आतां रजोदोषाविषयींचा निर्णय सांगतो -
अथरजोदोषेनिर्णयः माधवीये प्रारंभात्प्राग्विवाहस्यमातायदिरजस्वला निवृत्तिस्तस्यकर्तव्यासहत्वश्रुतिचोदनात् प्रारंभात् नांदीश्राद्धात् नांदीमुखंविवाहादावित्यादिनातस्यैवप्रारंभोक्तेः मेधातिथिः चौलेचव्रतबंधेचविवाहेयज्ञकर्मणि भार्यारजस्वलायस्यप्रायस्तस्यनशोभनं वधूवरान्यतरयोर्जननीचेद्रजस्वला तस्याः शुद्धेः परंकार्यंमांगल्यंमनुरब्रवीत् वृद्धमनुः विवाहव्रतचूडासुमातायदिरजस्वला तदानमंगलंकार्यंशुद्धौकार्यंशुभेप्सुभिः गर्गः यस्योद्वाहादिमांगल्येमातायदिरजस्वला तदानतत्प्रकर्तव्यमायुः क्षयकरंयतः नांदीश्राद्धोत्तरंरजोदोषेतुकपर्दिकारिकासु सूतिकोदक्ययोः शुद्ध्यैगांदद्याद्धोमपूर्वकम् प्राप्तेकर्मणिशुद्धिः स्यादितरस्मिन्नशुध्यति अलाभेसुमुहूर्तस्यरजोदोषेचसंगेत श्रियंसंपूज्यतत्कुर्यात्पाणिग्रहणमंगलं हैमींमाषमितांपद्मांश्रीसूक्तविधिनार्चयेत् प्रत्यृचंपायसंहुत्वाअभिषेकंसमाचरेदिति सूतकादिसंकटेतु कूष्मांडीभिर्घृतंहुत्वापयस्विनींगांचदत्वाविवाहादिकुर्यादितिचवक्ष्यते ।
माधवीयांत - “ विवाहाचा प्रारंभ होण्याच्या पूर्वीं जर वधूची किंवा वराची माता रजस्वला होईल, तर रजाची निवृत्ति होईपर्यंत विवाह होत नाहीं. कारण, माता व पिता या दोघांना मिळून अपत्यांच्या संस्कारांचा अधिकार श्रुतीनें सांगितला आहे. ” येथें विवाहाचा प्रारंभ म्हणजे नांदीश्राद्ध समजावें. कारण, “ विवाहादि मंगल कार्यांचे ठायीं नांदीश्राद्ध हा प्रारंभ. ” इत्यादि वचनानें नांदीश्राद्ध हाच प्रारंभ सांगितला आहे. मेधातिथि - “ चौल, उपनयन, विवाह, यज्ञ, या कर्मांमध्यें ज्याचीं भार्या रजस्वला होईल त्याचें फारकरुन शुभ होत नाहीं. वधूची किंवा वराची माता जर रजस्वला होईल तर ती शुद्ध झाल्यानंतर मंगल कार्य करावें असें मनु सांगतो. ” वृद्धमनु - “ विवाह, उपनयन, चौल हीं कर्तव्य असतां जर माता रजस्वला होईल तर तें विवाहादि मंगल करुं नये. कल्याणेच्छूंनीं तिची शुद्धि झाल्यानंतर तें मंगल करावें. ” गर्ग - “ ज्याचें विवाहादि मंगल कार्य करावयाचें असतां जर त्याची माता रजस्वला होईल तर त्या वेळीं तें मंगल कार्य करुं नये. कारण, त्या वेळीं केलेलें तें मंगलकार्य त्याच्या आयुष्याचा क्षय करणारें आहे. ” नांदीश्राद्ध झाल्यानंतर रजोदोष उपस्थित झाला असेल तर सांगतो कपर्दिकारिकेंत - “ सूतिका आणि रजस्वला यांच्या शुद्धीसाठीं होम करुन गोप्रदान करावें. म्हणजे प्राप्त असलेल्या कर्माविषयीं शुद्धि होते. इतर कर्माविषयीं शुद्धि होत नाहीं. रजोदोष प्राप्त झालेला असून दुसरा चांगला मुहूर्त मिळत नसेल, तर लक्ष्मीची यथाविधि पूजा करुन उपस्थित झालेलें विवाहादि मंगल करावें. लक्ष्मीच्या पूजेचा प्रकार असा -
माषपरिमित सुवर्णाची लक्ष्मीप्रतिमा करुन श्रीसूक्तविधीनें तिची पूजा करावी. नंतर श्रीसूक्ताच्या प्रत्येक ऋचेनें पायसाचा होम करुन अभिषेक करावा. ” सूतकादि संकट उपस्थित झालें असेल तर तैत्तिरीयशाखेंतील कूष्मांडी ऋचांनीं घृताचा होम करुन दूध देणारी गाई ब्राह्मणाला देऊन विवाहादि मंगल कार्य करावें, असें पुढें विवाहभेद सांगितल्यावर सांगावयाचें आहे.