मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
केशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें

तृतीयपरिच्छेद - केशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां केशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें सांगतो -

अथकेशवादिमूर्तयः बोपदेवः केविगोवादापुह्नुपेप्रजाच्युकृममात्रिना वाधोनृहसानिश्रीपाशाच्चगेविगपेचपे अत्रकेविगवित्याद्यैः केशवविष्ण्वादिचतुर्विंशतिमूर्तयोऽभिधीयंते शात् ‍ शंखात् ‍ चगे चक्रगदे ज्ञेयेइत्यर्थः शिष्टेभुजेपद्मंत्वर्थतः सिद्धं अत्रदक्षिणोर्ध्वकरक्रमेणज्ञेयम् ‍ दक्षिणोर्ध्वकरक्रमादितिहेमाद्रौवचनात् ‍ तेनहेमाद्रिणासंवादः विशब्देनविपरीतंगचेइत्यर्थः अत्रापिशादनुवृत्तिः शंखाद्गदाचक्रेइत्यर्थः गपेइत्यत्रापिशादनुवर्तते शंखाद्गदापद्मेइत्यर्थः विपरीतेपद्मगदेइत्यत्रापिशंखाज्ज्ञेये चपेचक्रपद्मे शंखाच्चक्रपद्मेइत्यर्थः विइत्यत्रापि पद्मचक्रेइत्यर्थः तेनचगेइत्यष्टौमूर्तयः गपेइत्यष्टौमूर्तयः चपेइत्यत्रच अत्रमूलंहेमाद्रौज्ञेयम् ‍ ।

बोपदेव - " केविगोवादापुह्नुपेप्रजाच्युकृममात्रिना ॥

वाधोनृहसानिश्रीपा शाच्चगे वि गपे चपे ॥

अर्थ - " के ( केशव ), वि ( विष्णु , गो ( गोविंद ), वा ( वासुदेव ), दा ( दामोदर ), पु ( पुरुषोत्तम ), ह्र ( ह्रषीकेश ), उपे ( उपेंद्र ), प्र ( प्रद्युम्न ), ज ( जनार्दन ), अच्यु ( अच्युत ), कृ ( कृष्ण ), म ( मधुसूदन ), मा ( माधव ), त्रि ( त्रिविक्रम ), ना ( नारायण ), वा ( वामन ), अधो ( अधोक्षज ), नृ ( नृसिंह ), ह ( हरि ), स ( संकर्षण ), अनि ( अनिरुद्ध ), श्री ( श्रीधर ), प ( पद्मनाभ ), याप्रमाणें चोवीस मूर्ति सांगितल्या आहेत . त्या कोणत्या रीतीनें समजाव्या , तें सांगतो - शात् ‍ म्हणजे शंखापासून आरंभ करुन चगे म्हणजे चक्र आणि गदा हीं दोन आयुधें जाणावीं . याप्रमाणें तीन आयुधें तीन हातांत सांगितलीं . अवशिष्ट राहिलेल्या चवथ्या हातांत अवशिष्ट असलेलें पद्म अर्थात् ‍ सिद्ध होतें . आतां ह्या आयुधांचा क्रम कोणत्या हातापासून समजावा , असें म्हणाल तर उजव्या खालच्या हातापासून वरती करीत यावा . कारण , ‘ दक्षिणोर्ध्वकरक्रमात् ‍ ’ असें हेमाद्रींत वचन आहे . यावरुन ह्या श्लोकाचा हेमाद्रीबरोबर संवाद आहे . विवाद ( विरुद्धपणा ) नाहीं . येथें ऊर्ध्वक्रमानें सांगितलें यावरुन प्रथम दक्षिण खालच्या हस्तापासून शंख , चक्र , गदा , पद्म , हीं आयुधें केशवाचीं . नंतर तींच आयुधें दक्षिण ऊर्ध्व हस्तापासून विष्णूचीं . तींच आयुधें डाव्या ऊर्ध्व हस्तापासून गोविंदाचीं . तींच आयुधें डाव्या खालच्या हस्तापासून वासुदेवाचीं होत . याप्रमाणें ‘ चगे ’ ह्यांच्या चार मूर्ति झाल्या . ‘ वि ’ विपरीत ‘ चगे ’ म्हणजे ‘ गचे ’ गदा व चक्र हीं समजावीं . या रीतीनें ‘ गचे ’ ह्यांच्या चार मिळून आठ मूर्ति होतात . अशाच रीतीनें ‘ गपे ’ ह्यांच्या आठ आणि ‘ चपे ’ ह्यांच्या आठ समजाव्या . " त्या चोवीस मूर्ति स्पष्ट येथें लिहितों - आयुधांचा क्रम धरणें तो दक्षिण खालच्या हस्तापासून ऊर्ध्वहस्तक्रमानें धरावा . तो असाः - शंख , चक्र , गदा , पद्म यांनीं युक्त तो केशव . पद्म , शंख , चक्र , गदा यांनीं युक्त तो विष्णु . गदा , पद्म , शंख , चक्र यांनीं युक्त तो गोविंद . चक्र , गदा , पद्म , शंख , यांनीं युक्त तो वासुदेव . शंख , गदा , चक्र , पद्म , यांनीं युक्त तो दामोदर . पद्य , शंख , गदा , चक्र यांनीं युक्त तो पुरुषोत्तम . चक्र , पद्म , शंख , गदा यांनीं युक्त तो ह्र्षीकेश . गदा , चक्र , पद्म , शंख यांनीं युक्त तो उपेंद्र . शंख , गदा , पद्म , चक्र यांनीं युक्त तो प्रद्युम्न . चक्र , शंख , गदा , पद्म यांनीं युक्त तो जनार्दन . पद्म , चक्र , शंख , गदा यांनीं संपन्न तो अच्युत . गदा , पद्म , चक्र , शंख , यांनीं युक्त तो कृष्ण . शंख , पद्म , गदा , चक्र यांनीं युक्त तो मधुसूदन . चक्र , शंख , पद्म , गदा यांनीं युक्त तो माधव . गदा , चक्र , शंख , पद्म यांनीं युक्त , तो त्रिविक्रम . पद्म , गदा , चक्र , शंख यांनीं युक्त तो नारायण . शंख , चक्र , पद्म , गदा यांनीं युक्त तो वामन . गदा , शंख , चक्र , पद्म यांनीं युक्त तो अधोक्षज . पद्म , गदा , शंख , चक्र यांनीं युक्त तो नारसिंह . चक्र , पद्म , गदा , शंख यांनीं युक्त तो हरि . शंख , पद्म , चक्र , गदा यांनीं युक्त तो संकर्षण . गदा , शंख , पद्म , चक्र यांनीं युक्त तो अनिरुद्ध . चक्र , गदा , शंख , पद्म यांनीं युक्त तो श्रीधर . पद्म , चक्र , गदा , शंख , यांनीं युक्त तो पद्मनाभ . याप्रमाणें चोवीस मूर्तींचीं लक्षणें जाणावीं .

अथबौधायनसूत्रंत्रैविक्रमींचानुसृत्य लिंगार्चाप्रतिष्ठोच्यते यजमानः पूर्वोक्तकालेपूर्वेद्युः दशद्वादशषोडशान्यतरहस्तंमंडपंकृत्वाग्नेयेहस्तमात्रंचतुरस्त्रंकुंडं स्थंडिलंवापूर्वतोहस्तमात्रांवेदींनैऋतेवास्तुमंडपं मध्येवेदींतदुपरिसर्वतोभद्रंकृत्वाप्राणानायम्यास्यांमूर्तौलिंगेवादेवस्यसान्निध्यसिद्ध्यर्थं दीर्घायुर्लक्ष्मीसर्वकामसमृद्ध्यक्षय्यसुखकामोऽमुकमूर्तिप्रतिष्ठांकरिष्येइतिसंकल्प्य गणेशपूजापुण्याहवाचनमातृकापूजननांदीश्राद्धानिकृत्वाचार्यंचतुरोऋत्विजश्चवृत्वावस्त्राद्यैः पूजयेत् ‍ अथाचार्यः यदत्रसंस्थितमितिसर्षपान् ‍ विकीर्यापोहिष्ठेतिकुशोदकेनभूमिंप्रोक्ष्य देवाआयांतु यातुधानाअपयांतु विष्णोदेवयजनंरक्षस्वेतिभूमौप्रादेशंकृत्वाऽस्मत्कृत तुलापद्धतिमार्गेणमंडपप्रतिष्ठांकृत्वाऽकृत्वावापूर्वरात्रौहिरण्योपधानंदेवंपंचगव्यहिरण्ययवदूर्वाश्वत्थपलाशपर्णान्युदकुंभेप्रक्षिप्यताभिरद्भिरापोहिष्ठेतितिसृभिर्हिरण्यवर्णाइतिचतसृभिः पवमानः सुवर्जनइत्यनुवाकेनाभिषिच्यव्याह्रतिभिरिदंविष्णुरितिफलयवदूर्वाः समर्प्यरक्षोहणमितिहस्तेकंकणंबध्वावाससाच्छाद्य अवतेहेळउदुत्तममितिजलेऽधिवासयेत् ‍ इदंबौधायनोक्तम् ‍ ॥

आतां बौधायनसूत्र त्रिविक्रमपद्धति यांना अनुसरुन लिंगप्रतिष्ठा व मूर्तिप्रतिष्ठा सांगतों - पूर्वीं सांगितल्याप्रमाणें देवप्रतिष्ठेचा मुहूर्त पाहून त्या मुहूर्ताच्या पूर्वदिवशीं यजमानानें दहा , बारा किंवा सोळा हातांचा मंडप करुन त्या मंडपांत आग्नेयीदिशेस एक हाताचें चतुरस्त्र ( चतुष्कोण ) कुंड किंवा स्थंडिल करावें . आणि पूर्वेस एक हाताची वेदी , नैऋतीस वास्तुमंडप , मध्यभागीं वेदी , व त्या वेदीवर सर्वतोभद्र करुन प्राणायाम करुन संकल्प करावा . तो असा - ‘ अस्यां मूर्तौ देवस्य सांनिध्यसिद्ध्यर्थ दीर्घायुर्लक्ष्मीसर्वकामसमृद्ध्यक्षय्यसुखकामोमुकमूर्तिप्रतिष्ठां करिष्ये ’ असा संकल्प करुन गणपतिपूजन , पुण्याहवाचन , मातृकापूजन , आणि नांदीश्राद्ध करुन आचार्य आणि चार ऋत्विज वरुन वस्त्रादिकांनीं त्यांची पूजा करावी . नंतर आचार्यानें ‘ यदत्रसंस्थितं० ’ या मंत्रानें सर्षप टाकून ‘ आपोहिष्ठा० ’ या मंत्रांनीं कुशोदकानें भूमीचें प्रोक्षण करुन नंतर " देवा आयांतु , यातुधाना अपयांतु , विष्णो देवयजनं रक्षस्व " असें म्हणून भूमीवर प्रादेश करावा . मंडपप्रतिष्ठा करावयाची असल्यास आम्हीं ( कमलाकरभट्टानें ) केलेल्या तुलापद्धतीच्या रीतीनें करावी . किंवा न करावी . नंतर मंडपांत प्रवेश करुन वेदीच्या उत्तरेकडे जलाधिवास करावा . तो असा - पूर्वरात्रीं देवाला हिरण्यावर ठेऊन , पंचगव्य , हिरण्य , यव , दूर्वा , अश्वत्थपर्णै व पलाशपर्णै कलशांत टाकून त्या उदकांनीं ‘ आपोहिष्ठा० ’ ह्या तीन ऋचांनीं , ‘ हिरण्यवर्णा० ’ ह्या चार ऋचांनीं , ‘ पवमानः सुवर्जनः० ’ ह्या अनुवाकानें अभिषेक करुन व्याह्रतिमंत्रांनीं आणि ‘ इदंविष्णु० ’ ह्या मंत्रानें फळें , यव आणि दूर्वा समर्पण करुन ‘ रक्षोहणं० ’ ह्या मंत्रानें हातांत कंकण बांधून वस्त्रानें आच्छादन घालून ‘ अवतेहेळो० , उदुत्तमं० ’ ह्या मंत्रांनीं उदकांत अधिवासन करावें . हा प्रकार बौधायनानें सांगितलेला आहे .

ततश्चललिंगेअर्चायांवाअत्राग्निंप्रतिष्ठाप्य गोक्षीरेनीवारचरुंकृत्वाविष्णुश्चेत् ‍ कृसरमपिश्रपयित्वाज्यभागांतेपलाशोदुंबराश्वत्थशम्यपामार्गसमिद्भिः आज्येनचरुणातिलैर्वाप्रत्येकमष्टाविंशतिमष्टौवाहुतीर्लोकपालमूर्तिमूर्तिपतिभ्योहुत्वास्थाप्यदेवमंत्रेणपूर्वोक्तसमित्तिलनैवारचर्वाज्यैरष्टसहस्त्रमष्टशतमष्टाविंशतिंवाहुत्वा अग्निर्यजुर्भिरित्यनुवाकेनदशाहुतीर्जुहुयात् ‍ प्रतिद्रव्यहोमांतेदेवंपादनाभिशिरसिस्पृशेत् ‍ आज्यहोमेचोत्तरतः सजलकुंभेसंपातान्नयेत् ‍ तेषांमंत्राः इंद्रायेंदोइतींद्रस्य स्योनेतिपृथिवीमूर्तेः अघोरेभ्यइतितत्पतेः शर्वस्य अग्नआयाहीत्यग्नेः अग्निंदूतमित्यग्निमूर्तेः नमः शर्वायचपशुपतयेचेतिपशुपतेः यमायसोमंयमस्य असिहिवीरितिजयमानमूर्तेः स्तुहिश्रुतंतत्पतेः उग्रस्य असुन्वंतंनिऋतेः आकृष्णेनसूर्यमूर्तेः योरुद्रोअग्नौइतितत्पतेरुद्रस्य इमंमेवरुणस्य शंनोदेवीजलमूर्तेः नमोभवायेतिभवस्य आनोनियुद्भिरितिवायोः वातआवातुवायुमूर्तेः तमीशानंतत्पतेरीशानस्य आप्यायस्वेतिकुबेरस्य वयंसोमेतिसोममूर्तेः तत्पुरुषायमहादेवस्य अभित्वाईशानस्य आदित्प्रत्नस्येत्याकाशस्य नमउग्रायचेतितत्पतेर्भीमस्य ततोदेवस्यपादौस्पृशेत् ‍ एवंद्वितीयेहुत्वानाभिंतृतीयेमध्यंचतुर्थेउरः पंचमेशिरः स्पृष्ट्वा प्रतिपर्यायंसंपातजलेनदेवंअभिषिंचेत् ‍ ततः स्विष्टकृदादिहोमशेषंसमाप्यार्चांशोधयेत् ‍ स्थिरलिंगार्चादौतुनेदानीमग्निस्थापनहोमादिकार्यम् ‍ ॥

आतां लिंगाची किंवा मूर्तीची चलप्रतिष्ठा असल्यास या वेळीं अग्निस्थापन करुन गोक्षीरांत नीवारचरु शिजवून विष्णुमूर्ति असेल तर कृसर ( तिलमिश्रओदन ) देखील शिजवून आज्यभागांच्या अंतीं पळस , उंबर , अश्वत्थ , शमी , अपामार्ग यांच्या समिधा , आज्य , चरु किंवा तिल या प्रत्येक द्रव्याच्या अष्टशत , अष्टविंशति किंवा आठ आहुति लोकपाल , मूर्ति आणि मूर्तिपति यांना होम करुन स्थापन करावयाच्या देवाच्या मंत्रानें वर सांगितलेल्या समिधा , तिल , नैवारचरु , आणि आज्य या द्रव्यांनीं अष्टसहस्त्र , अष्टशत किंवा अष्टाविंशति आहुति होम करुन ‘ अग्निर्यजुर्भिः० , ह्या अनुवाकानें दहा आहुति द्याव्या . प्रत्येक द्रव्याचा होम झाल्यावर देवाच्या पादांना , नाभीला आणि मस्तकाला स्पर्श करावा . आज्यहोम झाल्यावर उत्तरेकडे असलेल्या उदकयुक्त कलशांत आज्याचें संपात पाडवावें . आतां वर सांगितलेल्या लोकपालादिकांचे मंत्र येणेंप्रमाणें - ‘ इंद्रयेंदो० ’ हा इंद्राचा मंत्र . ‘ स्योना० ’ हा पृथिवीमूर्तीचा मंत्र . ‘ अघोरेभ्यो० ’ हा पृथिवीपतिशर्वाचा मंत्र . ‘ अग्नआयाहि० ’ हा अग्नीचा मंत्र . ‘ अग्निंदूतं ’ हा अग्निमूर्तीचा मंत्र . ‘ नमः शर्वायच पशुपतयेच ’ हा अग्निपति पशुपतीचा मंत्र . ‘ यमायसोमं० ’ हा यमाचा मंत्र . ‘ असिहिवीर० ’ हा यजमानमूर्तीचा मंत्र . ‘ स्तुहिश्रुतं० ’ हा यजमानपतिउग्राचा मंत्र . ‘ असुन्वंतं० ’ हा निऋतीचा मंत्र . ‘ आ कृष्णेन० ’ हा सूर्यमूर्तीचा मंत्र . ‘ योरुद्रो अग्नौ० ’ हा सूर्यपतिरुद्राचा मंत्र . ‘ इमंमे० ’ हा वरुणाचा मंत्र . ‘ शंनोदेवी० ’ हा जलमूर्तीचा मंत्र . ‘ नमोभवाय० ’ हा जलपतिभवाचा मंत्र . ‘ आनोनियुद्भिः० ’ हा वायूचा मंत्र . ‘ वातआवातु० ’ हा वायुमूर्तीचा मंत्र . ‘ तमीशानं० ’ हा वायुपति ईशानाचा मंत्र . ‘ आप्यायस्व० ’ हा कुबेराचा मंत्र . ‘ वयंसोम० ’ हा सोममूर्तीचा मंत्र . ‘ तत्पुरुषाय० ’ हा महादेवाचा मंत्र . ‘ अभित्वा० ’ हा ईशानाचा मंत्र . ‘ आदित्प्रत्नस्य० ’ हा आकाशाचा मंत्र . ‘ नमउग्रायच० ’ हा आकाशपति भीमाचा मंत्र . असा एक पर्याय झाल्यावर देवाच्या पदांना स्पर्श करावा . याप्रमाणें दुसरा पर्याय झाल्यावर देवाच्या नाभीला स्पर्श करावा . तिसरा पर्याय झाल्यावर देवाच्या मध्याला स्पर्श करावा . चवथा पर्याय झाल्यावर देवाच्या उराला स्पर्श करावा . पांचवा पर्याय झाल्यावर देवाच्या मस्तकाला स्पर्श करावा . आणि प्रत्येक पर्यायाला संपातजलानें देवाला अभिषेक करावा . तदनंतर स्विष्टकृदादि होमशेष समाप्त करुन मूर्तींचें शोधन करावें . हा प्रकार चलप्रतिष्ठेचा समजावा . स्थिरलिंग किंवा स्थिरमूर्ति यांची प्रतिष्ठा असेल तर या वेळीं अग्निस्थापन , होम इत्यादि करुं नये .

ततोदेवंनत्वा स्वागतंदेवदेवेशविश्वरुपनमोस्तुते शुद्धेपित्वदधिष्ठानेशुद्धिंकुर्मः सहस्वतामितिसंप्रार्थ्य उत्तिष्ठब्रह्मणस्पतेइतिसऋत्विगुत्थाप्य पूर्वमकृतेग्न्युत्तारणेअधुनावाकार्यम् ‍ अग्निः सप्तिमितिसूक्तमग्निपदहीनंपठित्वातत्सहितंपुनः पठेत् ‍ एवमष्टसहस्त्रमष्टशतमष्टाविंशतिंवापठन् ‍ जलंपातयेत् ‍ ततोर्चांद्वादशवारंमृदाजलेनचप्रक्षाल्यमंत्रवत् ‍ पंचगव्यंकृत्वा पयः पृथिव्यामावोराजानमितिचसंस्नाप्य आप्यायस्वदधिक्राव्णस्तेजोसिमधुवाताआयंगौरितिपंचामृतैः संस्नाप्य लिंगंचेन्नमस्तेरुद्रमन्यवइत्यष्टाभिः संस्नाप्य घृतेनाभ्यज्योद्वर्तनेनोद्वर्त्योष्णोदकेनप्रक्षाल्यगंधंदत्वासंपातोदकेनाभिषिच्य सपल्लवैश्चतुर्भिः कुंभैरापोहिष्ठेतित्रिभिराकलशेष्वितिचप्रत्येकं समुद्रज्येष्ठाइतिचतुर्भिराकलशेष्वितिचमिलितैः संस्नाप्यौदुंबरादिपीठेर्चामुपवेश्यपरितो‍ऽष्टदिक्षुसजलकुंभान् ‍ संस्थाप्यतेषुगंधपुष्पदूर्वाः क्षिप्त्वाऽऽद्येसप्तमृदः द्वितीयेपुष्करपर्णशमीविकंकताश्मंतकत्वचः पल्लवांश्च तृतीयादिषु सप्तधान्यं पंचरत्नफलपुष्पाणिकुशदूर्वागोरोचनसंपातोदकगंधफलसर्वौषधीः क्षिप्त्वा क्रमेणापोहिष्ठेतितिसृभिर्हिरण्यवर्णाइतिचतसृभिः पवमानानुवाकेनचाभिषिच्यैककुंभेशमीपलाशवटखदिरबिल्वाश्वत्थविकंकतपनसाम्रशिरीषोदुंबराणांपल्लवान् ‍ कषायांश्चक्षिप्त्वा अश्वत्थेवइत्यभिषिच्य पंचरत्नोदकेनहिरण्यवर्णाइतिसंस्नाप्य वाससीदत्वा उपवीतादिदीपांतंकृत्वा हिरण्यगर्भः यआत्मदा यः प्राणतः यस्येमे येनद्यौः यंक्रंदसी आपोहयत् ‍ यश्चिदापो इत्यष्टौपिष्टदीपान् ‍ दत्वा सुवर्णशलाकयातैजसपात्रस्थंमधुघृतंचगृहीत्वाचित्रंदेवानांतेजोसीतिमंत्राभ्यां ॐनमोभगवतेतुभ्यंशिवायहरयेनमः हिरण्यरेतसेविष्णोविश्वरुपायतेनमइतिचदक्षिणसव्येदेवनेत्रेमंत्रावृत्त्यालिखेत् ‍ अंजंतित्वेत्यंजनेनमधुनाचांक्त्वादेवस्यत्वासवितुः प्रसवे० इंद्रस्येंद्रियेणानज्मीतिमध्वाज्यशर्कराभिरंक्त्वातेनैवांजनेनपुनरंजयेत् ‍ स्थिरलिंगेतुस्वर्णसूच्यागंधेन ॐनमोभगवतेरुद्रायहिरण्यरेतसेपरायपरमात्मनेविश्वरुपायोमाप्रियायनमइत्यंजनादिनांजयेत् ‍ ततः आदर्शभक्ष्यादिदर्शयेत् ‍ ततः कर्ताआचार्यायगामृत्विग्भ्यश्चदक्षिणांदद्यात् ‍ अथाचार्यः प्रत्यृचमादौप्रणवंवदन् ‍ पुरुषसूक्तेनस्तुत्वा वंशपात्रेपंचवर्णौदनेनदेवस्यनीराजनंकारयित्वारुद्रायचतुष्पथादौदद्यात् ‍ मंत्रस्तु ॐनमोरुद्रायसर्वभूताधिपतयेदीप्तशूलधरायोमादयितायविश्वाधिपतयेरुद्रायवैनमोनमः शिवमगर्हितंकर्मास्तुस्वाहेति अश्वत्थपर्णेभूतेभ्योनमइति केचिदेतद्रात्रौस्थिरप्रतिष्ठायामिच्छंति ॥

तदनंतर देवाला नमस्कार करुन ‘ स्वागतं देव देवेश विश्वरुप नमोस्तु ते ॥ शुद्धेपि त्वदधिष्ठाने शुद्धिं कुर्मः सहस्व तां ॥ ’ अशी प्रार्थना करुन ‘ उत्तिष्ठब्रह्मणस्पते० ’ ह्या मंत्रानें ऋत्विजांसहित यजमानानें देवाला उठवून अग्न्युत्तारण पूर्वी केलेलें नसेल तर या वेळीं करावें . तें असें - ‘ अग्निः सप्तिं० ’ हें सूक्त अग्निपदरहित म्हणून पुनः अग्निपदसहित म्हणावें . असें अष्टसहस्त्र , किंवा अष्टशत अथवा अष्टाविंशतिवार म्हणत असून देवावर उदकधार धरावी . याप्रमाणें अग्न्युत्तारण झाल्यावर मूर्तीला बारा वेळां मृत्तिका लावून उदकानें प्रक्षालन करावें . नंतर समंत्रक पंचगव्य करुन ‘ पयः पृथिव्यां पय ओषधीषु० ’ या मंत्रानें व ‘ आवोराजानं० ’ ह्या मंत्रानें , मूर्तीला स्नान घालून ‘ आप्यायस्व० , दधिक्राव्णो० , तेजोसि० , मधुवाता० , आयंगौः० ’ ह्या पांच मंत्रांनीं पंचामृतांचें स्नान घालावें . लिंग असेल तर ‘ नमस्तेरुद्रमन्यव० ’ ह्या आठ ऋचांनीं स्नान घालावें . नंतर घृताचा अभ्यंग करुन उटणें लावून उष्णोदकानें प्रक्षालन करावें . नंतर गंध लावून संपातोदकानें अभिषेक करुन पल्लवसहित चार कलशांनीं अनुक्रमानें ‘ आपोहिष्ठा० , योवः शिव० , तस्मा० , आकलशेषु० ’ ह्या चार मंत्रांनीं स्नान घालून ‘ समुद्रज्येष्ठा० ’ ह्या चार ऋचा , आणि ‘ आकलशेषु० ’ ही एक ऋचा यांनीं एकत्र मीलित चार कलशांनीं स्नान घालून उदुंबरादिक पीठावर मूर्ती बसवून सभोंवतीं आठ दिशांना आठ उदक कलश स्थापून त्यांत गंध , पुष्पें , दूर्वा घालून ; पहिल्या कलशांत सप्तमृत्तिका ; दुसर्‍या कुंभांत कमलपत्र , शमीपत्र , विकंकत व आपटा यांच्या साली आणि पल्लव ; तिसर्‍या कलशांत सप्त धान्यें ; चवथ्या कलशांत पंचरत्नें ; पांचव्या कलशांत फलें व पुष्पें ; सहाव्या कलशांत कुश , दुर्वा , व गोरोचन ; सातव्या कलशांत संपातोदक ; आठव्या कलशांत सर्वौषधि टाकून अनुक्रमानें ‘ आपोहिष्ठा० ’ ह्या तीन ऋचा , ‘ हिरण्यवर्णाः शुचयः० ’ ह्या चार ऋचा , आणि ‘ पवमानः सुवर्जनः० ’ हा अनुवाक ह्या मंत्रांनीं अभिषेक करुन , एका कलशांत शमी , पळस , वट , खदिर , बिल्व , अश्वत्थ , विकंकत , पनस , आम्र , शिरीष , उदुंबर , यांचे पल्लव आणि कषाय टाकून ‘ अश्वत्थेवो० ’ ह्या मंत्रानें अभिषेक करुन पंचरत्नोदकानें ‘ हिरण्यवर्णा० ’ ह्या मंत्रानें स्नान घालून दोन वस्त्रें देऊन यज्ञोपवीत , गंध , पुष्प , धूप , आणि दीप देऊन ‘ हिरण्यगर्भः० , य आत्मदा० , यः प्राणतो० , यस्येमे० , येनद्यौ० , यंक्रंदसी० , आपोहयत् ‍ ० , यश्चिदापो० ’ ह्या आठ मंत्रांनीं आठ पिठाचे दीप देऊन सुवर्णशलाकेनें तैजस पात्रांतील मध व घृत घेऊन ‘ चित्रं देवानां० , तेजोसि० ’ हे दोन मंत्र आणि ‘ ॐ नमोभगवते तुभ्यं शिवाय हरये नमः ॥ हिरण्यरेतसे विष्णो विश्वरुपाय ते नमः ॥ ’ हा मंत्र यांची आवृत्ति करुन दक्षिण , व वाम नेत्रांना लेखन करावें . ‘ अंजंतित्वा० ’ ह्या मंत्रानें अंजन व मध डोळ्यांत घालून ‘ देवस्यत्वा० हस्ताभ्यामग्नेस्तेजयासूर्यस्यवर्चसेंद्रस्येंद्रियेणानज्मि ’ हा मंत्र म्हणून मध , आज्य , शर्करा यांचें अंजन घालून वरील अंजन पुनः घालावें . स्थिर लिंगप्रतिष्ठा असेल तर सुवर्णाचे सूचीनें गंध घेऊन ‘ ॐ नमो भगवते रुद्राय हिरण्यरेतसे पराय परमात्मने विश्वरुपायोमाप्रियाय नमः ’ ह्या मंत्रानें डोळ्यांत अंजनादिक घालावें . तदनंतर आरसा व भक्ष्यादि पदार्थ दाखवावे . तदनंतर यजमानानें आचार्याला गोप्रदान आणि ऋत्विजांना दक्षिणा द्यावी . तदनंतर आचार्यानें पुरुषसूक्ताच्या प्रत्येक ऋचेच्या आधीं . प्रणव म्हणून पुरुषसूक्तानें स्तुति करुन वेळूच्या पात्रांत पंचवर्ण ओदन घालून देवाला ओंवाळून रुद्राला चवाठ्यावर वगैरे द्यावें . त्याचा मंत्र - ‘ ॐ नमो रुद्राय सर्वभूताधिपतये दीप्तशूलधरायोमादयिताय विश्वाधिपतये रुद्राय वै नमोनमः शिवमगर्हितं कर्मास्तु स्वाहा ’ आणि अश्वथपर्णावर ‘ भूतेभ्यो नमः ’ असें द्यावें . केचित् ‍ विद्वान् ‍ हें रुद्राला पंचवर्णौदनदान रात्रीं स्थिरप्रतिष्ठेचे ठायीं करावें असें सांगतात .

अथाचार्यः सर्वतोभद्रेदेवानावाहयेत् ‍ मध्येब्रह्माणम् ‍ पूर्वादिदिक्षुइंद्रादिलोकपालान् ‍ ईशानेंद्राद्यंतरालेषु वसून् ‍ रुद्रान् ‍ आदित्यान् ‍ अश्विनौ विश्वान् ‍ देवान् ‍ पित्तृन् ‍ नागान् ‍ स्कंदवृषौ ब्रह्मेशानाद्यंतरालेषु दक्षं विष्णुं दुर्गां स्वधाकारं मृत्युरोगान् ‍ समुद्रान् ‍ सरितः मरुतः गणाधिपंचेति मध्येएव पृथिवीमेरुंसंस्थाप्यदेवंचावाह्य प्रागादि वज्रं शक्तिं दंडं खड्गं पाशं अंकुशं गदां शूलं तद्वाह्ये गौतमं भरद्वाजं विश्वामित्रं कश्यपं जमदग्निं वसिष्ठं अत्रिं अरुंधतींच तद्वाह्येनवग्रहान् ‍ तद्वाह्ये ऐंद्रीं कौमारीं ब्राह्मीं वाराहीं चामुंडां वैष्णवीं माहेश्वरीं वैनायकीमिति एताः नामभिरावाह्यसंपूज्य अर्चायांदेवंतन्मंत्रेणावाह्य मंडलमध्येर्चांसुप्रतिष्ठोभवेतिनिवेश्यसंपूज्य वह्नौमंडलदेवतानांनामभिस्तिलाज्येनदशदशाहुतीर्हुत्वापुष्पांजलिंसमर्प्यनमोमहदितिदेवंनत्वामंडलादुत्तरतः स्वस्तिकेमंचकं तदुपरिशय्यांकृत्वा उत्तिष्ठेतिदेवमुत्थाप्यमंगलघोषैः शय्यायांदेवमारोप्य पुरुषसूक्तोत्तर नारायणाभ्यांस्तुत्वादेवेन्यासंकुर्यात् ‍ तद्यथा पुरुषात्मनेनमः प्राणात्मनेन० प्रकृतितत्त्वाय० बुद्धितत्त्वाय० अहंकारतत्त्वाय० मनस्तत्त्वाय० इतिसर्वांगे प्रकृतितत्त्वाय० बुद्धितत्त्वाय० ह्रदि शब्दतत्त्वाय० शिरसि स्पर्शतत्त्वाय० त्वचि रुपतत्त्वाय० ह्रदि एवंह्रद्येवरसगंधश्रोत्रत्वक् ‍ चक्षुर्जिह्वाघ्राणवाक् ‍ पाणिपादपायूपस्थपृथिव्यप्तेजोवाय्वाकाशसत्वरजस्तमोदेहतत्वानिविन्यसेत् ‍ ततः पुरुषसूक्तस्याद्यमृग्द्वयंकरयोः तदुत्तरंजान्वोः तदुत्तरंकट्योः तंयज्ञमितितिस्त्रः नाभिह्रत्कंठेषु तस्मादश्वेतिद्वयंबाह्वोः ब्राह्मणोस्येतिद्वयंनासयोः नाभ्येतिद्वयमक्ष्णोः अंत्यांशिरसि केचित्तत्त्वन्यासमन्यथाआहुः पुरुषप्रकृतिमहदहंकारतत्त्वानि शब्दस्पर्शरुपरसगंधतन्मात्राणि आकाशवायुतेजोप्पृथिवीश्रोत्रत्वक् ‍ चक्षूरसनाघ्राणवाक् ‍ पाणिपादपायूपस्थमनस्तत्त्वानीति केचिदेतानिस्थिरलिंगादावेवेच्छंति ततः सुखशायीभवेतिशय्यायांदेवंस्वापयित्वा मंडलशय्ययोरंतरालेनगंतव्यमितिप्रैषंदत्वास्विष्टकृदादिहोमशेषंसमाप्यमंडलदेवताभ्योनामभिः पायसेनचरुणावाबलीन् ‍ दद्यात् ‍ नीवारचरुशेषेणदिग्बलिम् ‍ नेदंस्थिरप्रतिष्ठायाम् ‍ ।

तदनंतर आचार्यानें सर्वतोभद्रावर देवांचें आवाहन करावें . तें असें - मध्यें ब्रह्मा , पूर्वादि आठ दिशांचे ठायीं इंद्रादिक आठ लोकपाल , ईशान व इंद्र यांच्यामध्यें वसु , इंद्र अग्नि यांच्या मध्यें रुद्र , अग्नि यम यांच्यामध्यें आदित्य , यम नैऋति यांच्यामध्यें अश्विनौ , नैऋति व वरुण यांच्यामध्यें विश्वेदेव , वरुण वायु यांच्यामध्यें पितर , वायु सोम यांच्यामध्यें नाग , सोम ईशान यांच्यामध्यें स्कंद वृष यांचें आवाहन करावें . आतां ब्रह्मा आणि ईशानादिक आठ लोकपाल यांच्यामध्यें अनुक्रमानें दक्ष , विष्णु , दुर्गा , स्वधाकार , मृत्युरोग , समुद्र , सरित् ‍, मरुत् ‍, गणाधिप ह्या आठांचें आवाहन करावें . आणि मध्यभागींच पृथिवी , मेरु व स्थापन करावयाचा देव यांचें आवाहन करावें . पूर्वादि आठ दिशांचें ठायीं वज्र , शक्ति , दंड , खड्ग , पाश , अंकुश , गदा , शूल यांचें आवाहन करावें . त्यांच्या बाहेर गौतम , भरद्वाज , विश्वामित्र , कश्यप , जमदग्नि , वसिष्ठ , अत्रि , अरुंधती यांचें आवाहन करावें . त्यांच्या बाहेर नवग्रहांचें आवाहन करावें . त्यांच्या बाहेर ऐंद्री , कौमारी , ब्राह्मी , वाराही , चामुंडा , वैष्णवी , माहेश्वरी , वैनायकी यांचें नाममंत्रानें आवाहन करुन सर्वांची पूजा करुन मूर्तीचे ठायीं स्थापन करावयाच्या देवाचें त्याच्या मंत्रानें आवाहन करुन मंडलामध्यें ‘ सुप्रतिष्ठितो भव ’ असें म्हणून मूर्ति ठेवून पूजा करावी . नंतर अग्नीमध्यें मंडलदेवतांच्या नाममंत्रांनीं तिल आणि आज्य यांच्या दहादहा आहुति देऊन पुष्पांजलि समर्पण करुन ‘ नमोमह० ’ या मंत्रानें देवाला नमस्कार करुन मंडलाच्या उत्तरेस स्वस्तिकावर मंचक आणि मंचकावर शय्या करुन ‘ उत्तिष्ठ० ’ या मंत्रानें देवाला उठवून मंगलघोषांनीं शय्येवर बसवून पुरुषसूक्त व उत्तरनारायण ह्या दोन सूक्तांनीं स्तुति करुन देवाचे ठायीं न्यास करावा . तो असा - पुरुषात्मनेनमः प्राणात्मने० प्रकृतितत्त्वाय० बुद्धितत्त्वाय० अहंकारतत्त्वाय० मनस्तत्त्वाय० असा सर्वांगाचे ठायीं न्यास करावा . प्रकृतितत्त्वाय० बुद्धितत्त्वाय० ह्रदि . शब्दतत्त्वाय० शिरसि . स्पर्शतत्त्वाय० त्वचि . रुपतत्त्वाय० ह्रदि . याप्रमाणें ह्रदयाचे ठायींच रस , गंध , श्रोत्र , त्वक् ‍, चक्षु , जिव्हा , घ्राण , वाक् ‍, पाणि , पाद , पायु , उपस्थ , पृथिवी , अप् ‍, तेज , वायु , आकाश , सत्त्व , रज , तम या तत्त्वांचा न्यास करावा . तदनंतर पुरुषसूक्तन्यास येणेंप्रमाणें - ‘ सहस्त्र० ’ वामकरे . ‘ पुरुष० , दक्षिण करे . ‘ एतावा० ’ वामजानुनि . ‘ त्रिपादूर्ध्व० ’ दक्षिणजानुनि . ‘ तस्माद्विराळ० ’ वामकट्यां . ‘ यत्पुरुषेण० ’ दक्षिणकट्यां . ‘ तंयज्ञं० ’ नाभौ . ‘ तस्माद्यज्ञा० ’ ह्रदि . ‘ तस्माद्य० ’ कंठे . ‘ तस्मादश्वा० ’ वामबाहौ . ‘ यत्पुरुषं० ’ दक्षिणवाहौ . ‘ ब्राह्मणो० ’ वामनासायां . ‘ चंद्रमा० ’ दक्षिणनासायां . ‘ नाभ्या० ’ वामनेत्रे . ‘ सप्तास्या० ’ दक्षिणनेत्रे . ‘ यज्ञेनयज्ञ० ’ शिरसि . तदनंतर ‘ सुखशायीभव ’ असें म्हणून शय्येचे ठायीं देवाला निजवून ‘ मंडलशय्ययोरंतराले न गंतव्यं ’ असा प्रैष देऊन स्विष्टकृदादि होमशेष समाप्त करुन मंडलदेवतांना नाममंत्रांनीं पायसाचे किंवा चरुचे बलि द्यावे . नीवारचरुशेषानें दिग्बलि द्यावा . हें बलिदान स्थिरप्रतिष्ठेचे ठायीं करावयाचें नाहीं .

स्थिरलिंगार्चादौत्वयंविशेषः अग्निस्थापनहोमवर्ज्यंसर्वंपूर्ववत् ‍ कृत्वा इदानीमग्निस्थापनंकृत्वापूर्वोक्तहोमंकुर्यात् ‍ नात्रनैवारश्चरुः विष्णुश्चेत्पूर्वोक्तहोमंकृत्वापुरुषसूक्तेनप्रत्यृचमाज्यंहुत्वाइदंविष्णुरितिपादौस्पृष्ट्वापुनस्ताएवहुत्वाविष्णोर्नुकमितिनाभिंस्पृष्ट्वापुनस्ताएवहुत्वाअतोदेवेतिशिरः स्पृष्ट्वा पुनस्ताएवहुत्वापुरुषसूक्तेनसर्वांगंस्पृशेत् ‍ स्थिरलिंगचेदग्निस्थापनादिपूर्वोक्तसमिदाज्यतिलाहुतीर्हुत्वा यातइषुरित्यनुवाकांतेनद्रापेसहस्नाणीत्यनुवाकाभ्यांचप्रत्यृचमाज्यंहुत्वासर्वोवैरुद्रइतिमूलंस्पृशेत् ‍ पुनस्ताएवहुत्वाकद्रुद्रायेतिमध्यं पुनस्ताएवहुत्वानमोहिरण्यबाहवइत्यग्रम् ‍ पुनस्ताएवहुत्वासर्वरुद्रेणसर्वांगंस्पृशेत् ‍ ततोधामंतइतिपूर्णाहुतिंजुहुयान्नवा एवमधिवासनंकृत्वापरेद्युः सद्योवापीठिकांस्नापयित्वामहीमूष्वित्यावाह्य अदितिर्द्यौरितिस्तुत्वा हींनमइतिसंपूज्य तेनैवपूर्णाहुतिंहुत्वा उत्तिष्ठब्रह्मणस्पत इतिदेवमुत्थाप्यपुष्पांजलिंदत्वा पुरुषसूक्तेनस्तुत्वाउदुत्यमित्युत्थाप्यकनिक्रददितिसूक्तेनविष्णुं सद्योजातमितिपंचानुवाकैलिंगंगृहंप्रवेश्य पीठिकायांइंद्रादिनामभिरष्टरत्नानिक्षिप्त्वासप्तधान्यरुप्यवृक्षमनः शिलाः क्षिप्त्वापायसेनसंलिप्य प्रणवेनांगन्यासंकृत्वा सुवर्णशलाकामंतरितांकृत्वा ॐसुलग्नेप्रतितिष्ठपरमेश्वरेत्युक्त्वा अतोदेवेतिविष्णुं रुद्रेणचलिंगंस्थापयेत् ‍ ततः प्राणप्रतिष्ठा ॥

लिंग व मूर्ति इत्यादिकांची स्थिरप्रतिष्ठा असेल तर पूर्वी सांगितल्या प्रकारांत विशेष आहे , तो असा - अग्निस्थापन व होम वर्ज्य करुन बाकीचें सारें कृत्य पूर्वीप्रमाणें करावें . ( म्हणजे संकल्पादिक जलाधिवासापर्यंतचें कृत्य करुन देवाला नमस्कार करुन ‘ स्वागतं देवदेवेश० ’ इत्यादि प्रार्थना , उत्थापन , अग्न्युत्तारण इत्यादि नेत्रोन्मीलनापर्यंत करुन पुरुषसूक्तस्तुति इत्यादि करावें . नंतर मंडलदेवतास्थापनापर्यंतचें कृत्य करुन मंडलाचे ठायीं मूर्तिनिवेश , शय्येचे ठायीं देवतारोहण , नंतर स्तुति , पूर्वोक्तन्यास , आणि शय्येवर देवशयन करवावें . ) इतकें झाल्यावर अग्निस्थापन करुन पूर्वीं सांगितलेला होम करावा . स्थिरप्रतिष्ठेचे ठायीं स्थाप्यदेवताहोमाविषयीं नैवारचरु नाहीं . विष्णूची स्थिरप्रतिष्ठा असेल तर पूर्वीं सांगितलेला ; लोकपाल , मूर्ति , मूर्तिपति यांस समिधा , तिल , आज्यहोम झाल्यावर पुरुषसूक्ताच्या प्रत्येक ऋचेनें आज्यहोम करुन ‘ इदंविष्णुः० ’ ह्या मंत्रानें देवाच्या पायांना स्पर्श करावा . पुनः त्याच आहुति देऊन ‘ विष्णोर्नुकं० ’ ह्या मंत्रानें नाभीला स्पर्श करावा . पुनः त्याच आहुति देऊन ‘ अतोदेवा० ’ ह्या मंत्रानें मस्तकाला स्पर्श करावा . पुनः त्याच आहुति देऊन पुरुषसूक्तानें सर्वांगाला स्पर्श करावा . लिंगाची स्थिरप्रतिष्ठा असेल तर अग्निस्थापनादि करुन पूर्वीं सांगितलेल्या समिधा , आज्य , तिल यांचा होम करुन ‘ यातइषुः० ’ हा अनुवाकसमाप्तीपर्यंतचे मंत्र , ‘ द्रापे० ’ हा अनुवाक आणि ‘ सहस्त्राणि० ’ हा अनुवाक ह्यांच्या प्रत्येक ऋचेनें आज्यहोम करुन ‘ सर्वोवैरुद्रः० ’ ह्या मंत्रानें लिंगाच्या मुळास स्पर्श करावा . पुनः त्याच आहुतींच होम करुन ‘ कद्रुद्राय० ’ ह्या मंत्रानें लिंगाच्या मध्याला स्पर्श करावा . पुनः त्याच आहुतींचा होम करुन ‘ नमो हिरण्यबाहवे० ’ ह्या मंत्रानें लिंगाच्या अग्राला स्पर्श करावा . पुनः त्याच आहुतींचा होम करुन सार्‍या रुद्रानें सर्वांगाला स्पर्श करावा . तदनंतर ‘ धामंते० ’ ह्या मंत्रानें पूर्णाहुति द्यावी . किंवा पूर्णाहुति देऊं नये . याप्रमाणें पूर्वदिवशीं अधिवासन करुन दुसर्‍या दिवशीं , अथवा सद्यः पक्ष असेल तर त्याच दिवशीं ,

पीठिकेला स्नान घालून ‘ महीमूषु० ’ ह्या मंत्रानें आवाहन करुन ‘ अदितिर्द्यौ० ’ ह्या मंत्रानें स्तुति करुन ‘ र्‍हीं नमः ’ ह्या मंत्रानें पूजा करुन त्याच मंत्रानें पूर्णाहुति देऊन ‘ उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते० ’ ह्या मंत्रानें देवाला उठवून पुष्पांजलि देऊन पुरुषसूक्तानें स्तुति करुन ‘ उदुत्यं० ’ ह्या मंत्रानें उठवून ‘ कनिक्रदत् ‍ ० ’ ह्या सूक्तानें विष्णुमूर्तीला आणि ‘ सद्योजातं० ’ ह्या पांच अनुवाकांनीं लिंगाला गृहांत प्रवेश करवून पीठिकेवर इंद्रादि नांवांनीं आठ रत्नें टाकून , सप्तधान्यें , रौप्य , मनः शिला टाकून पायसानें लेप करुन प्रणवानें अंगन्यास करुन सुवर्णशलाका अंतरित करुन चांगल्या लग्नावर ( मुहूर्तावर ) ‘ प्रतितिष्ठ परमेश्वर ’ असें उच्चारुन ‘ अतो देवा० ’ ह्या मंत्रांनीं विष्णूची आणि रुद्रानें लिंगाची स्थापना करावी . तदनंतर प्राणप्रतिष्ठा करावी .

चलार्चादौत्वधिवासनांतेपरेद्युरुत्तिष्ठब्रह्मणस्पतइतिदेवमुत्थाप्यपुरुषसूक्तोत्तरनारायणाभ्यांस्तुत्वाघृतेव्रीहिचरुंकृत्वातद्देवतामंत्रेणदशाहुतीर्हुत्वानामभिर्जुहुयात् ‍ अग्नयेस्वाहा सोमायस्वाहा धन्वंतरयेस्वाहा कुह्वैस्वाहा अनुमत्यैस्वाहा प्रजपयेस्वाहा परमेष्ठिनेस्वाहा ब्रह्मणेस्वाहा अग्नयेस्वाहा सोमायस्वाहा अग्नयेन्नादायस्वाहा अग्नयेन्नपतयेस्वाहा प्रजापतयेस्वाहा विश्वेभ्योदेवेभ्यः स्वाहा सर्वेभ्योदेवेभ्यः स्वाहा भूर्भुवः स्वः स्वाहा अग्नयेस्विष्टकृतेइति ततः सप्तमेअग्नेपुनस्त्वेत्याभ्यांपूर्णाहुतिः ततः आचार्योयाओषधीरितिपुष्पफलसर्वौषधीः समर्प्य संपातोदकंताम्रपात्रेआदायदेवमंत्रेणशतवारमभिमंत्र्य तेनैवाभिषिंचेत् ‍ ततः उत्तिष्ठेतिदेवमुत्थाप्य विश्वतश्चक्षुरित्युपस्थायदेवंध्यात्वाजपेत् ‍ ब्रह्मणेनमः एवंविष्णवेरुद्राय० इंद्रादीनष्टौ वसुभ्योरुद्रेभ्यआदित्येभ्योऽश्विभ्यांमरुभ्द्यः कुबेरायगंगादिमहानदीभ्योऽग्नीषोमाभ्यामिंद्राग्निभ्यांद्यावापृथिवीभ्यांधन्वंतरयेसर्वेशायविश्वेभ्योदेवेभ्योब्रह्मणेनमइति ततः संपातोदकेनयजमानमभिषिच्य देवंध्यात्वाप्रतितिष्ठपरमेश्वरेतिपुष्पाजलिंनिवेद्य सच्चिदानंदंब्रह्मैवभक्तानुग्रहायगृहीतविग्रहंकरचरनाद्यवयविनंशंखचक्राद्यायुधवंतंनिजवाहनाद्युपेतंनिजह्रत्कमलेऽवस्थित्तंसर्वलोकसाक्षिणमणीयांसंपरमेष्ठ्यसिपरमांश्रियंगमयेतिमंत्रेणपुष्पांजलावागतंविभाव्याऽर्चायांविन्यस्यप्राणप्रतिष्ठांकुर्यात् ‍ ॥

मूर्तीची वगैरे चलप्रतिष्ठा असेल तर अधिवासन झाल्यावर दुसर्‍या दिवशीं ‘ उत्तिष्ठब्रह्मणस्पते० ’ ह्या मंत्रानें देवाला उठवून पुरुषसूक्त आणि उत्तरनारायणसूक्त यांनीं स्तुति करुन घृतांत व्रीहिचरु करुन त्या देवतेच्या मंत्रानें दहा आहुति होम करुन पुढच्या नाममंत्रांनीं होम करावा . तो असा - अग्नये स्वाहा , सोमाय० , धन्वंतरये० , कुह्रै० , अनुमत्यै० , प्रजापतये० , परमेष्ठिने० , ब्रह्मणे० , अग्नये० , सोमाय० , अग्नयेऽन्नादाय० , अग्नयेऽन्नपतये० , प्रजापतये० , विश्वेभ्योदेवेभ्यः० , सर्वेभ्योदेवेभ्यः० , भूर्भुवःस्वः० , अग्नयेस्विष्टकृते० . तदनंतर ‘ सप्ततेअग्ने० ’ , ‘ पुनस्त्वा० ’ ह्या दोन मंत्रांनीं पूर्णाहुति द्यावी . तदनंतर आचार्यानें ‘ या ओषधीः० ’ ह्या मंत्रानें पुष्पें , फलें , आणि सर्वौषधि समर्पण करुन संपातोदक ताम्रपात्रांत घेऊन देवमंत्रानें शंभर वेळां अभिमंत्रण करुन त्या उदकानें देवावर अभिषेक करावा . तदनंतर ‘ उत्तिष्ठ ब्रह्मण० ’ ह्या मंत्रानें देवाला उठवून ‘ विश्वतश्चक्षु० ’ ह्या मंत्रानें उपस्थान करावें . तदनंतर देवाचें ध्यान करुन जप करावा , तो असा - ब्रह्मणे नमः विष्णवे नमः रुद्राय नमः इंद्रादि अष्टलोकपालांस नमस्कार करावा . वसुभ्यो नमः रुद्रेभ्यो० आदित्येभ्यो० अश्विभ्यां० मरुभ्द्यो० कुबेराय० गंगादिमहानदीभ्यो० अग्नीषोमाभ्यां० इंद्राग्निभ्यां० द्यावापृथिवीभ्यां० धन्वंतरये० सर्वेशाय० विश्वेभ्यो देवेभ्यो० ब्रह्मणे नमः तदनंतर संपातोदकानें यजमानाला अभिषेक करावा . नंतर देवाचें ध्यान करुन ‘ प्रतितिष्ठ परमेश्वर ’ असें म्हणून पुष्पांजलि निवेदन करुन ‘ सच्चिदानंदं ब्रह्मैव भक्तानुग्रहाय गृहीतविग्रहं करचरणाद्यवयविनं शंखचक्राद्यायुधवंतं निजवाहनाद्युपेतं निजह्रत्कमलेऽवस्थितं सर्वलोकसाक्षिणमणीयांसं परमेष्ठ्यसि परमांश्रियं गमय ’ ह्या मंत्रानें पुष्पांजलीचेठायीं सच्चिदानंदब्रह्म आलेलें आहे , अशी भावना करुन तो पुष्पांजलि मूर्तीचेठायीं ठेऊन नंतर प्राणप्रतिष्ठा करावी .

यथाअस्यश्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्यब्रह्मविष्णुरुद्राऋषयः ऋग्यजुः सामानिच्छंदांसि क्रियामयवपुः प्राणाख्यादेवता आंबीजम् ‍ क्रोंशक्तिः प्राणप्रतिष्ठायांविनियोगः ततोऋष्यादीन् ‍ क्रमेणशिरोमुखह्रदयगुह्यपादेषुविन्यस्य ॐकंखंगंघंडं अंपृथिव्यप्तेजोवाय्वाकाशात्मने आंह्रदयायनमः ॐचंछंजंझंञं इंशब्दस्पर्शरुपरसगंधात्मनेईंशिरसेस्वाहा ॐटंठंडंढंणंउंश्रोत्रत्वक् ‍ चक्षुर्जिह्वाघ्राणात्मनेऊंशिखायैवषट् ‍ ॐतंथंदंधंनं एंवाक् ‍ पाणिपादपायूपस्थात्मनेऐंकवचायहुम् ‍ ॐ पंफंबंभंमंओंवचनादानविहरणोत्सर्गानंदात्मने औंनेत्रत्रयायवौषट् ‍ ॐयंरंलंवंशंषंसंहंळंक्षं अंमनोबुद्ध्यहंकारचित्तात्मने अः अस्त्रायफट् ‍ एवंआत्मनिदेवेचकृत्वादेवंस्पृष्ट्वाजपेत् ‍ ॐआंहींक्रोंअंयंरंलंवंशंषंसंहंसः देवस्यप्राणाइहप्राणाः ॐ आंहींक्रोंअंयंरंलंवंशंषंसंहंसः देवस्यजीवइहस्थितः ॐआंह्रींक्रोंअंयंरंलंवंशंषंसंहंसः देवस्यसर्वेंद्रियाणि ॐ आंह्नींक्रोंअंयंरंलंवंशंषंसंहंसः देवस्यवाड्मनश्चक्षुः श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणाइहागत्यस्वस्तयेसुखेनसुचिरंतिष्ठंतुस्वाहेति ततोऽर्चाह्रद्यंगुष्ठंदत्वाजपेत् ‍ अस्यैप्राणाः प्रतिष्ठंतुअस्यैप्राणाः क्षरंतुच अस्यैदेवत्वमर्चायैमामहेतिचकच्चनेति ततः प्रणवेनसंरुध्यसजीवंध्यात्वा ध्रुवाद्योरितितृचंजप्त्वाकर्णेगायत्रींदेवमंत्रंचजप्त्वापुरुषसूक्तेनोपस्थायपादनाभिशिरः

स्पृष्ट्वा इहैवैधीतित्रिर्जपेत् ‍ ततः कर्ता स्वागतं देवदेवेशमद्भाग्यात्त्वमिहागतः प्राकृतंत्वमदृष्ट्वामांबालवत्परिपालय धर्मार्थकामसिद्ध्यर्थंस्थिरोभवशुभायनः सान्निध्यंतुसदादेवस्वार्चायांपरिकल्पय यावच्चंद्रावनीसूर्यास्तिष्ठंत्यप्रतिघातिनः तावत्त्वयात्रदेवेशस्थेयंभक्तानुकंपया भगवन्देवदेवेशत्वंपितासर्वदेहिनाम् ‍ येनरुपेणभगवंस्त्वयाव्याप्तंचराचरम् ‍ तेनरुपेणदेवेशस्वार्चायांसन्निधौभवेतिनमेत् ‍ एतदंतंसर्वदेवानांसमानं देवमंत्रश्चमूलमंत्रोवैदिकोवाग्राह्यः अथाचार्यः कर्तावालिंगमर्चांवा ॐभूः पुरुषमावाहयामि ॐभुवः पुरुषमावाहयामि ॐसुवः पुरुषमावाहयामि ॐभूर्भुवः सुवः पुरुषमावाहयामीत्यावाह्य प्रणवेनासनंदत्त्वा तेनैवदूर्वाश्यामाकविष्णुक्रांतापद्ममिश्रंपाद्यम् ‍ इमाआपः शिवतमाः पूताः पूततमामेध्यामेध्यतमाअमृताअमृतरसाः पाद्यास्ताजुषतांप्रतिगृह्यतांप्रतिगृह्णातुभगवान् ‍ महाविष्णुर्विष्णवेनमइतिपाद्यम् ‍ भगवान् ‍ महादेवोरुद्रायनमइतिलिंगे एवंदेवतांतरेषूह्यं इमाआपआचमनीयास्ताजुषतामित्याचमनीयम् ‍ अर्घ्याइत्यर्घ्यम् ‍ ततोवेदमंत्रैः संस्नाप्य इदंविष्णुरितिविष्णौ नमोअस्तुनीलग्रीवायेतिलिंगेप्रतिसरंविस्रस्य वस्त्रंयज्ञोपवीतंचदत्वा इमेगंधाः शुभादिव्याः सर्वगंधैरलंकृताः पूताब्रह्मपवित्रेणपूताः सूर्यस्यरश्मिभिः इतिगंधम् ‍ इमेमाल्याः शुभादिव्याः सर्वमाल्यैरलंकृताः पूताइत्यादिमाल्यम् ‍ इमेपुष्पाः शुभाइत्यादिपुष्पम् ‍ वनस्पतिरसोद्भूतोगंधाढ्योधूपउत्तमः आघ्रेयः सर्वदेवानांधूपोयंप्रतिगृह्यताम् ‍ प्रतिगृह्णात्वित्यादिधूपम् ‍ ज्योतिः शुक्रंचतेजश्चदेवानांसततंप्रियः प्रज्योतिः सर्वभूतानांदीपोयंप्रतिगृह्यताम् ‍ इतिदीपंदत्वा विष्णौसंकर्षणवासुदेवप्रद्युम्नानिरुद्धपुरुषोत्तमाधोक्षजनृसिंहाच्युतजनार्दनोपेंद्रहरिश्रीकृष्णेतिद्वादशनामभिः केशवादिद्वादशनामभिर्वापुष्पाणिसमर्प्य तैरेवतर्पणंकृत्वा पायसगुडौदनचित्रौदनानि पवित्रंतेविततमितिनिवेद्य संकर्षणादिपूर्वोक्तनामभिर्द्वादशकृसराहुतीर्हुत्वा तैनेवशार्ड्गिणेश्रियैसरस्वत्यैविष्णवेइतिहुत्वा विष्णोर्नुकंवीर्याणि० तदस्यप्रियमभिपाथो० प्रतद्विष्णुस्तवतेवीर्येण० परोमात्रयातन्वावृधान० विचक्रमेपृथिवीमेषएतां० त्रिर्देवः पृथिवीमेषएतां० इतिजुहुयात् ‍ पुनः द्वादशनामभिर्जुहुयात् ‍ ॥

ती अशी - ‘ प्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्मविष्णुरुद्राऋषयः० ’ याला आरंभ करुन ‘ स्वस्तये सुखेन सुचिरंतिष्ठंतुस्वाहा ’ एथपर्यंत झाल्यावर प्रतिमेच्या ह्रदयावर अंगुष्ठ देऊन पुढील मंत्र जपावा . तो मंत्र - ‘ अस्यै प्राणाः प्रतिष्ठंतु अस्यै प्राणाः क्षरंतु च ॥ अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कच्चन ॥ ’ तदनंतर प्रणवानें रोधून मूर्ति सजीव आहे असें ध्यान करुन ‘ ध्रुवाद्यौः० ’ ह्या तीन ऋचांचा जप करुन कर्णांत गायत्रीचा व देवमंत्राचा जप करुन पुरुषसूक्तानें उपस्थान करुन पाद , नाभि व मस्तक यांना स्पर्श करुन ‘ इहैवैधि ’ याचा त्रिवार जप करावा . तदनंतर कर्त्यानें ‘ स्वागतं देवदेवेश मद्भाग्यात्त्वमिहागतः ॥ प्राकृतं त्वमदृष्ट्वा मां बालवत्परिपालय ॥ धर्मार्थकामसिद्ध्यर्थ० ’ इत्यादि प्रार्थना करुन नमस्कार करावा . प्राणप्रतिष्ठेला आरंभ करुन येथपर्यंत कृत्य सर्व देवांचें समान आहे . या ठिकाणीं देवमंत्र घ्यावयाचा तो मूलमंत्र किंवा वैदिकमंत्र घ्यावा . तदनंतर आचार्यानें किंवा यजमानानें त्या लिंगाची किंवा मूर्तीची पूजा करावी . ती अशी - ‘ ॐ भूः पुरुषमावाहयामि० ’ इत्यादि मंत्रानें आवाहन करुन प्रणवानें आसन देऊन प्रणवाचा उच्चार करुन ‘ इमा आपः शिवतमाः पूताः पूततमा मेध्या मेध्यतमा अमृता अमृतरसाः पाद्यास्ताजुषतांप्रतिगृह्यतां प्रतिगृह्णातुभगवान् ‍ महाविष्णुर्विष्णवेनमः ’ ह्या मंत्रानें दूर्वा , श्यामाक , विष्णुक्रांता , कमल , यांनीं मिश्रित असें पाद्य द्यावें . लिंग असेल तर ह्याच मंत्रांत ‘ महाविष्णुर्विष्णवेनमः ’ ह्याच्या स्थानीं ‘ महादेवोरुद्रायनमः ’ असें म्हणावें . याप्रमाणें इतर देवता असेल तर तसा ऊह करावा . आचमनीयाविषयीं ‘ इमा आपः शिवतमाः० ’ ह्या मंत्रांत ‘ आचमनीयास्ताजुषतां० ’ असा ऊह करुन आचमनीय द्यावें . ‘ इमाआपः० ’ ह्याच मंत्रांत ‘ अर्घ्यास्ता० ’ असा ऊह करुन अर्घ्य द्यावें . नंतर देवाला वेदमंत्रांनीं स्नान घालून ‘ इदंविष्णु० ’ या मंत्रानें विष्णूच्या प्रतिमेचे ठिकाणीं आणि ‘ नमो अस्तु नीलग्रीवाय० ’ ह्या मंत्रानें लिंगाचे ठिकाणीं प्रतिसर ( कंकण ) सोडावा . ‘ इमे गंधाः शुभा दिव्याः सर्वगंधैरलंकृताः ॥ पूता ब्रह्मपवित्रेण पूताः सूर्यस्य रश्मिभिः ॥ पूताः पूततमा० ’ हा मंत्र पूर्वीप्रमाणें म्हणून गंध द्यावें . ‘ इमे माल्याः शुभा दिव्याः सर्वमाल्यैरलंकृताः ॥ पूताः पूततमा० ’ इत्यादि म्हणून माला द्याव्या . ‘ इमे पुष्पाः शुभा० ’ इत्यादिमंत्रानें पुष्पें द्यावीं . ‘ वनस्पतिरसो० धूपोयं प्रतिगृह्यतां ॥ प्रतिगृह्यतुभगवान् ० ’ इत्यादि म्हणून धूप द्यावा . ‘ ज्योतिः शुक्रं च तेजश्च देवानां सततं प्रियः ॥ प्रज्योतिः सर्वभूतानां दीपोयं प्रतिगृह्यतां ॥ प्रतिगृह्णातु भगवान् ‍ ० ’ इत्यादि मंत्र म्हणून दीप द्यावा . विष्णूचे ठिकाणीम ‘ संकर्षणायनमः वासुदेवायनमः ’ इत्यादि बारा नांवांनीं किंवा ‘ केशवायनमः ’ इत्यादिक बारा नांवांनीं पुष्पें समर्पण करुन त्याच नांवांनीं तर्पण करुन पायस , गुडौदन , चित्रौदन यांचा ‘ पवित्रंतेविततं० ’ ह्या मंत्रानें नैवेद्य समर्पण करुन पूर्वीं सांगितलेल्या संकर्षणादिक बारा नांवांनीं गृहसिद्धकृसराच्या ( तिलमिश्र ओदनाच्या ) बारा आहुति अग्नींत देऊन त्याच कृसरानें ‘ शार्ड्गिणे० श्रियै० सरस्वत्यै० विष्णवेस्वाहा ’ ह्या आहुतींचा होम करुन ‘ विष्णोर्नुकं० , तदस्यप्रिय० , प्रतद्विष्णु० , परोमात्रया० , विचक्रमे० , त्रिर्देवः पृथिवी० ’ ह्या सहा मंत्रांनीं सहा आहुति द्याव्या . नंतर पुनः बारा नांवांनीं होम करावा .

लिंगेतुदीपांतंकृत्वा भवायदेवाय० शर्वाय० ईशानाय० पशुपतये० रुद्राय० उग्राय० भीमाय० महतेदेवायनमइति पुष्पाणिदत्वा तैरेवतर्पणंकृत्वा पवित्रंतेइतिपायसंगुडौदनंचनिवेद्यपूर्वोक्तनामभिः कृसरंहुत्वा भवस्यदेवस्यपत्न्यैस्वाहेत्याद्यष्टभिर्गुडौदनंहुत्वा भवस्यदेवस्यसुतायस्वाहेत्याद्यैर्हरिद्रौदनंहुत्वा त्र्यंबकंयजामहे० मानोमहांतमुतमानो० मानस्तोकेतनये० आरात्तेगोघ्नमुतपूरुषघ्ने० विकिरिदविलोहित० सहस्त्राणिसहस्त्र० इतिद्वादशएतैर्हुत्वा शिवाय० शंकराय० सहमानाय० शितिकंठाय० कपर्दिने० ताम्राय० अरुणाय० अपगुरमाणाय० हिरण्यबाहवे० सस्पिंजराय० बभ्लुशाय० हिरण्यायेतिचजुहुयात् ‍ ततः स्विष्टकृदादिहोमशेषंसमाप्य पूर्वोक्तसर्वहविर्भिर्विष्णवेलिंगायवाबलिंदद्यात् ‍ मंत्रस्तु त्वामेकमाद्यंपुरुषंपुरातनंनारायणंविश्वसृजंयजामहे त्वमेवयज्ञोविहितोविधेयस्त्वमात्मनात्मन् ‍ प्रतिगृह्णीष्वहव्यमिति लिंगेतुनारायणपदेरुद्रंशिवमितिवदेत् ‍ ततोऽश्वत्थपर्णेभूर्भुवः स्वरोमितिहुतशेषंनिधायप्रदक्षिणीकृत्यविश्वभुजेआत्मनेपरमात्मनेनमइतिनत्वा आचार्यायशतंतदर्धंतदर्धंद्वादशतिस्रएकांवागांदत्वाऋत्विग्भ्योपिदक्षिणांदत्वाशतंद्वादशवाब्राह्मणान् ‍ भोजयेदितिसंक्षेपः प्रासादमात्रेनूतनेतुमात्स्योक्तजलाशयप्रतिष्ठाविधिमेवकुर्यात् ‍ गोरुत्तारणपात्रीप्रक्षेपादितुनभवति द्वारलोपात् ‍ वारुणहोमस्थानेवास्तुहोमः अन्यत्तद्वदेव इतिभट्टकमलाकरकृतौलिंगार्चाप्रतिष्ठाविधिः ॥

लिंग असेल तर दीपापर्यंत पूजा करुन ‘ भवायदेवायनमः ’ इत्यादि आठ नाममंत्रांनीं पुष्पें समर्पण करुन त्याच नाममंत्रांनीं तर्पण करुन ‘ पवित्रंते० ’ ह्या मंत्रानें पायस आणि गुडौदन नैवेद्य समर्पण करुन ‘ भवाय देवाय स्वाहा ’ ह्या आठ नाममंत्रांनीं कृसराचा होम करुन नंतर ‘ भवस्य देवस्य पत्न्यै स्वाहा ’ इत्यादिक आठ मंत्रांनीं गुडौदनाचा होम करुन ‘ भवस्य देवस्य सुताय स्वाहा ’ इत्यादिक आठ मंत्रांनीं हरिद्रौदनाचा होम करुन ‘ त्र्यंबकं० , मानोमहांत० , मानस्तोके० , आरात्तेगोघ्न० ’ ह्या चार आणि ‘ विकिरिदविलोहित० , सहस्त्राणि सहस्रधा० ह्या बारा ऋचा ह्यांनीं होम करुन ‘ शिवाय० , शंकराय० , ’ ह्या बारा नामांनीं होम करावा . तदनंतर स्विष्टकृदादि होमशेष समाप्त करुन पूर्वीच्या सार्‍या हवींनीं विष्णूला किंवा लिंगाला बलि द्यावा . बलिदानाचा मंत्र - ‘ त्वामेकमाद्यं पुरुषं पुरातनं नारायणं विश्वसृजं यजामहे ॥ त्वमेव यज्ञो विहितो विधेयस्त्वमात्मनात्मन् ‍ प्रतिगृह्णीष्व हव्यम् ‍ ॥ ’ लिंग असेल तर त्या मंत्रांत ‘ नारायणं ’ ह्या स्थानीं ‘ रुद्रंशिवं ’ असें म्हणावें . तदनंतर अश्वत्थाच्या पानावर ‘ भूर्भुवः स्वरोम् ‍ ’ ह्या मंत्रानें हुतशेष ठेवून प्रदक्षिणा करुन ‘ विश्वभुजे सर्वभुजे आत्मने परमात्मनेनमः ’ असें म्हणून नमस्कार करुन आचार्याला शंभर , पन्नास , पंचवीस , बारा , तीन , किंवा एक गाई देऊन ऋत्विजांनाही दक्षिणा देऊन शंभर किंवा बारा ब्राह्मणांना भोजन घालावें . असा हा थोडक्यांत प्रयोग सांगितला आहे . देवप्रतिष्ठा पूर्वीची असून केवळ प्रासाद नवीन केलेला असेल तर मात्स्योक्त जलाशयप्रतिष्ठाविधिच करावा . त्या प्रयोगांत गाईचें उत्तारण वगैरे सांगितलेलें आहे तें वर प्रासाद प्रतिष्ठेंत होत नाहीं . कारण , त्याचें येथें द्वार नाहीं . वारुणहोमाच्या स्थानीं वास्तुहोम करावा , बाकीचें सारें कृत्य त्यासारखेंच समजावें .

इति लिंगार्चाप्रतिष्ठाविधिः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP