आतां महानाम्न्यादि व्रतें सांगतो -
अथमहानाम्न्यादिव्रतानि श्रीधरः तिथिनक्षत्रवारांशवर्गोदयनिरीक्षणं चौलवत्सर्वमाख्यातंसगोदानव्रतेषुच एषांलोपेशौनकः व्रतानिविधिनाकृत्वास्वशाखाध्ययनंचरेत् अकृत्वाभ्यस्यतेयेनसपापीविधिघातकः प्रत्येकंकृच्छ्रमेकैकंचरित्वाज्याहुतीः शतं हुत्वाचैवतुगायत्र्यास्नायादित्याहशौनकः स्मृत्यर्थसारेतु त्रीन् षट् द्वादशवाकृच्छ्रान् कृत्वापुनर्व्रतंचरेदित्युक्तं ।
श्रीधर - “ महानाम्नीव्रत, महाव्रत, उपनिषद् व्रत, आणि गोदान हीं चार व्रतें क्रमानें जन्मापासून तेराव्या, चवदाव्या, पंधराव्या आणि सोळाव्या वर्षीं उत्तरायणांत चौलास सांगितलेली तिथि, नक्षत्र, वार, अंश, वर्ग, लग्न यांची शुद्धि पाहून करावीं, असें सांगितलें आहे. ” या व्रतांचा लोप झाला असतां सांगतो शौनक - “ ब्रह्मचार्यानें यथाविधि व्रतें करुन आपल्या शाखेचें अध्ययन करावें. व्रतें केल्यावांचून जो वेदाचा अभ्यास करितो तो विधिघातक असल्यामुळें पापी समजावा. प्रत्येक व्रताच्या लोपनिमित्तक एक एक कृच्छ्र प्रायश्चित्त करुन गायत्रीमंत्रानें शंभर आज्याहुति देऊन स्नान ( समावर्तन ) करावें, असें शौनक सांगतो. ” स्मृत्यर्थसारांत तर - तीन, सहा किंवा बारा कृच्छ्र करुन पुनः व्रत करावें, असें सांगितलें आहे.