निजलेल्या मुलास - ऊठ मुला
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
ऊठ मुला, ऊठ मुला, बघ हा अरुणोदय झाला !
नवरंगीं किरणांनीं भूषविली बघ ही अवनी.
मोदभरें रान भरे, मंद सुगंधातें विखरें,
शीतल हा वात पहा, आळस हरण्या येत अहा !
किलबिलती, बागडती, वृक्षांवरतीं पक्षि किती !
रव करीती भूंगतती, पुष्णांचा मकरंद पिती.
फुलांवरी, फळांवरी, पतंग मोदें मजा करी.
झटकन बसे, झटकन उठे, उंच भरार्या घेत सुटे.
आनंदें नभ कोंदें, हरुनि आळसा तरतरि दे.
पूर्वेला रवि आला, मुला उठाया कयित तुला.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP