आतां गृहारंभाविषयीं मुहूर्त सांगतो -
अथगृहारंभः ज्योतिर्निबंधेबादरायणः वैशाखेफाल्गुनेपौषेश्रावणेमार्गशीर्षके सूत्रारंभः शिलान्यासः स्तंभारंभः प्रशस्यते नारदः सौम्यफाल्गुनवैशाखमाघश्रावणकार्तिकाः मासाः स्युर्गृहनिर्माणेपुत्रारोग्यधनप्रदाः अत्रवृषसिंहवृश्चिकाः वैशाखश्रावणकार्तिकाः सौराज्ञेयाइतिकालादर्शः तत्रैवकारणतंत्रेस्थिरमासेस्थिरेराशौस्थिरेंशेनववेश्मनाम् कुर्वीतस्थापनंशंकोः स्तंभस्थापनमेववा कार्तिकनिषेधस्तुलापरः कुंभेमासेऽपिसर्वेषांमंदिराणामुपक्रमम् महर्षयः प्रशंसंतिधान्यागारंविहायच निषेधोधान्यगृहपरः पाकभोजनशालादौमार्गशीर्षश्चफाल्गुनः रथ्यागेहमठादौचसहस्यः शुचिरेवतु पौषाषाढनिषेधस्तुप्रधानगृहपरः नप्रधानगृहारंभंकुर्यात्पौषेशुचावपीतितत्रैवोक्तेः ज्योतिस्तत्त्वे पूर्वापरास्यंतुनभोंत्यपौषेयाम्योत्तरास्यंसहसिद्वितीये कार्यंगृहंजीवबुधर्क्षगार्कंनीचास्तगौजीवसितौचहित्वा रत्नमालायां कर्कनक्रहरिकुंभगतेऽर्केपूर्वपश्चिममुखानिगृहाणि तौलिमेषवृषवृश्चिकयातेदक्षिणोत्तरमुखानिवदंति दैवज्ञवल्लभः शोकंधान्यंपंचतांनिः पशुत्वंस्वाप्तिंनैः स्वसंगरंभृत्यनाशम् स्वंश्रीप्राप्तिंवह्निभीतिंचलक्ष्मींकुर्युश्चैत्राद्यागृहारंभकाले ॥
ज्योतिर्निबंधांत बादरायण - " वैशाख , फाल्गुन , पौष , श्रावण , मार्गशीर्ष , या मासांत सूत्रारंभ , शिलान्यास , स्तंभारोपण हीं प्रशस्त होत . " नारद - " मार्गशीर्ष , फाल्गुन , वैशाख , माघ , श्रावण , कार्तिक , हे मास गृह बांधण्याविषयीं शुभ होत ; ते पुत्र , आरोग्य , धन , यांतें देणारे होतात . " येथें वृषभ , सिंह , वृश्चिक या संक्रांतींस रवि असतां क्रमेंकरुन वैशाख , श्रावण , कार्तिक , हे मास सौरमानानें घ्यावे , असें कालादर्श सांगतो . तेथेंच कारणतंत्रांत सांगतो - " स्थिरमासांत स्थिरलग्नावर आणी स्थिरांशीं नूतन गृहाचें शंकुस्थापन , व स्तंभस्थापन हीं कृत्यें करावीं . " कार्तिकमासाचा जो निषेध सांगितला तो तुलासंक्रांतिरुप कार्तिकविषयक आहे . " कुंभसंक्रांतीस रवि असतां सर्व प्रकारचे गृहांचा आरंभ करावा , धान्यागाराचा ( कोठाराचा ) मात्र आरंभ करुं नये , असें महर्षि सांगतात . " कुंभमासाचा निषेध सांगितला आहे तो धान्यगृहविषयक समजावा . " स्वयंपाकगृह , भोजनगृह , इत्यादि गृहांविषयीं मार्गशीर्ष , फाल्गुन हे मास शुभ होत . रथ्यागृह ( धर्मशाळा ), मठ , इत्यादिकांविषयीं पौष , आषाढ हे मास उक्त होत . " पौष व आषाढ यांचा निषेध आहे तो मुख्य गृहाविषयीं जाणावा . कारण , " पौष व आषाढ या मासांत मुख्य गृह बांधूं नये " असें तेथेंच सांगितलें आहे . ज्योतिस्तत्त्वांत - " श्रावण , फाल्गुन , पौष या मासांत गृह पूर्वाभिमुख व पश्चिमाभिमुख बांधावें . मार्गशीर्ष , वैशाख या मासांत गृह दक्षिणाभिमुख व उत्तराभिमुख बांधावें . धन , मीन , मिथुन , कन्या , ह्या राशींत रवि वर्ज्य करुन व नीचस्थानगत आणि अस्तंगत गुरु व शुक्र वर्ज्य करुन गृह बांधावें . " रत्नमालेंत - " कर्क , मकर , सिंह , कुंभ ह्या राशींस रवि असतां पूर्वाभिमुख व पश्चिमाभिमुख गृहें बांधावीं . तुला , मेष , वृषभ , वृश्चिक या स्थानीं रवि असतां दक्षिणोत्तरमुख गृहें बांधावीं . " दैवज्ञवल्लभ - " शोक , धान्य , मरण , पशुराहित्य , द्रव्यवृद्धि , द्रव्यनाश , युद्ध , भृत्यनाश , धनप्राप्ति , लक्ष्मीप्राप्ति , अग्निभीति , लक्ष्मीप्राप्ति , याप्रमाणें क्रमेंकरुन चैत्रादिमासांचीं फलें जाणावीं . "
गर्गः त्र्युत्तरामृगरोहिण्यांपुष्येमैत्रेकरत्रये धनिष्ठाद्वितयेपौष्णेगृहारंभः प्रशस्यते रोहिण्यांश्रवणत्रयेदितियुगेहस्तत्रयेमूलकेरेवत्युत्तरफल्गुनीष्वुरगभेमैत्रोत्तराषाढयोः शस्तंवास्तुकुजार्कवर्जितदिनेगोकुंभसिंहेमुखेकन्यायांमिथुनेनभः शुचिसहोराधोर्जकेफाल्गुने कालादर्शेसनत्कुमारः आदित्यभौमवर्जंतुसर्वेवाराः शुभप्रदाः वास्तुशास्त्रे मार्गशीर्षेतथापौषेवैशाखेश्रावणेतथा फाल्गुनेचकृतंवेश्मसर्वसंपत् प्रदंभवेत् कार्तिकेमाघमासेचचैत्रेज्येष्ठेतथाश्विने मास्याषाढेभाद्रपदेनकुर्यात्सर्वथागृहं द्वितीयाचतृतीयचपंचमीसप्तमीतथा त्रयोदशीचदशमीपूर्णाचैकादशीतथा वेश्मारंभेशुभायस्युर्विशेषाच्छुक्लपक्षगाः व्यवहारसारे शिलान्यासः प्रकर्तव्योगृहाणांश्रवणेमृगे पौष्णेहस्तेचरोहिण्यांपुष्याश्विन्युत्तरात्रये वास्तुप्रदीपे अधोमुखैर्भैर्विदधीतखातंशिलास्तथैवोर्ध्वमुखैश्चपट्टम् तिर्यड्मुखैर्द्वारकपाटयानंगृहप्रवेशोमृदुभिर्ध्रुर्वैश्च लल्लः स्नानंचपाकंशयनंच भोज्यंगजालयंवाजिगृहंधनस्य देवस्यपूर्वादिदिशिक्रमेणमध्येसभाभूपनिवेशनाय शिल्पशास्त्रे कन्यासिंहेतुलायांभुजगपतिमुखंशंभुकोणेग्निखातंवायव्येस्यात्तदास्यंत्वलिधनमकरेईशखातंवदंति कुंभेमीनेचमेषेनिऋतिदिशिमुखंखातवायव्यकोणेचाग्नेः कोणेमुखंवैवृषमिथुनगतेकर्कटेरक्षखातं तत्त्वचिंतामणौ यत्रदैर्घ्यंगृहादीनांद्वात्रिंशद्धस्ततोधिकं नतत्रचिंतयेद्धीमान् गुणानायव्ययादिकान् राजमार्तंडः आयव्ययौमासशुद्धिंतृणागारेनचिंतयेत् शिलान्यासादिनोकुर्यात्तथागारेपुरातने व्यवहारतत्त्वे निषिद्धेष्वपिकालेषुस्वानुकूलेशुभेदिने तृणकाष्ठगृहारंभेमासदोषोनविद्यते चंडेश्वरः पूर्णादित्वष्टमींयावत् पूर्वास्यंवर्जयेद्गृहं उत्तरास्यंनकुर्वीतनवम्यादिचतुर्दशीं अमावास्याष्टमींयावत्पश्चिमास्यंविवर्जयेत् नवम्यादौतथायाम्यंयावत्कृष्णचतुर्दशीं ध्रुवं दृष्ट्वाथवास्मृत्वाकर्तव्यंवास्तुरोपणम् सायाह्नवर्जदिवसेरात्रौत्यक्त्वामहानिशाम् वराहः दक्षिणपूर्वेकोणेकृत्वापूजांशिलांन्यसेत् प्रथमाम् शेषाः प्रदक्षिणेनस्तंभाश्चैवंसमुत्थाप्याः कालादर्शेवास्तुशास्त्रे खातेचैवशिलान्यासेवृषचक्रंप्रशस्यते तच्चोक्तंशांतिरत्ने चतुर्हस्तप्रमाणंतुखात्वागर्तंसमंततः कुंभोदकैः सेचयेयुः शांतिपाठपुरः सरं ततईशानदिग्भागेसाक्षतंरत्नपंचकम् साज्यंकुंभंस्थिरंमुक्त्वावास्तुपूजनपूर्वकं कुंभोपरिशिलान्यासः कर्तव्यस्तदनंतरम् ॥
गृहाविषयीं नक्षत्रादि सांगतो गर्ग - " तीन उत्तरा , मृग , रोहिणी , पुष्य , अनुराधा , हस्त , चित्रा , स्वाती , धनिष्ठा , शततारका , रेवती ह्या नक्षत्रांवर गृह बांधण्यास आरंभ करावा . रोहिणी , श्रवण , धनिष्ठा , शततारका , पुनर्वसु , पुष्य , हस्त , चित्रा , स्वाती , मूळ , रेवती , उत्तराफल्गुनी , आश्लेषा , अनुराधा , उत्तराषाढा , ह्या नक्षत्रांवर ; मंगळ व रवि वर्ज्य करुन इतर वारीं ; वृषभ , कुंभ , सिंह , कन्या , मिथुन ह्या लग्नांवर ; श्रावण , आषाढ , मार्गशीर्ष , वैशाख , कार्तिक , फाल्गुन , ह्या मासांत गृहारंभ प्रशस्त होय . " कालादर्शांत सनत्कुमार - " आदित्य व भौम हे वर्ज्य करुन इतर सर्व वार शुभ होत . " वास्तुशास्त्रांत - " मार्गशीर्ष , पौष , वैशाख , श्रावण , फाल्गुन या मासांत घर बांधलें असतां तें सर्वसंपत्तिदायक होतें . कार्तिक , माघ , चैत्र , ज्येष्ठ , आश्विन , आषाढ , भाद्रपद या मासांत कदापि गृह बांधूं नये . द्वितीया , तृतीया , पंचमी , सप्तमी , त्रयोदशी , दशमी , पूर्णिमा , एकादशी , ह्या तिथी गृहारंभ करण्याविषयीं शुभ होत . ह्याच तिथि शुक्लपक्षींच्या विशेष शुभ होत . " व्यवहारसारांत - " श्रवण , मृग , रेवती , हस्त , रोहिणी , पुष्य , अश्विनी , तीनउत्तरा ह्या नक्षत्रांवर गृहांचा शिलान्यास ( जोतें बांधण्यास आरंभ ) करावा . " वास्तुप्रदीपांत - " अधोमुख नक्षत्रावर गृहाचा खात ( म्हणजे भूमि खणून शुद्धि करणें तो ), व शिलान्यास हीं कृत्यें करावीं . ऊर्ध्वमुख नक्षत्रांवर पट्टबंधन ( पाटबंध ) करावें . तिर्यड्मुख नक्षत्रांवर द्वार , कपाट , यात्रा , हीं कृत्यें करावीं . मृग , रेवती , अनुराधा , चित्रा , तीन उत्तरा , रोहिणी ह्या नक्षत्रांवर गृहप्रवेश करावा . " लल्ल - " राजानें स्नानगृह , पाकगृह , शयनगृह , भोजनगृह , हस्तिगृह , अश्वगृह , कोशगृह , देवगृह , हीं आठ गृहें पूर्वादि आठ दिशांस अनुक्रमानें बांधावीं , आणि मध्यभागीं सभागृह करावें . " शिल्पशास्त्रांत - " कन्या , सिंह तुला ह्या राशींस रवि असतां शेषाचें मुख ईशानदिशेस असतें . खात आग्नेयदिशेस करावें . वृश्चिक , धन , मकर , ह्या राशींस रवि असतां शेषमुख वायव्यदिशेस असतें . खात ईशानकोणीं करावें . कुंभ , मीन , मेष , ह्या राशींस रवि असतां निऋतिदिशेस शेषमुख आहे . खात वायव्य कोणीं करावें , आणि वृषभ , मिथुन , कर्क ह्या राशींस रवि असतां आग्नेयीस शेषमुख आहे . खात निऋतिदिशेकडे करावें . " तत्त्वचिंतामणींत - " बत्तीस हातांहून अधिक लांबीचीं गृहें , राजवाडे , धर्मशाळा यांविषयीं बुद्धिमान् पुरुषानें आय , व्यय इत्यादि गुण पाहूं नयेत . " राजमार्तंड - " जुनें घर व गवताचें घर यांविषयीं आय , व्यय , आणि महिना यांची शुद्धि पाहण्याचें प्रयोजन नाहीं , व शिलान्यासादि कृत्येंही करुं नयेत . " व्यवहारतत्त्वांत - " तृण , काष्ठें सांचविण्यासाठीं गृह कर्तव्य असतां मास वगैरे निषिद्ध असले तरी आपणास अनुकूल चंद्र , व शुभदिवस पाहून त्याचा आरंभ करावा . मास पाहण्याचें कारण नाहीं . " चंडेश्वर - " पौर्णिमेपासून कृष्णाष्टमीपर्यंत पूर्वाभिमुख गृह बांधूं नये . नवमीपासून चतुर्दशीपर्यंत उत्तराभिमुख गृह बांधूं नये . अमावास्येपासून शुक्ल अष्टमीपर्यंत पश्चिमाभिमुख गृह वर्ज्य करावें . शुक्ल नवमीपासून शुक्ल चतुर्दशीपर्यंत दक्षिणाभिमुख गृह बांधूं नये . वास्तुपुरुष पुरावयाचा त्या कालीं ध्रुवाचें दर्शन अथवा स्मरण करावें . वास्तुपुरुष दिवसा पुरणें असेल तर सायंकाल वर्ज्य करावा . रात्रीं वास्तुपुरुष पुरणें असेल तर महानिशा ( मध्यरात्रीचा १ प्रहर ) टाकावी . " वराह - " दक्षिणपूर्व कोणीं ( आग्नेय दिशेस ) पूजा करुन प्रथम शिळा पुरावी . बाकीच्या सर्व शिळा प्रदक्षिणक्रमानें पुराव्या . स्तंभारोपणही याप्रमाणेंच करावें . " कालादर्शांत - वास्तुशास्त्रांत - " खात व शिलान्यास यांविषयीं वृषवास्तुचक्र प्रशस्त होय . तें शांतिरत्नांत सांगितलें आहे . ( तें असें - सूर्यनक्षत्रापासून दिवसनक्षत्रापावेतों नक्षत्रें मोजावीं . पहिलीं सात नक्षत्रें अशुभ . आठव्या नक्षत्रापासून अकरा नक्षत्रें शुभ . अवशिष्ट दहा तीं अशुभ . याप्रमाणें वृषवास्तुचक्र पाहून ज्या दिवशीं शुभनक्षत्र असेल त्या दिवशीं आरंभ करावा . अथवा चवथ्या नक्षत्रापासून , पंधराव्या नक्षत्रापासून , आणि तेविसाव्या नक्षत्रापासून क्रमानें ४।४।५ हीं नक्षत्रें गृहारंभ व प्रवेश यांविषयीं अशुभ होत . ) " आसमंतात् चार हस्तप्रमाण असा खाडा खणून तो खाडा , कुंभोदकानें शांतिसूक्तांचा पाठ करीत ब्राह्मणांनीं सिंचन करावा . नंतर त्यांत ईशानी दिशेस तंडुलसहित पंचरत्नें घालून घृतयुक्त कलश स्थापन करुन त्या कलशावर वास्तुपूजन करुन त्यावर मुहूर्तशिला पुरावी . "