पाळणा
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
निज रे निज बाळ,
लडिवाळा, हालविते हिंदोळा
आणुं नको चित्तीं
क्षणही ती नश्वर संशय भीति
चंचल निमिषाचे
मोहन ते, सुंदर म्हणती ज्यातें
फसवुनिया तूतें
जाइल ते अक्षय बा दु:खातें
आशा हृदयाच्या
जरि दिसती दृरून सोज्ज्वल कांती
धरिती परित हातीं
हो माती, सोडून दे ती भ्रांति
काळा नच कांहीं,
ठाउक ती, थोर तुझी विख्याती
निंदा स्तुति सारी
सोडुन दे निज निज परमानंदे
झोंपेमधिं कांहीं
भवदायी, स्वप्न न सजणा पाही
सुख दु:खें चिंता
निभ्रांता भिवविति न तुला आता
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP