मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
यज्ञोपवीत

तृतीयपरिच्छेद - यज्ञोपवीत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां यज्ञोपवीत सांगतो .

अथयज्ञोपवीतं मनुः कार्पासमुपवीतंस्याद्विप्रस्योर्ध्ववृतंत्रिवृत् ‍ पारिजातेदेवलः कार्पासक्षौम गोवालशणबल्वतृणादिकं यथासंभवतोधार्यमुपवीतंद्विजातिभिः शुचौदेशेशुचिः सूत्रंसंहतांगुलिमूलके आवर्त्यषण्णवत्यातत्र्त्रिगुणीकृत्ययत्नतः अब्लिंगकैस्त्रिभिः सम्यक् ‍ प्रक्षाल्योर्ध्ववृतंत्रिवृत् ‍ अप्रदक्षिणमावृत्यसावित्र्यात्रिगुणीकृतं ततः प्रदक्षिणावर्तंसमंस्यान्नवसूत्रकं त्रिरावेष्ट्यदृढंबध्वाब्रह्मविष्ण्वीश्वरान्नमेत् ‍ तन्नवतंतुकार्यं सावित्र्यात्रिगुणंकुर्यान्नवसूत्रंतुतद्भवेदितितेनैवोक्तेः छंदोगपरिशिष्टे त्रिवृदूर्ध्ववृतंकार्यंतंतुत्रयमधोवृतं त्रिवृतंचोपवीतंस्यात्तस्यैकोग्रंथिरिष्यते ऊर्ध्ववृतंदक्षिणंकरमूर्ध्वंकृत्वावलितं भृगुः वामावर्तवलितंत्रिगुणंकृत्वादक्षिणावर्तवलितंत्रिगुणंकार्यं सएकस्तंतुरेवंत्रितंतुकमित्यर्थः कात्यायनः पृष्ठदेशेचनाभ्यांचधृतंयद्विंदतेकटिं तद्धार्यमुपवीतंस्यान्नातिलंबंनचोच्छ्रितं वसिष्ठः नाभेरुर्ध्वमनायुष्यमधोनाभेस्तपः क्षयः तस्मान्नाभिसमंकुर्यादुपवीतंविचक्षणः पारिजातेदेवलः उपवीतंबटोरेकंद्वेतथेतरयोः स्मृते एकमेवयतीनांस्यादितिशास्त्रस्यनिश्चयः सएव बहूनिवायुष्कामस्य तत्रमंत्रमाह सएव यज्ञोपवीतमितिवाव्याह्रत्यावापिधारयेत् ‍ हेमाद्रौ यज्ञोपवीतेद्वेधार्येश्रौतेस्मार्तेचकर्मणि तृतीयमुत्तरीयार्थेवस्त्राभावेतदिष्यते देवलः सावित्र्यादशकृत्वोद्भिर्मंत्रिताभिस्तदुक्षयेत् ‍ विच्छिन्नंचाप्यधोयातंभुक्त्वानिर्मितमुत्सृजेत् ‍ मनुः मेखलामजिनंदंडमुपवीतंकमंडलुं अप्सुप्रास्यविनष्टानिगृह्णीतान्यानिमंत्रतः ॥

मनु - " ब्राह्मणाला यज्ञोपवीत कापसाचें असावें , तें असें कीं , सूत त्रिगुण करुन उजवा हात वर करुन वळलेलें करावें . " पारिजातांत देवल - " कार्पास ( कापसाचें सूत ), क्षौम ( अळशीचें सूत ), गोवाल ( अरण्य गाईचे केश ), शण ( तागाचें सूत ), बल्व ( लव्ह्याचें सूत ), यांपैकीं ज्याचें मिळेल व होईल त्याचें यज्ञोपवीत ब्राह्मणादिकांनीं धारण करावें . शुचिर्भूत ब्राह्मणानें शुद्ध भूमीवर बसून सूत काढावें . नंतर हाताचीं सारखीं चार बोटें एकत्र करुन त्या बोटांना ( चंवग्याला ) त्रिगुणित केलेल्या सुताचे ( तिसुतीचे ) शाण्णव फेरे घालावे , म्हणजे तिसुती तयार झाली . नंतर " आपोहिष्ठा० " हे तीन मंत्र म्हणून उदकानें चांगलें धुवून ती तिसुती ऊर्ध्ववृत रीतीनें अप्रदक्षिण वळून गायत्रीमंत्रानें त्रिगुणित करुन प्रदक्षिण वळावें . ती नवसुती सारखी होते . तिचे तीन फेरे करुन घट्ट ग्रंथि बांधावी . त्या ग्रंथीचे ठायीं ब्रह्मा , विष्णु , महेश्वर यांना नमस्कार करावा . " तें यज्ञोपवीत नवसुती करावें . कारण , " तिसुती गायत्रीमंत्रानें त्रिगुणित ( तिपेड ) करावी , म्हणजे नवसुती होते . " असें त्यानें ( देवलानें ) च सांगितलें आहे . छंदोगपरिशिष्टांत - " तिसुती करुन ऊर्ध्ववृत वळावें . पुनः तिपेड करुन अधोवृत वळावें . म्हणजे नवसुती झाली . त्याचे तीन फेरे करुन त्याला एक ग्रंथि ( गांठ ) द्यावा , म्हणजे यज्ञोपवीत होतें . " ऊर्ध्ववृत याचा अर्थ - डावा हात खालीं आणि उजवा हात वर करुन त्या उजव्या हातानें वळलें तें ऊर्ध्ववृत , याच्या उलट म्हणजे उजवा हात खालीं करुन वळलेलें तें अधोवृत होय . भृगु - " वामावर्त ( अप्रदक्षिण ) वळलेली तिसुती करुन पुनः प्रदक्षिण वळलेलें असें त्रिगुणित करावें . " तो एक तंतु ( नवसुती ) होतो , त्याच्या तीन तंतूंचें यज्ञोपवीत होतें , असा भाव . कात्यायन - " जें यज्ञोपवीत घातलें असतां स्कंधावरुन पाठीवर आणि पुढें नाभीवर येऊन कटिप्रदेशापर्यंत पोहोंचतें , तें यज्ञोपवीत धारण करावें . फार लांब व फार आंखूड असूं नये . " वसिष्ठ - " नाभीच्या वरती राहणारें यज्ञोपवीत आयुष्यहानि करणारें होतें . नाभीच्या खालीं जाणारें यज्ञोपवीत तपाचा क्षय करणारें होतें ; म्हणून ज्ञात्या पुरुषानें नाभिसमान यज्ञोपवीत धारण करावें . " पारिजातांत देवल - " बटूनें ( ब्रह्मचार्‍यानें ) एक यज्ञोपवीत धारण करावें . गृहस्थाश्रमी व वानप्रस्थ यांनीं दोन . यतींनीं ( त्रिदंडी यांनीं ) एक यज्ञोपवीत धारण करावें , असा शास्त्राचा निश्चय आहे . " देवलच - " अथवा आयुष्कामानें बहुत ( तीन , चार ) धारण करावीं . " त्या यज्ञोपवीतधारणाविषयीं मंत्र सांगतो देवल - " यज्ञोपवीतं परमं० " ह्या मंत्रानें किंवा व्याह्रति मंत्रानें धारण करावें . " हेमाद्रींत - " श्रौतकर्म व स्मार्तकर्म यांचेठायीं दोन यज्ञोपवीतें धारण करावीं . तिसरें यज्ञोपवीत , उत्तरीय किंवा वस्त्र यांच्या अभावीं धारण करावें . " देवल - " गायत्रीमंत्रानें दशवार अभिमंत्रित केलेल्या उदकानें तें प्रोक्षण करावें . तुटलें असतां किंवा खालीं गळलें असतां तें टाकावें . व भोजन करुन निर्माण केलेलें टाकावें . " मनु - " मेखला , अजिन , दंड , यज्ञोपवीत , कमंडलु हीं छिन्न भिन्न झालीं असतां तीं उदकांत टाकून मंत्रानें नवीं धारण करावीं . "

आतां ब्रह्मचारिधर्माचा लोप झाला असतां प्रायश्चित्त सांगतो -

अथैतल्लोपेप्रायश्चित्तंमनुः अकृत्वाभैक्ष्यचरणमसमिध्यचपावकं अनातुरः सप्तरात्रमवकीर्णिव्रतंचरेत् ‍ अमत्या आपदित्यागेतु याज्ञवल्क्यः भैक्ष्याग्निकार्येत्यक्त्वातुसप्तरात्रमनातुरः कामावकीर्णइत्याभ्यांजुहुयादाहुतिद्वयं उपस्थानंततः कुर्यात्संमासिंचंत्यनेनतु मंत्रास्तु मिताक्षरायांज्ञेयाः सकृल्लोपेतुऋग्विधाने मानस्तोकेजपेन्मंत्रंशतसंख्यंशिवालये अग्निकार्यंविनाभुक्तौनपापंब्रह्मचारिणः स्मृत्यर्थंसारेतु संध्याग्निकार्यलोपेस्नात्वाऽष्टसहस्रंजपः भिक्षालोपेष्टशतं अभ्यासेद्विगुणंपुनः संस्कारश्चेत्युक्तं अपरार्केसंवर्तः यः संध्यांचैवनोपास्तेअग्निकार्यंयथाविधि गायत्र्यष्टसहस्रंतुजपेत्स्नात्वासमाहितः ।

मनु - " ब्रह्मचारी आतुर ( रोगपीडित ) नसून त्यानें सात दिवसपर्यंत भिक्षा मागितली नाहीं व अग्नींत समिधा दिली नाहीं तर अवकीर्णिव्रत सांगितलें आहे तें त्यानें करावें . " ( हें प्रायश्चित्त , जाणतेपणानें भिक्षाचरणादि केलें नसतां समजावें ). अजाणतेपणानें व आपत्कालीं भिक्षादिकांचा त्याग असेल तर सांगतो याज्ञवल्क्य - " स्वस्थ ( निरोगी ) असतां जो ब्रह्मचारी भिक्षा मागणें , अग्निकार्य हीं सप्तरात्रपर्यंत टाकील त्यानें ‘ कामावकीर्णोस्म्यवकीर्णोस्मि कामकामाय स्वाहा ’ ‘ कामावपन्नोस्म्यवपन्नोस्मि कामकामाय स्वाहा ’ ह्या दोन मंत्रांनीं दोन आज्याहुतिहोम करुन नंतर ‘ संमा सिंचुंत मरुतः समिंद्रः संबृहस्पतिः समायमग्निः सचतां यशसा ब्रह्मवर्चसा . ’ ह्या मंत्रेंकरुन अग्न्युपस्थान करावें . " हे मंत्र मिताक्षरेंत पहावे . एकवार लोप झाला असेल तर सांगतो ऋग्विधानांत - " ब्रह्मचारी अग्निकार्य केल्यावांचून भोजन करील तर त्यानें शिवालयांत ‘ मानस्तोके० ’ ह्या मंत्राचा शतवार जप करावा , तेणेंकरुन ब्रह्मचारी निर्दोषी होतो . " स्मृत्यर्थसारांत तर - संध्या व अग्निकार्य यांचा लोप झाला असतां स्नान करुन गायत्रीमंत्राचा अष्टसहस्त्र जप करावा . भिक्षालोप असतां अष्टशत जप करावा . अभ्यास असतां ( हेंच प्रायश्चित्त ) द्विगुणित करुन पुनः संस्कार करावा , असें सांगितलें आहे . अपरार्कांत संवर्त - " जो संध्या व अग्निकार्य हीं यथाविधि करीत नाहीं . त्यानें स्नान करुन स्वस्थचित्तपणानें गायत्रीमंत्राचा अष्टसहस्त्र जप करावा . "

अग्निकार्यंसंध्याद्वयेकार्यं अग्निकार्यंततः कुर्यात्संध्ययोरुभयोरपीति याज्ञवल्क्योक्तेः सायमेववा सायमेववाग्निमिंधीतेत्येकेइति लौगाक्षिणोक्तेः पारिजातेवृद्धशातातपः ब्रह्मचारीतुयोश्नीयान्मधुमांसंतथैवच प्राजापत्यंचरेत्कृच्छ्रंव्रतशेषंसमापयेत् ‍ ऋग्विधाने तंवोधियाजपेन्मंत्रंलक्षंचैवशिवालये ब्रह्मचारीस्वधर्मेषुन्यूनंचेत्पूर्णमेतितत् ‍ ।

अग्निकार्य ( अग्नींत समिधाहोम ) सायंकालीं व प्रातःकालीं असें द्विवार करावें . कारण , " नंतर दोन संध्याकालींही अग्निकार्य करावें . " असें याज्ञवल्क्याचें वचन आहे . अथवा सायंकालीं मात्र अग्निकार्य करावें . कारण , " अथवा सायंकालीं मात्र अग्नींत समिधा द्यावीं , असें कितीएक आचार्य सांगतात " असें लौगाक्षीचें वचन आहे . पारिजातांत वृद्धशातातप - " जो ब्रह्मचारी मधु व मांस भक्षण करितो त्यानें प्राजापत्य कृच्छ्र प्रायश्चित्त करुन शेष ब्रह्मचर्यव्रत समाप्त करावें . " ऋग्विधानांत - " ब्रह्मचारी हा स्वकीय धर्मांत न्यून असेल तर त्यानें शिवालयांत ‘ तंवोधिया० ’ ह्या मंत्राचा एक लक्ष जप करावा , तेणेंकरुन धर्मांचा न्यूनपणा पूर्ण होतो . "

स्त्रीसंग घडला असतां सांगतो .

स्त्रीसंगेतुमनुः अवकीर्णीतुकाणेनगर्दभेनचतुष्पथे स्थालीपाकविधानेनयजेद्वैनिऋतिंनिशि विस्तरस्तु मिताक्षरादौज्ञेयः उपवीतनाशेतुहारीतः मनोव्रतपतीभिश्चतस्त्र आज्याहुतीर्हुत्वापुनः प्रतीयात् ‍ तत्रैव मरीचिः ब्रह्मसूत्रंविनाभुंक्तेविण्मूत्रेकुरुतेथवा गायत्र्यष्टसहस्त्रेणप्राणायामेनशुध्यति ।

मनु - " अवकीर्णी ब्रह्मचार्‍यानें चवाठ्यावर स्थालीपाकविधानेंकरुन रात्रीं निऋति देवतेला उद्देशून काण अशा गर्दभ पशूनें याग करावा . " याचा याहून विस्तार पहावयाचा असल्यास मिताक्षरादि ग्रंथांत पहावा . यज्ञोपवीताचा नाश झाला असतां सांगतो हारीत - " मनोज्योति ० " ह्या एका मंत्रानें व ‘ व्रतपतीभिः० ’ ह्या तीन मंत्रांनीं अशा घृताच्या चार आहुतींनीं होम करुन पुनः दुसरें यज्ञोपवीत यथाविधि समंत्रक धारण करावें . " यज्ञोपवीतावांचून भोजनादि केलें असतां तेथेंच सांगतो मरीचि - " यज्ञोपवीतावांचून जर भोजन किंवा मलमूत्रोत्सर्ग करील तर प्राणायाम व अष्टसहस्त्र गायत्रीजप करुन शुद्ध होतो . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP