माझें गाणें - एक सदा मज हें गाणें, गुंग...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
एक सदा मज हें गाणें, गुंगूं द्या आनंदानें
बालपणांतुनि
तारुण्यांतुनि
काळाच्या कुहरांतोनी, एकच हीं माझीं गाणीं १
छता जगाच्या बदलोत, एक सदा माझें गीत
उच्चनीचता
नलगे आतां
कसलीही परवा नाही; गाण्यांतच सारें काहीं २
गाण्यानें केलें वेडें, बंधाचे तुटले वेढे
स्वैरपणाची
यात्रा साची
गाण्याची करणें आतां, दिव्याची वाचिक गाया ३
बेफिकीर आत्मा झाला गाऊं द्या अक्षय त्याला
येथें तेथें
एकच जें तें
गाण्याचे दिसती सूर; भ्रमपटलें झालीं दूर ४
व्रम्हारूप या आम्हांला, कबळूं द्या ब्रम्हांडाला
ऋणें संपलीं
मरणें मेलीं
गाण्याविण नुरलें कांहीं, गाण्याला वंधन नाहीं ५
नवयुग, मे १९२१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP