मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
वसंत आला । बाळा तुज रंजवि...

वसंत - वसंत आला । बाळा तुज रंजवि...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


वसंत आला । बाळा तुज रंजविण्याला.
वृक्षांवरि नव पल्लव आले,
लाल लाल वन दिसूं लागलें,
दिगंतरीं हिम दडोनि गेलें.
आम्रतरूला । मोहोर कसा बघ आला ! १

पुष्पित लतातरू हे होती,
दिशासुगंधें भरोनि जाती,
माणें भमर मनोहर गाती,
शीतल वारा । श्रम दूर करी तव सारा. २

मधमाशा मधुसंचय करिती,
नभांत पक्षी स्वैर विहरती.
कोकिळ मंजुळ गायन गाती,
सुखकर झाला । हा वसंत सर्व जगाला. ३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP