मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
विमळ चंद्रिका क्षितिजावरत...

तडाग असतों तर - विमळ चंद्रिका क्षितिजावरत...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


विमळ चंद्रिका क्षितिजावरतीं,
तरळ तारका चमचम करिती,
दिव्य लोकिंची रुचिरा शांती,
तुडुंब भरली गगनांतु; १

ग्रहाग्रहावर भरलें तेज,
तेजाची लयलूटच आज,
रात्रीचा शेवटला साज
देव करिती जणुं स्वर्गांत २

तेज दाटलें, शांति दाटाली,
सौंदर्याची वेलहि फुलली;
प्रेमाच्या नव पुष्पीं नटली
कविच्या ह्दयांत, ३

मंद तेज अवनीवरते तें,
मधु एकांता वाढवितें तें.
त्यांतहि वारा हळूंच हाले
निर्भर रुचिरानंदांत ४

या समथीं जर तडाग असतों;
रम्य दिव्य तें रेखित बसतों;
हीच शांतता अशीच धरितों
शुभ्र जलाच्या हृदयांत. ५

[सौंदर्यानें जीवन बाणे,
प्रेमजागृती हो मग त्यानें,
लहरीवर हें लिहुनी गाणें,
मग दिवसा बसतों गात. ६

चित्रकराला कविरायाला,
अशक्य जें कां उठवायाला,
सौंदर्याच्या नव नव लीला,
त्या उठत्या मम हृदयांत] ७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP