आतां कलियुगांत वर्ज्य कर्मैं कोणतीं तीं सांगतो -
अथकलिवर्ज्यानि बृहन्नारदीये समुद्रयातुः स्वीकारः कमंडलुविधारणं द्विजानामसवर्णासुकन्यासूपयमस्तथा देवराच्चसुतोत्पत्तिर्मधुपर्केपशोर्वधः मांसदानंतथाश्राद्धेवानप्रस्थाश्रमस्तथा दत्ताक्षतायाः कन्यायाः पुनर्दानंपरस्यच दीर्घकालंब्रह्मचर्यंनरमेधाश्वमेधकौ महाप्रस्थानगमनंगोमेधश्चतथामखः इमान् धर्मान् कलियुगेवर्ज्यानाहुर्मनीषिणः कमंडलुः सोदकंचकमंडलुमित्युक्तः मृन्मयोवा दत्ताऊढा ऊढायाः पुनरुद्वाहंज्येष्ठांशंगोवधस्तथा कलौपंचनकुर्वीतभ्रातृजायांकमंडलुमिति हेमाद्रौवचनात् ऊढायाः पुरापूरुषसंयोगान्मृतेदेयेतिकेचनेत्यादिभिर्विवाह्यतोक्ता हेमाद्रौब्राह्मे गोत्रान्मातुः सपिंडाच्चविवाहोगोवधस्तथा नराश्वमेधौमद्यंचकलौवर्ज्यंद्विजातिभिः गोत्राद्भोत्रजायाः पितृष्वसुः मातृसपिंडात् मातुलात्तत्कन्यायाविवाहः कलौनकार्यः तेनयानितद्विधायकानितानियुगांतरविषयाणि तथाव्यासः तृतीयांमातृतः कन्यांतृतीयांपितृतस्तथा शुल्केनचोद्वहिष्यंतिविप्राः पापविमोहिताइतिकलौतन्निंदामाह मातृतस्तृतीयांमातुलकन्यामित्यर्थः उक्तंचैतत् प्राक् मद्यंस्त्रीभ्यश्चसुरामाचाममित्यादिनाविहितमपिवर्ज्यम् ॥
बृहन्नारदीय पुराणांत - " गलबतांत बसून समुद्रपर्यटन करणार्याला जातींत घेणें , उदकयुक्त किंवा मृन्मय कमण्डलु धारण करणें , भिन्न जातीच्या कन्यांशीं द्विजांनीं विवाह करणें , दिरापासून पुत्र उत्पन्न करणें , मधुपर्कामध्यें पशूचा वध , श्राद्धांत मांस देणें , वानप्रस्थाश्रम स्वीकारणें , दत्ता ( दान केलेली ) जी कन्या ती अभुक्त असतां तिचें दान पुनः दुसर्यास करणें , दीर्घकाल ब्रह्मचर्यधारण , नरमेध , अश्वमेध , महाप्रस्थानगमन ( उत्तरदिग्गमन ), गोमेध , राजसूययज्ञ हे धर्म कलियुगांत वर्ज्य होत , असें पंडित सांगतात . " वरील वचनांत ‘ दत्ता ’ म्हणजे ऊढा ( विवाहिता ) समजावी . कारण , " ऊढाकन्येचा पुनर्विवाह , ज्येष्ठ भ्रात्याला उद्धाररुप श्रेष्ठ भाग देणें , मधुपर्कामध्यें गोवध , भ्रातृपत्नीचा स्वीकार , कमंडलुधारण हीं पांच कर्मै करुं नयेत " असें हेमाद्रींत वचन आहे . ऊढाकन्येचा " पुरुषसंयोग होण्याचे पूर्वीं पति मृत झाला असतां दुसर्या वराला ती द्यावी , असें केचित् सांगतात . इत्यादिक वचनांनीं पुनर्विवाह सांगितला आहे , तो येथें निषिद्ध केला . हेमाद्रींत - ब्राह्मांत - " आतेबहीण व मामेबहीण यांच्याशीं विवाह , मधुपर्कामध्यें गोवध , नरमेध , अश्वमेध , आणि मद्यपान हीं कलियुगांत द्विजातींनीं वर्ज्य करावीं . " यावरुन जीं मातुलकन्यादि विवाहविधायक वचनें तीं इतर युगविषयक होत . तसेंच व्यास - " मातृकुलाकडून तिसरी व पितृकुलाकडून तिसरी कन्या वरणारे आणि कन्येला मोल देऊन विवाह करणारे विप्र ते पापी होत . " अशी मामेबहीण व आतेबहीण यांच्याशीं विवाह करणारांची , व्यास निंदा सांगतो . मातृकुलाकडून तिसरी म्हणजे मातुलकन्या , हा प्रकार पूर्वीं ( विवाहप्रकरणीं ) सांगितला आहे . अन्वष्टक्यश्राद्धाचेठायीं पिंडप्रदानांत " स्त्रियांचे पिंडाला सुरा , आचाम ( भाताची पेज ) अर्पण करावीं . " असें आश्वलायनसूत्रांत विहित जें मद्य तेंही वर्ज्य होय .
हेमाद्रौआदित्यपुराणे विधवायांप्रजोत्पत्तौदेवरस्यनियोजनं बालायाः क्षतयोन्यास्तुवरेणान्येनसंस्कृतिः कन्यानामसवर्णानांविवाहश्चद्विजन्मभिः आततायिद्विजाग्र्याणांधर्मयुद्धेनहिंसनम् द्विजस्याब्धौतुनौयातुः शोधितस्यापिसंग्रहः सत्रदीक्षाचसर्वेषांकमंडलुविधारणम् महाप्रस्थानगमनंगोसंज्ञप्तिश्चगोसवे सौत्रामण्यामपिसुराग्रहणस्यचसंग्रहः अग्निहोत्रहवन्याश्चलेहोलीढापरिग्रहः वृत्तस्वाध्यायसापेक्षमघसंकोचनंतथा प्रायश्चित्तविधानंचविप्राणांमरणांतिकं संसर्गदोषस्तेयान्यमहापातकनिष्कृतिः संसर्गदोषस्तत्संसर्गीचपंचमइत्युक्तः स्तेयंच तदन्यानिमहापातकानि ब्रह्महत्यासुरापगुरुतल्पानित्रीणि तेषांकामकृतानांमरणांतिकंप्रायश्चित्तंविप्राणांकलौनेत्यर्थः मरणांतिकेहिजातिवधनिमित्तंद्वादशाब्दद्विगुणंब्रह्मवधनिमित्तंचद्विगुणंभवति तच्चतुर्थेनास्तिनिष्कृतिरितिनिषिद्धम् नचात्महत्याविधिनातद्बाधः तेनह्यात्महत्यानिमित्तस्यैवबाधोनजातिवधनिमित्तस्य भिन्नविषंयत्वात् संसर्गिणस्तुकामतोपिव्रतस्यैवोक्तेर्नमरणांतिकम् नापिस्तेये तत्रराज्ञोवधकर्तृत्वात् तेनतयोर्मरणांतिकाभावात् तयोरेवनिष्कृतिर्नान्येषांत्रयाणां युगान्तरेतुकलौनिषेधबलात् प्रवृत्तिः एतद्विप्रपरम् न क्षत्रियादेः तदुक्तं विप्राणांमरणांतिकमिति विशेषोस्मत् कृतेप्रायश्चित्तरत्नेज्ञेयः वरातिथिपितृभ्यश्चपशूपाकरणक्रिया दत्तौरसेतरेषांतुपुत्रत्वेनपरिग्रहः सवर्णान्यांगनादुष्टैः संसर्गः शोधितैरपि अयोनौसंग्रहेवृत्तेपरित्यागोगुरुस्त्रियः परोद्देशात्मसंत्यागउद्दिष्टस्यापिवर्जनम् प्रतिमाभ्यर्चनार्थायसंकल्पश्चसधर्मकः अस्थिसंचयनादूर्ध्वमंगस्पर्शनमेवच शामित्रंचैवविप्राणांसोमविक्रयणंतथा षडभक्तानशनेचान्नहरणंहीनकर्मणा माधवीयेपृथ्वीचंद्रोदयेच शूद्रेषुदासगोपालकुलमित्रार्धसीरिणां भोज्यान्नतागृहस्थस्यतीर्थसेवातिदूरतः शिष्यस्यगुरुदारेषुगुरुवद्वृत्तिशीलता आपद्वृत्तिर्द्विजाग्र्याणामश्वस्तनिकतातथा प्रजार्थेतुद्विजाग्र्याणांप्रजारणिपरिग्रहः ब्राह्मणानांप्रवासित्वंमुखाग्निधमनक्रिया बलात्कारादिदुष्टस्त्रीसंग्रहोविधिचोदितः यतेश्चसर्ववर्णेषुभिक्षाचर्याविधानतः नवोदकेदशाहंचदक्षिणागुरुचोदिता ब्राह्मणादिषुशूद्रस्यपचनादिक्रियापिच भृग्वग्निपतनैश्चैववृद्धादिमरणंतथा गोतृप्तिशिष्टेपयसिशिष्टैराचमनक्रिया पितापुत्रविरोधेषुसाक्षिणांदंडकल्पनं यतेः सायंगृहत्वंचसूरिभिस्तत्त्वदर्शिभिः एतानिलोकगुप्त्यर्थंकलेरादौमहात्मभिः निवर्तितानिविद्वद्भिर्व्यवस्थापूर्वकंबुधैः सुराग्रहणस्यतत्कर्तुः संग्रहोव्यवहारकः नवमद्यंतेतिसामान्येननिषिद्धस्याऽनेनोपसंहारइतिवाच्यम् निषेधस्यनिवृत्तिमात्रफलत्वेनविशेषानपेक्षत्वात् नहिंस्यादित्यस्यनब्राह्मणंहन्यादित्यनेनोपसंहारेहिंसांतरस्यादोषत्वापत्तेश्च निरुपितंचैतद्धेमाद्रिणाऽन्यत्रेत्युपरम्यते सुराग्रहस्योद्देश्यस्यसौत्रामणिविशेषणाविवक्षयावाजपेयेपिनिषेधः सौत्रामण्यांतुपयोग्रहावास्युरित्यापस्तंबोक्तेर्वैकल्पिकपयोग्रहैरप्यधिकारः वाजपेयेतुतत्प्राप्तौमानाभावात् सोमसुरयोः सहत्यागेनांशेसुराद्रव्यत्वात्तत्प्रख्यतयायागनामत्वेनतांविनासंज्ञायोगात् कलौनाधिकारइतियुक्तंप्रतीमः त्रिकांडमंडनादिलिखनंतुनिर्मूलमनाकरंच वृत्तेति एकाहाद्ब्राह्मणः शुध्येद्योग्निवेदसमन्वितइतिउक्तः अघस्याशौचस्यसंकोचः नतस्यनिष्कृतिर्दृष्टाभृग्वग्निपतनादृतेइत्युक्तस्यप्रायश्चित्तस्यविधानंउपदेशः कलौकर्तैवलिप्यतेइतिव्यासोक्तेः पतितसंसर्गेदोषसत्त्वेपिपातित्यंनेत्यर्थः अन्यथासंसर्गः शोधितैरपीतिविरोधापत्तेः स्तेयभिन्नेमहापापेरहस्यकृतेप्रायश्चित्तंनेत्यर्थः सवर्णान्याअसवर्णाक्षत्रियादिस्तयादुष्टैः अयोनौशिष्यादौ चतस्त्रस्तुपरित्याज्याः शिष्यगागुरुगाचयेत्युक्तस्त्यागः परोद्देशेनब्राह्मणाद्यर्थंआत्मत्यागः यद्वा परोद्देशात्मत्यागः गोदानंमनसापात्रमुद्दिश्येत्युक्तं उद्दिष्टस्यत्यक्तस्यवर्जनंप्रतिग्रहसमर्थोपीत्युक्तम् वेतनग्रहणेनप्रतिमापूजा स्वाशौचकालाद्विज्ञेयंस्पर्शनंतुत्रिभागतइत्युक्तः स्पर्शः षडिति उपोषितस्त्र्यहंस्थित्वाधान्यमब्राह्मणाद्धरेदित्युक्तमन्नचौर्यम् आपदिक्षात्रादिवृत्तिः मुखेनैवधमेदग्निमित्युक्तंधमनं दशाहेनैवशुद्ध्येतभूमिष्ठंचनवोदकमित्युक्तोदशाहः गुरवेतुवरंदत्वेत्युक्तादक्षिणा शूद्रेषुदासगोपालेति कंदूपक्कंस्नेहपक्कंयच्चदुग्धेनपाचितम् एतान्यशूद्रान्नभुजोभोज्यानिमनुरब्रवीदित्यपरार्केसुमंतूक्ताशूद्रस्यपाकक्रिया पितापुत्रविवादेतुसाक्षिणांत्रिपणोदमइत्युक्तः सायंगृहत्वं विधूमेसन्नमुसलेइत्युक्तं पृथ्वीचंद्रेणतु अटंतिवसुधांविप्राः पृथिवीदर्शनायच अनिकेताह्यनाहारायत्रसायंगृहास्तुतेइतिविष्णुपुराणोक्तंनिषिद्धम् तेनाज्ञातशीलपांथादेः श्राद्धादौविनियोगोनकार्यः कलावित्यर्थउक्तः एतानिवर्ज्यानीत्यर्थः ॥
हेमाद्रींत आदित्यपुराणांत - " प्रजोत्पतीसाठीं विधवा भ्रातृपत्नीशीं दिराची योजना ( नियोग ), विवाहित असून क्षतयोनी ( उपभुक्त ) अशा कन्येचा दुसर्यां वराशीं विवाहसंस्कार करणें , द्विजातींचा असवर्ण कन्यांशीं विवाह , आततायी ब्राह्मणांची धर्मयुद्धांत हिंसा , गलबतांत बसून समुद्रपर्यटन करणाराला प्रायश्चित्त देऊनही त्याचा स्वीकार करणें , सर्वांना सत्रदीक्षा , कमंडलुधारण , यावद्देहपातपर्यंत उत्तरदिग्गमन , गोमेध , सौत्रामणीयज्ञाचेठायींही सुरापान करणाराचा स्वीकार , अग्निहोत्रांत स्रुचीपात्रानें होम दिल्यानंतर अवशिष्ट घृतादिक हवनीय द्रव्य जिव्हेनें चाटणें , व चाटलेली स्रुची पुनः घेणें , अग्निहोत्री वेदाध्ययन करणारा एकदिवस आशौच धरुन शुद्ध होतो इत्यादि सांगितल्यावरुन आशौचसंकोच करणें तो , ब्राह्मणांना मरणांतिक प्रायश्चित्तविधि , संसर्गदोष व सुवर्णस्तेय यांवांचून इतर जीं महापातकें ( ब्रह्महत्या , सुरापान , गुरुपत्नीगमन ) त्यांची निष्कृति , हीं कृत्यें कलियुगांत नाहींत . " " प्रायश्चित्तविधानं च विप्राणां मरणांतिकम् ! संसर्गदोषस्तेयान्यमहापातकनिष्कृतिः " या वचनाचा अर्थ - संसर्गदोष म्हणजे " ब्रह्महत्यादि चार महापाप्यांचा संसर्गी पांचवा तोही महापापी होतो " या वचनानें सांगितलेला दोष , आणि चोरी , यांवांचून इतर तीन ( ब्रह्महत्या , सुरापान , गुरुपत्नीगमन ) हीं पापें बुद्धिपूर्वक करणार्या ब्राह्मणाला मरणांतिक प्रायश्चित्त कलियुगांत नाहीं . कारण , मरणांतिक प्रायश्चित्त केलें असतां जातिवध झाला , ब्रह्महत्या झाली , आणि आत्महत्या घडली . त्यांत जातिवधनिमित्तक द्वादशाब्द द्विगुण प्रायश्चित्त . ब्रह्मवधनिमित्तक द्वादशाब्द द्विगुण प्रायश्चित्त आहे . आणि पूर्वीचें केलेलें महापाप व आत्महत्या हीं झाल्यामुळें ‘ चतुर्थे नास्ति निष्कृतिः ’ म्हणजे चवथ्या पापाला निष्कृति नाहीं , ह्या वचनानें मरणांतिक प्रायश्चित्त निषिद्ध केलें आहे . आतां मरणांतिक प्रायश्चित्त करावें , अशा विधीनें जातिवधादिप्रयुक्त पापाचा बाध होईल ! असें म्हणतां येणार नाहीं . कारण , त्यानें आत्महत्यानिमित्तक दोषाचा बाध होतो . जातिबधनिमित्तक दोषाचा बाध होत नाहीं . त्याचा विषय वेगळा आणि याचा विषय वेगळा आहे . संसर्गदोष तर बुद्धिपूर्वक घडला तरी त्याला व्रतच ( कृच्छ्रादिकच ) सांगितल्यामुळें त्याला मरणांतिक प्रायश्चित्त नाहीं . चोरीविषयींही मरणांतिक प्रायश्चित्त नाहीं . कारण , चोरीविषयीं राजानें वध करावयाचा आहे . यावरुन संसर्गदोष व चोरी यांविषयीं मरणांतिक प्रायश्चित्त नसल्यामुळें त्या दोघांचीच निष्कृति ( शुद्धि ) होते , इतर तीन महापाप्यांची शुद्धि होत नाहीं . कलियुगांत मरणांतिक प्रायश्चित्ताचा निषेध केल्यामुळें इतर युगांत मरणांतिक प्रायश्चित्ताची प्रवृत्ति आहे . हा मरणांतिक प्रायश्चित्तनिषेध ब्राह्मणांना आहे , क्षत्रियादिकांस नाहीं . तेंच सांगतो - ‘ विप्राणां मरणांतिकं ’ याचा विशेष निर्णय आम्हीं ( कमलाकरभट्टानें ) केलेल्या प्रायश्चित्तरत्नांत पहावा . " वर , अतिथि , पितर यांच्यासाठीं पशु अभिमंत्रित करुन मारणें , दत्तक व औरस यांवांचून इतर क्रीत इत्यादिक ( मनु - याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं सांगितलेल्या ) दशविध पुत्रांचें पुत्रत्वेंकरुन ग्रहण ( मानणें ), ब्राह्मणादि उत्कृष्ट जातीच्या स्त्रियांच्या संभोगानें दुष्ट झालेल्या शूद्रादिकांचा प्रायश्चित्त देऊनही संसर्ग करणें , गुरुस्त्रियेशीं शिष्यादिकांचा संयोग झाला असतां त्या गुरुस्त्रियेचा त्याग करणें , परोद्देशेंकरुन ( गाई , ब्राह्मण यांच्याकरितां ) प्राणत्याग करणें , दान सोडून ठेविलेलेंही वर्ज्य करणें ( न घेणें ), द्रव्यप्राप्तीसाठीं ( वेतन घेऊन ) प्रतिमापूजा करणें , कार्यसिद्धीकरितां देवपूजा इत्यादिकांचा संकल्प करणें , दशाहाशौचांत अस्थिसंचयन झाल्यानंतर ( आशौच कमी झाल्यामुळें ) स्पर्श करणें , ब्राह्मणांनीं यज्ञांत पशु मारणें , व सोमक्रय करणें , तीन दिवस उपोषित राहणारानें पाप्यापासूनही धान्य चोरुन आणणें , हे धर्म कलियुगांत वर्ज्य आहेत . " माधवीयांत आणि पृथ्वीचंद्रोदयांत - " शूद्रांमध्यें दास , गोपाल ( गौळी ) कुलमित्र ( कुलपरंपरेचा मित्र ), अर्धसीरी ( अर्ध्या वांट्यानें शेती करणारा ) यांचें अन्न गृहस्थाश्रमी ब्राह्मणानें भक्षण करणें ; अतिदूर तीर्थसेवा करणें ; गुरुपत्नीचे ठिकाणीं शिष्यानें गुरुप्रमाणें वर्तन करुन राहाणें ; श्रेष्ठ ब्राह्मणांनीं आपत्कालीं क्षत्रिय - वैश्यादि वृत्ती ( उपजीविका ) स्वीकारणें ; एक दिवस निर्वाहापुरतें धान्य संग्रह करुन राहाणें ( अधिक धान्यसंग्रह न करणें ), कोणत्याएका शाखेंत प्रजा जीवंत राहण्यासाठीं जातकर्म होमांत अरणिस्वीकार सांगितला आहे तो ; ब्राह्मणांनीं प्रवास करणें ; मुखानें ( फुंकणीवांचून ) अग्नि पेटवणें ; बलात्कारादिकानें दुष्ट झालेल्या स्त्रियांना जातींत घेणें ; संन्याशांनीं सर्व वर्णांची ( ब्राह्मण , क्षत्रिय इत्यादिकांची ) भिक्षा घेणें ; भूमीवर नवें उत्पन्न झालेलें उदक दहा दिवसांनीं शुद्ध म्हणून सांगितलें आहे , त्याच्यापूर्वीं तें न स्वीकारणें ; गुरुनें सांगितलेली दक्षिणा देणें ; ब्राह्मणादिकांची अन्नपाकादिक्रिया शूद्रानें करणें ; वृद्धादिकांना पर्वताच्या कड्यावरुन उडी टाकून किंवा अग्नींत उडी टाकून मरण विहित आहे तें मरण ; गाईंनीं प्राशन करुन अवशिष्ट राहिलेल्या सांचीव उदकांत शिष्टांनीं आचमन करणें ; पितापुत्रांच्या विवादांत असलेल्या साक्ष्यांना दंड सांगितला आहे , तो दंड करणें ; संन्याशांनीं दिवसाच्या सायंकालीं भिक्षा मागावी , अशी सांगितलेली सायंकालिकभिक्षाः हे धर्म कलियुगांत करुं नयेत , असें तत्त्वद्रष्टे महात्मे अशा विद्वानांनीं कलियुगाच्या आरंभीं व्यवस्थापूर्वक सांगितलें आहे . " वर सांगितलेल्या ‘ सौत्रामण्यामपि सुराग्रहणस्य च संग्रहः ’ या वचनाचा अर्थ - सौत्रामणि यज्ञांतही सुरा ( मद्य ) ग्रह करणाराशीं व्यवहारसंबंध कलियुगांत वर्ज्य आहे . आतां असें म्हणतों कीं , ‘ नराश्वमेधौ मद्यं च कलौ वर्ज्यं द्विजातिभिः ’ ह्या वर सांगितलेल्या हेमाद्रिस्थ ब्राह्मवचनानें सर्वसाधारण मद्याचा निषेध केलेला आहे , त्या निषेधाचा ह्या वचनानें उपसंहार ( संकोच ) केला आहे . म्हणजे मद्य वर्ज्य म्हणून जें सांगितलें तें सौत्रामणि यज्ञांत समजावें . अर्थात् इतर वर्ज्य नाहीं ; असें म्हणतां येणार नाहीं . कारण , निषेधाचें तात्पर्य निवृत्ति होणें इतकेंच असल्यामुळें , कोणत्या ठिकाणीं निवृत्ति होते व कोणत्या ठिकाणीं नाहीं इत्यादि विशेष अर्थाची त्या निषेधाला गरज नाहीं . आणि याप्रमाणें सामान्य निषेधाचा विशेष निषधानें उपसंहार केला तर ‘ सर्वभूतांची हिंसा करुं नये ’ ह्या सामान्य निषेधाचा ‘ ब्राह्मणाला मारुं नये ’ ह्या विशेष वचनानें उपसंहार होईल . तसा उपसंहार झाला असतां इतर हिंसा निर्दोषीही होईल ! हा सर्व निर्णय हेमाद्रीनें इतर ग्रंथांत सांगितलेला आहे , म्हणून मी याविषयीं विशेष निर्णय सांगत नाहीं . सौत्रामणियागांत सुराग्रहणाचा उद्देश करुन संग्रहनिषेधाचें विधान केलें आहे . येथें उद्देश्य जें सुराग्रहण त्याचें विशेषण जें सौत्रामणि त्याची अविवक्षा असल्यामुळें वाजपेययज्ञांतही सुराग्रहणाचा निषेध होतो . सौत्रामणि यागांत तर " अथवा दुधाचे ग्रह ( पात्रें ) होतील " ह्या आपस्तंब वचनावरुन विकल्पानें पयोग्रह सांगितले असल्यामुळें त्यांनींही सौत्रामणीयागाविषयीं अधिकार येतो . वाजपेयांत तर दुग्धप्राप्ति असल्याविषयीं प्रमाण नसल्यामुळें ; सोम व सुरा यांचा सहत्याग ( आहुति ) असल्यानें त्याच्या अंशांत सुरा द्रव्य असल्यामुळें त्या योगानेंच त्या यागाला वाजपेय असें नांव असल्याकारणानें ती सुरा नसेल तर वाजपेय नांव येणार नाहीं , म्हणून कलियुगांत वाजपेययागाविषयीं अधिकार नाहीं , हें म्हणणें युक्त आहे असें आम्ही ( कमलाकरभट्ट ) समजतों . त्रिकांडमंडनादिकांचा लेख तर मूलरहित व आकरग्रंथ सोडून आहे . " प्रायश्चित्तविधानं च विप्राणां मरणांतिकं " या पूर्वीच्या वाक्याचा अर्थ - " पर्वताचा कडा किंवा अग्नि यांत देहत्यागावांचून दुसरें त्या महापापांना प्रायश्चित्त नाहीं " याप्रमाणें जें प्रायश्चित्त सांगणें , तें कलियुगांत सांगूं नये . हें वाक्य पंचमहापापांविषयीं आहे . त्यांत संसर्गपापांविषयीं असें आहे कीं , ‘ कलौ कर्तैव लिप्यते ’ या व्यासवचनावरुन कलियुगांत कर्त्यालाच पातित्य आहे . संसर्गी पाप्याला नरकादि प्राप्ति असली तरी पातित्य नाहीं . संसर्ग्याला सर्वथा दोष नाहीं असें म्हटलें , तर ‘ सवर्णान्यांगनादुष्टैः संसर्गः शोधितैरपि ’ या पूर्वोक्त वचनांत संसर्गाचा निषेध सांगितला आहे , त्याचा विरोध येईल . म्हणून संसर्गाला दोष नाहीं असें म्हणतां येत नाहीं . तर स्तेयभिन्न एकांतीं घडलेल्या महापापाविषयीं प्रायश्चित्त सांगूं नये , असा भाव . लोकांत प्रसिद्ध वुद्धिपूर्वक घडलेल्या महापापाविषयीं निष्कृति नाहीं . व तो पापी व्यवहारांतही येत नाहीं , हें पूर्वीच सांगितलें आहे . शूद्रामध्यें दास , गोपाळ , कुलाचा मित्र , अर्ध्या शेतीचा वांटेकरी यांचें अन्न गृहस्थानें भक्षण करुं नये . ’ हा निषेध कोणाचा असें म्हटलें तर - " निखार्यांवर भाजलेले , घृतादिक पक्क केलेले , आणि दुग्धामध्यें शिजविलेले हे पदार्थ ; शूद्रान्न न खाणाराला भक्षण करण्यास योग्य आहेत असें मनु सांगतो . " याप्रमाणें अपरार्कांत सुमंतूनें सांगितलेला शूद्रपाक तो ‘ शूद्रेषु दासगोपाल० ’ या वचनानें कलींत निषिद्ध केला आहे . ‘ पितापुत्रांचा विवाद असतां साक्ष्यांना तीन पण ( कार्पापण , ६ पैसे ) दंड करावा ’ असा सांगितलेला दंड तो ‘ साक्षिणां दंडकल्पनं ’ या वचनानें निषिद्ध केला आहे . ‘ यतेः सायंगृहत्वं च० ’ याचा अर्थ - " लोकांच्या घरांतील धूर गेला , मुसळांचा शब्द नाहींसा झाला , चुलींतील निखारे विझाले , सर्व लोकांचें भोजन झालें म्हणजे तीन प्रहर दिवस होऊन गेल्यावर संन्याशांनीं भिक्षेस जावें " असें मनूनें सांगितलेलें सायंकाळीं भिक्षाटन तें ‘ यतेः सायंगृहत्वं० ’ या वचनानें निषिद्ध केलें आहे . पृथ्वीचंद्रग्रंथकारानें तर - " पृथ्वी पाहण्याकरितां भूमीवर ब्राह्मण फिरतात . त्यांना गृह नसून आहारही मिळत नाहीं , ते सायंकाळीं ज्या घरीं जातील तीं घरें त्यांचीं आहेत अर्थात् ते सायंगृह होत " ह्या विष्णुपुराणवचनानें सांगितलेलें सायंगृहत्व तें कलियुगांत निषिद्ध केलें आहे यावरुन ज्या ब्राह्मणाचा स्वभाव , आचरण वगैरे माहीत नसेल अशा पांथादिकाला कलियुगांत श्राद्धादिकांत सांगूं नये , असा अर्थ सांगितला आहे .
निगमः अग्निहोत्रंगवालंभंसंन्यासंपलपैतृकं देवराच्चसुतोत्पत्तिः कलौपंचविवर्जयेत् अग्निहोत्रंतदर्थमाधानं एतच्चसर्वाधानपरं अर्धाधानंस्मृतंश्रौतस्मार्ताग्न्योस्तुपृथक्कृतिः सर्वाधानंतयोरैक्यकृतिः पूर्वयुगाश्रितेतिलौगाक्षिवचनादितिस्मृतिचंद्रिकायाम् एतेन चत्वार्यब्दसहस्राणिचत्वार्यब्दशतानिच कलेर्यदाग मिष्यंतितदात्रेतापरिग्रहः संन्यासश्चनकर्तव्योब्राह्मणेनविजानतेतिव्यासवचनंव्याख्यातम् सर्वाधानेपि विशेषमाहदेवलः यावद्वर्णविभागोस्तियावद्वेदः प्रवर्तते संन्यासंचाग्निहोत्रंचतावत्कुर्यात्कलौयुगेइति अत्रपूर्वयुगाश्रितेतिलौगाक्षिवाक्येपूर्वयुगानिकृतादीनीत्येकोर्थः अन्येतु युगस्यपूर्वं कलेः पूर्वोभागः सचत्वार्यब्दसहस्त्राणीतिपूर्वोक्तवाक्याच्चतुश्चत्वारिंशच्छतवर्षावच्छिन्नः तस्मिन् भागेसर्वाधानंकार्यम् तदुत्तरंतुयावद्वर्णविभागोस्तीतिवाक्यात् वर्णविभागपर्यंतमर्धाधानमित्याहुः संन्यासस्त्रिदंडः इतिश्रीमन्नारायणभट्टसूरिसूनुरामकृष्णभट्टात्मजदिनकरभट्टानुजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौतृतीयपरिच्छेदेकलिवर्ज्यानिसमाप्तानि ।
निगम - " अग्निहोत्र , मधुपर्कांत गोवध , संन्यास , मांसानें श्राद्ध करणें , दिरापा़सून पुत्रोत्पत्ति , हीं पांच कर्मै कलियुगांत वर्ज्य करावीं . " अग्निहोत्र म्हणजे अग्निहोत्रासाठीं आधान करणें . हा निषेध सर्वाधानविषयक आहे . कारण , " श्रौताग्नि व स्मार्ताग्नि हे वेगवेगळे राखणें ( अर्धा स्मार्ताग्नि श्रौताग्नींत मिळवून अर्धा वेगळा राखणें ) हें अर्धाधान म्हटलें आहे . आणि श्रौताग्नींत स्मार्ताग्नि मिळविणें ( वेगळा न ठेवणें ) हें सर्वाधान पूर्वयुगांत सांगितलें आहे . कलियुगांत नाहीं . " असें कलियुगांत सर्वाधाननिषेधक लौगाक्षिवचन आहे , असें स्मृतिचंद्रिकेंत सांगितलें आहे . यावरुन " कलियुगाचीं ४४०० वर्षै गेल्यानंतर ज्ञात्या ब्राह्मणानें त्रेतापरिग्रह ( सर्वाधान ) आणि संन्यास हे करुं नयेत " या व्यासवचनाची व्यवस्था केल्यासारखी झाली . तात्पर्य - त्रेतापरिग्रह म्हणजे सर्वाधान तें निषिद्ध आहे . अर्धाधान निषिद्ध नाहीं . सर्वाधानाविषयींही विशेष सांगतो देवल " जोंपर्यंत ब्राह्मणादिक वर्णाचा ( जातींचा ) विभाग आहे , जोंपर्यंत वेदविहित कर्मै चाललेलीं आहेत , तोंपर्यंत कलियुगांत संन्यास आणि अग्निहोत्र ( अर्धाधान व सर्वाधान ) करावें . " वर सांगितलेल्या लौगाक्षिवाक्यांत ‘ पूर्वयुगाश्रिता ’ याचा अर्थ - पूर्वयुगें म्हणजे कृत , त्रेता , द्वापार यांमध्यें सर्वाधान आहे असा एक अर्थ झाला . इतर ग्रंथकार तर - ‘ युगस्य पूर्वं पूर्वयुगं ’ म्हणजे कलियुगाचा पूर्वभाग होय . तो किती म्हटला तर ‘ चत्वार्यब्दसहस्त्राणि० ’ ह्या पूर्वोक्त व्यासवचनावरुन ४४०० वर्षैपर्यंत समजावा . तेथपर्यंत कलियुगांत सर्वाधान करावें . त्याच्यापुढें तर ‘ यावद्वर्णविभागोस्ति० ’ ह्या देवलवचनावरुन वर्णविभाग आहे तोंपर्यंत अर्धाधान करावें , असें सांगतात . वरील व्यासवचनांत संन्यासाचा जो निषेध केला , तो त्रिदंड संन्यासाचा समजावा . इति कलिवर्ज्य प्रकरणाची प्राकृत टीका समाप्त झाली .
इति तृतीयपरिच्छेदपूर्वार्धः समाप्तः