मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
हा शोक उगाच कशाला, क्षयरो...

क्षय - हा शोक उगाच कशाला, क्षयरो...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


हा शोक उगाच कशाला, क्षयरोग जरी मज झाला - माउली.
जन्मला, दिसे क्षय त्याला; क्षय जडला सर्व जगला - माउली.
वर्षांत
वाहला येथ,
झरा जो शांत
क्षयी तो झाला - ग्रीष्मांत उडोनी गेला - माउली.
कीर्तीला क्षय काळाला - जरि अनंतही तो असला - माउली,
क्षय जें जें दिसतें त्याला - तेजाला. घोर तमाला - माउली.
चंद्रमा
भारितो नभा
वितरुनी स्वभा,
परी क्षय त्याला - क्षय सुटला नाहीं रविला - माउली.
जीवित हें दों दिवसांचें, आज ना उद्यां सरणार, माउली,
परि धर्मी नित्य रमावें, हें मात्र यांतलें सार - माउली.
परमेश -
पदीं सहवास
सदाचा वास
शांतिसह व्हावा - कांहिं असा पंथ धरावा - माउली !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP