आतां आंगिरसगण सांगतो -
अथांगिरसः ते गौतमाः भरद्वाजाः केवलांगिरसश्चेतित्रिधा अत्रगौतमादश आयास्याः शारद्वताः कौमंडाः दीर्घतमसः औशनसाः कारेणुपालेयाः राहूगणाः सोमराजकाः वामदेवाः बृहदुक्थाश्चेति तत्रायास्यानां आंगिरसायास्यगौतमेति शारद्वतानां आंगिरसगौतमशारद्वतेति कौमंडानां आंगिरसौतथ्यकाक्षीवतगौतमकौमंडेतिवा आंगिरसायास्यौशिजगौतमकाक्षीवतेतिवा आंगिरसौतथ्यगौतमौशिजकाक्षीवतेतिवा आंगिरसौशिजकाक्षीवतेतित्रयोवा दीर्घतमसां आंगिरसौतथ्यकाक्षीवतगौतमदैर्घतमसेति आंगिरसौतथ्यदैर्घतमसेतित्रयोवा औशनसानां आंगिरसगौतमौशनसेतित्रयः कारेणुपालेयानां आंगिरसगौतमकारेणुपालेतित्रयः राहूगणानां आंगिरसराहूगणगौतमेति सोमराजकानां आंगिरससोमराजकगौतमेति वामदेवानां आंगिरसवामदेव्यगौतमेति बृहदुक्थानां आंगिरसबार्हदुक्थगौतमेति आंगिरसवामदेवबार्हदुक्थेतिवा उतथ्यानामांगिरसौतथ्यगौतमेति औशिजानामांगिरसौशिजकाक्षीवतेत्यापस्तंबः आंगिरसायास्यौशिजगौतमकाक्षीवतेतिकात्यायनः एतौद्वौक्कचित् रघुवानां आंगिरसराघुवगौतमेतिकेचित् तत्रमूलंचिंत्यम् एषांसर्वेषांगौतमानामविवाहः ।
ते आंगिरस गण तीन प्रकारचे - गौतम , भरद्वाज , आणि केवलांगिरस .
गौतम १० ते येणेंप्रमाणें -
आयास्य - श्रोणिवेध , मूढरथ , इत्यादि अठरांहून अधिक आयास्य होत . त्यांचे - ‘ आंगिरसायास्यगौतमेति ’ तीन .
शारद्वत - अभिजित , रौहिण्य इत्यादि सत्तरांहून अधिक शारद्वत होत . त्यांचे ‘ आंगिरसगौतमशारद्वतेति तीन .
कौमंड - मामंथरेषण , मासुराक्ष , इत्यादि दहांहून अधिक कौमंड होत . त्यांचे ‘ आंगिरसौतथ्यकाक्षीवतगौतमकौमंडेति ’ पांच , किंवा ‘ आंगिरसायास्यौशिजगौतमकाक्षीवतेति ’ पांच , किंवा आंगिरसौतथ्यगौतमौशिजकाक्षीवतेति ’ पांच अथवा ‘ आंगिरसौशिजकाक्षीवतेति ’ तीन .
दीर्घतमस् - यांचे ‘ आंगिरसौतथ्यकाक्षीवतगौतमदैर्घतमसेति ’ पांच . अथवा ‘ आंगिरसौतथ्यदैर्घतमसेति तीन .
औशनस् - दिश्य , इत्यादि नवांहून अधिक औशनस् होत . त्यांचे ‘ आंगिरसगौतमौशनसेति ’ तीन .
करेणुपालि - वास्तव्य , श्वेतीय इत्यादि सातांहून अधिक करेणुपालि होत . त्यांचे - आंगिरसगौतमकारेणुपालेति ’ तीन .
राहूगण - यांचे ‘ आंगिरसराहूगणगौतमेति ’ तीन .
सोमराजक - यांचे ‘ आंगिरससोमराजकगौतमेति ’ तीन .
वामदेव - यांचे ‘ आंगिरसवामदेव्यगौतमेति ’ तीन .
बृहदुक्थ - यांचे ‘ आंगिरसबार्हदुक्थगौतमेति ’ तीन . अथवा ‘ आंगिरसवामदेव्यबार्हदुक्थेति ’ तीन .
क्कचित् दोन गण अधिक आहेत ते असे -
उतथ्य - यांचे ‘ आंगिरसौतथ्यगौतमेति ’ तीन .
औशिज - यांचे ‘ आंगिरसौशिजकाक्षीवतेति ’ तीन , असें आपस्तंब सांगतो . ‘ आंगिरसायास्यौशिजगौतमकाक्षीवतेति ’ पांच , असें कात्यायन सांगतो .
राघुव - यांचे ‘ आंगिरसराघुवगौतमेति ’ तीन , असें केचित् सांगतात . याविषयीं मूल ( प्रमाण ) चिंत्य आहे . या सर्व गौतमांचा परस्पर विवाह होत नाहीं .
अथभरद्वाजाः तेचत्वारः भरद्वाजाः गर्गाः ऋक्षाः कपय इति भरद्वाजानामांगिरसबार्हस्पत्यभारद्वाजेतित्रयः गर्गाणांमांगिरसबार्हस्पत्यभारद्वाजसैन्यगार्ग्येतिपंच आंगिरससैन्यगार्ग्येतित्रयोवा अंत्ययोर्व्यत्ययोवा भारद्वाजगार्ग्यसैन्येतिवा गर्गभेदानां आंगिरसतैत्तिरिकापिभुवेति ऋक्षाणांकपिलानांचांगिरसबार्हस्पत्यभारद्वाजवांदनमातवचसेतिपंच आंगिरसवांदनमातवचसेतित्रयोवा कपीनामांगिरसामहीयवौरुक्षयसेति आत्मभुवाम् आंगिरसभारद्वाजबार्हस्पत्यमंत्रवरात्मभुवेतिपंच अयंक्कचित् भरद्वाजानांसर्वेषामविवाहः ।
आतां भरद्वाज गण ४ ते येणेंप्रमाणें -
भरद्वाज - क्षाम्यायण , देवाश्व इत्यादि १६० हून अधिक भरद्वाज आहेत . त्यांचे - ‘ आंगिरसबार्हस्पत्यभारद्वाजेति ’ तीन प्रवर .
गर्ग - सांभरायण , सखीनय इत्यादि ५० हून अधिक गर्ग . त्यांचे - ‘ आंगिरसबार्हस्पत्यभारद्वाजसैन्यगार्ग्येति पांच अथवा ‘ आंगिरससैन्यगार्ग्येति ’ तीन . किंवा ‘ आंगिरसगार्ग्यसैन्येति ’ तीन . अथवा ‘ भारद्वाजगार्ग्यसैन्येति ’ तीन . गर्गभेदांचे - ‘ आंगिरसतैत्तिरिकापिभुवेति ’ तीन .
ऋक्ष - रौक्षायण , कपिल इत्यादि ९ हून अधिक ऋक्ष . त्यांचे - ‘ आंगिरसबार्हस्पत्यभारद्वाजवांदनमातवचसेति ’ पांच . अथवा ‘ आंगिरसवांदनमातवचसेति ’ तीन .
कपि - स्वस्तितरि , दंडिन् इत्यादि २५ हून अधिक कपि . त्यांचे - ‘ आंगिरसामहीयवौरुक्षयसेति ’ तीन .
आत्मभुव् - यांचे - ‘ आंगिरसभारद्वाजबार्हस्पत्यमंत्रवरात्मभुवेति ’ पांच . हा गण क्कचित् आहे . ह्या सर्व भरद्वाजांचा परस्पर विवाह होत नाहीं .
अथकेवलांगिरसः तेच षट् हारिताः कुत्साः कण्वाः रथीतराः मुद्गलाः विष्णुवृद्धाश्चेति हारितान आंगिरसांबरीषयौवनाश्वेति आद्योमांधातावा कुत्सानां आंगिरसमांधातृकौत्सेति कण्वानामांगिरसाजमीढकाण्वेति आंगिरसघोरकाण्वेतिवा रथीतराणामांगिरसवैरुपराथीतरेति आंगिरसवैरुपपार्षदश्वेतिवा अष्टादंष्ट्रपार्षदश्ववैरुपेतिवा अंत्ययोर्व्यत्ययोवा मुद्गलानामांगिरसभार्म्याश्वमौद्गल्येति आद्यस्तार्क्ष्योवा आंगिरसतार्क्ष्यमौद्गल्येतिवा विष्णुवृद्धानामांगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति एषांस्वगणंविहायसर्वैर्विवाहोभवति हारितकुत्सयोस्तुनभवति ।
आतां केवल आंगिरस गण ६ ते येणेंप्रमाणें -
हारित - सौभग , नैयगव इत्यादि ३२ हून अधिक हारित . त्यांचे - ‘ आंगिरसांबरीषयौवनाश्वेति ’ तीन . किंवा या तीन प्रवरांमध्यें पहिल्या स्थानीं ‘ मांधाता ’ आहे .
कुत्स - यांचे ‘ आंगिरस मांधातृ कौत्सेति ’ तीन .
कण्व - औपमर्कट , बाष्कलायन इत्यादि २१ हून अधिक कण्व . त्यांचे - ‘ आंगिरसाजमीढकाण्वेति ’ तीन . अथवा आंगिरसघोरकाण्वेति ’ तीन .
रथीतर - हस्तिद , नैतिरक्षि इत्यादि १४ हून अधिक रथीतर . त्यांचे - ‘ आंगिरसवैरुपराथीतरेति ’ , अथवा ‘ आंगिरसवैरुपपार्षदश्वेति ’ किंवा ‘ अष्टादंष्ट्रवैरुपपार्षदश्वेति ’ , किंवा शेवटच्या दोघांचा विपर्यास आहे .
मुद्गल - सात्यमुग्रिय इत्यादि १८ हून अधिक मुद्गल . त्यांचे - ‘ आंगिरसभार्म्याश्वमौद्गल्येति ’ तीन . किंवा पहिला ‘ तार्क्ष्य . ’ अथवा ‘ आंगिरसतार्क्ष्यमौद्गल्येति ’ तीन .
विष्णुवृद्ध - शठ , भरण , इत्यादि २५ हून अधिक विष्णुवृद्ध . त्यांचे - ‘ आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति ’ तीन .
ह्या केवलांगिरसांचा आप आपला गण वेगळून सर्वांशीं विवाह होतो . हारित आणि कुत्स यांचा मात्र परस्पर होत नाहीं .
अथात्रयः तेचत्वारः अत्रयः वाद्भुतकाः गविष्ठिराः मुद्गलाइति आद्यानामात्रेयार्चनानसश्यावाश्वेति वाद्भुतकानां आत्रेयार्चनानसवाद्भुतकेति धनंजयानां आत्रेयार्चनानसधानंजयेतिक्कचित् गविष्ठिराणामात्रेयार्चनानसगाविष्ठिरेति आत्रेयगाविष्ठिरपौर्वातिथेतिवा मुद्गलानामात्रेयार्चनानसपौर्वातिथेति वामरथ्यसुमंगलबैजवापानामात्रेयार्चनानसातिथेति आत्रेयार्चनानसगाविष्ठिरेतिवा सुमंगलानांअत्रिसुमंगलश्यावाश्वेति केचित् अत्रेः पुत्रिकापुत्राणाम् आत्रेयवामरथ्यपौत्रिकेति अत्रीणांसर्वेषामविवाहः ।
आतां अत्रि गण ४ ते येणेंप्रमाणें -
अत्रि - भूरि इत्यादि ९४ हून अधिक अत्रि . त्यांचे - ‘ आत्रेयार्चनानसश्यावाश्वेति ’ तीन प्रवर .
वाद्भुतक - यांचे - ‘ आत्रेयार्चनानसवाद्भुतकेति ’ तीन .
धनंजय - यांचे ‘ आत्रेयार्चनानसधानंजयेति ’ तीन . हा गण क्कचित् आहे .
गविष्ठिर - दक्षि , भलंदन इत्यादि २४ हून अधिक गविष्ठिर . त्यांचे - ‘ आत्रेयार्चनानसगाविष्ठिरेति ’ तीन . किंवा ‘ आत्रेयगाविष्ठिरपौर्वातिथेति ’ तीन .
मुद्गल - शालिसंधि , अर्णव इत्यादि १० हून अधिक मुद्गल . त्यांचे - ‘ आत्रेयार्चनानसपौर्वातिथेति ’ तीन .
वामरथ्य , सुमंगल , बैजवाप - यांचे ‘ आत्रेयार्चनानसातिथेति ’ तीन . किंवा आत्रेयार्चनानसगाविष्ठिरेति ’ तीन .
सुमंगल - यांचे - ‘ अत्रिसुमंगलश्यावाश्वेति ’ तीन . हे चार गण केचित् सांगतात .
वालेय - कौंद्रेय , शौभ्रेय , वामरथ्य इत्यादि अत्रीचे पुत्रिकापुत्र . त्यांचे - ‘ आत्रेयवामरथ्यपौत्रिकेति ’ तीन प्रवर .
सार्या अत्रींचा परस्पर विवाह होत नाहीं . कारण , सगोत्र आहे आणि सप्रवर आहे . अत्रीच्या पुत्रिकापुत्रांचा वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्याशींही विवाह होत नाहीं .
अथविश्वामित्राः तेदश कुशिकाः लोहिताः रौक्षकाः कामकायनाः अजाः कताः धनंजयाः अघमर्षणाः पूरणाः इंद्रकौशिका इति कुशिकानांवैश्वामित्रदेवरातौदलेति लोहितानांवैश्वामित्राष्टकलौहितेति अंत्ययोर्व्यत्ययोवा वैश्वामित्रमाधुच्छंदसाष्टकेतिवा वैश्वामित्राष्टकेतिद्वौवा रौक्षकाणांवैश्वामित्रगाथिनरैवणेति वैश्वामित्ररौक्षकरैवणेतिवा कामकायनानांवैश्वामित्रदेवश्रवसदैवतरसेति अजानांवैश्वामित्रमाधुच्छंदसाजेति वैश्वामित्राश्मरथवाधूलेतिवा धनंजयानांवैश्वामित्रमाधुच्छंदसधानंजयेति वैश्वामित्रमाधुच्छंदसाघमर्षणेतिवा कतानांवैश्वामित्रकात्यात्कीलेति अघमर्षणानांवैश्वामित्राघमर्षणकौशिकेति पूरणानांवैश्वामित्रपौरणेतिद्वौ वैश्वामित्रदेवरातपौरणेतिवा इंद्रकौशिकानांवैश्वामित्रेंद्रकौशिकेतिद्वौ एतेबौधायनोक्ताः ॥ रौहिणानांवैश्वामित्रमाधुच्छंदसरौहिणेति रेणूनांवैश्वामित्रगाथिनरैणवेति वेणूनांवैश्वामित्रगाथिनवैणवेति जह्नूनांवैश्वामित्रशालंकायनकौशिकेति आश्मरथ्यानां वैश्वामित्राश्मरथ्यवाधूलेति उदवेणूनांवैश्वामित्रगाथिनवैणवेति एते आश्वलायनमात्स्योक्ताः अन्यैस्त्वन्येपिषट् गणाउक्ताः तेऽन्यत्रमत्कृतौज्ञेयाः एषांविश्वामित्राणामविवाहः ॥
आतां विश्वामित्र गण १० ते येणेंप्रमाणें -
कुशिक - पर्णजंघ , नारक्य इत्यादि ७० हून अधिक कुशिक . त्यांचे - ‘ वैश्वामित्रदेवरातौदलेति ’ तीन प्रवर .
लोहित - कुडक्य , चाक्रवर्णायन इत्यादि ५ हून अधिक लोहित . त्यांचे - ‘ वैश्वामित्राष्टकलौहितेति ’ तीन . किंवा शेवटच्या दोहोंचा विपर्यास आहे . अथवा ‘ वैश्वामित्रमाधुच्छंदसाष्टकेति ’ तीन . किंवा ‘ वैश्वामित्राष्टकेति ’ दोन प्रवर .
रौक्षक - यांचे - ‘ वैश्वामित्रगाथिनरैवणेति तीन . अथवा ‘ वैश्वामित्ररौक्षकरैवणेति ’ तीन .
कामकायन - देवश्रवस् , देवतरस इत्यादि ५ हून अधिक कामकायन . त्यांचे - ‘ वैश्वामित्रदेवश्रवसदैवतरसेति ’ तीन .
अज - यांचे - ‘ वैश्वामित्रमाधुच्छंदसाजेति ’ तीन . किंवा ‘ वैश्वामित्राश्मरथवाधूलेति ’ तीन .
कत - औदुंबरि , शैशिरि , इत्यादि २० हून अधिक कत . त्यांचे - ‘ वैश्वामित्रकात्यात्कीलेति ’ तीन .
धनंजय - पार्थिव , बंधुल , इत्यादि ७ हून अधिक धनंजय . त्यांचे - वैश्वामित्रमाधुच्छंदसधानंजयेति ’ तीन . किंवा वैश्वामित्रमाधुच्छंदसाघमर्षणेति ’ तीन .
अघमर्षण - यांचे - ‘ वैश्वामित्राघमर्षणकौशिकेति ’ तीन .
पूरण - यांचे - ‘ वैश्वामित्रपौरणेति ’ दोन . किंवा ‘ वैश्वामित्रदेवरातपौरणेति ’ तीन .
इंद्रकौशिक - यांचे - ‘ वैश्वामित्रेंद्रकौशिकेति ’ दोन .
हे वरील १० गण बौधायनानें सांगितले आहेत .
रौहिण - यांचे - ‘ वैश्वामित्रमाधुच्छंदसरौहिणेति ’ तीन प्रवर .
रेणु - यांचे - ‘ वैश्वामित्रगाथिनरैणवेति ’ तीन .
वेणु - यांचे - ‘ वैश्वामित्रगाथिनवैणवेति ’ तीन .
जन्हु - यांचे - ‘ वैश्वामित्रशालंकायनकौशिकेति ’ तीन .
आश्मरथ्य - यांचे - ‘ वैश्वामित्राश्मरथ्यवाधूलेति ’ तीन .
उदवेणु - यांचे - ‘ वैश्वामित्रगाथिनवैणवेति ’ तीन .
हे वरील ६ गण आश्वलायनांनीं व मात्स्यांत सांगितलेले आहेत . इतर ग्रंथकारांनीं दुसरेही ६ गण सांगितले आहेत . ते कमलाकरभट्टानें केलेल्या प्रवरदर्पणांत आहेत ते वर संस्कृत टीपेंत दिले आहेत .
ह्या सर्व विश्वामित्रगणांचा परस्पर विवाह होत नाहीं . कारण , हे सगोत्र आणि सप्रवर आहेत .
अथकश्यपाः तेपंच निध्रुवाः कश्यपाः रेभाः शंडिलाः लौगाक्षयश्च निध्रुवाणांकाश्यपावत्सारनैध्रुवेति कश्यपानांकाश्यपावत्सारासितेति रेभाणांकाश्यपावत्साररैभ्येति शंडिलानांकाश्यपावत्सारशांडिल्येति अंत्यस्थानेदेवलोवासितोवा शांडिलासितदेवलेतिवा काश्यपासितदेवलेतिवा अंत्ययोर्व्यत्ययोवा देवलासितेतिद्वौवा लौगाक्षीन् वक्ष्यामः एषांकश्यपानामविवाहः ॥
आतां कश्यप ५ ते येणेंप्रमाणें -
निध्रुव - हे १४० हून अधिक आहेत . त्यांचे - ‘ काश्यपावत्सारनैध्रुवेति ’ तीन .
कश्यप - यांचे - ‘ काश्यपावत्सारासितेति ’ तीन प्रवर .
रेभ - याचे - ‘ काश्यपावत्साररैभ्येति ’ तीन .
शांडिल - कोहल , उदमेध इत्यादि ६० हून अधिक शांडिल . त्यांचे ‘ काश्यपावत्सारशांडिल्येति ’ तीन . अथवा शेवटच्या स्थानीं देवल किंवा असित . किंवा ‘ शांडिलासितदेवलेति ’ , अथवा ‘ काश्यपासितदेवलेति ’ अथवा शेवटच्या दोहोंचा विपर्यास , अथवा ‘ देवलासितेति ’ दोन प्रवर .
लौगाक्षि - हे द्विगोत्रांत पुढें सांगूं .
ह्या सर्व कश्यपांचा परस्पर विवाह होत नाहीं . कारण , हे सगोत्र व सप्रवर आहेत .
अथवसिष्ठाः तेपंच वसिष्ठाः कुंडिनाः उपमन्यवः पराशराः जातूकर्ण्याश्चेति वसिष्ठानां वासिष्ठेंद्रप्रमदाभरद्वस्विति वासिष्ठेत्येकोवा कुंडिनानां वासिष्ठमैत्रावरुणकौंडिन्येति उपमन्यूनां वासिष्ठेंद्रप्रमदाभरद्वस्विति वासिष्ठाभरद्वस्विंद्रप्रमदेतिवा आद्ययोर्व्यत्ययोवा पराशराणांवासिष्ठशाक्त्यपाराशर्येति जातूकर्ण्यानां वासिष्ठात्रिजातूकर्ण्येति वसिष्ठानांसर्वेषामविवाहः अंत्यस्यात्रिभिश्च ॥
आतां वसिष्ठ ५ ते येणेंप्रमाणें -
वसिष्ठ - वैतालकवि , रकि इत्यादि ६० हून अधिक वसिष्ठ . त्यांचे - ‘ वासिष्ठेंद्रप्रमदाभरद्वस्विति ’ तीन . अथवा ‘ वासिष्ठेति ’ एक प्रवर .
कुंडिन - लोहितायन , गुग्गुलि इत्यादि २५ हून अधिक कुंडिन . त्यांचे - ‘ वासिष्ठमैत्रावरुणकौंडिन्येति ’ तीन प्रवर .
उपमन्यु - औदलि , इत्यादि ७० हून अधिक उपमन्यु . त्यांचे - ‘ वासिष्ठेंद्रप्रमदाभरद्वस्विति ’ तीन . किंवा ‘ वासिष्ठाभरद्वस्विंद्रप्रमदेति ’ अथवा पहिल्या दोघांचा विपर्यास .
पराशर - कांडशय , वाजि इत्यादि ४७ हून अधिक पराशर . त्यांचे - ‘ वासिष्ठशाक्त्यपाराशर्येति ’ तीन .
जातूकर्ण्य - यांचे - ‘ वासिष्ठात्रिजातूकर्ण्येति ’ तीन .
ह्या सर्व वसिष्ठांचा परस्पर विवाह होत नाहीं . आणि जातूकर्ण्यांचा अत्रींशींही विवाह होत नाहीं .
अथागस्त्याः तेचत्वारः इध्मवाहाः सांभवाहाः सोमवाहाः यज्ञवाहाश्चेति आद्यानां आगस्त्यदार्ढ्यच्युतैथ्मवाहेति आगस्त्येत्येकोवा सोमवाहानां आगस्त्यदार्ढ्यच्युतसोमवाहेति सांभवाहानांसांभवाहोऽन्त्यः यज्ञवाहानांयज्ञवाहोऽन्त्यः आद्यौपूर्वोक्तावेव सारवाहानांतदंतास्त्रयः दर्भवाहानांतदंतास्त्रयः अगस्तीनामागस्त्यमाहेंद्रमायोभुवेति पूर्णमासानां आगस्त्यपौर्णमासपारणेति हिमोदकानां आगस्त्यहैमवर्चिहैमोदकेति पाणिकानामागस्त्यपैनायकपाणिकेति एतेषट्क्कचित् अगस्तीनांसर्वेषामविवाहः ॥
आतां अगस्त्य ४ ते येणेंप्रमाणें -
इध्मवाह - विशालाद्य , स्फालायन इत्यादि ५० हून अधिक इध्मवाह . त्यांचे - ‘ आगस्त्यदार्ढ्यच्युतैध्मवाहेति ’ तीन , अथवा ‘ आगस्त्येति ’ एक .
सांभवाह - यांचे - ‘ आगस्त्यदार्ढ्यच्युतसांभवाहेति ’ तीन .
सोमवाह - यांचे - ‘ आगस्त्यदार्ढ्यच्युतसोमवाहेति ’ तीन .
यज्ञवाह - यांचे - ‘ आगस्त्यदार्ढ्यच्युतयज्ञवाहेति ’ तीन .
सारवाह - यांचे - ‘ आगस्त्यदार्ढ्यच्युतसारवाहेति ’ तीन .
दर्भवाह - यांचे - ‘ आगस्त्यदार्ढ्यच्युतदर्भवाहेति ’ तीन .
अगस्ति - यांचे - ‘ आगस्त्यमाहेंद्रमायोभुवेति ’ तीन .
पूर्णमास - यांचे - ‘ आगस्त्यपौर्णमासपारणेति ’ तीन .
हिमोदक - यांचे - ‘ आगस्त्यहैमवर्चिहैमोदकेति ’ तीन .
पाणिक - यांचे - ‘ आगस्त्यपैनायकपाणिकेति ’ तीन .
सारवाहांपासून पुढचे ६ गण क्कचित् आहेत .
ह्या सर्व अगस्त्यांचा परस्पर विवाह होत नाहीं . कारण , हे सगोत्र आणि सप्रवर आहेत .