प्रेमाचा पहिला भास - जरि धूप जळत अनलांत । वार्...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
जरि धूप जळत अनलांत । वार्यावर भरतो वास;
जरि देह शिजे दु:खांत । परि सुटका आज मनास.
मन्मानसराजसहंसी । अवतरली स्त्रीरूपानें,
सौंदर्य हृदंगम ज्योती । पाजळते दिव्यत्वानें.
जा, प्रेमदेवते जा जा । बंदिस्त तुझ्या दासानें
तव पुण्यदर्शनें केलें । निमिषांत जिवाचें सोनें.
देहाचा दास मरून । प्रेमाचा उरला जीव;
प्रेमांतच झाला सारा । विश्वाचा अंतर्भाव.
तारुण्यमदाचा श्वास । प्रेमाचा पहिला भास,
मुग्धेचें मोहन तेंही । याहूनि मनोहर नाहीं.
नवरागरक्तिमा रांगें । रविरंजित रजनीवरतीं.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP