आतां अन्नप्राशन संस्कार सांगतो.
अथान्नप्राशनं पारिजाते नारदः जन्मतोमासिषष्ठेस्यात्सौरेणान्नाशनंपरं तदभावेऽष्टमेमासिनवमेदशमेपिवा द्वादशेवापिकुर्वीतप्रथमान्नाशनंपरं संवत्सरेवासंपूर्णेकेचिदिच्छंतिपंडिताः मदनरत्नेलौगाक्षिः षष्ठेन्नप्राशनंजातेषुदंतेषुवेति शंखः संवत्सरेऽन्नप्राशनमर्धसंवत्सरेवेति ज्योतिर्निबंधेनारदः षष्ठेवाप्यष्टमेमासिपुंसांस्त्रीणांतुपंचमे सप्तमेमासिवाकार्यंनवान्नप्राशनंशुभं रिक्तांदिनक्षयंनंदांद्वादशीमष्टमीममां त्यक्त्वान्यतिथयः प्रोक्ताः सितजीवज्ञवासराः चंद्रवारंप्रशंसंतिकृष्णेचांत्यत्रिकंविना श्रीधरः आदित्यतिष्यवसुसौम्यकरानिलाश्विचित्राजविष्णुवरुणोत्तरपौष्णमित्राः बालान्नभोजनविधौदशमेविशुद्धेछिद्रांविहायनवमींतिथयः शुभाः स्युः वसिष्ठः बालान्नभुक्तौव्रतबंधनेचराजाभिषेकेखलुजन्मधिष्ण्यं शुभंत्वनिष्टंसततंविवाहेसीमंतयात्रादिषुमंगलेषु मार्कंडेयविष्णुधर्मयोः ब्रह्माणंशकरंविष्णुंचंद्राकौंचदिगीश्वरान् भुवंदिशश्चसंपूज्यहुत्वावह्नौतथाचरुं देवतापुरतस्तस्यधात्र्युत्संगगतस्यच अलंकृतस्यदातव्यमन्नंपात्रेसकांचनं मध्वाज्यदधिसंयुक्तंप्राशयेत्पायसंतुवेति ।
पारिजातांत - नारद - “ जन्ममासापासून सौरमानानें सहाव्या मासांत अन्नप्राशन करावें. त्याच्या अभावीं आठव्या, नवव्या, दहाव्या अथवा बाराव्या मासांत बालकाला प्रथम अन्नप्राशन करावें, अथवा वर्ष संपूर्ण झाल्यावर अन्नप्राशन करावें असें केचित् विद्वान् सांगतात. ” मदनरत्नांत - लौगाक्षि - “ सहाव्या मासांत किंवा दंतोत्पत्ति झाल्यानंतर अन्नप्राशन करावें. ” शंख - “ वर्षांतीं अन्नप्राशन करावें. किंवा सहाव्या मासांत करावें. ” ज्योतिर्निबंधांत - नारद - “ सहाव्या किंवा आठव्या मासीं पुरुषाचें प्रथम अन्नप्राशन करावें. स्त्रियांचें पांचव्या किंवा सातव्या मासीं अन्नप्राशन करावें. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, दिनक्षय, प्रतिपदा, द्वादशी, अष्टमी, अमावास्या, ह्या तिथि वर्ज्य करुन अन्य तिथि शुभ होत. बुध, गुरु, शुक्र, हे वार अन्नप्राशनाविषयीं प्रशस्त होत. कृष्ण पक्षांतील शेवटचे पांच दिवस टाकून इतर दिवशीं चंद्रवार प्रशस्त आहे. ” श्रीधर - “ पुनर्वसु, पुष्य, धनिष्ठा, मृग, हस्त, स्वाती, अश्विनी, चित्रा, रोहिणी, श्रवण, शततारका, तीन उत्तरा, रेवती, अनुराधा, हीं नक्षत्रें अन्नप्राशनाविषयीं शुभ होत. धरलेल्या लग्नापासून दशम लग्न शुद्ध असावें. छिद्रा तिथि, व नवमी वर्ज्य करुन इतर तिथि शुभ होत. ” वसिष्ठ - “ बालकाचें अन्नप्राशन, उपनयन, राजाभिषेक, यांचे ठायीं जन्मनक्षत्र शुभ आहे. विवाह, सीमंतसंस्कार आणि यत्रादिक मंगल कृत्यें यांविषयीं जन्मनक्षत्र अशुभ जाणावें. ” मार्केंडेयांत व विष्णुधर्मांत - “ ब्रह्मा, शंकर, विष्णु, चंद्र, सूर्य, दिक्पाल, भूमि, दिशा, यांची पूजा करुन अग्नीमध्यें चरुहोम करुन कुलदेवत्रेच्या अग्रभागीं मातेच्या मांडीवर बसलेला असून अलंकारयुक्त अशा बालकाला, पात्रांत दधि, मध, घृत यांनीं मिश्रित असें अन्न किंवा क्षीर, सुवर्णयुक्त हस्तानें घेऊन प्राशन करवावें.