भटकणें - सर्व जगानें मला टाकिलें म...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
सर्व जगानें मला टाकिलें म्हणून धरिलें तुला;
तुझ्याच मजनीं तुझ्याच चरणीं जीवभाव वाहिला.
तुझ्याजवळ मी कशी देवते, प्रेमयाचना करूं ?
हा गवताहुनि दीन दास तव, दूर नको परि धरूं.
थोर थोर नर नित्य वांछिती तुझें कृपाबीक्षण,
तव चरणाच्या धूळिं लोभलें दुबळें माझें मन.
तव हाताचा गोड जाहला स्पर्श मला जेधवां,
तुझिया भजनीं मात्र वाहिलें तेव्हांपासुनि जिवा.
गेला भडकुन राही जाउन वनस्मशानीं जरी,
या गगनाची शपथ, लोचनीं तुझीच मूर्ती परी.
निराश झालों बधुनि सभोंतीं पर्यतमाला जरी,
रडत बैसलों बाळपणींही तझ्याच नांवें तरी.
परदेशामधिं दिवस कंठिले, सौख्य सर्व टाकिलें;
आशा कीं मज दिसतिल कोठें रम्य तुझीं पाउलें.
मैदानावर खुळया पिशापरि भटकत फिरलों किती !
किती कोटली रात्र तयाची नाहीं हृदया क्षिती.
किति हृदयाची तीव्र वेदना तुजसाठीं सोशितों !
परि अजुनी तूं दूर किती वद पथ दु:खद वाटतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP