आनंदी - प्रवासी
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
ही शांत वेळ दिसते बहु सौख्यदायी
हा भागुनी अरुणा अस्तगिरीस जाई
हा भागला पवन शीतल मंद आहे
हा वृक्षसंघहि अतीव निवांत आहे १
सायंकाळीं उलुनि कलिका वास जो रम्य येत
त्या वासाला भुलुन मन हें सौख्यदायीच होत
पक्षी वृक्षावरति बसुनी गोडसें गीत गाती
नाना शब्दां अळवुनि किती मंदिरा शीव्र जाती २
भक्ष्यशोधन तें सर्व सोडुनीयां
सुखें विहराया जमति एक ठाया
उठें सर्वांचा शब्द मजेदार
तयें पांथस्था सौख्य होत फार ३
वृक्ष असती घनदाट सभोंतीं हे
वनश्रींचें उद्यान गमे आहे
हरित वस्त्रा नेसोनि मही छान
सुखवि माझ्यापरि वाटसरा जाण ४
भव्य मंदिर ही भूमि गमे मातें
लावियलें नभ छतचि हें तयातें
असति झुंबर हें चंदसूर्य त्याला
सर्व निर्मियलें आमुच्या सुखाला ५
असे आनंदी सर्व जरी त्यातें
ईशकरणी आनंदमयचि होते
असे दु:खी जो त्यास दिसे दु:ख
रहा आनंदी सर्व तुला सौख्य ६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP