नि:श्वास (?) - हेहचिंतनीं जीव जाळुनि हा ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
हेहचिंतनीं जीव जाळुनि हा कुठवर घ्यावा,
घाल मोहिनी तूं फुंकूनी गोड गडे पांवा.
तव अधरींचें प्रेम - लाडके कवीश नमि यातें;
तव हृदयींचें श्वसन - अहा त्या प्रेरितसे गीतें.
तव हृदयींची सुखद उष्णता प्रेम भरी हृदयीं;
नवल न मग तदगीत ऐकतां मन मोहुनि जाई.
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP