आतां दशदोष सांगतो -
अथदशदोषाः व्यवहारोच्चये वेधश्चलत्ताचतथैवपातः खर्जूरवेधोदशयोगचक्रं युतिश्चजामित्रमुपग्रहश्चबाणाख्यवज्रेचदशैवदोषाः एषांलक्षणंज्योतिषेज्ञेयम् अतिचारगेगुरौतुवसिष्ठः अतिचारगतेजीवेवर्जयेत्तदनंतरं विवाहादिषुकार्येषुअष्टाविंशतिवासरान् रत्नमालायाम् एकपंचनवयुग्मषट्दशत्रीणिसप्तचतुरष्टलाभगः द्वादशाजवृषभादिराशितोघातचंद्रइतिकीर्तितोबुधैः नारदः भूबाणनंदहस्ताश्चरसदिग्वह्निशैलजाः वेदावसुशिवादित्याघातचंद्रोयथाक्रमम् यात्रायांयुद्धकार्येषुघातचंद्रंविवर्जयेत् विवाहेसर्वमांगल्येचौलादौव्रतबंधने घातचंद्रोनैवचिंत्यइतिपाराशरोब्रवीत् ज्योतिर्निबंधे विवाहचौलव्रतबंधयज्ञेपट्टाभिषेकेचतथैवराज्ञां सीमंतयात्रासुतथैवजातेनोचिंतनीयः खलुघातचंद्रः नारदः अकालजाभवेयुश्चेद्विद्युन्नीहारवृष्टयः प्रत्यर्कपरिवेषेंद्रचापाभ्रध्वनयोयदि दोषायमंगलेनूनंनदोषायैवकालजाः अकालवृष्टिस्वरुपमाह लल्लः पौषादिचतुरोमासान् प्रोक्तावृष्टिरकालजेति शार्ड्गधरः निर्घातेक्षितिचलनेग्रहयुद्धेराहुदर्शनेचैव आपंचदिनात्कन्यापरिणीतानाशमुपयाति उल्कापातेंद्रचापप्रबलघनरजाधूमनिर्घातविद्युद्वृष्टिप्रत्यर्कदोषादिषुसकलबुधैस्त्याज्यमेवैकरात्रम् दुःस्वप्नेदुर्निमित्तेह्यशुभफलदृशोदुर्मनोभ्रांतबुद्धौचौलेमौंजीनिबंधेपरिणयनविधौसर्वदात्याज्यमेव ज्योतिः प्रकाशे अर्वाक् षोडशनाड्यः संक्रांतेः पुण्यदाः परतः उपनयनव्रतयात्रापरिणयनादौविवर्ज्यास्ताः गर्गः दिग्दाहेदिनमेकंचग्रहेसप्तदिनानितु भूकंपेचसमुत्पन्नेत्र्यहमेवतुवर्जयेत् उल्कापातेत्रिदिवसंधूमेपंचदिनानिच वज्रपातेचैकदिनंवर्जयेत्सर्वकर्मसु दर्शनादर्शनाद्राहुकेत्वोः सप्तदिनंत्यजेत् यावत्केतूद्गमस्तावदशुभः समयोभवेत् अस्यापवादोऽद्भुतसागरे अथदिवसत्रयमध्येमृदुपानीयंयदाभवति उत्पातदोषशमनंतदैवसंप्राहुराचार्याः संबंधतत्त्वे भूकंपादेर्नदोषोऽस्तिवृद्धिश्राद्धेकृतेसति ॥
व्यवहारोच्चयांत - " वेध , लत्ता , पात , खर्जूरवेध , दशयोगचक्र , युति , जामित्र , उपग्रह , बाणयोग आणि वज्रयोग हे दहा दोष मुहूर्तांत असतात . " ह्या दहा दोषांचीं लक्षणें ज्योतिषग्रंथांतून पाहावीं . गुरुचा अतिचार असेल तर सांगतो वसिष्ठ - " गुरुचा अतिचार ( शीघ्र गतीनें एक राशि भोगून दुसर्या राशीस जाणें तो ) झाला असतां विवाहादि मंगलकार्यांविषयीं अठ्ठावीस दिवस वर्ज्य करावे . " रत्नमालेंत - " मेषराशीस पहिला , वृषभास पांचवा , मिथुनास नववा , कर्कास दुसरा , सिंहास सहावा , कन्येस दहावा , तुळास तिसरा , वृश्चिकास सातवा , धनुराशीस चवथा , मकरास आठवा , कुंभास अकरावा , आणि मीनास बारावा , याप्रमाणें असलेला चंद्र घातचंद्र म्हणून विद्वानांनीं सांगितला आहे . " नारद - " अर्थ तसाच आहे . तो असा - मेषादि १२ राशींपासून अनुक्रमानें १।५।९।२।६।१०।३।७।४।८।११।१२। या स्थानीं असलेला चंद्र यात्रेचे ठायीं आणि युद्धकार्यांत घातचंद्र वर्ज्य करावा . विवाह , चौल , मौंजीबंधन इत्यादि सर्व मंगल कार्यांविषयीं घातचंद्र पाहूं नये , असें पाराशर ऋषि सांगतो . ’ ज्योतिर्निबंधांत - " विवाह , चौल , उपनयन , यज्ञ , राजांचा पट्टाभिषेक , सीमंतोन्नयन , यात्रा , आणि जातकर्म यांविषयीं घातचंद्र पाहूं नये . " नारद - " वीज , धुकें , वृष्टि , सूर्याचा सभोंवतीं परिवेष ( खळें ) पडणें , इंद्रधनुष्य , मेघगर्जना हीं जर अकालीं होतील , तर तीं मंगलकार्यांचे ठायीं दोषकारक आहेत असें समजावें . आणि आपल्या कालीं जर होतील तर दोषकारक नाहींत . " अकालवृष्टीचें स्वरुप सांगतो लल्ल - " पौष , माघ , फाल्गुन , चैत्र ह्या चार मासांत झालेली वृष्टि अकालीं वृष्टि समजावी . शार्ड्गधर - " वीज वगैरे पडणें , भूकंप होणें , ग्रहांचें युद्ध , चंद्रसूर्यांचें ग्रहण , हीं झालीं असून पांच दिवसांचे आंत कन्येचा विवाह केला असतां ती कन्या नाश पावते . आकाशांतून अग्निरुपी तारा पडणें , इंद्रधनुष्य उगवणें , प्रबळ दाट धूलि उडणें , धूम होणें , वीज वगैरे पडून पाषाण वगैरे फुटणें , वीज होणें , पर्जन्य पडणें , सूर्यास परिवेष पडणें , इत्यादि दोष उत्पन्न झाले असतां चौल , उपनयन , विवाह या कार्यांविषयीं सकल विद्वानांनीं एक दिवस टाकावा . चौल , उपनयन , विवाह या कार्यांमध्यें दुष्टस्वप्नाचें दर्शन झालें , एकादें दुष्ट निमित्त उत्पन्न झालें , अशुभफलसूचक चिह्नें दृष्टीस पडलीं , दुश्चित्त झालें , किंवा बुद्धि भ्रांतिष्ट झाली असतां त्या वेळीं तीं कार्यैं वर्ज्य करावीं . " ज्योतिः प्रकाशांत - " संक्रांतीच्या पहिल्या सोळा घटिका आणि पुढच्या सोळा घटिका पर्वकाळ आहे . त्या घटिका उपनयन , यात्रा , विवाह इत्यादि कार्यांचे ठायीं वर्ज्य कराव्या . " गर्ग - " दिशा पेटल्या असतां एक दिवस टाकावा . ग्रहण झालें असतां सात दिवस टाकावे . आणि भूकंप झाला असतां तीन दिवस टाकावे . सर्व कार्यांविषयीं , उल्कापात ( आकाशांतून अग्निरुप तारा पडणें ) झाला असतां तीन दिवस टाकावे . धूम उत्पन्न असतां पांच दिवस टाकावे . आणि वीज पडली असतां एक दिवस टाकावा . चंद्रसूर्यांचे ग्रहण असून तें दृष्टीस पडलें किंवा दृष्टीस पडलें नाहीं तरी सात दिवस टाकावे . धूमकेतु ( शेंडेनक्षत्र ) उत्पन्न झाला असतां त्याचा उदय जोंपर्यंत आहे तोंपर्यंतचा काल अशुभ आहे . " याचा अपवाद सांगतो अद्भुतसागरांत - " उत्पात उत्पन्न झाल्यानंतर तीन दिवसांत समुद्राचें किंवा नद्यादिकांचें पाणी जेव्हां शांत व निर्मळ होईल तेव्हांच उत्पात दोष शांत होतो , असें आचार्य सांगतात . " संबंधतत्त्वांत - " नांदीश्राद्ध केल्यावर भूकंपादि झालें असतां त्याचा दोष नाहीं . "
अथापरिहार्येकन्यायावैधव्ययोगेविशेषउच्यतेमार्कंडेयपुराणे बालवैधव्ययोगेतुकुंभद्रुप्रतिमादिभिः कृत्वालग्नंरहः पश्चात्कन्योद्वाह्येतिचापरे अत्रपुनर्भूदोषाभावउक्तोविधानखंडे स्वर्णांबुपिप्पलानांचप्रतिमा विष्णुरुपिणी तयासहविवाहेतुपुनर्भूत्वंनजायते सूर्यारुणसंवादे विवाहात्पूर्वकालेचचंद्रताराबलान्विते विवाहोक्तेचतांकन्यांकुंभेनसहचोद्वहेत् सूत्रेणवेष्टयेत्पश्चाद्दशतंतुविधानतः कुंकुमालंकृतंदेहंतयोरेकांतमंदिरे ततः कुंभंचनिः सार्यप्रभज्यसलिलाशये ततोभिषेचनंकुर्यात्पंचपल्लववारिभिः कुंभप्रार्थनातत्रैव वरुणांगस्वरुपायजीवनानांसमाश्रय पतिंजीवयकन्यायाश्चिरंपुत्रसुखंकुरु देहिविष्णोवरंदेवकन्यांपालयदुः खतः ततोलंकारवस्त्राढ्यांवरायप्रतिपादयेत् इतिकुंभविवाहः ॥
आतां कन्येचा वैधव्ययोग अपरिहार्य ( परिहार करण्यास अशक्य ) असतां विशेष सांगतो - मार्कंडेयपुराणांत - " कन्येला बालवैधव्ययोग असेल तर उदकानें भरलेला कुंभ , अश्वत्थादिवृक्ष , सुवर्णाची विष्णुप्रतिमा इत्यादिकांसह तिचा विवाह करुन नंतर त्या कन्येचा वराशीं विवाह करावा . असें कितीएक विद्वान् सांगतात . " असा विवाह केला असतां पुनर्विवाहाचा दोष उत्पन्न होत नाहीं , असें सांगतो विधानखंडांत - " सुवर्ण , उदक , आणि पिंपळ यांची जी प्रतिमा ती विष्णुरुपिणी आहे . तिच्यासह विवाह करुन वरासह विवाह केला असतां ती स्त्री पुनर्भू ( द्विवारविवाहित ) होत नाहीं . " सूर्यारुणसंवादांत - " घरांत एकांतस्थळीं कन्येच्या अंगास व कुंभास हळदकुंकूं लाऊन विवाहाच्या पूर्वीं चंद्रबळ व ताराबळ यांनीं युक्त विवाहोक्त मुहूर्तावर त्या कन्येचा कुंभासह विवाह करावा . नंतर त्या कन्येला व कुंभाला ‘ परित्वा० ’ इत्यादि मंत्रांनीं खालीं आणि वरती सूत्रानें वेष्टन करावें . तदनंतर कुंभ नेऊन जलाशयांत फोडून पंचपल्लवांनीं शुद्ध उदक घेऊन ‘ समुद्रज्येष्ठा० ’ इत्यादि मंत्रांनीं कन्येवर अभिषेक करावा . आणि ब्राह्मणभोजन घालावें . " कुंभाशीं विवाह करतेसमयीं कुंभाची षोडशोपचार पूजा करुन त्याची प्रार्थना करावी . ती कुंभप्रार्थना तेथेंच सांगतो - प्रार्थनामंत्र - " वरुणांगस्वरुपाय जीवनानां समाश्रय ॥ पतिं जीवय कन्यायाश्चिरं पुत्रसुखं कुरु ॥ देहि विष्णो वरं देव कन्यां पालय दुःखतः ॥ ’ याप्रमाणें कुंभविवाह केल्यानंतर त्या कन्येवर अलंकार आणि वस्त्रें घालून ती कन्या वराला द्यावी . " इति कुंभविवाह .
मूर्तिदानमपितत्रैवोक्तं ब्राह्मणंसाधुमामंत्र्यसंपूज्यविविधार्हणैः तस्मैदद्याद्विधानेनविष्णोर्मूतिचतुर्भुजां शुद्धवर्णसुवर्णेनवित्तशक्त्याथवापुनः निर्मितांरुचिरांशंखगदाचक्राब्जसंयुताम् दधानांवाससीपीतेकुमुदोत्पलमालिनीं सदक्षिणांचतांदद्यान्मंत्रमेतमुदीरयेत् यन्मयाप्रांचिजनुषिघ्नंत्यापतिसमागमम् विषोपविषशस्त्राद्यैर्हतोवातिविरक्तया प्राप्यमानंमहाघोरंयशः सौख्यधनापहम् वैधव्याद्यतिदुःखौघनाशायशुभलब्धये बहुसौभाग्यलब्ध्यैचमहाविष्णोरिमांतनुम् सौवर्णींनिर्मितांशक्त्यातुभ्यंसंप्रददेद्विज अनघाद्याहमस्मीतित्रिवारंप्रजपेदिति एवमस्त्वितितस्याशीर्गृहीत्वास्वगृहंविशेत् ततोवैवाहिकंकुर्याद्विधिंदातामृगीदृशः अन्येप्यश्वत्थविवाहवृक्षसेचनादयस्तत्रैवज्ञेयाः विस्तरभयान्नोच्यंते ॥
मूर्तिदानही तेथेंच सांगतो - " उत्तम ब्राह्मणाला बोलावून त्याची अनेक उपचारांनीं पूजा करुन त्याला , सांगितलेल्या विधीनें विष्णूची चतुर्भुजमूर्ति द्यावी . ती अशी - उत्तम शंभरनंबरी सोनें आपल्या शक्तीप्रमाणें ४ कर्ष किंवा त्याहून कमी घेऊन त्याची सुंदर चतुर्भुज विष्णुमुर्ति करावी . ती शंख , चक्र , गदा , पद्म या आयुधांनीं युक्त करावी . व त्या मूर्तींची आचार्यानें अग्न्युत्तारणादिपूर्वक षोडशोपचारांनीं पूजा करावी . पूजेंत वस्त्रार्पणसमयीं दोन पीत वस्त्रें द्यावीं . आणि पुष्पार्पणकालीं श्वेतकमलांची माला अर्पण करावी . पूजा झाल्यानंतर कन्येनें देवाला नमस्कार करुन पुढील मंत्र म्हणून सुवर्णदक्षिणासहित ती प्रतिमा त्या ब्राह्मणास द्यावी . दानमंत्र - " यन्मया प्राञ्चि जनुषि घ्नंत्या पतिसमागमम् ॥ विषोपविषशस्त्राद्यैर्हतो वापि विरक्तया ॥ प्राप्यमाणं महाघोरं यशः सौख्यधनापहम् । वैधव्याद्यतिदुःखौघं तं नाशय सुखाप्तये ॥ बहुसौभाग्यलब्ध्यै च महाविष्णोरिमां तनुम् ॥ सौवर्णी निर्मितां शक्त्या तुभ्यं संप्रपदे द्विज ॥ ’ याप्रमाणें विष्णुमूर्तींचें दान करुन कन्येनें ‘ अनवाद्याहमस्मि ’ असें त्रिवार म्हणावें . ब्राह्मणानें ‘ एवमस्तु ’ असें त्रिवार म्हणावें . नंतर कन्येनें घरांत जावें . नंतर ब्राह्मणभोजन घालावें . तदनंतर त्या कन्येचा विवाह करावा . " वैधव्यनाशक अश्वत्थविवाह , वृक्षसेचन इत्यादिक दुसरेही विधि सांगितले आहेत ते तेथेंच पाहावे . विस्तार फार होईल या भीतीनें येथें सांगत नाहीं .