मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
उपनयन ( मौंजी ) संस्कार

तृतीयपरिच्छेद - उपनयन ( मौंजी ) संस्कार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां उपनयन ( मौंजी ) संस्कार सांगतो .

अथोपनयनं आश्वलायनः गर्भाष्टमेष्टमेवाब्देपंचमेसप्तमेपिवा द्विजत्वंप्राप्नुयाद्विप्रोवर्षेत्वेकादशेनृपः मनुः ब्रह्मवर्चसकामस्यकार्यंविप्रस्यपंचमे राज्ञोबलार्थिनः षष्ठेवैश्यस्यार्थार्थिनोष्टमे विष्णुः षष्ठेतुधनकामस्यविद्याकामस्यसप्तमे अष्टमेसर्वकामस्यनवमेकांतिमिच्छतः आपस्तंबः गर्भाष्टमेषुब्राह्मणमुपनयीत बहुवचनंगर्भषष्ठगर्भसप्तमयोः प्राप्त्यर्थमितिसुदर्शनभाष्ये केचित्तुविप्रस्यषष्ठंनमन्यंते आपस्तंबः अथ काम्यानि सप्तमेब्रह्मवर्चसकाममष्टमआयुष्कामंनवमेतेजस्कामंदशमेऽन्नाद्यकाममेकादशइंद्रियकामंद्वादशेपशुकाममुपनयेत् ‍ गौणकालमाहमनुः आषोडशाद्ब्राह्मणस्यसावित्रीनातिवर्तते आद्वाविंशात्क्षत्रबंधोराचतुर्विंशतेर्विशः ज्योतिर्निबंधे अग्रजाबाहुजावैश्याः स्वावधेरुर्ध्वमब्दतः अकृतोपनयाः सर्वेवृषलाएवतेस्मृताः ।

आश्वलायन - " गर्भापासून आठव्या वर्षी किंवा जन्मापासून आठव्या वर्षी , अथवा पांचव्या किंवा सातव्या वर्षीं ब्राह्मणाची मौंजी करावी . क्षत्रियाची अकराव्या वर्षीं करावी . " मनु - " वेदाध्ययनाचे समृद्धीची इच्छा करणार्‍या ब्राह्मणाची मौंजी पांचव्या वर्षीं करावी . बलाची इच्छा करणार्‍या क्षत्रियाची सहाव्या वर्षीं , आणि धनाची इच्छा करणार्‍या वैश्याची आठव्या वर्षीं मौंजी करावी . " विष्णु - " धनाची इच्छा करणार्‍याची सहाव्या वर्षीं , विद्येची इच्छा करणार्‍याची सातव्या वर्षीं , सर्वकामाची इच्छा कराणार्‍याची आठव्या वर्षीं , आणि कांतीची इच्छा करणार्‍याची नवव्या वर्षीं मौंजी करावी . " आपस्तंब - " गर्भापासून आठव्या वर्षीं ब्राह्मणाची मौंजी करावी . " ह्या आपस्तंबवचनांत ‘ गर्भाष्टमेषु ’ ह्या बहुवचनावरुन गर्भापासून सहाव्या व गर्भापासून सातव्या वर्षीं ब्राह्मणाची मौंजी करावी , असें सुदर्शनभाप्यांत सांगितलें आहे . केचित् ‍ तर सहावे वर्षीं ब्राह्मणाची मौंजी करावी , असें मानीत नाहींत . आपस्तंब - " आतां काम्य उपनयनें सांगतो - ब्रह्मवर्चस कामाचें सातव्या वर्षीं , आयुष्कामाचें आठव्या वर्षीं , तेजस्कामाचें नवव्या वर्षीं , अन्नादिकामाचें दहाव्या वर्षीं इंद्रियकामाचें अकराव्या वर्षीं , आणि पशुकामाचें बाराव्या वर्षीं उपनयन करावें . " गौणकाल सांगतो मनु - " ब्राह्मणाची सोळा वर्षैंपर्यंत , क्षत्रियाची बेवीस वर्षैंपर्यंत आणि वैश्याची चोवीस वर्षैंपर्यंत , गायत्री अतिक्रांत ( गत ) होत नाहीं . " ज्योतिर्निबंधांत - " ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य हे आपापल्या वर्षांच्या अवधीनंतर उपनयनविरहित राहतील तर ते सर्व वृषलच ( शूद्रच ) म्हटले आहेत . "

गर्गः विप्रंवसंतेक्षितिपंनिदाघेवैश्यंघनांतेव्रतिनंविदध्यात् ‍ माघादिशुक्लांतिकपंचमासाः साधारणावास कलद्विजानां हेमाद्रौज्योतिषे माघादिषुचमासेषुमौंजीपंचसुशस्यते कालादर्शेवृद्धगार्ग्यः माघादिमासषट्केतुमेखलाबंधनंमतं चूडाकरणमन्नंचश्रावणादौविवर्जयेत् ‍ मैत्रेयसूत्रेपि वसंतोग्रीष्मः शरदित्यृतवोवर्णानुपूर्व्येणमाघादिषण्मासावासर्ववर्णानामेतदुदगयनमनयोर्विकल्पइति अत्रेदंतत्त्वं नात्रवसंतेनोत्तरायणस्यसंकोचः श्राद्धेदर्शस्यापराह्णविधिनेवाधानेवसंतादेः कृत्तिकादिनेवसायंप्रातर्विधिनायावज्जीवविधेरिवयुक्तः आद्ययोः परस्परव्यभिचारान्नियमः अंत्येनिमित्तेसांगकर्मोक्तेः कालापेक्षा इहतूत्तरायणंविनावसंतस्याभावान्ननियमः नवानिमित्तत्वं नचैकंवृणीतइतिवदवयुत्यानुवादः तद्वद्वाक्यभेदापरिहारात् ‍ उत्तरायणविधिवैयर्थ्यात्त्वनुकल्पोयमिति माघआदिर्येषांपंचनांएवंषट् ‍ ।

गर्ग - " वसंतऋतूंत ब्राह्मणाची , ग्रीष्मऋतूंत क्षत्रियाची , शरदृतूंत वैश्याची , मौंजी करावी . अथवा माघापासून ज्येष्ठा पर्यंत पांच मास सर्व द्विजातींस साधारण विहित होत . " हेमाद्रींत ज्योतिषांत - ‘‘ माघादि पांच मासांचे ठायीं मौंजी प्रशस्त आहे . " कालादर्शांत वृद्धगार्ग्य - " माघादि सहा मासांचे ठायीं मेखलाबंधन ( मौंजी ), चौल , अन्नप्राशन हे संस्कार करावे . श्रावणादि मासांत करुं नयेत . " मैत्रेयसूत्रांतही - " वसंतऋतु , ग्रीष्मऋतु , आणि शरदृतु हे ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य यांना अनुक्रमानें सांगितले आहेत . अथवा माघापासून आषाढापर्यंत सहा मास सर्ववर्णांना ( ब्राह्मणादिकांना ), सांगितले आहेत . हे माघादिक सहा मास म्हटले हें उदगयन समजावें . वसंतादि ऋतु व उदगयन यांचा विकल्प समजावा " याचें तत्त्व असें आहे कीं , ब्राह्मणादिकांना वसंतादि ऋतु आणि उत्तरायण असें सांगितलें आहे . त्यांत वसंत ऋतूनें उत्तरायणाचा संकोच होतो ( म्हणजे वसंत ऋतु असतां उत्तरायण घ्यावें . इतर उत्तरायण नाहीं . ) असें म्हणूं ? जसें - श्राद्धाविषयीं दर्श ( अमावास्या ) सांगितला आणि अपराह्ण काल सांगितला आहे . तेथें अपराह्णानें दर्शाचा संकोच होतो , म्हणजे अपराह्णावांचून इतर दर्श घ्यावयाचा नाहीं तसें . आणि जसें - अग्नीच्या आधानाविषयीं वसंतादिक ऋतु आणि कृत्तिकादिक नक्षत्रें सांगितलीं आहेत . तेथें कृत्तिकादिक नक्षत्रांनीं वसंतादिकांचा संकोच होतो तसा . आणि अग्निहोत्राविषयीं सायंप्रातः काल व यावज्जीवपर्यंत काल सांगितला आहे , तेथें सायंप्रातः कालानें यावज्जीव कालाचा संकोच होतो तसा . ह्या तीन दृष्टांतांप्रमाणें येथें वसंतानें उत्तरायणाचा संकोच होतो , असें म्हणूं नये . कारण , दृष्टांतांत व यांत वैषम्य आहे , तें असें - श्राद्धाविषयीं व आधानाविषयीं जे दोन दोन काल सांगितले त्यांचा परस्पर व्यभिचार असल्यामुळें त्या ठिकाणीं नियम केला आहे . म्हणजे - श्राद्धाविषयीं दर्श व अपराह्ण असे दोन काल सांगितले आहेत . तेथें परस्पर व्यभिचार असा - दर्श नसलेल्या काळीं अपराह्ण असतो व अपराह्ण नसलेल्या काळीं दर्श असतो , म्हणून त्या ठिकाणीं अपराह्णयुक्त दर्शच घ्यावा , असा नियम झाल्यामुळें इतर दर्शाची व्यावृत्ति झाल्यानें अर्थात् ‍ संकोच झाला आहे . तसेंच आधानाविषयीं वसंतादि ऋतु व कृत्तिकादि नक्षत्रें यांचाही परस्पर व्यभिचार आहे . म्हणजे वसंतादि ऋतु नसल्या काळीं कृत्तिकादिक नक्षत्रें आहेत आणि कृत्तिकादिरहित काळीं वसंतादिक ऋतु आहेत . म्हणून त्या ठिकाणींही कृत्तिकादियुक्त वसंतादिकाल घ्यावा , असा नियम झाल्यानें अर्थात् ‍ इतर वसंतादिकांचा व्यावृत्तिरुप संकोच झाला आहे . शेवटच्या दृष्टांतांत सायंप्रातः कालनिमित्तानें सांग कर्म होतें असें सांगितल्यामुळें सायंप्रातः कालाची अग्निहोत्रहोमाविषयीं अपेक्षा आहे . प्रकृतस्थलीं उत्तरायणावांचून इतर कालीं वसंत ऋतु नसल्याकारणानें परस्पर व्यभिचार येत नाहीं . म्हणून नियम होत नाहीं . अथवा उपनयनाला वसंत ऋतु निमित्तही नाहीं . आतां ‘ एकं वृणीते ’ म्हणजे एक ऋषि वरावा , या वाक्यांत जसा अनेकांतून एक ऋषि पृथक् ‍ करुन त्याला वरण सांगितलें आहे . तो जसा अवयुत्य ( पृथक् ‍ कृत्य ) अनुवाद केला आहे , तसा येथें अवयुत्यानुवाद समजूं ? असें म्हणतां येत नाहीं . कारण , त्या ठिकाणीं वाक्यभेद ( भिन्नवाक्यें ) झाला आहे . तसा येथेंही वाक्यभेद होईल ? म्हणजे उत्तरायणाचा विधि वेगळा आणि वसंतऋतूचा विधि वेगळा होईल ! तसें झालें असतां उत्तरायणविधि व्यर्थ होईल ! म्हणून वसंतावांचून उत्तरायणविधि हा अनुकल्प आहे , असें समजावें .

पारिजातेबृहस्पतिः झषचापकुलीरस्थोजीवोप्यशुभगोचरः अतिशोभनतांदद्याद्विवाहोपनयादिषु वृत्तशते नजन्मधिष्ण्येनचजन्ममासेनजन्मकालीयदिनेविदध्यात् ‍ ज्येष्ठेनमासिप्रथमस्यसूनोस्तथासुताया अपिमंगलानि राजमार्तंडः जातंदिनंदूषयतेवसिष्ठोह्यष्टौचगर्गोनियतंदशात्रिः जातस्यपक्षंकिलभागुरिश्चशेषाः प्रशस्ताः खलुजन्ममासि जन्ममासेतिथौभेचविपरीतदलेसति कार्येमंगलमित्याहुर्गर्गभार्गवशौनकाः जन्ममासनिषेधेपिदिनानिदशवर्जयेत् ‍ आरभ्यजन्मदिवसाच्छुभाः स्युस्तिथयोपरे ग्रंथांतरे व्रतेजन्मत्रिखारिस्थोजीवोपीष्टोर्चनात्सकृत् ‍ शुभोतिकालेतुर्याष्टव्ययस्थोद्विगुणार्चनात् ‍ शुद्धिर्नैवगुरोर्यस्यवर्षेप्राप्तेष्टमेयदि चैत्रेमीनगतेभानौतस्योपनयनंशुभं जन्मभादष्टमेसिंहेनीचेवाशत्रुभेगुरौ मौंजीबंधः शुभः प्रोक्तश्चैत्रेमीनगतेरवौ नारदः बालस्यबलहीनोपिशांत्याजीवोबलप्रदः यथोक्तवत्सरेकार्यमनुक्तेचोपनायनं शांतिश्चाग्रेवक्ष्यते ।

पारिजातांत बृहस्पति - " मीन , धनु , कर्क या स्थानींचा गुरु गोचरीं ( राशीस ) जरी अशुभ असला तरी तो विवाह , उपनयन इत्यादिकांविषयीं अति शुभकारक होय . " वृत्तशतांत - " जन्मनक्षत्रांवर , जन्ममासांत , आणि जन्मदिवशीं , मंगल कार्यै करुं नयेत . ज्येष्ठपुत्र व ज्येष्ठकन्या यांचीं मंगल कार्यैं ज्येष्ठ मासांत करुं नयेत . " सारा जन्ममास टाकण्यास अशक्य असेल तर अपवाद सांगतो - राजमार्तंड - " जन्मदिवस निषिद्ध आहे , असें वसिष्ठ सांगतो . जन्मदिवसापासून आठ दिवस वर्ज्य करावे , असें गर्ग सांगतो . जन्मदिवसापासून दहा दिवस वर्ज्य करावे , असें अत्रि सांगतो . आणि भागुरीच्या मतीं पक्ष वर्ज्य करावा . जन्ममासांतील अवशेष राहिलेले दिवस प्रशस्त होत . जन्ममास , जन्मतिथि , आणि जन्मनक्षत्र यांचे ठायीं मंगलकार्य कर्तव्य असतां उत्तर भागांत करावें ; असें गर्ग , भार्गव शौनक हे सांगतात . सर्व जन्ममासाचा निषेध जरी आहे तथापि जन्मदिवसापासून दहा दिवस वर्ज्य करावे . शेष दिवस शुभ होत . " ग्रंथांतरांत - " जन्मराशीपासून प्रथम , तृतीय , दशम , षष्ठ , या स्थानींचा गुरु असतां एकवार पूजा ( बृहस्पतिशांति ) केल्यानें शुभकारक जाणावा . अतिकाळ झाला असतां ४।८।१२ या स्थानींचा असतांही द्विवार पूजेनें शुभकारक होतो , आठवें वर्ष प्राप्त झालें असतां जरी गुरुबल नसलें तरी चैत्र मासांत मीनराशीचा सूर्य असतां त्याचें उपनयन करावें . जन्मराशीपासून अष्टमस्थ , सिंहस्थ , नीचस्थ ( मकरस्थ ) अथवा शत्रुस्थानस्थित असा गुरु असला तथापि मीनराशीचा सूर्य असतां चैत्रमासांत मौजीबंध शुभ होय . " नारद - " कुमाराला गुरु जरी बलहीन असला तथापि बृहस्पतिशांति केली असतां तो बल देणारा होतो . मुख्य कालीं व अमुख्यकालीं कधींही मौंजी कर्तव्य असतां गुरुबल नसेल तर बृहस्पतिशांति करुन मौंजी करावी . " बृहस्पतिशांति पुढें ( विवाहप्रकरणीं ) सांगूं .

ज्योतिर्निबंधेनृसिंहः तृतीयापंचमीषष्ठीद्वितीयाचापिसप्तमी पक्षयोरुभयोश्चैवविशेषेणसुपूजिताः धर्मकामौसितेपक्षेकृष्णेचप्रथमातथा शुक्लत्रयोदशींकेचिदिच्छंतिमुनयस्तथा टोडरानंदेवसिष्ठः नैमित्तिकमनध्यायंकृष्णेचप्रतिपद्दिनं मेखलाबंधनेशस्तंचौलेवेदव्रतेष्वपि प्रशस्ताप्रतिपत्कृष्णेनपूर्वापरसंयुता एतदतीतकालस्यार्तस्यबटोरुपनयनविषयम् ‍ प्रशस्ताप्रतिपत्कृष्णेकदाचिच्छुभगेविधौ चंद्रेबलयुतेलग्नेवर्षाणामतिलंघनइतिव्यासोक्तेरित्याहुः एवंसप्तम्यपि तस्यागलग्रहत्वोक्तेः ।

ज्योतिर्निबंधांत नृसिंह - " शुक्ल व कृष्ण दोन्ही पक्षांतील द्वितीया , तृतीया , पंचमी , षष्ठी , सप्तमी ह्या तिथि विशेषेंकरुन ( उपनयनाविषयीं ) प्रशस्त जाणाव्या . शुक्ल पक्षांतील दशमी व एकादशी प्रशस्त . कृष्णपक्षांतील प्रतिपदा प्रशस्त . केचित् ‍ मुनि शुक्लत्रयोदशी प्रशस्त असें सांगतात . " टोडरानंदांत वसिष्ठ - " नैमित्तिक अनध्याय , व कृष्णप्रतिपदा दिवस हे मौंजी , चौल , आणि वेदव्रतें ह्यांविषयीं प्रशस्त आहेत . कृष्णपक्षांतील प्रतिपदा प्रशस्त सांगितली ती पौर्णिमायुक्त प्रशस्त नाहीं . द्वितीयायुक्त प्रशस्त आहे . " हें वचन ज्याचा उपनयनकाल गेला असेल त्याच्या मौंजीविषयीं जाणावें . कारण , " लग्नाला शुभस्थानीं चंद्र , राशीस चंद्रबळ व लग्न बलिष्ठ असें असून ज्याच्या उपनयनाच्या काळाचीं वर्षैं फार गेलीं असतील त्याच्या उपनयनाविषयीं कृष्णप्रतिपदा कदाचित् ‍ प्रशस्त आहे . " असें व्यासवचन आहे , असें विद्वान् ‍ सांगतात . याचप्रमाणें सप्तमीही समजावी . कारण , ती सप्तमी गलग्रह म्हणून सांगितली आहे .

बृहस्पतीः शुक्लपक्षः शुभः प्रोक्तः कृष्णश्चांत्यत्रिकंविना तथा मिथुनेसंस्थितेभानौज्येष्ठमासोंनदोषकृत् ‍ मदनरत्नेनारदः विनर्तुनावसंतेनकृष्णपक्षेगलग्रहे अपराह्णेचोपनीतः पुनः संस्कारमर्हति अपराह्णस्त्रेधाविभक्तदिनतृतीयांशइत्युक्तंतत्रैव वसंतेगलग्रहोनदोषायेत्यर्थः नारदः कृष्णपक्षेचतुर्थीचसप्तम्यादिदिनत्रयम् ‍ त्रयोदशीचतुष्कंचअष्टावेतेगलग्रहाः वसिष्ठः पापांशकगतेचंद्रेअरिनीचस्थितेपिच अनध्यायेचोपनीतः पुनः संस्कारमर्हति अनध्यायस्यपूर्वेद्युस्तस्यचैवापरेहनि व्रतबंधंविसर्गंचविद्यारंभंनकारयेत् ‍ राजमार्तंडः आरंभानंतरंयत्रप्रत्यारंभोनसिध्यति गर्गादिमुनयः सर्वेतमेवाहुर्गलग्रहं ज्योतिर्निबंधे अष्टकासुचसर्वासुयुगमन्वंतरादिषु अनध्यायंप्रकुर्वीततथासोपपदास्वपि सोपपदास्तुस्मृत्यर्थसारे सिताज्येष्ठेद्वितीयाचआश्विनेदशमीसिता चतुर्थीद्वादशीमाघेएताः सोपपदाः स्मृताः एवंप्रदोषदिनंवर्ज्यं प्रदोषस्वरुपमाहगोभिलः षष्ठीचद्वादशीचैवअर्धरात्रोननाडिका प्रदोषमिहकुर्वीततृतीयातूनयामिका ज्योतिर्निबंधेव्यासः याचैत्रवैशाखसितातृतीयामाघस्यसप्तम्यथफाल्गुनस्य कृष्णेद्वितीयोपनयेप्रशस्ताप्रोक्ताभरद्वाजमुनींद्रमुख्यैः अत्रापिकृष्णप्रतिपद्वज्ज्ञेयम् ‍ यत्तुबृहद्गार्ग्यः अनध्यायेप्रकुर्वीतयस्तुनैमित्तिकोभवेत् ‍ सप्तमीमाघशुक्लेतुतृतीयाचाक्षयातथा बुधत्रयेंदुवाराश्चशस्तानिव्रतबंधनइति तत्प्रायश्चित्तार्थेपनयनविषयम् ‍ स्वाध्यायवियुजोघस्त्राः कृष्णप्रतिपदादयः प्रायश्चित्तनिमित्तेतुमेखलाबंधनेमता इतितेनैवोक्तेरितिनिर्णयामृतकालादर्शौं यद्यप्यथोपेतपूर्वस्येत्युक्त्वा अनिरुक्तंपरिदानंकालश्चेत्याश्वलायनेनपुनरुपनयनेकालानियमउक्तस्तथापिनिमित्तानंतरमेवसः तदानीमकरणेतुपूर्वोक्तकालोज्ञेयः प्रतिवेदमुपनयनेकालानियमइतितुयुक्तम् ‍ गर्गः ग्रहेरवींद्वोरवनिप्रकंपेकेतूद्गमोल्कापतनादिदोषे व्रतेदशाहानिवदंतितज्ज्ञास्त्रयोदशाहानिवदंतिकेचित् ‍ संकटेतुचंडेश्वरः दाहेदिशांचैवधराप्रकंपेवज्रप्रपातेथ विदारणेच केतौतथोल्कांशुकणप्रपातेत्र्यहंनकुर्याद्व्रतमंगलानि तत्रैव वेदव्रतोपनयनेस्वाध्यायाध्ययनेतथा नदोषोयजुषांसोपपदास्वध्ययनेपि च ॥

बृहस्पति - " शुक्लपक्ष शुभ होय . शेवटचे पांच दिवस वर्ज्य करुन कृष्णपक्ष शुभ होय . " तसेंच - " मिथुनस्थ रवि असतां ज्येष्ठमास दोषकारक होत नाहीं . " मदनरत्नांत नारद - " वसंतव्यतिरिक्त ऋतूंत कृष्णपक्ष , गलग्रह व अपराह्ण काल , यांचे ठायीं ज्याचें उपनयन झालें तो पुनरुपनयनास योग्य होतो . " अपराह्ण काल म्हणजे दिवसाचे तीन भाग करुन त्यांपैकीं तिसरा भाग होय , असें तेथेंच ( मदनरत्नांतच ) सांगितलें आहे . वसंत ऋतूंत गलग्रहाचा दोष नाहीं , असा भाव . नारद - " कृष्णपक्षांतील चतुर्थी , दोन्ही पक्षांतील सप्तमी , अष्टमी , नवमी , आणि त्रयोदशीपासून ४ तिथि ह्या आठ तिथि गलग्रह होत . " वसिष्ठ - ‘ पापांशीं किंवा षष्ठस्थानीं , व नीचस्थानीं चंद्र असतां अथवा अनध्याय असतां ज्याचें उपनयन होईल तो पुनः संस्कारास योग्य होतो . अनध्यायाचे पूर्वदिवशीं किंवा दुसर्‍या दिवशीं मौंजी , समावर्तन ( सोडमुंज ), आणि वेदारंभ हे करुं नयेत . " राजमार्तंड - " जेथें आरंभ झाल्यानंतर प्रत्यारंभ ( दुसर्‍या दिवशीं अध्ययन ) होत नाहीं तो दिवस गलग्रह होय , असें गर्गादि मुनि सांगतात . " ज्योतिर्निबंधांत - " सर्व अष्टका , युगादि तिथि , मन्वादि तिथि , आणि सोपपदा तिथि यांचे ठायीं अनध्याय करावा , म्हणजे वेदाध्ययन करुं नये . " सोपपदा तिथि सांगतो स्मृत्यर्थसारांत - " ज्येष्ठशुक्ल द्वितीया , आश्विनशुक्ल दशमी , माघशुक्लांतील चतुर्थी व द्वादशी ह्या तिथि सोपपदा जाणाव्या . " याप्रमाणें प्रदोषदिवसही वर्ज्य करावा . प्रदोषाचें स्वरुप सांगतो गोभिल - " षष्ठी व द्वादशी ह्या तिथि मध्यरात्रीच्या आंत संपल्या असतां त्या दिवशीं प्रदोष होतो . आणि तृतीया एक प्रहर रात्रीच्या आंत संपली असतां त्या दिवशीं प्रदोष होतो . " ज्योतिर्निबंधांत व्यास - " चैत्र व वैशाख या मासांतील शुक्लपक्षींच्या तृतीया , माघमासांतील सप्तमी , आणि फाल्गुन मासांतील कृष्णपक्षाची द्वितीया , ह्या तिथि मौंजीविषयीं प्रशस्त आहेत , असें भरद्वाज मुनि सांगतात . " ह्या तिथींचाही निर्णय कृष्णप्रतिपदेप्रमाणें , म्हणजे ज्याचा अतीत काल झाला असेल त्याच्या मौंजीविषयीं ह्या तिथि प्रशस्त होत असें जाणावें . आतां जें बृहद्गार्ग्य - " नैमित्तिक अनध्यायदिवशीं मौंजी करावी . माघशुक्ल सप्तमी , अक्षय्यतृतीया , आणि बुध , गुरु , शुक्र , इंदु हे वार मौंजीविषयीं प्रशस्त होत " असें सांगतो तें प्रायश्चित्तार्थ उपनयनाविषयीं आहे . कारण ,

" कृष्णप्रतिपदाप्रभृति जे अनध्याय दिवस उपनयनाविषयीं सांगितले , ते अध्ययनाचा वियोग करणारे असल्यामुळें पहिल्या उपनयनाविषयीं प्रशस्त नाहींत . प्रायश्चित्ताकरितां जें उपनयन त्याविषयीं प्रशस्त होत . " असें त्याच ग्रंथकारानें सांगितलें आहे , असें निर्णयामृत कालादर्श सांगतात . आतां जरी " ज्याचें उपनयन पूर्वीं झालें आहे त्याला " असें सांगून " पुनरुपनयनाविषयीं परिदान व काल सांगितला नाहीं " असा आश्वलायन सूत्रकारानें पुनरुपनयनाविषयीं कालाचा अनियम सांगितला आहे , तथापि तो अनियम उपनयनाचें निमित्त उत्पन्न झाल्यावर लगेच उपनयन कर्तव्य असतां समजावा . निमित्त उत्पन्न झाल्यावर त्या वेळीं पुनरुपनयन केलें नसेल तर पूर्वीं सांगितलेला काळ जाणावा . प्रत्येक वेदाचें उपनयन कर्तव्य असतां कालाचा नियम नाहीं , असें म्हणणें तर युक्त आहे . गर्ग - " चंद्रसूर्यांचें ग्रहण , भूकंप , धूमकेतूची ( शेंडेनक्षत्राची ) उत्पत्ति , उल्कापात ( आकाशांतून अग्निरुप तारा पडणें ), इत्यादि दोष उपस्थित झाले असतां दहा दिवसपर्यंत मौंजी करुं नये . तेरा दिवसपर्यंत करुं नये असें केचित् ‍ सांगतात . " संकट असेल तर सांगतो चंडेश्वर - " दिशा पेटणें , भूकंप , वज्रपात ( वीज पडणें ), भूविदारण , केतु ( शेंडे नक्षत्र ) उगवणें , उल्कापात ( आकाशांतून अग्निरुप तारा पडणें ) हीं झालीं असतां तीन दिवसपर्यंत उपनयन मंगल कार्यै करुं नयेत . " तेथेंच सांगतो - " वेदव्रतें , उपनयन , वेदाचें अध्ययन , यांविषयीं यजुर्वेद्यांना सोपपदा तिथींचा दोष नाहीं . "

हेमाद्रौज्योतिषे हस्तत्रयेपुष्यधनिष्ठयोश्चपौष्णाश्विसौम्यादितिविष्णुभेषु शस्तेतिथौचंद्रबलेनयुक्ते कार्यौद्विजानांव्रतबंधमोक्षौ ज्योतिर्निबंधेनारदः श्रेष्ठान्यर्कत्रयांत्येज्यचंद्रादित्युत्तराणिच विष्णुत्रयाश्विमित्राब्जयोनिभान्युपनायने बृहस्पतिः त्रिषूत्तरेषुरोहिण्यांहस्तेमैत्रेचवासवे त्वाष्ट्रेसौम्यपुनर्वस्वोरुत्तमंह्युपनायनं ज्योतिर्निबंधे पूर्वाहस्तत्रयेसार्पश्रुतिमूलेषुबह्वृचां यजुषांपौष्णमैत्रार्कादित्यपुष्यमृदुध्रुवैः सामगानांहरीशार्कवसुपुष्योत्तराश्विभैः धनिष्ठादितिमैत्रार्केष्विंदुपौष्णेष्वथर्वणां राजमार्तंडस्तु ब्राह्मणस्यपुनर्वसुं निषेधति ताराचंद्रानुकूलेषुग्रहाब्देषुशुभेष्वपि पुनर्वसौकृतोविप्रः पुनः संस्कारमर्हति ।

हेमाद्रींत ज्योतिषांत - " हस्त , चित्रा , स्वाती , पुष्य , धनिष्ठा , रेवती , अश्विनी , मृग , पुनर्वसु , श्रवण या नक्षत्रीं ; पूर्वोक्त तिथींस चंद्रबल असतां द्विजातींची मौंजी व समावर्तन ( सोडमुंज ) हीं करावीं . " ज्योतिर्निबंधांत - नारद - " हस्त , चित्रा , स्वाती , रेवती , पुष्य , मृग , पुनर्वसु , तीन उत्तरा , श्रवण , धनिष्ठा , शततारका , अश्विनी , अनुराधा , रोहिणी हीं नक्षत्रें उपनयनाविषयीं श्रेष्ठ होत . " बृहस्पति - " तीन उत्तरा , रोहिणी , हस्त , अनुराधा , धनिष्ठा , चित्रा , मृग , पुनर्वसु , ह्या नक्षत्रांवर उपनयन उत्तम होय . " ज्योतिर्निबंधांत - " पूर्वा , हस्त , चित्रा , स्वाती , आश्लेषा , श्रवण , मूल ह्या नक्षत्रांवर ऋक् ‍ शाख्यांची मौंजी करावी . रेवती , अनुराधा , हस्त , पुनर्वसु , पुष्य , मृग , चित्रा , तीन उत्तरा , रोहिणी ह्या नक्षत्रांवर यजुः शाख्यांची मौंजी करावी . श्रवण , आर्द्रा , हस्त , धनिष्ठा , पुष्य , तीन उत्तरा , अश्विनी ह्या नक्षत्रांवर सामवेद्यांची मौंजी करावी . धनिष्ठा , पुनर्वसु , अनुराधा , हस्त , मृग , रेवती , ह्या नक्षत्रांवर अथर्वणवेद्यांची मौंजी करावी . " राजमार्तंड तर - ब्राह्मणांविषयीं पूनर्वसूचा निषेध करितो . तो असा - " तारा , चंद्र , ग्रह , वर्ष हीं सर्व शुभ असतांही जर पुनर्वसु नक्षत्रावर मौंजी होईल तर तो ब्राह्मण पुनरुपनयनास योग्य होतो . "

ज्योतिर्निबंधेनारदः सर्वेषांजीवशुक्रज्ञवाराः प्रोक्ताव्रतेशुभाः चंद्रार्कौमध्यमौज्ञेयौसामबाहुजयोः कुजः शाखाधिपतिवारश्चशाखाधिपबलंतथा शाखाधिपतिलग्नंचदुर्लभंत्रितयंव्रते शाखाधिपाश्चरत्नसंग्रहे ऋगथर्वसामयजुषामधिपागुरुसौम्यभौमसिताः जीवसितौविप्राणांक्षत्रस्यारोष्णगूविशांचंद्रइति पारिजातेबृहस्पतिः बह्वृचानांगुरोर्वारेयजुर्वेदजुषांबुधे सामगानांधरासूनोरथर्वविदुषांरवेः अत्रलग्नशुद्ध्यादिदैवज्ञेभ्योज्ञेयम् ‍ विस्तरभयान्नोच्यते ।

ज्योतिर्निबंधांत नारद - " गुरु , शुक्र , बुध हे वार सर्वांस उपनयनाविषयीं श्रेष्ठ होत . रविवार व सोमवार हे मध्यम होत . सामवेदी व क्षत्रिय यांना भौमवार प्रशस्त आहे . शाखाधिपतीचा वार , शाखाधिपतीचें बल , आणि शाखाधिपतीचें लग्न हीं तीन , मौंजीविषयीं दुर्लभ होत . " शाखाधिपति सांगतो रत्नसंग्रहांत - ऋग्वेदाचा अधिपति गुरु , अथर्वण वेदाचा अधिपति बुध , सामवेदाचा अधिपति भौम , यजुर्वेदाचा अधिपति शुक्र , याप्रमाणें वेदाधिपति होत . गुरु व शुक्र हे ब्राह्मणांचे अधिपति . मंगळ व रवि हे क्षत्रियांचे अधिपति . चंद्र हा वैश्यांचा अधिपति . याप्रमाणें वर्णाधिपति जाणावे . " पारिजातांत बृहस्पति - " ऋक् ‍ शाख्यांची गुरुवारीं , यजुः शाख्यांची बुधवारीं , सामवेद्यांची भौमवारीं , आणि अथर्वणवेद्यांची रविवारीं मौंजी करावी . " ह्या मौंजीविषयीं लग्नशुद्धि , षड्वर्गशुद्धि इत्यादि निर्णय ज्योतिष्यांकडून जाणावा . ग्रंथविस्तर होईल म्हणून मी सांगत नाहीं .

लल्लः व्रतेऽह्निपूर्वसंध्यायांवारिदोयदिगर्जति तद्दिनेस्यादनध्यायोव्रतंतत्रविवर्जयेत् ‍ ज्योतिर्निबंधे नांदीश्राद्धंकृतंचेत्स्यादनध्यायस्त्वकालिकः तदोपनयनंकार्यंवेदारंभंनकारयेत् ‍ एतद्वह्वृचातिरिक्तानां तेषांतद्दिनेवेदारंभाभावात् ‍ अतस्तेषामुपनयनंनभवत्येव ऐतरेयोपनिषदि मृगादिज्येष्ठांतंवर्षर्तुः तंविनावर्षादौत्रिरात्रमनध्यायइतिवेदभाष्येउक्तं एतच्चप्रातस्तनिते सायंस्तनितेतुदिवैवचरुंश्रपयित्वासायंसंध्योत्तरंहोमंकुर्यात् ‍ नसंध्यागर्जितेकालेनवृष्ट्युत्पातदूषिते ब्रह्मौदनंपचेदग्नौपक्कंचेन्ननिवर्तते ब्रह्मौदनंपचेदग्नौपक्कमन्नंनदुष्यतीतिसंग्रहोक्तेरितिप्रयोगरत्नेभट्टचरणाः अत्रशांतिरप्युक्तानृसिंहप्रसादे ब्रह्मौदनविधेः पूर्वंप्रदोषेगर्जितंयदि तदाविघ्नकरंज्ञेयंबटोरध्ययनस्यतत् ‍ तस्यशांतिप्रकारंतुवक्ष्येशास्त्रानुसारतः प्रधानंपायसंसाज्यंद्रव्यंशांतियजौभवेत् ‍ सूक्तंबृहस्पतेर्विद्वान् ‍ पठेत्प्रज्ञाविवृद्धये गायत्रीचैवमंत्रः स्यात्प्रायश्चित्तंतुसर्पिषा धेनुंसवत्सकांदद्यादाचार्यायपयस्विनीं ब्राह्मणान्भोजयेत्पश्चात्ततोब्रह्मौदनंचरेत् ‍ ।

लल्ल - " ज्या दिवशीं उपनयन करावयाचें त्या दिवशीं पूर्वसंध्येचे ठायीं मेघ गर्जना करील तर तो अनध्याय दिवस आहे म्हणून त्या दिवशीं उपनयन करुं नये . " ज्योतिर्निबंधांत - " नांदीश्राद्ध केल्यानंतर जर अकालिक ( अकालीं मेघगर्जनारुप ) अनध्याय प्राप्त होईल तर उपनयन करावें ; पण वेदारंभ करुं नये . " हें वचन ऋक् ‍ शाखिव्यतिरिक्तविषयक जाणावें . कारण , ऋक् ‍ शाख्यांचा वेदारंभ उपनयनदिवशीं होत नाहीं , मग वेदारंभ करुं नये , हें सांगणें त्यांना लागू होत नाहीं . म्हणून ऋक् ‍ शाख्यांचें उपनयन ( नांदीश्राद्धोत्तर अकालिक अनध्याय असतां ) होत नाहींच . ऐतरेय उपनिषदांत - मृगनक्षत्रापासून ज्येष्ठानक्षत्रापर्यंत जो काल तो वर्षाकाल सांगितला आहे . त्यावांचून अन्य कालीं वृष्टि , गर्जना इत्यादि असतां त्रिरात्र अनध्याय होतो , असें वेदभाष्यांत सांगितलें आहे . हा ( उपनयन करुं नये असा ) जो पूर्वीं निर्णय सांगितला तो प्रातः कालीं गर्जना असतां समजावा . सायंकालीं गर्जना होण्याचा संभव असेल तर दिवसासच चरु शिजवून ठेवून सायंसंध्योत्तर अनुप्रवचनीय होम करावा . कारण , " संध्यागर्जित काल , वृष्टि व उत्पात यांनीं दूषित काल , अशा कालीं अग्नीवर ब्रह्मौदन ( चरु ) शिजवूं नये . गर्जना , वृष्टि वगैरे होण्याचे पूर्वीं शिजविलेला चरु असेल तर व्यर्थ होत नाहीं . म्हणून अशा समयीं ब्रह्मौदन ( चरु ) पूर्वीं शिजवावा . शिजविलेला चरु दुष्ट होत नाहीं . " असें संग्रहकाराचें वचन आहे , असें प्रयोगरत्नांत नारायणभट्ट सांगतात . चरु शिजवून ठेविला नसतां गर्जना इत्यादि निमित्त उपस्थित होईल तर त्याविषयीं शांतिही सांगतो नृसिंहप्रसादांत - " ब्रह्मौदनविधीचे पूर्वीं प्रदोषकालीं जर गर्जना होईल तर ती गर्जना बटूचे विद्येला विघ्नकारक आहे , यास्तव त्याची शांति शास्त्रानुसार सांगतो - ह्या शांतियज्ञाचे ठायीं घृतयुक्त पायस हें प्रधानद्रव्य , त्याचा होम करावा . प्रज्ञावृद्धीसाठीं बृहस्पतिसूक्ताचा पाठ करावा . गायत्रीमंत्रेंकरुन प्रधान होम करुन प्रायश्चित्ताहुति घृताच्या घालाव्या . नंतर दूध देणारी सवत्स अशी गाई आचार्याला देऊन ब्राह्मणांना भोजन देऊन नंतर ब्रह्मौदन चरु शिजवावा . "

आतां उपनयन करण्याचे अधिकारी सांगतो .

उपनयनेचाधिकारिणः माधवीयेवृद्धमनुनोक्ताः पितापितामहोभ्राताज्ञातयोगोत्रजाग्रजाः उपायनेधिकारीस्यात्पूर्वाभावेपरः परः प्रयोगरत्ने पितैवोपनयेत्पुत्रंतदभावेपितुः पिता तदभावेपितुर्भ्रातातदभावेतुसोदरः पितेतिविप्रपरं नक्षत्रियादेः तेषांपुरोहितएव उपनयनस्यदृष्टार्थत्वात् ‍ तेषांचाध्यापनेऽनधिकारात् ‍ अत्रपितृव्यस्यज्येष्ठभ्रात्रभावेधिकारः असंस्कृतास्तुसंस्कार्याभ्रातृभिः पूर्वसंस्कृतैरितियाज्ञवल्क्योक्तेः तेनेदमविभक्तपरं पूर्वंतुविभक्तपरं मातूरजोदोषेतुप्रागुक्तम् ‍ ।

माधवीयांत वृद्धमनु - " पिता , त्याच्या अभावीं पितामह , तदभावीं भ्राता , भ्रात्याचे अभावीं ज्ञाति ( सगोत्र सपिंड ), ज्ञातीचे अभावीं गोत्रज , याप्रमाणें पूर्वाच्या अभावीं पुढचा अधिकारी जाणावा . हा अधिकारी कुमारापेक्षां वयानें ज्येष्ठ असावा . " प्रयोगरत्नांत - " पित्यानेंच पुत्राचें उपनयन करावें , पित्याचे अभावीं पितामह , पितामहाचे अभावीं पितृव्य , पितृव्याचे अभावीं सोदर भ्राता . " पित्यानेंच उपनयन करावें ’ असें जें सांगितलें तें ब्राह्मणविषयक आहे . क्षत्रियादिविषयक नाहीं . कारण , क्षत्रियादिकांचें उपनयन पुरोहितानेंच करावें . त्यांच्या पित्यानें करुं नये ; कारण , उपनयन हें अध्ययनासाठीं आहे . क्षत्रियादिकांना अध्ययन पढविण्याचा अधिकार नाहीं . येथें उपनयनाविषयीं ज्येष्ठ भ्रात्याला पूर्वीं अधिकार . त्याच्या अभावीं पितृव्याला अधिकार समजावा . कारण , " असंस्कृत भ्रात्यांचे संस्कार पूर्वीं संस्कार झालेल्या भ्रात्यांनीं करावे " असें याज्ञवल्क्याचें वचन आहे . यावरुन प्रयोगरत्नांत भ्रात्याच्या पूर्वीं पितृव्याला अधिकार सांगितला तो पितृव्यादिक अविभक्त असतां समजावा . आणि विभक्त असतील तर वृद्धमनूनें सांगितलेला भ्रात्याला अधिकार समजावा . माता रजस्वला झाली असतां तद्विषयक निर्णय पूर्वीं ( चौलप्रकरणीं ) सांगितला आहे .

आतां षंढ , मूक इत्यादिकांचा विशेष सांगतो .

अथषंढमूकादीनांविशेषः प्रयोगपारिजातेब्राह्मे ब्राह्मण्यांब्राह्मणाज्जातोब्राह्मणः सइतिश्रुतिः तस्माच्चषंढबधिरकुब्जवामनपंगुषु जडगद्गदरोगार्तशुष्कांगविकलांगिषु मत्तोन्मत्तेषुमूकेषुशयनस्थेनिरिंद्रिये ध्वस्तपुंस्त्वेषुचैतेषुसंस्काराः स्युर्यथोचितं मत्तोन्मत्तौनसंस्कार्यावितिकेचित् ‍ प्रचक्षते कर्मस्वनधिकाराच्चपातित्यंनास्तिचैतयोः तदपत्यंचसंस्कार्यमपरेत्वाहुरन्यथा संस्कारमंत्रहोमादीन्करोत्याचार्यएवतु उपनेयांश्चविधिवदाचार्यस्यसमीपतः आनीयाग्निसमीपंवासावित्रींस्पृश्यवाजपेत् ‍ कन्यास्वीकरणादन्यत्सर्वंविप्रेणकारयेत् ‍ एवमेवद्विजैर्जातौसंस्कार्यौकुंडगोलकौइति स्मृत्यर्थसारेप्येवं कुंडगोलकयोः संस्कार्यत्वंश्राद्धेनिषेधश्चक्षेत्रजपुत्रविषयः अन्यस्य विन्नास्वेषविधिः स्मृतइतिवचनात् ‍ अब्राह्मण्येनोपनयनाद्यप्राप्तेरित्यपरार्कः ।

प्रयोगपारिजातांत ब्राह्मांत - " ब्राह्मणापासून ब्राह्मणी स्त्रीचे ठायीं झाला तो ब्राह्मण अशी श्रुति आहे , यास्तव षंढ , बधिर , कुब्ज ( कुबडा ), वामन ( खुजा , र्‍हस्व ), पंगु , जड , गद्गदवाक् ‍, रोगार्त , शुष्कांग , विकलांग ( ज्यास स्वभावतः कांहीं अवयव कमी आहे तो ), मत्त , उन्मत्त , मूक , शयनस्थित , इंद्रियरहित , पुरुषत्वहीन , ह्यांचे यथायोग्य संस्कार करावे . मत्त व उन्मत्त ह्यांचे संस्कार करुं नयेत . कारण , मत्त व उन्मत्त यांना कर्माविषयीं अधिकार नाहीं , म्हणून त्यांचें उपनयन झालें नाहीं , तरी त्यांना पतितपणा नाहीं . त्यांच्या अपत्यांचे संस्कार करावे , असें केचित् ‍ सांगतात . दुसरे विद्वान् ‍ असें सांगतात कीं , पूर्वोक्त सर्वांचें उपनयन करावें . ज्यांना मंत्रोच्चार , होम इत्यादिक होत नाहींत त्यांचे ते मंत्रोच्चारादिक आचार्यानेंच करावे . उपनयन करावयाच्या बटूंना आचार्याच्या समीप यथाविधि नेऊन अथवा अग्नीच्या समीप नेऊन त्यांना स्पर्श करुन गायत्री जपावी . विवाहसमयीं कन्यास्वीकारावांचून बाकीचें सर्व कृत्य ब्राह्मणद्वारा करवावें . असाच ब्राह्मणापासून झालेल्या कुंडगोलकांचा संस्कार करावा . " स्मृत्यर्थसारांतही असेंच सांगितलें आहे . कुड व गोलक यांचे संस्कार करावे हा निर्णय व त्या कुंडगोलकांचा श्राद्धभोजनाविषयीं जो निषेध केला तो , हे दोनही निर्णय क्षेत्रज पुत्रविषयक आहेत . कारण , " हा जो सवर्णमूर्धावसिक्तादि संज्ञाविधि सांगितला तो विवाहित स्त्रियांविषयीं जाणावा . " असें ( आचाराध्यायांत ) याज्ञवल्क्यवचन आहे . यास्तव अन्य ( क्षेत्रज पुत्रावांचून कुंड , गोलक ) जो पुत्र तो ब्राह्मण्यविरहित असल्यामुळें त्यास उपनयनादिक संस्कार प्राप्त होत नाहींत , असें अपरार्क सांगतो .

उपनयनंचकुमारंभोजयित्वाकार्यम् ‍ प्रागेवैनंतदहर्भोजयंतीतिमदनपारिजातेगोभिलोक्तेः गायत्र्युपदेशश्चोत्तरतोग्नेः कार्यः उत्तरेणाग्निमुपविशतः प्राड्मुखआचार्यः प्रत्यड्मुखइतरो‍ऽधीहिभोइति शांखायनसूत्रोक्तेः यद्यपि कात्यायनेनाथास्मैसावित्रीमन्वाहोत्तरतोग्नेः प्रत्यड्मुखायेत्युक्त्वादक्षिणतस्तिषतआसीनायवैकेइतिविकल्पउक्तस्तथापि कातीयानामेवसः बह्वृचानांतूत्तरएववेदैक्यात् ‍ भिक्षायांविशेषमाह कात्यायनः मातरमेवाग्रेभिक्षेत पराशरमाधवीये मातरंवास्वसारंवामातुर्वाभगिनींनिजाम् ‍ भिक्षेतभिक्षांप्रथमंयाचैनंनविमानयेत् ‍ ।

मौंजी करावयाची ती कुमाराला भोजन घालून करावी . कारण , " मौंजीच्या दिवशीं पूर्वीं ह्याला ( कुमाराला ) भोजन घालितात " असें मदनपरिजातांत गोभिलाचें वचन आहे . गायत्रीमंत्राचा उपदेश अग्नीच्या उत्तर प्रदेशीं करावा . कारण , " अग्नीच्या उत्तर प्रदेशीं बसणारा कुमार पूर्वाभिमुख आचार्य व कुमार पश्चिमाभिमुख बसून , भो आचार्य , मला गायत्रीचा उपदेश करा " असें शांखायनसूत्रवचन आहे . जरी कात्यायनानें " आतां अग्नीच्या उत्तरेस पश्चिमाभिमुख असलेल्या ह्याला ( कुमाराला ) गायत्री सांगावी " असें सांगून नंतर अग्नीच्या दक्षिणेस उभ्या राहिलेल्या किंवा बसलेल्या कुमारास गायत्री सांगावी , असें कितीएक आचार्य सांगतात . " याप्रमाणें अग्नीच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असा विकल्प सांगितला आहे , तथापि तो विकल्प कातीयांनाच समजावा . बह्वृचांना तर अग्नीच्या उत्तरेसच उपदेश समजावा . कारण , शांखायन व बह्वृच यांचा वेद एक आहे . भिक्षेविषयीं विशेष सांगतो कात्यायन - " मातेजवळच प्रथमतः भिक्षा मागावी . " पराशरमाधवीयांत - " माता , किंवा मावशी , अथवा आपली भगिनी यांच्या जवळ प्रथम भिक्षा मागावी . किंवा जी ह्या ब्रह्मचार्‍याचा अपमान करणार नाहीं तिच्याजवळ भिक्षा मागावी . "

अथसंस्कारलोपेशौनकः आरभ्याधानमाचौलात् ‍ कालेतीतेतुकर्मणाम् ‍ व्याह्रत्याग्निंतुसंस्कृत्यहुत्वाकर्मयथाक्रमं एतेष्वेकैकलोपेतुपादकृच्छ्रंसमाचरेत् ‍ चूडायामर्धकृच्छ्रंस्यादापदित्वेवमीरितं अनापदितुसर्वत्रद्विगुणंद्विगुणंचरेत् ‍ पारिजातेकात्यायनः लुप्तेकर्मणिसर्वत्रप्रायश्चित्तंविधीयते प्रायश्चित्तेकृतेपश्चाल्लुप्तंकर्मसमाचरेत् ‍ स्मृत्यर्थसारेचैवं कारिकायांतुप्रायश्चित्तेकृतेतीतंलुप्तंकर्मकृताकृतमित्युक्तं प्रायश्चित्तेकृतेपश्चादतीतमपिकर्मवै कार्यमित्येकआचार्यानेत्यन्येतुविपश्चितइति त्रिकांडमंडनेतुकालातीतेषुकार्येषुप्राप्तवत्स्वपरेषुच कालातीतानिकृत्वैवविदध्यादुत्तराणितु तत्रसर्वेषांतंत्रेणनांदीश्राद्धंकुर्यात् ‍ देशकालकर्त्रैक्यात् ‍ गणशः क्रियमाणानांमातृणांपूजनंसकृत् ‍ सकृदेवभवेच्छ्राद्धमादौनपृथगादिष्वितिछंदोगपरिशिष्टात् ‍ एतद्वहूनामपत्यानांयुगपत्संस्कारकरणविषयमिति बोपदेवः अतीतसंस्काराणांयुगपत्करणइत्यन्ये तत्रापिचौलस्योपनीत्यासहेतिपक्षेउपनीतिदिनएवानुष्ठानंनपूर्वदिने सहत्वस्यदिवसैक्येसन्निकृष्टतरत्वात् ‍ वृद्धाचारोप्येवं ।

आतां संस्कारांचा लोप झाला असतां सांगतो शौनक - गर्भाधान , पुंसवन , सीमंतोन्नयन , विष्णुबलि , जातकर्म , नामकर्म , निष्क्रमण , अन्नप्राशन आणि चौल ह्या संस्कारांचा काल अतीत झाला असतां अग्निसंस्कार करुन समस्तव्याह्रतिमंत्रांनीं प्रतिसंस्काराला क्रमेंकरुन एकेक आज्याहुतिरुप कालातिपत्तिनिमित्तक प्रायश्चित्त करावें . आणि चौलव्यतिरिक्त गर्भाधानादि संस्कारांपैकीं प्रमादानें एकेकाचा लोप असेल तर प्रत्येक संस्काराविषयीं पादकृच्छ्र प्रायश्चित्त करावें . चौलसंस्काराविषयीं अर्धकृच्छ्र करावें . याप्रमाणें हें प्रायश्चित्त करुन नंतर चौलसंस्कार करावा . आपत्ति असतां हें प्रायश्चित्त सांगितलें आहे . आपत्ति नसेल तर सर्वत्र द्विगुण करावें . पारिजातांत कात्यायन - " कर्मांचा लोप असतां सर्वत्र लोपनिमित्त प्रायश्चित्त करावें . प्रायश्चित्त केल्यानंतर लुप्तकर्म करावें . " स्मृत्यर्थसारांतही असेंच सांगितलें आहे , कारिकेंत - तर अतीताचें प्रायश्चित्त केलें असतां अतीत कर्म कृताकृत आहे असें सांगितलें आहे . तें असें : - " प्रायश्चित्त केल्यानंतर अतीत कर्म ( संस्कार ) ही करावें . असें कोणी आचार्य सांगतात . इतर विद्वान अतीत कर्म करुं नये , असें सांगतात . " त्रिकांडमंडनांत तर - " पहिलीं संस्कारादि कार्यै अतिक्रांत ( राहिलीं ) असून दूसरीं कार्यै प्राप्त झालीं असतां पूर्वींचीं ( म्हणजे ज्यांचा काळ टळून गेला आहे तीं ) केल्यानंतर पुढचीं प्राप्त झालेलीं कार्यै करावीं . त्या स्थलीं सर्व संस्कारांचें नांदीश्राद्ध तंत्रेंकरुन करावें . कारण , सर्व संस्कारांचा देश , काल व कर्ता एक आहे . " बहुत संस्कार एक समयीं करावयाचे असतां त्यांमध्यें मातृकापूजन , व नांदीश्राद्ध हीं एकवारच ( एकतंत्रानें ) करावीं . पृथक् ‍ पृथक् ‍ करुं नयेत . " असें छंदोगपरिशिष्ट वचन आहे . हें वचन बहुत अपत्यांचे एकाकालीं संस्कार कर्तव्य असतां तद्विषयक आहे , असें बोपदेव सांगतो . अतीत संस्कार एककालीं एकदम कर्तव्य असतां हें वचन आहे , असें इतर ग्रंथकार सांगतात . त्यांतही चौलसंस्कार , मौंजीसहकरणपक्षीं मौंजीच्या दिवशींच करावा . पूर्वदिवशीं करुं नये . कारण , सहपणास मौंजीचा दिवस हाच फार जवळ आहे . आणि वृद्धाचारही असाच मौंजीच्या दिवशींच चौल करण्याचा आहे .

उपनीतिदिनेमध्याह्नसंध्यामाहपारिजातेजैमिनिः यावद्ब्रह्मोपदेशस्तुतावत्संध्यादिकंचन ततोमध्याह्नसंध्यादिसर्वंकर्मसमाचरेदिति ब्रह्म गायत्री यत्तुवचनम् ‍ उपायनेतुकर्तव्यंसायंसंध्येउपासनं आरभेद्ब्रह्मयज्ञंतुमध्याह्नेतुपरेहनीति तच्छाखांतरविषयमितिपारिजातः विकल्पइतियुक्तंपश्यामः उपनयनाग्निस्त्रिरात्रंधार्यः त्र्यहमेतमग्निंधारयंतीत्यापस्तंबोक्तेः बौधायनसूत्रेतुसदाधारणमप्युक्तं उपनयनादिरग्निस्तमौपासनमित्याचक्षते पाणिग्रहणादित्येकेनित्योधार्योनुगतोनिर्मंथ्यइति इदंजातारणिपक्षे अन्यथामंथनासंभवात् ‍ ब्रह्मयज्ञेविशेषमाहतत्रैवजैमिनिः अनुपाकृतवेदस्यकर्तव्योब्रह्मयज्ञकः वेदस्थानेतुसावित्रीगृह्यतेतत्समायतइति येषांतद्दिनएववेदारंभस्तेषांनेदमितिदिक् ‍ ।

उपनयनदिवशीं मध्याह्नसंध्या सांगतो - पारिजातांत जैमिनि - " जोंपर्यंत गायत्रीचा उपदेश झाला नाहीं तोपर्यंत संध्यादिक कर्म नाहीं . गायत्रीचा उपदेश झाल्यानंतर माध्याह्नसंध्यादिक सर्व कर्म करावें . " आतां जें " उपनयनदिवशीं सायंकालीं संध्योपासन करावें , आणि दुसर्‍या दिवशीं ब्रह्मयज्ञाला आरंभ करावा " असें वचन , तें अन्यशाखाविषयक आहे , असें पारिजात सांगतो . त्या दिवशीं मध्याह्नसंध्येपासून किंवा सायंसंध्येपासून आरंभ करावा , असा विकल्प युक्त आहे , असें आम्हीं समजतों . उपनयनाग्नि तीन दिवस पर्यंत धारण करावा . कारण , " हा उपनयनाग्नि तीन दिवस धारण करितात " असें आपस्तंबवचन आहे . बौधायनसूत्रांत तर - उपनयनाग्नीचें सदा धारणही सांगितलें आहे , तें असें : - " उपनयनाचा जो अग्नि तो औपासनाग्नि असें म्हणतात . कितीएक आचार्य विवाहापासून जो अग्नि तो औपासनाग्नि असें म्हणतात . तो औपासनाग्नि नित्य धारण करावा . गेला असतां मंथन करुन उत्पन्न करावा . " ‘ अग्नि नष्ट झाला असतां मंथन करुन उत्पन्न करावा ’ असें जें सांगितलें तें अरणी सिद्ध असतां जाणावें . अरणी सिद्ध नसेल तर मंथनाचा असंभव आहे . ब्रह्मयज्ञाविषयीं विशेष सांगतो . पारिजातांत - जैमिनि - " ज्याच्या वेदाचें उपाकरण झालें नाहीं त्यानेंही ब्रह्मयज्ञ करावा . त्यानें वेदस्थानीं गायत्रीमंत्राचा पाठ करावा . कारण , गायत्रीमंत्रानें सर्व वेदाचें फल प्राप्त होतें . " ज्यांचा उपनयनदिवशींच वेदारंभ असेल त्यांना हें सांगितलें नाहीं . याप्रमाणें ही दिशा दाखविली आहे .


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP