मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
मूर्तिप्रतिष्ठेविषयीं अधिकारी

तृतीयपरिच्छेद - मूर्तिप्रतिष्ठेविषयीं अधिकारी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


मूर्तिप्रतिष्ठेविषयीं अधिकारी सांगतो .

अत्राधिकारिणउक्ताः कृत्यकल्पतरौदेवीपुराणे वर्णाश्रमविभेदेनदेवाः स्थाप्यास्तुनान्यथा ब्रह्मातुब्राह्मणैः स्थाप्योगायत्रीसहितः प्रभुः चतुर्वर्णैस्तथाविष्णुः प्रतिष्ठाप्यः सुखार्थिभिः भैरवोपिचतुर्वर्णैरंत्यजानांतथामतः मातरः सर्वलोकैस्तुस्थाप्याः पूज्याः सुरोत्तमाः लिंगंगृहीयतिर्वापिसंस्थाप्यतुयजेत्सदा शिवसर्वस्वेभविष्ये यस्तुपूजयतेलिंगंदेवादिंमांजगत्पतिम् ‍ ब्राह्मणः क्षत्रियोवैश्यः शूद्रोवामत्परायणः तस्यप्रीतः प्रदास्यामिशुभाँल्लोकाननुत्तमान् ‍ तिथितत्त्वेस्कांदे शूद्रः कर्माणियोनित्यंस्वीयानिकुरुतेप्रिये तस्याहमर्चांगृह्णामिचंद्रखंडविभूषिते ब्रह्मचारीगृहस्थोवावानप्रस्थश्चसुव्रते एवंदिनेदिनेदेवंपूजयेदंबिकापतिम् ‍ संन्यासीदेवदेवेशंप्रणवेनैवपूजयेत् ‍ नमोंतेनशिवेनैवस्त्रीणांपूजाविधीयते एतच्चपुराणप्रसिद्धजीर्णलिंगपूजाविषयम् ‍ यानितु त्रिस्थलीसेतौनारदीये यः शूद्रेणार्चितंलिंगंविष्णुंवाप्रणमेन्नरः नतस्यनिष्कृतिर्दृष्टाप्रायश्चित्तायुतैरपि नमेद्यः शूद्रसंस्पृष्टंलिंगंवाहरिमेववा ससर्वयातनाभोगीयावदाचंद्रतारकम् ‍ पाखंडपूजितंलिगंनत्वा पाखंडतांव्रजेत् ‍ आभीरपूजितंलिगंनत्वानरकमश्नुते योषिद्भिः पूजितंलिगंविष्णुंवापिनमेत्तुयः सकोटिकुलसंयुक्तमाकल्पंरौरवंवसेदित्यादीनितानिनूतनस्थापितलिंगादिविषयाणि यदाप्रतिष्ठितंलिंगंमंत्रविद्भिर्यथाविधितदाप्रभृतिशूद्रश्चयोषिद्वापिनसंस्पृशेदितितत्रैवोक्तेः ।

कृत्यकल्पतरुंत देवीपुराणांत - " ज्या वर्णास व आश्रमास ज्या देवाची प्रतिष्ठा सांगितली असेल त्या वर्णानें त्या आश्रमांत त्या देवाची प्रतिष्ठा करावी . इतरानें करुं नये . गायत्रीसहित ब्रह्मदेवाची स्थापना ब्राह्मणांनीं करावी . विष्णूची स्थापना सुखेच्छु अशा चारही वर्णांनीं करावी . आणि भैरवाची स्थापना चार वर्णांनीं व अंत्यजांनीं करावी . मातांची स्थापना सर्व लोकांनीं करावी आणि पूजा करावी . लिंगाची स्थापना गृहस्थाश्रम्यानें किंवा संन्याशानें करुन त्याचें सतत पूजन करावें . " शिवसर्वस्वांत भविष्यांत - भगवान् ‍ शंकर म्हणतात - " सकल देवांचा आदिभूत व जगताचा पति अशा माझी पूजा लिंगाचे ठायीं जो करितो ; मग तो ब्राह्मण असो , क्षत्रिय असो , वैश्य असो किंवा मत्परायण शूद्र असो , त्याला मी संतुष्ट होऊन उत्तमोत्तम असे शुभ लोक देतों . " तिथितत्त्वांत स्कांदांत - भगवान् ‍ शंकर म्हणतात - " हे प्रिये , जो शूद्र आपणास सांगितलेलीं कर्मै नित्य करितो त्यानें केलेली पूजा मी घेतों . चांगलें व्रत धारण करणारा ब्रह्मचारी , किंवा गृहस्थाश्रमी अथवा वानप्रस्थ यानें प्रतिदिवशीं भवानीपति शंकराची पूजा करावी . संन्याशानें शंकराची पूजा प्रणवानेंच करावी . स्त्रियांना शंकराची पूजा ‘ शिवायनमः ’ याच मंत्रानें सांगितली आहे . " स्त्रिया , शूद्र इत्यादिकांस जो पूजेचा प्रकार सांगितला तो पुराणप्रसिद्ध जें पुरातन लिंग त्याच्या पूजेविषयीं समजावा . आतां जीं त्रिस्थलीसेतूंत नारदीयांत - " शूद्रानें पूजित लिंगास किंवा विष्णूस जो मनुष्य नमस्कार करील त्याची निष्कृति ( पापनिरास ) दहा हजार प्रायश्चित्तांनीं देखील कोठें पाहिली नाहीं . जो मनुष्य शूद्रानें स्पर्श केलेल्या लिंगास किंवा विष्णूस नमस्कार करील तो मनुष्य चंद्र व तारका आहेत तोंपर्यंत सर्व यातना भोगणारा होईल . पाखंडानें पूजित लिंगास नमस्कार केल्यानें पाखंडी होईल . गवळ्यानें पूजित लिंगास नमस्कार केल्यानें नरकप्राप्ति होते . स्त्रियांनीं पूजित लिंगास किंवा विष्णूस जो नमस्कार करील तो कोटि कुलांनीं सहित कल्पपर्यंत रौरव नरकांत वास करील . " इत्यादिक वचनें तीं नवीन स्थापित लिंग , प्रतिमा इत्यादिविषयक समजावीं . कारण , " ज्या वेळी मंत्रवेत्त्या ब्राह्मणांनीं यथाविधि लिंगाची प्रतिष्ठा केली असेल त्या वेळेपासून पुढें शूद्र किंवा स्त्रिया यांनीं त्याला स्पर्श करुं नये " असें तेथेंच सांगितलें आहे .

प्रतिष्ठायांतुशूद्रादीनांनाधिकारः स्त्रीणामनुपनीतानांशूद्राणांचजनेश्वर स्थापनेनाधिकारोस्तिविष्णोर्वाशंकरस्यवा यः शूद्रसंस्कृतंलिंगंविष्णुंवापिनमेन्नरः इहैवानंतदुः खानिपश्यत्यामुष्मिकेकिमु शूद्रोवानुपनीतोवास्त्रियोवापतितोपिवा केशवंवाशिवंवापिस्पृष्ट्वानरकमश्नुतेइति बृहन्नारदीयस्कांदोक्तेरितित्रिस्थलीसेतौपितामहचरणाः चतुर्वर्णैरितिपूर्वोक्तवचनाद्विष्ण्वादिप्रतिष्ठायांशूद्रस्यविकल्प इतियुक्तंपश्यामः तत्रैवगौतमः शिवार्चनंसदाप्येवंशुचिः कुर्यादुदड्मुखः वाचस्पतिधृतम् ‍ प्राक् ‍ पश्चिमोदगास्यस्तुप्रातः सायंनिशासुचेति प्रयोगपारिजातेगृह्यपरिशिष्टे प्रतिमाः प्राड्मुखीरुदड्मुखोयजेताऽन्यत्रप्राड्मुखः एतच्चस्थिरप्रतिमाविषयं अन्यत्र चलार्चासु ।

प्रतिष्ठेविषयीं तर शूद्रादिकांना अधिकार नाहीं . कारण , " स्त्रिया , उपनयन न झालेले , आणि शूद्र यांना विष्णूच्या किंवा शंकराच्या स्थापनाविषयीं अधिकार नाहीं . जो मनुष्य शूद्रानें स्थापित लिंगास किंवा विष्णूस नमस्कार करील तो येथेंच अत्यंत दुःखें अनुभवितो ; मग परलोकीं गेल्यावर अनुभवील हें काय सांगावयाचें आहे ? शूद्र किंवा अनुपनीत अथवा स्त्री किंवा पतित यांनीं विष्णूला किंवा शंकराला स्पर्शल्यानें त्यांस नरकप्राप्ति होते " असें बृहन्नारदीयांत स्कांदवचन आहे , असें त्रिस्थलीसेतूंत आमच्या पितामहांनीं ( नारायणभट्टांनीं ) सांगितलें आहे . ‘ चतुर्वर्णैस्तथा विष्णुः प्रतिष्ठाप्यः ’ ह्या वर सांगितलेल्या देवीपुराणवचनावरुन विष्णु इत्यादिकांचे प्रतिष्ठेविषयीं शूद्राला विकल्प योग्य आहे , असें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) समजतों . तेथेंच गौतम " याप्रमाणें शुचिर्भूत होऊन उत्तरेकडे मुख करुन सर्वदा शिवपूजा करावी . " वाचस्पतीनें धरलेलें वचन - " प्रातः कालीं प्राड्मुख होऊन पूजा करावी . सायंकालीं पश्चिमाभिमुख होऊन पूजा करावी . रात्रीं उत्तराभिमुख होऊन पूजा करावी . " प्रयोगपारिजातांत गृह्यपरिशिष्टांत - " प्राड्मुखप्रतिमांची पूजा उदड्मुख बसून करावी . चलप्रतिमांची पूजा प्राड्मुख होऊन करावी . " या वचनांत उदड्मुख बसून जी पूजा सांगितली ती स्थिर प्रतिमांची समजावी .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP