आतां निष्क्रमण सांगतो.
अथनिष्क्रमणं ज्योतिर्निबंधेयमः तृतीयेवाचतुर्थेवामासिनिष्क्रमणंभवेत् यमः ततस्तृतीये कर्तव्यंमासिसूर्यस्यदर्शनं चतुर्थेमासिकर्तव्यंशिशोश्चंद्रस्यदर्शनं अत्र सूर्येद्वोः कर्मणीयेचतयोः श्राद्धंनविद्यतइति छंदोगपरिशिष्टात छंदोगानांनिष्क्रमणेवृद्धिश्राद्धंनास्तीतिकल्पतरुः व्यासः मैत्रेपुष्यपुनर्वसुप्रथमभेपौष्णेनुकूलेविधौहस्तेचैवसुरेश्वरेचमृगभेतारासुशस्तासुच कुर्यान्निष्क्रमणंशिशोर्बुधगुरौशुक्रेविरिक्तेतिथौकन्याकुंभतुलामृगारिभवनेसौम्यग्रहालोकिते मदनरत्ने अन्नप्राशनकालेवाकुर्यान्निष्क्रमणक्रियां विष्णुधर्मे दिगीशानांदिनेतत्रतथाचंद्रार्कयोर्द्विजः पूजनंवासुदेवस्यगगनस्यचकारयेत बहिर्निष्कासयेद्गेहाच्छंखपुण्याहनिस्वनैः चंद्रार्कयोर्दिगीशानांदिशांचगगनस्यच निक्षेपार्थमिमंदद्मितेमेरक्षंतुसर्वदा अप्रमत्तंप्रमत्तंवादिवारात्रमथापिवा रक्षंतुसततंसर्वेदेवाः शक्रपुरोगमाः माधवीयेमार्कंडेयः अग्रतोथप्रविन्यस्यशिल्पभांडानिसर्वशः शस्त्राणिचैववस्त्राणिततः पश्येत्तुलक्षणं प्रथमंयत्स्पृशेद्वालस्ततोभांडंस्वयंतदा जीविकातस्यबालस्यतेनैवतुभविष्यतीति ।
ज्योतिर्निबंधांत - यम - “ तिसर्या किंवा चवथ्या मासांत निष्क्रमण करावें. ” यम - “ तिसर्या मासांत सूर्याचें दर्शन बालकास करवावें. चवथ्या मासांत बालकास चंद्राचें दर्शन करवावें. ” ह्या ठिकाणीं “ सूर्य व चंद्र ह्यांचीं दर्शनरुप जीं कर्मैं त्यांचे ठायीं श्राद्ध करुं नये ” ह्या छंदोगपरिशिष्टवचनावरुन छंदोगांना निष्क्रमणसंस्कारीं वृद्धिश्राद्ध नाहीं, असें कल्पतरु सांगतो. व्यास - “ अनुराधा, पुष्य, पुनर्वसु, अश्विनी, रेवती, हस्त, ज्येष्ठा, मृग, ह्या नक्षत्रांवर; शोभन तारा असतां; बुध, गुरु, शुक्र, ह्या वारीं; रिक्ताविरहित तिथीचे ठायीं; कन्या, कुंभ, तुला, सिंह ह्या लग्नीं शुभ ग्रहांची दृष्टि लग्नावर असतां बालकाचा निष्क्रमणसंस्कार करावा. ” मदनरत्नांत - “ अथवा अन्नप्राशनकालीं निष्क्रमण संस्कार करावा. ” विष्णुधर्मांत - “ निष्क्रमणदिवशीं ब्राह्मणानें दिक्पति, चंद्र, सूर्य, वासुदेव, आकाश यांची पूजा करुन शंख, मंगलवाद्यें, वेदमंत्र यांचा घोष करीत बालकाला घरांतून बाहेर आणून सूर्यादि देवतांचें दर्शन करवून प्रार्थना करावी. प्रार्थनामंत्र - ‘ चंद्रार्कयोर्दिगीशानां दिशां च गगनस्य च ॥ निक्षेपार्थमिमं दद्मि ते मे रक्षतुं सर्वदा ॥ अप्रमत्तं प्रमत्तं वा दिवारात्रमथापि वा ॥ रक्षंतु सततं सर्वे देवाः शक्रपुरोगमाः ॥ ” माधवीयांत - मार्कंडेय - “ बालकाच्या पुढें कलाकौशल्याचे सर्व पदार्थ, शस्त्रें, वस्त्रें इत्यादिक ठेऊन त्यांवरुन त्या बालकाचें लक्षण पाहावें. पुढें ठेवलेल्या पदार्थांतून ज्या पदार्थाला बालक स्पर्श करील त्या पदार्थानेंच त्याची उपजीविका होईल. ”