टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगे, देवाचीया दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
दरबारी आले रंक आणी राव, सारे एकरुप नाही भेदभाव, गावू नाचू सारे होऊनी निसंग ॥१॥
जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसूनीया मने रीझवावी, ताल देवोनी हा बोलतो मृदुंग बोलतो मृदुंग ॥२॥
ब्रह्मानंदी ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, एक एक खांब वारकरी होई, अनाथाचा नाथ झाला अनाथाच नाथ झाला पांडुरंग ॥ देवाचीया द्वारी आज रंगला अभंग ॥३॥