आतां अब्दपूर्ति ( वर्धापन , वाढदिवसाचा विधि ) सांगतो .
अथाब्दपूर्तिः व्यवहारनिर्णये नवांबरधरोभूत्वापूजयेच्चचिरायुषं मार्कंडेयंनरोभक्त्यापूजयेत् प्रयतस्तथा ततोदीर्घायुषंव्यासंरामंद्रौणिंकृपंबलिम् प्रह्नादंचहनूमंतंबिभीषणमथार्चयेत् स्वनक्षत्रंजन्मतिथिंप्राप्यसंपूजयेन्नरः षष्ठींचदधिभक्तेनवर्षेवर्षेपुनःपुनः तिथितत्त्वेएतन्नामभिस्तिलहोमोप्युक्तः आदित्यपुराणे सर्वैश्चजन्मदिवसेस्नातैर्मंगलवारिभिः गुरुदेवाग्निविप्राश्चपूजनीयाः प्रयत्नतः स्वनक्षत्रंचपितरौतथादेवः प्रजापतिः प्रतिसंवत्सरंयत्नात्कर्तव्यश्चमहोत्सवः कृत्यचिंतामणौ गुडदुग्धतिलान् दद्याद्धस्तेग्रंथौचबंधयेत् गुग्गुलंनिंबसिद्धार्थदूर्वागोरोचनादिकं संपूज्यभानुविघ्नेशौमहर्षिंप्रार्थयेदिदं चिरंजीवीयथात्वंभोभविष्यामितथामुने रुपवान् वित्तवांश्चैवश्रियायुक्तश्चसर्वदा मार्कंडेयनमस्तेस्तुसप्तकल्पांतजीवन आयुरारोग्यसिद्धयर्थंप्रसीदभगवन् मुने चिरंजीवीयथात्वंतुमुनीनांप्रवरद्विज कुरुष्वमुनिशार्दूलतथामांचिरजीविनं मार्कंडेयमहाभागसप्तकल्पांतजीवन आयुरारोग्यसिद्धयर्थमस्माकंवरदोभव सतिलंगुडसंमिश्रमंजल्यर्धमितंपयः मार्कंडेयाद्वरंलब्ध्वापिबाम्यायुर्विवृद्धयइतिपयः पिबेत् तिथितत्त्वेस्कांदे खंडनंनखकेशानांमैथुनाध्वागमौतथा आमिषंकलहंहिंसांवर्षवृद्धौविवर्जयेत् तत्रैवदीपिकायां कृतांतकुजयोर्वारेयस्यजन्मतिथिर्भवेत् अनृक्षयोगसंप्राप्तौविघ्नस्तस्यपदेपदे कृतांतः शनिः तस्यसर्वौषधिस्नानंगुरुदेवाग्निपूजनं वृद्धमनुः मृतेजन्मनिसंक्रांतौश्राद्धेजन्मदिनेतथा अस्पृश्यस्पर्शनेचैवनस्नायादुष्णवारिणा अत्रजन्मतिथिरौदयिकीग्राह्या युगाद्यावर्षवृद्धिश्चसप्तमीपार्वतीप्रिया एवेरुदयमीक्षंतेनतत्रतिथियुग्मतेतिकृत्यतत्त्वार्णवेवचनात् विशेषोमत्कृतशूद्रधर्मेज्ञेयः ॥
व्यवहारनिर्णयांत - " पुरुषानें प्रतिवर्षीं आपलें जन्मनक्षत्र , व जन्मतिथि प्राप्त असतां नूतन वस्त्रपरिधान करुन चिरायु मार्कंडेयाची भक्तीनें पूजा करावी . नंतर व्यास , परशुराम ; अश्वत्थामा , कृप , बलि , प्रह्लाद , हनूमान् , बिभीषण , आणि षष्ठी देवी ह्या देवतांची ( नाममंत्रानें ) पूजा करुन षष्ठी देवीला दहींभाताचा नैवद्य समर्पण करावा . " तिथितत्त्वांत - ह्या देवतांच्या नाममंत्रांनीं तिलह्होमही सांगितला आहे . आदित्यपुराणांत - " सर्वांनीं आपापल्या जन्मदिवशीं तैलाभ्यंग करुन मांगलिक उदकानें स्नान करुन तिलक करावा . आणि गुरु , देव , अग्नि , ब्राह्मण , आपलें जन्मनक्षत्र , माता , पिता , देव प्रजापति , यांची पूजा करावी . याप्रमाणें प्रतिवर्षीं मोठा उत्सव करावा . " कृत्यचिंतामणींत - " गूळ , दूध , तीळ यांचें दान करावें . आणि गुग्गुळ , निंब , राई , दूर्वा , गोरोचन इत्यादिक पदार्थ वस्त्राच्या ग्रंथींत घालून ते हातांत बांधावे . नंतर भानु , व गणपति यांची पूजा करुन मार्कंडेयाची प्रार्थना करावी . प्रार्थनामंत्र - ‘ चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने ॥ रुपवान् वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ॥ मार्कंडेय नमस्तेस्तु सप्तकल्पांतजीवन ॥ आयुरारोग्य सिद्धर्थं प्रसीद भगवन्मुने ॥ चिरंजीवी यथा त्वं तु मुनीनां प्रवर द्विज ॥ कुरुष्व मुनिशार्दूल तथा मां चिरजीविनं ॥ मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांतजीवन ॥ आयुरारोग्यसिद्धर्थमस्माकं वरदो भव ॥ ’ याप्रमाणें प्रार्थना केल्यानंतर ‘ सतिलं गुडसंमिश्रमंजल्यर्धमितं पयः ॥ मार्कंडेयाद्वरं लब्ध्वा पिबाम्यायुर्विवृद्धये ॥ ’ ह्या मंत्रानें दुग्ध प्राशन करावें . " तिथितत्त्वांत स्कादांत - " नखें व केश यांचे छेदन , मैथुन , प्रयाण , मांसभक्षण , कलह , हिंसा हीं वाढदिवसाचे दिवशीं वर्ज्य करावीं . " तेथेंच दीपिकेंत " शनिवारीं व भौमवारीं ज्याची जन्मतिथि प्राप्त झाली असेल व जन्मनक्षत्र , जन्मयोग नसेल त्याला पदोपदीं विघ्न प्राप्त होतें , त्याच्यापरिहारासाठीं सर्वौषधियुक्त उदकानें स्नान व गुरु , देव अग्नि यांचें पूजन हीं करावीं . " वृद्धमनु - " सपिंडादिकांचें मरण , पुत्र कन्या यांचे जन्म , सूर्याची संक्रांति , श्राद्ध , वाढदिवस चांडालादिकांचा स्पर्श यांतून कोणतेंही असतां जें स्नान करणें तें उष्णोदकानें करुं नये . " ह्या वर्धापनाविषयीं जन्मतिथि घ्यावयाची ती सूर्योदयव्यापिनी घ्यावी . कारण , " युगादितिथि , वर्धापनाची तिथि , नवरात्रांतील सप्तमी , ह्या तिथि सूर्योदयव्यापिनी घ्याव्या . युग्मवाक्यानें प्राप्त झालेल्या घेऊं नयेत . " असें कृत्यतत्त्वार्णवांत वचन आहे . याविषयींचा विशेष विचार मी ( कमलाकरानें ) केलेल्या शूद्रकमलाकरांत पाहावा .