आतां गृहप्रवेशास मुहूर्त सांगतो -
अथगृहप्रवेशः बृहस्पतिः नंदायांदक्षिणद्वारंभद्रायांपश्चिमेनतु जयायामुत्तरद्वारंपूर्णायांपूर्वतोविशेत् वसिष्ठः कृत्वाशुक्रंपृष्ठतोवामतोऽर्कंविप्रान् पूज्यानग्रतः पूर्णकुंभं हर्म्यंरम्यंतोरणस्रग्वितानैः स्त्रीभिः स्रग्वीगीतवाद्यौर्विशेच्च व्यवहारतत्त्वे सौम्यायनेश्रावणमार्गपौषेजन्मर्क्षलग्नोपचयोदयेंशे वामंगतेर्केगृहवास्तुपूजांकृत्वाविशेद्वेश्मभकूटशुद्धम् वास्तुशास्त्रे लग्नात्प्रागादितोदिक्षुद्वौद्वौराशीनियोजयेत् एकमेकंन्यसेत्कोणेसूर्यंवामंविचिंतयेत् वसिष्ठः चंद्रजार्यसितवासरेषुचश्रीकरंसुतमहार्थलाभदं सूर्यसूनुदिवसेस्थिरप्रदंकिंतुचौरभयमत्रनिर्दिशेत् रत्नकोशे पुष्येधनिष्ठामृगवारुणेषुस्वायंभुवर्क्षेत्रिषुचोत्तरासु अक्षीणचंद्रेशुभदोनृपस्यतिथावरिक्तेचगृहप्रवेशः नारदः प्रवेशोमध्यमोज्ञेयः सौम्यकार्तिकमासयोः माघफाल्गुनवैशाखज्येष्ठमासेषुशोभनः अकपाटमनाच्छन्नमदत्तबलिभोजनं गृहंनप्रविशेद्धीमानापदामाकरोहितत् ज्येष्ठः क्षुद्रग्रहपरः वृद्धगार्ग्यः भानोश्चभौमस्यविहायवारौशूलादियोगानशुभान्नवापि रिक्तातिथिश्चापिमृदुध्रुवर्क्षेसौम्य यनेचप्रविशेद्गृहाणि रत्नमालायाम् त्वाष्ट्रमित्रशशिपूषदैवतान्यामनंतिमुनयोमृदून्यथ मैत्रगेहरतिभूषणां बरोद्गीतमंगलविधानमेषुच रोहिण्युत्तरात्रयंचध्रुवाणि प्रवेशश्चवास्तुपूजांकृत्वाकार्यः जीर्णोद्धारेतथोद्यानेतथा गृहनिवेशने नवप्रासादभवनेप्रासादपरिवर्तने द्वाराभिवर्तनेतद्वत् प्रासादेषुगृहेषुच वास्तूपशमनंकुर्यात् पूर्वमेव विचक्षणइतिमात्स्योक्तेः तत्रैव कृत्वाग्रतोद्विजवरानथपूर्णकुंभंदध्यक्षताम्रदलपुष्पफलोपशोभम् दत्वाहिरण्यवसनानितथाद्विजेभ्योमांगल्यशांतिनिलयंस्वगृहंविशेच्च गृह्योक्तहोमविधिनाबलिकर्मकुर्यात् प्रासादवास्तुशमनेचविधिर्यउक्तः संतर्पयेद्दिजवरानथभक्ष्यभोज्यैः शुक्लांबरः स्वभवनंप्रविशेत्सुरुपम् ॥
बृहस्पति - " नंदा ( प्रतिपदा , षष्ठी , एकादशी ) तिथींचे ठायीं दक्षिणद्वारानें गृहांत प्रवेश करावा . भद्रा ( द्वितीया , सप्तमी , द्वादशी ) तिथींचे ठायीं पश्चिमद्वारानें प्रवेश करावा . जया ( म्हणजे तृतीया , अष्टमी , त्रयोदशी ) तिथींचे ठायीं उत्तरद्वारानें प्रवेश करावा . आणि पूर्णा ( म्हणजे पंचमी , दशमी , पौर्णिमा ) तिथींचे ठायीं पूर्वद्वारानें गृहांत प्रवेश करावा . " वसिष्ठ - " शुक्र पृष्ठभागीं करुन आणि सूर्य वामभागीं करुन गृहप्रवेश करावा . ( म्हणजे जर शुक्र पूर्वदिशेस उदय पावणारा आहे तर पूर्वद्वारानेम गृहांत प्रवेश करावा . शुक्र पश्चिम दिशेस उदय पावणारा आहे तर पश्चिमद्वारानें प्रवेश करावा . ( वामभागीं सूर्य - प्रवेश लग्नाच्या अष्टमस्थानापासून पांचलग्नीं सूर्य असतां पूर्वाभिमुख गृहप्रवेशीं वामभागीं सूर्य होतो . प्रवेशलग्नाच्या द्वितीयस्थानापासून पांचलग्नांस सूर्य असतां पश्चिमाभिमुख गृहीं वामभागीं सूर्य होतो . प्रवेशलग्नाच्या पंचमस्थानापासून पांचलग्नांस सूर्य असतां दक्षिणाभिमुख गृहीं वामभागीं सूर्य होतो . आणि प्रवेशलग्नाच्या एकादशस्थानापासून पांचलग्नांस सूर्य असतां उत्तराभिमुख गृहीं वामभागीं सूर्य होतो . ) ज्या नूतन गृहांत प्रवेश करावयाचा तें गृहतोरणें , पुष्पमाला , चांदवे यांनीं सुशोभित करुन नंतर ब्राह्मणांची पूजा करुन अग्रभागीं उदकपूर्णकुंभ करुन ब्राह्मण , सुवासिनी स्त्रिया यांसहित मंगल वाद्यांनीं युक्त , माला धारण करणार्या यजमानानें गृहांत प्रवेश करावा . " व्यवहारतत्त्वांत - " उत्तरायणांत , आणि श्रावण , मार्गशीर्ष , पौष , या मासांत , जन्मलग्न व जन्मराशीपासून शुभ लग्नीं व शुभ लग्नांशीं ; वामरवि असतां , वास्तुपूजा करुन शुद्ध राशिकूटावर गृहांत प्रवेश करावा . " वामरवि पाहण्याचा प्रकार - वास्तुशास्त्रांत - " प्रवेशलग्नापासून प्रत्येक दिशेस दोन दोन आणि विदिशेस एक एक असे राशी अप्रदक्षिण क्रमानें योजावे . आणि वामभागीं सूर्य पाहावा . " ( म्हणजे प्रवेशलग्न मेष असेल तर मेष वृषभ पूर्वेस , मिथुन ईशानीस , कर्क सिंह उत्तरेस , कन्या वायव्येस . येथें वृषभापासून कन्याराशीपर्यंत कोणत्याही राशीस सूर्य असतां पश्चिमद्वारानें प्रवेश असल्यास वामभागीं सूर्य होतो . याप्रमाणें इतर राशींचाही जाणावा . ) वसिष्ठ - " बुध , गुरु , शुक्र ह्या वारीं गृहप्रवेश केला असतां तें गृह संपत्ति , पुत्र व अर्थलाभ देणारें होतें . शनिवारीं स्थैर्यकारक होतें , पण चोरभय प्राप्त होतें असें समजावें . " रत्नकोशांत - " पुष्य , धनिष्ठा , मृग , शततारका , रोहिणी , तीन उत्तरा , ह्या नक्षत्रांवर ; चंद्र पूर्ण असतां रिक्तारहिततिथींचे ठायीं गृहप्रवेश शुभदायक आहे . " नारद - " मार्गशीर्ष व कार्तिक या मासांत गृहप्रवेश मध्यम होय . माघ , फाल्गुन , वैशाख , आणि ज्येष्ठ या मासांत गृहप्रवेश शुभ होय . दरवाजे , भिंती , आच्छादन यांहीं विरहित अशा गृहांत बुद्धिमान् पुरुषानें कदापि प्रवेश करुं नये . तसेंच वास्तुशांति , व ब्राह्मणभोजन हीं केल्यावांचून गृहप्रवेश करुं नये . केला असतां अनेक आपत्ति प्राप्त होतात . " ज्येष्ठमास प्रवेशाविषयीं शुभ सांगितला तो अल्पगृहाविषयीं समजावा . वृद्धगार्ग्य - " रवि , भौम हे वार ; शूलादिक अशुभ नऊ योग ; आणि रिक्तातिथि हे सर्व वर्ज्य करुन मृग , रेवती , चित्रा , अनुराधा , तीन उत्तरा , रोहिणी ह्या नक्षत्रांवर उत्तरायणांत गृहप्रवेश करावा . " रत्नमालेंत - " चित्रा , अनुराधा , मृग , रेवती हीं मृदुनक्षत्रें ; ह्या नक्षत्रांवर मित्रकार्य , गृहप्रवेश , क्रीडा , अलंकार , वस्त्र , गायन , मंगलकृत्यें , हीं करावीं . " गृहप्रवेश वास्तुशांति करुन करावा . कारण , " जीर्णोद्धार , उद्यान ( बाग ), गृहप्रवेश , नवीन प्रासाद ( राजवाडा , देवालय ) करणें , प्रासाद फिरवणें , द्वार फिरवणें , प्रासादगृह करणें , यांचेठायीं पूर्वींच वास्तुपूजा ( वास्तुशांति ) करावी " असें मत्स्यपुराणवचन आहे . तेथेंच सांगतो - " दधि , अक्षता , आम्रपल्लव , पुष्पें , फळें यांहीं सुशोभित असा उदकपूर्णकुंभ व ब्राह्मण यांना अग्रभागीं करुन व ब्राह्मणांना सुवर्ण आणि वस्त्रें देऊन मांगल्य व शांतिमंत्रांचा घोष करीत गृहाप्रत प्रवेश करावा . आपापल्या गृह्यसूत्रांत सांगितलेल्या विधीनें होम व बलि द्यावे , आणि प्रासादवास्तुशमनाविषयीं जो विधि सांगितला आहे तो करावा . भक्ष्यभोज्य पदार्थांनीं ब्राह्मणांना तृप्त करुन श्वेतवस्त्र धारण करुन स्वगृहांत प्रवेश करावा . "