच्या प्रत्येक ऋतुकालीं त्याला भ्रूणहत्यादोष प्राप्त होईल . ह्या वर सांगितलेल्या सर्व अधिकार्‍यांच्या अभावीं कन्येनें विवाहसंबंध करण्यास योग्य अशा पतीला स्वतः आपण होऊन वरावें . " भ्रात्यांना अधिकार सांगितला तो संस्कार झालेल्याच भ्रात्यांना अधिकार , असें सांगतो तोच याज्ञवल्क्य - " पूर्वीं संस्कृत भ्रात्यांनीं संस्कार न झालेल्या भ्रात्यांचे संस्कार करावे . आणि पूर्व संस्कृत भ्रात्यांनीं आपल्या विभागास आलेल्या द्रव्यांतून चतुर्थांश द्रव्य काढून त्या द्रव्यानें भगिनींचे संस्कार करावे . " या वचनांत ‘ भगिन्यश्च ’ येथील चकारानें पूर्वार्धांतील ‘ पूर्वसंस्कृतैः ’ या पदाची अनुवृत्ति ( संबंध ) होत असल्यामुळें , जर भगिनींच्या विवाहाला पुरेल इतकें द्रव्य देण्याविषयीं किंवा आपल्या विभागांतून चतुर्थांश द्रव्य देण्याविषयीं भ्रात्यांना सांगितलें आहे असें म्हटलें तर , चकारानें ‘ पूर्वसंस्कृतैः ’ या पदाची अनुवृत्ति केलेली व्यर्थ होईल . म्हणून पूर्वीं संस्कृत असलेल्याच भ्रात्यांना भगिनीविवाहाचें कर्तृत्व आहे . असंस्कृत भ्रात्यांना कर्तृत्व नाहीं . असा कर्तृत्वाचा नियम या वचनानें केलेला आहे . यावरुन अनुपनीत भ्राता आणि माता इत्यादिक असतां माता इत्यादिकांनाच अधिकार आहे . अनुपनीत भ्रात्याला भगिनीच्या विवाहाचा अधिकार नाहीं , असें संबंधतत्त्व इत्यादि ग्रंथांत सांगितलें आहे . कन्या आपण होऊन पतीला वरणारी असतां किंवा कन्यादान करणारी माता असतां त्यांनींच नांदीश्राद्ध करावें . ह्या नांदीश्राद्धांत प्रधान संकल्पमात्र स्वतः करुन बाकीचें कृत्य ब्राह्मणद्वारा करवावें , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . वराचा विवाहकर्ता संस्कृत भ्राता वगैरे नसेल तर त्यानें स्वतःच नांदीश्राद्ध करावें . मातेनें नांदीश्राद्ध करुं नये . कारण , " पुत्र विद्यमान असतां इतराकडून श्राद्ध करवूं नये " या वचनानें पुत्रव्यतिरिक्तांना श्राद्धाचा निषेध आहे . पुत्राला अधिकार नसला म्हणजे मातेनें करावें , असें आहे तरी या ठिकाणीं वराला अधिकार नाहीं असें नाहीं . कारण , वराचें उपनयन झालेलें असल्यामुळें सर्व कर्मांचा अधिकार झालेला आहे , असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . माधवीयांत अपरार्कांत नारद - " आपल्या कन्येचें दान स्वतः पित्यानें करावें . अथवा पित्याच्या संमतीनें भ्रात्यानें करावें . त्याच्या अभावीं मातामह , मातुल , सकुल्य ( पितृव्यादिक ), बांधव ( मातृवंशांतील ) यांनीं कन्यादान करावें . सर्वांच्या अभावीं कन्येची माता जर स्वस्थचित्त असेल , तर तिनें कन्यादान करावें . माता अस्वस्थचित्त असेल तर आपल्या जातींतील लोकांनीं कन्या द्यावी . वरती आलेल्या ‘ सकुल्य ’ व ‘ बांधव ’ या पदांचे अर्थ सांगतो - सकुल्य म्हणजे पितृवंशांतील पितृव्य , पितृव्यपुत्र इत्यादि . आणि बांधव म्हणजे मातृवंशांतील मातामहभ्राता , मातुलपुत्र इत्यादिक समजावे . " मदनपारिजातांत कात्यायन - " औरसी कन्येचें दान स्वतः पित्यानेंच करावें . पित्याच्या अभावीं पितृकुलांतील बांधवांनीं करावें . औरसी भिन्न असून धर्मजा म्हणजे परकीय क्षेत्राचे ठायीं परपुरुषापासून उत्पन्न झालेली कन्या तिचें दान मातामहानें किंवा मातेनें अथवा मातुलानें करावें . " यावरुन औरस कन्येच्या दानाविषयीं पितृकुलांतील बांधव असतां मातामहादिकांना अधिकार नाहीं . याचा अपवाद तेथेंच सांगतो - " कन्येचे वडील फार दिवस प्रवासांत आहेत , व बंधु बालक आहेत , आणि कन्येचा विवाहकाल प्राप्त झाला असेल तर औरस कन्या असली तरी तिचें दान योग्यसमयीं मातेनें करावें . " मनु - " ज्या वेळीं कन्येचें दान करणारा कोणी नसेल त्या वेळीं कन्येनें राजाजवळ जाऊन आपला विवाह करण्यास सांगावें . "

परकीयकन्यादानेविशेषोमदनरत्नेस्कांदे आत्मीकृत्यसुवर्णेनपरकीयांतुकन्यकाम् ‍ धर्मेणविधिनादानमसगोत्रेपियुज्यते अत्रप्रकृतिस्थग्रहणादप्रकृतिस्थेनकृतमकृतमेव स्वतंत्रोयदितत्कार्यंकुर्यादप्रकृतिंगतः तदप्यकृतमेवस्यादस्वातंत्र्यस्यहेतुतइत्यपरार्के नारदोक्तेः यदितुसप्तपदीविवाहहोमादिप्रधानंजातंतदंगवैकल्येपिनावृत्तिर्विवाहस्य गौडाअप्येवमाहुः तत्रैवमरीचिः गौरींददन्नाकपृष्ठंवैकुंठंरोहिणींददत् ‍ कन्यांददद्ब्रह्मलोकंरौरवंतुरजस्वलाम् ‍ ॥

परकीयकन्यादानाविषयीं विशेष सांगतो मदनरत्नांत स्कांदांत - " परकीयकन्या असली तर तिच्या वडिलांस द्रव्य देऊन ती आपलीशी करुन धर्मानें यथाविधि तिचें दान करावें . याप्रमाणें भिन्न गोत्रांतील कन्या असली तरी त्या कन्येचें दान युक्त आहे . " या कन्यादानप्रकरणीं वरील याज्ञवल्क्यवचनांत आणि नारदवचनांत ‘ प्रकृतिस्थ ’ असें पद आहे . त्याचा अर्थ स्वस्थचित्त असा आहे . यावरुन अस्वस्थचित्तानें केलेलें तें न केल्यासारखेंच समजावें . कारण , " कोणतेंही कार्य करावयाचें असतां कोणताही मनुष्य जर स्वतंत्र असेल ( पराधीन नसेल ) तर त्यानें तें कार्य करावें . जर तो अस्वस्थचित्त ( पराधीन ) असून कोणतेंही कार्य करील तर तो पराधीन असल्याकारणानें त्यानें केलें तें न केल्यासारखें होईल " असें अपरार्कांत नारदवचन आहे . जर सप्तपदीक्रमण , विवाहहोम इत्यादि प्रधान कर्म झालेलें असेल , आणि त्यांत एकादें अंग विकल झालेलें असेल , तरी विवाहाची ( विवाहप्रयोगाची ) पुनः आवृत्ति होत नाहीं . गौडही असेंच सांगतात . तेथेंच मरीचि - " गौरी ( आठवर्षांची ) कन्या देणारा स्वर्गास जातो . रोहिणी ( नऊवर्षांची ) कन्या देणारा वैकुंठास जातो . दहा वर्षांची कन्या देणारा ब्रह्मलोकास जातो . रजस्वला कन्या देणारा रौरव नरकास जातो . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP