मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
पार्थिवपूजा

तृतीयपरिच्छेद - पार्थिवपूजा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां पार्थिवपूजा सांगतो -

अथपार्थिवपूजा नंदिपुराणे आयुष्मान् ‍ बलवान् ‍ श्रीमान् ‍ पुत्रवान् ‍ धनवान् ‍ सुखी वरमिष्टंलभेल्लिंगंपार्थिवंयः समर्चयेत् ‍ तस्मात्तुपार्थिवंलिगंज्ञेयंसर्वार्थसाधकं तत्रैव गोभूहिरण्यवस्त्रादिबलिपुष्पनिवेदने ज्ञेयोनमः शिवायेतिमंत्रः सर्वार्थसाधकः सर्वमंत्राधिकश्चायमोंकाराद्यः षडक्षरः भविष्ये मूर्तयोष्टौशिवस्यैताः पूर्वादिक्रमयोगतः आग्नेय्यंताः प्रपूज्यास्तुवेद्यांलिंगेशिवंयजेत् ‍ अत्रनप्राचीमग्रतः शंभोरितिरुद्रयामलेनिषेधात् ‍ नांतरालंप्राची किंतुप्रसिद्धैव तिथितत्त्वेदेवीपुराणे मृदाहरणसंघट्टेप्रतिष्ठाह्वानमेवच स्नपनंपूजनंचैवविसर्जनमतः परं हरोमहेश्वरश्चैवशूलपाणिः पिनाकधृक् ‍ शिवः पशुपतिश्चैवमहादेवइतिक्रमः स्कांदे शुष्काण्यपिचपत्राणिश्रीवृक्षस्यनिवेदयेत् ‍ तत्रैवभविष्ये धत्तूरकैश्चयोलिंगंसकृत्पूजयतेनरः सगोलक्षफलंप्राप्यशिवलोकेमहीयते योगिनीतंत्रे शिवागारेझल्लकंचसूर्यागारेचशंखकं दुर्गागारेवंशवाद्यंमधूरींचनवादयेत् ‍ श्राद्धहेमाद्रौस्कांदे स्पृष्ट्वारुद्रस्यनिर्माल्यंवाससाआप्लुतः शुचिः प्रयोगपारिजातेक्रियासारे मध्यमानामिकामध्येपुष्पंसंगृह्यपूजयेत् ‍ अंगुष्ठतर्जन्यग्राभ्यांनिर्माल्यमपनोदयेत् ‍ अपनीतंचनिर्माल्यंचंडेशायनिवेदयेत् ‍ अशून्यमस्तकंलिंगंसदाकुर्वीतपूजकः शूलपाणौलैंगे वरंप्राणपरित्यागः शिरसोवापिकर्तनम् ‍ नचैवापूज्यभुंजीतशिवलिंगेमहेश्वरम् ‍ सूतकेमृतकेचैवनत्याज्यंशिवपूजनम् ‍ तिथितत्त्वेलैंगे विनाभस्मत्रिपुंड्रेणविनारुद्राक्षमालया पूजितोपिमहादेवोनस्यात्तस्यफलप्रदः तस्मान्मृदापिकर्तव्यंललाटेवैत्रिपुंड्रकम् ‍ ।

नंदिपुराणांत - " जो पार्थिवलिंगाची पूजा करील तो आयुष्यवान् ‍ बलवान् ‍ श्रीमान् ‍ पुत्रवान् ‍ धनवान् ‍ सुखी असा होऊन अभीष्ट वर पावेल . तस्मात् ‍ कारणात् ‍ पार्थिवलिंग सर्वार्थाचें साधक आहे , असें जाणावें . " तेथेंच सांगतो - " गाई , भूमि , सुवर्ण , वस्त्रें वगैरे , बलि , पुष्पें यांच्या निवेदनाविषयीं ‘ नमः शिवाय ’ हा मंत्र जाणावा . हा मंत्र सर्वार्थसाधक आहे . या मंत्राच्या आधीं ‘ ॐकार लावून षडक्षर ( सहा अक्षरांचा ) मंत्र होतो , तो सर्व मंत्रांहून अधिक आहे . " भविष्यांत - " क्षिति , जल , अग्नि , वायु , आकाश , यजमान , सोम , सूर्य , ह्या आठ मूर्ति शिवाच्या आहेत . पूर्वेपासून ( प्राचीपासून ) अनुक्रमानें आग्नेयीपर्यंत आठ दिशांस यांची क्रमानें पूजा करावी . आणि वेदीचे ठायीं लिंगावर शिवाजी पूजा करावी . " येथें प्राची दिशा कोणती समजावी ? कारण , ‘ पूज्य आणि पूजक यांच्या मधील दिशा प्राची कल्पावी , ’ या वचनावरुन मधली प्राची आली आहे , ती घ्यावी कीं काय ? असा संशय आला म्हणून सांगतो - ‘ शिवाच्या अग्रभागीं प्राची कल्पूं नये ’ असा रुद्रयामलांत निषेध असल्यामुळें येथें पूज्यपूजकांच्या मधली दिशा प्राची समजूं नये . तर प्रसिद्ध जी प्राची तीच येथें घ्यावी . तिथितत्त्वांत देवीपुराणांत - " माती आणणें , ती मळून तिचें लिंग करणें , प्रतिष्ठा करणें , आवाहन करणें , स्नानादिक उपचार करणें , पूजा करणें , आणि विसर्जन करणें ; हे सर्व उपचार अनुक्रमानें हर , महेश्वर , शूलपाणि , पिनाकधृक् ‍ , शिव , पशुपति , महादेव , ह्या नाममंत्रांनीं करावे . " स्कांदांत - " बिल्ववृक्षाचीं शुष्क पत्रें असलीं तरी तीं निवेदन करावीं . " तेथेंच भविष्यांत - " जो मनुष्य धत्तूरपुष्पांनीं एकवार लिंगाची पूजा करितो तो लक्ष गोप्रदानांचें फल पावून शिवलोकीं पूज्य होतो . " योगिनीतंत्रांत - " शिवमंदिरांत झांज , सूर्यमंदिरांत शंख , आणि देवीच्या मंदिरांत पांवरी , मधूरी हीं वाजवूं नयेत . " श्राद्धहेमाद्रींत स्कांदांत - " शिवनिर्माल्यास स्पर्श केला असतां वस्त्रसहित स्नान करावें , म्हणजे शुद्ध होतो . " प्रयोगपारिजातांत क्रियासारांत - " मध्यमा व अनामिका ह्या दोन अंगुलींमध्यें पुष्प घेऊन पूजा करावी . अंगुष्ठ व तर्जनी यांच्या अग्रांनीं निर्माल्य काढावा . काढलेला निर्माल्य चंडेशाला निवेदन करावा . पूजकानें सर्वकालीं लिंगाचें मस्तक शून्य करुं नये . " शूलपाणींत लिंगपुराणांत - " प्राणत्याग किंवा मस्तकच्छेद झालेला श्रेष्ठ आहे ; पण शिवलिंगावर शिवाची पूजा केल्यावांचून भोजन करुं नये . जननाशौचांत किंवा मृताशौचांतही शिवपूजन टाकूं नये . " तिथितत्त्वांत लिंपुराणांत - " भस्माचा त्रिपुंड्र केल्यावांचून व रुद्राक्षमाळा धारण केल्यावांचून महादेवाची पूजा केली तरी ती त्यास फलप्रद होणार नाहीं . तस्मात् ‍ मृत्तिकेचा तरी ललाटावर त्रिपुंड्र करावा . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP