आतां पशुकृत्य सांगतो -
अथपशुकृत्यम् श्रीपतिः चित्रोत्तरावैष्णवरोहिणीषुचतुर्दशीदर्शदिनाष्टमीषु स्थानप्रवेशोगमनंविदध्यात्पुमान्पशूनांनकदाचिदेव चंडेश्वरः हस्तमूलविशाखासुरेवत्यांश्रवणेतथा मैत्रेचवारुणेश्रेष्ठंपशुक्रयणमुच्यते पूर्वात्रयामृतमयूखहुताशनेषुइंद्राग्निवाजिवसुवारुणशंकरेषु एतेषुगोमहिषदंतितुरंगमादिनानाप्रकारपशुजातिगतिः प्रशस्ता ॥
श्रीपति - “ चित्रा, तीन उत्तरा, श्रवण, रोहिणी, या नक्षत्रांवर; आणि चतुर्दशी, अमावास्या, अष्टमी या तिथींस पशूंचा गोठ्यांत प्रवेश आणि हिकडून तिकडे नेणें हें कधींही करुं नये. ” चंडेश्वर - “ हस्त, मूल, विशाखा, रेवती, श्रवण, अनुराधा, शततारका या नक्षत्रांवर पशु विकत घ्यावे. पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, मृगशीर्ष, कृत्तिका, विशाखा, अश्विनी, धनिष्ठा, शततारका, आर्द्रा, या नक्षत्रांवर; गाई, महिषी, हत्ती, घोडे इत्यादि नाना प्रकारच्या पशूंच्या जातींचें गमन प्रशस्त आहे. ”
अथगजदंतच्छेदः ज्योतिर्निबंधे त्वाष्ट्रेवैष्णव अश्विन्यामादित्येवसुदैवते दंतिनांशुभदंकर्मपुष्येहस्तेचकर्तनम् अथनिक्षेपः भरणीत्रीणिपूर्वाणिआर्द्राश्लेषामघातथा चित्राज्येष्ठाविशाखाचमूलंमृगपुनर्वसू एभिर्दत्तंप्रयुक्तंचयद्यन्निक्षिप्यतेधनम् पृष्ठतोधावमानस्यधनिनोनोपपद्यते ॥
आतां हस्तिदंतच्छेद सांगतो - ज्योतिर्निबंधांत - “ चित्रा, श्रवण, अश्विनी, पुनर्वसु, धनिष्ठा, पुष्य, हस्त, या नक्षत्रांवर हत्तीच्या दंताचें छेदन शुभदायक आहे. ” आतां ठेव ठेवणें, व्याजास लावणें वगैरे सांगतो - “ भरणी, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, आर्द्रा, आश्लेषा, मघा, चित्रा, ज्येष्ठा, विशाखा, मूल, मृग, पुनर्वसु, या नक्षत्रांवर एकाद्यास द्रव्य दिलें, व्याजास लाविलें, किंवा एकाद्यापाशीं ठेविलें असतां तें पुनः परत मिळणार नाहीं. ”