बालकवींची पहिली कविता - निंब, जांब, जांभूळ, शेंदर...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
निंब, जांब, जांभूळ, शेंदरी,
तुळशी बहुतचि झाक मारी;
जणूं काय ती येत धावुनी,
असेंच वाटे पहा साजणी.
पुढे पाहिली खैरी झाडें,
जणूं करिति तीं हात वाकडे;
खांद्या त्यांच्या उंच वाढती
स्वर्गा कवळाय त्या बघती !
पुढे पाहिलीं नारळि झाडें.
हीं ‘नारळि झाझें’ हि तेथे कवींनीच निर्माण केलेलीं !
तशीच मोठी मेंदी वाढे;
जाइजुई ती फार दाटली
गुंफा मोठी बहुतचि झाली !
अशा वनीं मीं ऐकिलि मुरली,
तिला ऐकुनी वृत्ति मुराली !
काय कथूं त्या सुस्वर नादा ?
पुढे पाहिलें रम्य मुकुंदा !
गोपांनी तो वेष्टित दिसला,
गळाम फुलांचा हार शोभला;
पीतांवर तो कमरिं खोविला,
गोप खेळती नाना खेळां,
किती खेळती नाना खेळां,
किती खेळती आटयापाटया,
किती खेळती दांडू - विटया;
अशा करिति ते नाना लीला,
देवहि भक्तां आधिन झाला !
वाटतें जावें ! तत्कमल - मूखा पहावें ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP