पारवा - भिंत खचली, कलथून खांब गेल...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
भिंत खचली, कलथून खांब गेला,
जुनी पडकी उदध्वस्त धर्मशाला;
तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो.
सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे,
घार मंडळ त्याभंवतिं घालिताहें.
पक्षि पानांच्या शाम्त सावल्यांत
सुखें साखरझोपेंत पेंगतात.
तुला नाहीं परि हौस उडायाची,
गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची,
उष्ण झळया बाह्रे तापतात.
गीतनिद्रा तव आंत अखंडीत.
चित्त किंवा तव कोंवळ्या विखारें
दुखतखुपतें का सांग, सांग वा रे !
तुला कांहीं जगतांत नको मान ?
गोड गावें मग भाग हें कुठून ?
झोंप सौरत्यानंदांत मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची ?
दु:खनिद्रें निद्रिस्त बुद्धराज
करुणगीतें घुमवीत जगीं आज.
दु;खनिद्रा ती आज तुला लागे;
तुझें जागही निद्रिस्त तुझ्हा संगें.
फिरे माझ्या जगतांत उष्ण वारें,
तुला त्याचें भानही नसे बा रे !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP