मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
मातृगोत्रवर्जनाचा निर्णय

तृतीयपरिच्छेद - मातृगोत्रवर्जनाचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां मातृगोत्रवर्जनाचा निर्णय सांगतो -

अथमातृगोत्रवर्जननिर्णयः शातातपः मातुलस्यसुतामूढ्वामातृगोत्रांतथैवच समानप्रवरांचैव गत्वाचांद्रायणंचरेत् ‍ यद्यपि सगोत्रांमातुरप्येकेनेच्छंत्युद्वाहकर्मणि जन्मनाम्नोरविज्ञानेप्युद्वहेदविशंकितइति व्यासोक्तेरज्ञातनामत्वेनसगोत्रत्वदोषस्तथापिनेदंकलौप्रवर्तते गोत्रान्मातुः सपिंडाच्चविवाहोगोवधस्तथेति कलिवर्ज्यत्वोक्तेः इदंमातृगोत्रवर्जनंमाध्यंदिनीयानामेव मातृगोत्रंमाध्यंदिनीयानामपुत्रायाश्चेति सत्याषाढोक्तेरितिकश्चित्तन्निर्मूलम् ‍ अतएवआहप्रवरमंजरीकारः दोषस्यातिगुरुत्वात् ‍ सर्वेषांमातृगोत्रंवर्ज्यमिति यत्तु एकस्मिन् ‍ प्रवरेतुल्येमातृगोत्रेवरस्यच तमुद्वाहंनकुर्वीतसाकन्याभगिनीस्मृतेतिमातृकुलेप्रवरचिंतनमुक्तम् ‍ तदासुरादिविवाहोढापरमितिदिक् ‍ । विस्तरस्तुग्रंथांतरेभ्योज्ञेयः ।

शातातप - " मातुलाची कन्या , मातेच्या गोत्रांतील ( मातामहाच्या गोत्रांतील ) कन्या आणि सप्रवर कन्या यांच्याशीं विवाह करुन गमन करील तर चांद्रायण प्रायश्चित्त करावें . " आतां जरी " किती एक विद्वान् ‍ विवाहाविषयीं मातेच्या गोत्रांतली देखील कन्या इच्छीत नाहींत . त्या मातृगोत्रांतील कन्येच्या वडिलांचें , अमुकापासून अमुक झाला इत्यादि जन्म , आणि त्यांचें नांव बरोबर माहीत नसेल तर कोणतीही शंका न धरितां तिच्याशीं विवाह करावा " ह्या व्यासवचनावरुन नांवाचें ज्ञान नसेल तर त्या कन्येला मातृसगोत्रत्वरुप दोष नाहीं ; तरी हें वचन कलियुगांत प्रवृत्त होत नाहीं . कारण , " मातेच्या गोत्रांतील व मातेच्या सपिंडांतील कन्येशीं विवाह आणि मधुपर्कांत गोवध हे कलियुगांत वर्ज्य करावे " असें पुढें ( तृतीयपरिच्छेद पूर्वार्धाच्या शेवटीं ) कलिवर्ज्यप्रकरणांत सांगितलें आहे . ही मातृगोत्रांतील कन्या वर्ज्य सांगितली ती माध्यंदिन शाख्यांनाच आहे . इतरांना वर्ज्य नाहीं . कारण , " मातृगोत्र वर्ज्य सांगितलें तें माध्यंदिनांनाच समजावें " असें सत्याषाढाचें वचन आहे , असें कोणी एक सांगतो . तें निर्मूल आहे . म्हणूनच प्रवरमंजरीकार सांगतो - " मातृगोत्रांतील कन्या वरणें हा दोष फार मोठा असल्यामुळें सर्वांना मातृगोत्र वर्ज्य आहे . " आतां जें " वराच्या मातेचें गोत्र व प्रवर आणि वधूचें गोत्र व प्रवर एक झाला असतां त्या वधूवरांचा विवाह करुं नये . कारण , ती कन्या त्या वराची भगिनी म्हटली आहे . " ह्या वचनानें मातेच्या कुलांतील प्रवर पहावा , म्हणून सांगितलें आहे . तो प्रकार आसुर , गांधर्व इत्यादि विवाहानें विवाहित मातेविषयीं समजावा . ही दिशा दाखविली आहे . याचा विस्तार पाहणें असल्यास इतर ग्रंथांतून पाहावा .

सगोत्रादिविवाहेप्रायश्चित्तंस्मृत्यर्थसारे इत्थंसगोत्रसंबंधविवाहविषयेस्थिते यदिकश्चिज्ज्ञानतस्तांकन्यामूढ्वोपगच्छति गुरुतल्पव्रताच्छुद्ध्येद्गर्भस्तज्जोऽन्त्यतांव्रजेत् ‍ भोगतस्तांपरित्यज्यपालयेज्जननीमिव अज्ञानादैंदवैः शुद्ध्येत्र्त्रिभिर्गर्भस्तुकाश्यपः एवंसापिंड्येपि सपिंडापत्यदारेषुप्राणत्यागोविधीयतइतिबृहद्यमोक्तेः तिथितत्त्वेबौधायनः सपिंडांसगोत्रांचेदमत्योपयच्छेन्मातृवदेनांबिभृयात् ‍ ।

सगोत्र सपिंड कन्येशीं विवाह झाला असतां प्रायश्चित्त सांगतो स्मृत्यर्थसारांत - " याप्रमाणें सगोत्रसंबंधी विवाहविषय उपस्थित झाला असतां जर कोणी जाणून त्या सगोत्र कन्येशीं विवाह करुन तिजप्रत गमन करील तर त्यानें गुरुपत्नीगमनाचें प्रायश्चित्त करावें , म्हणजे तो शुद्ध होईल . आणि त्यापासून झालेला गर्भ असेल तो चांडाल होईल . याकरितां सगोत्र कन्येशीं विवाह झाला असतां संभोगाविषयीं तिचा त्याग करुन मातेसारखें तिचें पालन करावें . न जाणून सगोत्र कन्येशीं विवाह करील व तिचा संभोग करील तर तीन चांद्रायणांनीं त्याची शुद्धि होईल आणि त्यापासून झालेला गर्भ काश्यप गोत्री होईल . " हाच प्रकार सपिंडांतील कन्येविषयीं देखील समजावा . कारण , " सपिंडांतील कन्या व स्त्रिया यांचे ठायीं गमन केलें असतां प्राणत्याग होईल असें प्रायश्चित्त सांगितलें आहे " असें बृहद्यमाचें वचन आहे . तिथितत्त्वांत बौधायन - " सगोत्र व सपिंड कन्येशीं न जाणून जर विवाह करील तर तिचें मातेसारखें पालन करावें . "

कन्याविवाहकालउक्तोज्योतिर्निबंधे षडब्दमध्येनोद्वाह्याकन्यावर्षद्वयंयतः सोमोभुंक्तेततस्तद्वद्गंधर्वश्चतथाऽनलः राजमार्तंडः अयुग्मेदुर्भगानारीयुग्मेतुविधवाभवेत् ‍ तस्माद्गर्भान्वितेयुग्मेविवाहेसापतिव्रता मासत्रयादूर्ध्वमयुग्मवर्षेयुग्मेपिमासत्रयमेवयावत् ‍ विवाहशुद्धिंप्रवदंतिसंतोवात्स्यादयः स्त्रीजनिजन्ममासात् ‍ पराशरमाधवीयेतु जन्मतोगर्भाधानाद्वापंचमाब्दात्परंशुभं कुमारीवरणंदानंमेखलाबंधनं तथेत्युक्तम् ‍ संबंधतत्त्वेयमः कन्याद्वादशवर्षाणियाऽप्रदत्तावसेद्गृहे ब्रह्महत्यापितुस्तस्याः साकन्यावरयेत्स्वयं भारते त्रिंशद्वर्षः षोडशाब्दांभार्यांविंदेतनग्निकां द्व्यष्टवर्षाऽष्टवर्षांवाधर्मेसीदतिसत्वरः अतोऽप्रवृत्तेरजसिकन्यांदद्यात्पितासकृत् ‍ तत्रैव सप्तसंवत्सरादूर्ध्वंविवाहः सार्ववर्णिकः कन्यायाः शस्यतेराजन्नन्यथाधर्मगर्हितः राजमार्तंडः राहुग्रस्तेतथायुद्धेपितृणांप्राणसंशये अतिप्रौढाचयाकन्याचंद्रलग्नबलेनतु मनुः त्रिंशद्वर्षोवहेत्कन्यांह्रद्यांद्वादशवार्षिकीं त्र्यष्टवर्षोष्टवर्षांवाधर्मेसीदतिसत्वरः यद्यपि विवाहस्त्वष्टवर्षायाः कन्यायाः शस्यतेबुधैरितिसंवर्तोक्तेरतऊर्ध्वंरजस्वलेत्यादेश्चदशवर्षादूर्ध्वंविवाहोनिषिद्धः तथापिदातुरभावेद्वादशषोडशाब्देज्ञेयेत्रीणिवर्षाण्यृतुमतीकांक्षेतपितृशासनमिति पराशरमाधवीयेबौधायनोक्तेश्च मनुः स्त्रीसंबंधे दशैतानिकुलानिपरिवर्जयेत् ‍ हीनक्रियंनिः पुरुषंनिश्छंदोरोमशार्शसम् ‍ क्षय्यामयाव्यपस्मारिश्वित्रिकुष्ठिकुलानिच नर्क्षवृक्षनदीनाम्नींनांत्यपर्वतनामिकां नपक्ष्यहिप्रेष्यनाम्नींनबिभीषणनामिकाम् ‍ यमः तस्मादुद्वाहयेत्कन्यांयावन्नर्तुमतीभवेत् ‍ तथामूलजादीनांफलंप्रागुक्तम् ‍ तथा वर्णवश्यग्रहमैत्र्यादिघटितविचारोज्योतिर्विंभ्द्योज्ञेयः विस्तरात्तुनोच्यते ।

कन्येचा विवाहकाल सांगतो ज्योतिर्निबंधांत - " सहा वर्षांच्या आंत कन्येचा विवाह करुं नये . कारण , दोन वर्षै सोम तिला भोगतो , नंतर दोन वर्षै गंधर्व भोगतो , पुढें दोन वर्षै अग्नि भोगतो . " राजमार्तंड - " कन्येचा विषमवर्षीं विवाह केला असतां ती स्त्री दुर्भगा होईल . आणि समवर्षीं विवाह केला असतां ती स्त्री विधवा होईल . तस्मात् ‍ गर्भापासून समवर्षीं विवाह करावा , म्हणजे ती पतिव्रता होईल . कन्येचें जन्म ज्या मासांत असेल त्या जन्ममासापासून अयुग्म ( विषम ) वर्षीं तीन महिन्यांनंतर आणि समवर्षीं तीन महिनेपर्यंत विवाहाचा काल शुद्ध आहे , असें वात्स्यादिमुनि सांगतात . " पराशर माधवीयांत तर " कन्येचें वरण , कन्येचें दान आणि मौंजीबंधन हें जन्मापासून किंवा गर्भस्थापनापासून पांचव्या वर्षाच्या पुढें शुभ आहे " असें सांगितलें आहे . संबंधतत्त्वांत यम - " बारा वर्षैपर्यंत जी अविवाहित कन्या पित्याच्या घरीं राहील तिच्या पित्याला ब्रह्महत्या दोष प्राप्त होईल . म्हणून त्या कन्येनें आपण होऊन पति वरावा . " भारतांत - " तीस वर्षांच्या पुरुषानें ऋतुप्राप्त न झालेली अशी सोळा वर्षांची स्त्री वरावी . अथवा सोळा वर्षांच्या पुरुषानें आठ वर्षांची भार्या वरावी . म्हणजे धर्माचे ठायीं तो राहतो . नग्निका ( ऋतु प्राप्त न झालेली ) वरावी , असें आहे म्हणून कन्येला ऋतु प्राप्त झाला नसेल तोंपर्यंत तिचें दान पित्यानें एकवार करावें . " तेथेंच - " सात वर्षांच्या पुढें कन्येचा विवाह ब्राह्मणादि सर्व वर्णांना प्रशस्त आहे . असा न होईल तर तो धर्मानें निंदित होईल . " राजमार्तंड - " चंद्रसूर्यग्रहणांत सांगितलेल्या कर्माविषयीं , युद्धांत करावयाच्या , कार्याविषयीं , मातापितरांच्या वांचण्याचा संशय उत्पन्न असतां कन्येच्या विवाहाविषयीं आणि अति प्रौढ झालेल्या कन्येच्या विवाहाविषयीं चंद्रबळ व लग्नबळ पाहावयाचें कारण नाहीं . " मनु - " तीस वर्षांच्या पुरुषानें आपणास आवडणारी बारा वर्षांची कन्या वरावीं . अथवा चोवीर वर्षांच्या वरानें आठ वर्षांची कन्या वरावी . म्हणजे तो धर्माचे ठायीं स्थिर होतो . " आतां जरी " आठ वर्षांच्या कन्येचा विवाह विद्वानांनीं प्रशस्त सांगितला आहे " ह्या संवर्तवचनावरुन ; आणि " आठ वर्षांची गौरी , नऊ वर्षांची रोहिणी , दहा वर्षांची कन्या , याच्या पुढें रजस्वला म्हटली आहे " इत्यादि बृहस्पतिवचनावरुनही दहा वर्षांच्या पुढें कन्येचा विवाह निषिद्ध आहे ; तथापि दात्याच्या अभावीं बारा वर्षांच्या व सोळा वर्षांच्या कन्येचा विवाह सांगितला आहे , असें समजावें . आणि " विवाहाच्या पूर्वी ऋतु प्राप्त झालेल्या कन्येनें , पित्यानें करावयाच्या विवाहाची तीन वर्षैं प्रतीक्षा करावी , नंतर स्वतः आपण होऊन योग्य वराला वरावें " असें पराशरमाधवीयांत बौधायनवचनही आहे . मनु - " स्त्रीसंबंध ( विवाह ) करावयाचा असतां दहा कुलांतील कन्या वर्ज्य करावी . तीं दहा कुलें येणेंप्रमाणें - ज्या कुलांत वेदशास्त्रविहित कर्मै होत नाहींत असलें कुल , ज्या कुलांत पुरुष उत्पन्न होत नाहींत असलें कुल , वेदाध्ययनरहित कुल , अंगावर बहुत केश उत्पन्न होणारें कुल , ज्यांत मुळव्याधीचा रोग उत्पन्न होत आहे असलें कुल , ज्यांत क्षयरोगी होतात असलें कुल , ज्यांत दीर्घकालपर्यंत रोगी असतात असलें कुल , ज्यांत अपस्मार ( फेपरें ) येत असतो असलें कुल , ज्या कुलांत अंगावर पांढरें कोड होतें तें कुल , आणि ज्या कुलांत कुष्ठ ( महारोग ) उत्पन्न आह तें कुल , ह्या दहा कुलांतील कन्या वर्ज्य

करावी . तसेंच - आस्वल , वृक्ष , नदी , अंत्यज , पर्वत , पक्षी , सर्प , दास , यांच्या नांवाची आणि भयकारक नांवाची कन्या वरुं नये . " यम - " तस्मात् ‍ जोंपर्यंत ऋतुमती झाली नसेल तोंपर्यंत कन्येशीं विवाह करावा . " तसेंच मूलनक्षत्र , आश्लेषानक्षत्र इत्यादिकांवर झालेल्या कन्यांचें फल पूर्वीं जातकनिर्णयप्रसंगीं सांगितलें आहे , त्याचा विचार करावा . तसेंच वर्ण , वश्य , ग्रहमैत्री इत्यादि वधूवरांचा घटित विचार ज्योतिर्वेत्त्यांपासून जाणावा . फार विस्तार होईल म्हणून येथें सांगत नाहीं .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP