सदा सर्वकाळ अंतरी कुटील तेणे गळा माळ घालू नये ॥धृ॥
ज्यासी नाही धर्म दया क्षमा शांती तेणे अंगी विभूति लावू नये ॥१॥
ज्याचे मन नाही लागले हातासी तेणे प्रपंचासे सोडू नये ॥२॥
जयासी न कळे भक्तिचे महिमान तेणे ब्रह्माज्ञान बोलू नये ॥३॥
तुका म्हणे ज्यासी नाही हरीभक्ति तेणे भगवी हाती घेऊ नये ॥४॥