मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
ब्रह्मचारिधर्म

तृतीयपरिच्छेद - ब्रह्मचारिधर्म

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां ब्रह्मचारिधर्म सांगतो .

अथब्रह्मचारिधर्माः याज्ञवल्क्यः मधुमांसांजनोच्छिष्टशुक्तस्त्रीप्राणिहिंसनं भास्करालोकनाश्लीलपरिवादादिवर्जयेत् ‍ मनुः अभ्यंगमंजनंचाक्ष्णोरुपानच्छत्रधारणं वर्जयेदितिप्रकृतं पारिजातेकौर्मे नादर्शंचैववीक्षेतनाचरेद्दंतधावनं गुरुच्छिष्टंभेषजार्थंप्रयुंजीतनकामतः एतन्निषिद्धमध्वादिविषयं अन्यस्यगुरुच्छिष्टस्यसर्वदाप्राप्तेः सचेव्द्याधीयीतकामंगुरोरुच्छिष्टंभेषजार्थंसर्वंप्राश्नीयादितिवसिष्ठोक्तेः ज्येष्ठभ्रातुरित्यपिज्ञेयम् ‍ पितुर्ज्येष्ठस्यचभ्रातुरुच्छिष्टंभोज्यमित्यापस्तंबोक्तेः गुरुपुत्रेतुस्मृत्यंतरेउक्तं गुरुवद्गुरुपुत्रः स्यादन्यत्रोच्छिष्टभोजनात् ‍ प्रचेताः तांबूलाभ्यंजनंचैवकांस्यपात्रेचभोजनं यतिश्चब्रह्मचारीचविधवाचविवर्जयेत् ‍ ।

याज्ञवल्क्य ( आचाराध्याय ) - " मधु , मांस , अंजन ( डोळ्यांत काजळ ), गुरुवांचून इतराचें उच्छिष्ट , आंबलेला पदार्थ , स्त्रीसेवन , प्राणिहिंसा , सूर्याचें उदयकालीं व अस्तकालीं अवलोकन , ग्राम्य भाषण , परनिंदा इत्यादि वर्ज्य करावीं . " मनु - " तैलादि अभ्यंग , डोळ्यांत अंजन ( काजळ ) घालणें , पायांत जोडा घालणें , छत्री घेणें , हीं ब्रह्मचार्‍यानें वर्ज्य करावीं . " पारिजातांत कूर्मपुराणांत - " आरशांत पाहूं नये . दंतधावन करुं नये . गुरुचें उच्छिष्ट औषधाकरितां असेल तर भक्षण करावें . लोभानें भक्षण करुं नये . " हें सांगणें ब्रह्मचार्‍याला निषिद्ध जो मधु इत्यादि पदार्थ त्याचें भक्षण सुचविण्याकरितां आहे . कारण , इतर ( निषिद्धभिन्न ) गुरुच्छिष्टाचें भक्षण सर्वदा प्राप्त आहे . " तो ब्रह्मचारी जर व्याधिग्रस्त होईल तर गुरुचें सर्व ( निषिद्ध मध्वादिकही ) उच्छिष्ट औषधाकरितां यथेच्छ भक्षण करावें " असें वसिष्ठवचन आहे . ज्येष्ठ भ्रात्याचेंही उच्छिष्ट असेंच जाणावें . कारण , " पिता व ज्येष्ठ भ्राता यांचें उच्छिष्ट भक्षण करावें " असें आपस्तंबवचन आहे . गुरुपुत्राविषयीं तर स्मृत्यंतरांत सांगतो - " जसा गुरु तसाच गुरुपुत्र आहे . गुरुपुत्राचें उच्छिष्ट मात्र भक्षण करुं नये . " प्रचेता - " तांबूल , काजळ , आणि कांस्यपात्रांत भोजन , हीं यति ( संन्यासी ), ब्रह्मचारी आणि विधवा यांनीं वर्ज्य करावीं . "

यमः मेखलामजिनंदंडमुपवीतंचनित्यशः कौपीनंकटिसूत्रंचब्रह्मचारीतुधारयेत् ‍ अग्नींधनंभैक्ष्यचर्यामधः शय्यांगुरोर्हितं कुर्यादितिशेषः मेखलामाहाश्वलायनः तेषांमेखलामौंजीब्राह्मणस्यधनुर्ज्याक्षत्रियस्यावीवैश्यस्येति आचार्यः त्रिवृतामेखलाकार्यात्रिवारंस्यात्समावृता तद्ग्रंथयस्त्रयः कार्याः पंचवासप्तवापुनः मनुः मौंजीत्रिवृत्समाश्लक्ष्णाकार्याविप्रस्यमेखला त्रिवृताग्रंथिनैकेनत्रिभिः पंचभिरेववा मौंज्यभावेतुकर्तव्याः कुशाश्मंतकबल्वजैः अत्रप्रवरसंख्यानियम इतिवृद्धाः अथदंडाः मनुः ब्राह्मणोबैल्वपाला शौक्षत्रियोवाटखादिरौ पैप्पलौदुंबरौवैश्योदंडानर्हंतिधर्मतः एषामभावे गौतमः यज्ञियोवासर्वेषांमूर्धल लाटनासाप्रमाणइति अजिनमाहाश्वलायनः अहतेनवाससासंवीतमैणेयेनवाजिनेनब्राह्मणंरौरवेणक्षत्रियमाजेनवैश्यमिति यद्यप्यैणेयशब्देनमृगीचर्मैवोच्यते एण्याढञितिपाणिनिस्मृतेः ऐणेयमेण्याश्चर्माद्यमेणस्यैणमुभेत्रिष्वितिअमरकोशाच्च तथापिकृष्णरुरुबस्तान्यजिनानीतिशंखोक्तेः सर्वेषांवारौरवमितियमोक्तेश्च मृगचर्मणासहविकल्पोज्ञेयः वस्त्राजिनयोस्तुविकल्पः कार्पासंवाविकृतमितिगौतमोक्तेः ।

यम - " मेखला , अजिन , दंड , यज्ञोपवीत , कौपीन , कटिसूत्र हीं ब्रह्मचार्‍यानें नित्य धारण करावीं . अग्नींत समिधा देणें , भिक्षा मागणें , भूमिशयन , आणि गुरुचें हित , हीं करावीं . " मेखला सांगतो - आश्वलायन - " ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य यांच्या मेखला - ब्राह्मणाची मेखला मौंजी ( मुंजतृणाची ), क्षत्रियाची मेखला धनुर्ज्या ( मूर्वा तृणाची ), वैश्याची मेखला आवी ( मेंढ्याचे लोंकरीची ), समजावी . " आचार्य - " मेखला तिपेड करावी ; त्या मेखलेचे कमरेस तीन फेरे घालून तीन , पांच अथवा सात गांठी द्याव्या . " मनु - " मोळाच्या तिपेडासारखी मृदु अशी ब्राह्मणाची मेखला करावी . त्या मेखलेचे तीन फेरे घालून एक , तीन किंवा पांच ग्रंथि द्यावे . वर सांगितलेल्या मोळ इत्यादिकांच्या अभावीं ब्राह्मणादि तीन वर्णांनीं अनुक्रमानें कुश , अश्मंतक ( आपटा ) आणि लवाळा यांच्या मेखला कराव्या . " ह्या मेखलेस जे ग्रंथि द्यावयाचे ते जितके प्रवराचे ऋषि असतील तितके द्यावे , असें वृद्ध सांगतात . आतां दंड सांगतो मनु - " ब्राह्मणानें बेलाचा किंवा पळसाचा , क्षत्रियानें वडाचा किंवा खदिराचा , वैश्यानें पिप्पलाचा किंवा उंबराचा , याप्रमाणें धर्मैंकरुन दंड धारण करावें . " हे दंड न मिळतील तर सांगतो गौतम - " अथवा सर्वांनीं उदुंबरादिक यज्ञियवृक्षाचे दंड धारण करावे . ब्राह्मणानें मस्तकापर्यंत उंचीचा , क्षत्रियानें ललाटापर्यंत उंचीचा आणि वैश्यानें नासिकापर्यंत उंचीचा दंड धारण करावा . " अजिन सांगतो आश्वलायन - " अहत म्हणजे नवें असून वापरलेलें नसेल अशा वस्त्रानें प्रावृत्त कुमार अथवा मृगीचर्मानें प्रावृत ब्राह्मणकुमार , रुरुमृगचर्मानें प्रावृत्त क्षत्रियकुमार , आणि बोकडाच्या चर्मानें प्रावृत्त वैश्यकुमार , यांना आणून होम करावा . " आतां जरी ऐणेयेन वाऽजिनेन ब्राह्मणं ’ ह्या वरील आश्वलायन सूत्रांतील ‘ ऐणेय ’ शब्दानें मृगीचेंच चर्म सांगितलें आहे . कारण , " एण्याढञ् ‍ " ह्या पाणिनिसूत्रावरुन एणी म्ह० मृगी तिचें चर्म विवक्षित असतां ‘ ऐणेय ’ असा शब्द सिद्ध होत आहे . आणि " एणीचें ( मृगीचें ) चर्मादिक तें ऐणेय होय . आणि एणाचें ( मृगाचें ) चर्मादिक तें ऐण होय . " असा अमरकोशही आहे . तथापि " कृष्णसार , रुरु मृग आणि बोकड यांचीं चर्मै तीं अजिनें वर्णानुक्रमानें घ्यावी . " ह्या शंख वचनावरुन ; " अथवा सर्वांनीं रुरुमृगाचें चर्म धारण करावें " ह्या यमवचनावरुनही मृगचर्मासह त्या मृगीच्या चर्माचा विकल्प जाणावा . वस्त्र आणि अजिन यांचा तर विकल्प आहेच . कारण , " अथवा रंगविलेलें कार्पासवस्त्र धारण करावें . " असें गौतमाचें वचन आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP