मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
जातकर्म

तृतीयपरिच्छेद - जातकर्म

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां जातकर्म सांगतो -

अथजातकर्म पारिजातेवसिष्ठः श्रुत्वाजातंपितापुत्रंसचैलंस्नानमाचरेत् ‍ मनुः प्राड्नाभिवर्धनात्पुंसोजातकर्मविधीयते वर्धनंच्छेदनं हेमाद्रौबैजवापः जन्मतोनंतरंकार्यंजातकर्मयथाविधि दैवादतीतकालंचेदतीतेसूतकेभवेत् ‍ पृथ्वीचंद्रोदयेविष्णुधर्मे अच्छिन्ननाभिकर्तव्यंश्राद्धंवैपुत्रजन्मनि पुत्रपदेन कन्यापिगृह्यते तदाहतत्रैवकार्ष्णाजिनिः प्रादुर्भावेपुत्रपुत्र्योर्ग्रहणेचंद्रसूर्ययोः स्नात्वानंतरमात्मीयान् ‍ पितन् ‍ श्राद्धेनतर्पयते ‍ एतच्चरात्रावपिकार्यं पुत्रजन्मनियात्रायांशर्वर्यांदत्तमक्षयमिति तत्रैवव्यासोक्तेः बैजवापः जातमात्रकुमारस्यजातकर्मविधीयते स्तनप्राशनतः पूर्वंनाभिकर्तनतोपिवा एतेननैमित्तिकमपीदंजातेष्टिवदाशौचांतेकार्यमितिशंकापरास्ता जातेकुमारेपितृणामामोदात्पुण्यंतदहरितिहारितोक्तेश्च ।

पारिजातांत वसिष्ठ - " पुत्र झालेला श्रवण करितांच पित्यानें वस्त्रसहित स्नान करावें . " मनु - " नाभिच्छेदनाचे पूर्वी पुत्राचें जातकर्म करावें . " हेमाद्रींत बैजवाप - " जन्म झाल्यानंतर त्या वेळीं जातकर्म यथाविधि करावें . दैवानें त्या कालीं झालें नाहीं तर जननाशौच गेल्यावर जातकर्म होईल . " पृथ्वीचंद्रोदयांत विष्णुधर्मांत - " पुत्रजन्मसमयीं नाभिच्छेदन झालें नाहीं तोंपर्यंत श्राद्ध करावें . " या वचनांत पुत्रपदानें कन्या देखील घ्यावयाची आहे . तें सांगतो तेथेंच कार्ष्णाजिनि - " पुत्र व कन्या यांच्या उत्पत्तिकालीं , व चंद्रसूर्याच्या ग्रहणांत , स्नान करुन नंतर आपल्या पितरांना श्राद्धानें तृप्त करावें . " हें श्राद्ध रात्रीं सुद्धां करावें . कारण , " पुत्रजन्मकालीं , आणि यात्रेचे ठायीं रात्रीं दिलेलें अक्षय होतें " असें तेथेंच व्यासवचन आहे . बैजवाप - " उत्पन्न होतांक्षणीं पुत्राचें जातकर्म स्तनप्राशनाच्या पूर्वीं किंवा नाभिच्छेदनाच्या पूर्वी करावें . " हें जातकर्म नैमित्तिक असलें तरी तत्कालीं आशौचांतही करावें , असें सांगितल्यावरुन - जशी पुत्रजातेष्टि आशौचांतीं करावयाची , तसें हें जातकर्म आशौचांतीं करावें , अशी शंका होती ती खंडित झाली . आणि " पुत्र झाला असतां पितरांना हर्ष होत असल्यामुळें तो दिवस पुण्य आहे " असें हारीतवचनही आहे . या वचनावरुनही तत्कालीं करावें , असें होतें .

अत्रश्राद्धमामेनहेम्नावाकार्यमित्युक्तं पृथ्वीचंद्रोदयेआदित्यपुराणे जातश्राद्धेतुपक्कान्नंनदद्याद्ब्राह्मणेष्वपीति हेमाद्रिस्तु पुत्रजन्मनिकुर्वीतश्राद्धंहेम्नैवबुद्धिमान् ‍ नपक्केननचामेनकल्याणान्यभिकामयन्निति संवर्तोक्तेर्हेम्नैवेत्याह एतच्चजननाशौचेमरणाशौचेचकार्यमित्याहमिताक्षरायांप्रजापतिः आशौचेतुसमुत्पन्नेपुत्रजन्मयदाभवेत् ‍ कर्तुस्तात्कालिकीशुद्धिः पूर्वाशौचेनशुध्यति केचित्तु मृताशौचस्यमध्येतुपुत्रजन्मयदाभवेत् ‍ आशौचापगमेकार्यंजातकर्मयथाविधीति स्मृतिसंग्रहोक्तेराशौचांतेकार्यमित्याहुः स्मृत्यर्थसारेपिविकल्प उक्तः मृदुध्रुवचरक्षिप्रभेष्वेषामुदयेषुच गुरौशुक्रेथवाकेंद्रेजातकर्मचनामच मृद्वादिलक्षणमाहश्रीधरः रोहिण्युत्तरभंस्थिरंगिरिशमूलेंद्रोरगादारुणंक्षिप्रंचाश्विदिनेशपुष्यमनलेंद्राग्नीतुसाधारणं उग्रंपूर्वमघांतकंमृदुगतित्वाष्ट्रांत्यमैत्रंचरंविष्णुस्वातिशतोडुवस्वदितयः कुर्युः स्वसंज्ञाफलं अत्रसर्वत्रजातकर्मनामकर्मादावुक्तकालातिक्रमेनक्षत्रादिकंज्ञेयम् ‍ देशकालोपघाताद्यैः कालातिक्रमणंयदि अनस्तगेज्येंदुसितेतत्कार्यंचोत्तरायणे इतिमदनरत्नेनारदोक्तेः बृहस्पतिरपि मुख्यालाभेविधिज्ञेनविधिश्चिंत्योऽप्रमादतः नक्षत्रतिथिलग्नानांविचार्यैवंपुनः पुनः सूतकेसंध्यादौविशेषंवक्ष्यामः ।

ह्या जातकर्माचे ठायीं आमानें किंवा हेमानें ( सुवर्णानें ) श्राद्ध करावें , असें सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत आदित्यपुराणांत - " जातकर्मश्राद्धांत ब्राह्मणांना देखील पक्वान्न देऊं नये . " हेमाद्री तर - " पुत्रजन्माचे ठायीं श्राद्ध हेमानेंच करावें . कल्याण इच्छिणारानें पक्वान्नानें किंवा आमान्नानें करुं नये " ह्या संवर्तवचनावरुन हेमानेंच करावें असें सांगतो . हें श्राद्ध जननाशौचांत व मरणाशौचांतही करावें , असें सांगतो . मिताक्षरेंत प्रजापति - " आशौच उत्पन्न असतां जेव्हां पुत्रजन्म होईल तेव्हां कर्त्याची तात्कालिक शुद्धि होते . म्हणजे कर्ता पूर्वीं असलेल्या आशौचानें शुद्ध होतो . " केचित् ‍ विद्वान् ‍ तर - मृताशौचामध्यें जेव्हां पुत्रजन्म होईल तेव्हां आशौचसमाप्तीनंतर जातकर्म यथाविधि करावें " ह्या स्मृतिसंग्रहवचनावरुन आशौचांतीं करावें , असें सांगतात . स्मृत्यर्थसारांतही मृताशौच असतां त्यांत किंवा आशौचांतीं करावें , असा विकल्प सांगितला आहे . " मृदु , ध्रुव , चर , क्षिप्र , ह्या नक्षत्रांवर ; आणि ह्या नक्षत्रांच्या उदयकालींही ; गुरु किंवा शुक्र केंद्रीं ( १।४।७।१० या स्थानीं ) असतां जातकर्म व नामकर्म करावें . " मृदु इत्यादि नक्षत्रें कोणतीं तीं सांगतो श्रीधर - " रोहिणी व तीन उत्तरा ( उत्तरा , उत्तराषाढा , उत्तराभाद्रपदा ) हीं स्थिर होत . आर्द्रा , मूल , ज्येष्ठा , आश्लेषा , हीं दारुण होत . अश्विनी , हस्त , पुष्य , हीं क्षिप्र होत . कृत्तिका , विशाखा हीं साधारण होत . पूर्वा तीन , मघा , भरणी हीं उग्र होत . मृग , चित्रा , रेवती , अनुराधा हीं मृदु होत . श्रवण , स्वाती , शततारका , धनिष्ठा , पुनर्वसु हीं चर होत . हीं नक्षत्रें आपापल्या नांवासारखें फल करितात . " येथें जातकर्म , नामकर्म इत्यादि सर्व कर्मांविषयीं उक्तकालाचा अतिक्रम झाला असतां नक्षत्रादिक पाहावें . कारण , " देशाचा उपघात ( उच्छेद , अशुद्धि वगैरे ), कालाचा उपघात ( विघ्नादि ) इत्यादि कारणांनीं जर मुख्य कालाचें अतिक्रमण ( उल्लंघन ) होईल तर उत्तरायणांत गुरु , चंद्र , शुक्र हे अस्तंगत नसतां तें कर्म करावें " असें मदनरत्नांत नारदवचन आहे . बृहस्पतिही - " मुख्य कालाचा लाभ नसतां नक्षत्र , तिथि , लग्न यांचा पुनः पुनः विचार करुन अप्रमादानें काल ( मुहूर्त ) पहावा . " सूतकांत संध्यादि कर्माविषयीं विशेष विचार पुढें ( आशौचप्रकरणीं ) सांगूं .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP